Friday 10 April 2020

शेजारी देशांमध्ये विशेष विमानाने पोहोचवली औषधे.

🔷भारताप्रमाणे अन्य शेजारचे देशही करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. भारताने या देशांना मदत पाठवायला सुरुवात केली आहे.

🔷तर सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचे ठरणारे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध भारताने या देशांना पाठवले आहे. साऊथ ब्लॉकमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.तसेच हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन ही गोळी करोना व्हायरसवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. अमेरिकेने याच औषधाच्या निर्यातीसाठी भारतावर दबाव टाकला होता.

🔷भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत.
मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून 10 टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे.

🔷अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

मेक्सिको वगळता इतर देशांची तेल उत्पादन घटवण्यास मान्यता

मेक्सिको वगळता इतर प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावर मतैक्य झाले आहे. ओपेक या तेल उत्पादक व निर्यातदार देशांची बैठक होऊन त्यात जुलैपर्यंत तेलाचे उत्पादन दर दिवशी १ कोटी पिंपे व वर्षअखेरीपर्यंतच्या काळात ८० लाख पिंपांनी कमी करण्यावर मतैक्य झाले. पण त्याला मेक्सिकोने मान्यता दिलेली नाही.
ओपेक व रशियासह काही मित्र देश यांची आभासी बैठक गुरुवारी झाली. तेलाचे दर दोन दशकातील नीचांकी होत आले असून घसरण रोखण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करणे गरजेचे आहे, पण मेक्सिकोने त्यासाठी मान्यता देणे गरजेचे आहे. मेक्सिकोने त्यांच्या वाटय़ाचे तेल उत्पादन दिवसाला चार लाख पिंपानी कमी करणे गरजेचे आहे.
मेक्सिकोच्या ऊर्जा मंत्री रोसिओ नहले गार्सिया यांनी सांगितले, आम्ही दिवसाला १ लाख पिंपे उत्पादन कमी करण्यास तयार आहोत. मार्चपर्यंत मेक्सिकोने १७ लाख पिंपे उत्पादन केले आहे. दिवसाला १ कोटी पिंपे तेल उत्पादन घटवण्याचा सौदी अरेबिया आणि रशियाचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे असे व्हेनेझुएलाने म्हटले आहे.
जगात

कोविड-19: बंदरावरील कामकाज सुरळीत ठेवण्यात नौवहन मंत्रालयाची सक्रिय भूमिका.

✅कोविड -19 च्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर नौवहन आणि बंदरातील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी, अडचणींना कमी करण्यासाठी आणि त्याच वेळी लॉकडाऊन दरम्यान लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासाठी नौवहन मंत्रालयाने सक्रिय पावले उचलली आहेत.

✅महत्वाच्या बंदरांवर झालेली मालवाहतूकगतवर्षी मार्च ते एप्रिल या काळात 699.10 दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती जी यावर्षी याच कालावधीत 0.82% वाढून 704.63 दशलक्ष टन झाली आहे.

〽️कोविड-19 चा सामना करण्यासाठी नौवहन मंत्रालयातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या जसे की:-

📛थर्मल स्कॅनिंग....

✅महत्वाच्या बंदरांवर बंदर वापर करणाऱ्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्क, विलंब शुल्क, दंड किंवा भाड्यात सूट

✅प्रमुख बंदरांना निर्देश देण्यात आले आहेत की सवलत कराराच्या तरतुदीनुसार विद्यमान आणि कार्यान्वित पीपीपी ( सरकारी-खाजगी भागीदारी) प्रकल्पांसाठी सर्व दंडात्मक परीणामांना ते माफ करू शकतात.

✅कोविड-19 चा सामना करण्यासाठी महत्वाच्या बंदरांच्या ठिकाणची रुग्णालयांची सज्जता..

✅कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 7 कोटी रुपये पंतप्रधान मदत निधीत

✅नौवहन मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली बंदरे आणि मालवाहू कंपन्यांच्या सीएसआर निधीतून पंतप्रधान मदत निधीत 52 कोटी रुपयांहून अधिक साहाय्य.

✅कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी नौवहन मंत्रालयाने नौवहन कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. सर्व भारतीय नौवहन कंपन्यांसह नौवहन क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांसाठी या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
 
✅मालाच्या आयात-निर्यातीसाठी बंदरात उतरवण्यात आलेल्या कंटेनरना त्यांच्या करारातील अटीनुसार किंवा त्यापेक्षा अधिक काळ थांबण्याच्या व्यवस्थेसाठी 22 मार्च 2020 ते14 एप्रिल 2020 (या दोन्ही तारखा धरून) अतिरिक्त शुल्क न आकारण्याबाबत नौवहन मंत्रालयाने सर्व सागरी मालवाहतूक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

भारताचे संशोधक करोनावर शोधणार लस, ऑस्ट्रेलियाशी केला करार

- आजवर जगभरात सुमारे ८८००० लोकांचा बळी घेणाऱ्या आणि लाखो लोकांना लागण झालेल्या कोरोना विषाणू (कोविड-19)वर लस शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केल्याची घोषणा इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने केली आहे. 

- भारतात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत कराराच्या माध्यमातून सहयोग साधला आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढण्यासाठी या सहयोगातून प्रचंड प्रमाणावर संशोधन हाती घेतले जाणार आहे.

- या दोन खंडांमधील या लक्षणीय सहकार्यामुळे आयआयएल आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया)मधील वैज्ञानिक कोडोन डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून 'लाइव्ह अटेन्युएटेड सार्स - सीओव्ही-2 लस' किंवा कोविड-19 लसीचा शोध लावणार आहेत. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह हे रोगप्रतिबंधक, सक्रिय, सिंगल डोस प्रतिकारात्मक औषध मानवी शरीरात कोरोना विषाणूंशी लढण्यासाठीची लस तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान आश्वासक आहे. या लसीमुळे एकाच डोसमधून दीर्घकाळ सुरक्षितता आणि इतर अधिकृत सक्रिय रोगप्रतिकारक लसींप्रमाणे लाभ मिळणे अपेक्षित आहे.

- संशोधन पूर्ण झाल्यानंतर या लसीचे अंश इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला हस्तांतरित केले जातील आणि लस बनवणाऱ्या कंपन्या देशातील सीडीएससीओ (द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)च्या नियमनानुसार टप्प्याटप्प्याने पुढील क्लिनिकल चाचण्या घेतील.

- या संदर्भात इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के आनंद कुमार म्हणाले, "या संशोधन सहकार्यातून तातडीच्या सार्वजनिक आरोग्य गरजा पूर्ण करण्यास आयआयएल बांधिल आहे. आयआयएलची मोहीमच आहे 'वन हेल्थ' मोहिमेला पाठबळ देणाऱ्या लसी तयार करणे आणि त्यांचा पुरवठा करणे.

- कोविड-19 या साथीच्या संकटासाठी लस तयार करण्याचा उपक्रम आयआयएलने हाती घेतला आहे. मानवजात आणि प्राण्यांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील लसी तयार करण्यातील आमच्या नेतृत्व स्थानामुळे या उपक्रमात यश मिळवणे आम्हाला शक्य होणार आहे."

- कोडोना डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानामुळे आम्ही एंटेरोवायरस सी (), ह्युमन इम्युनोडेफिशीअन्सी वायरस टाइप 1, झिका वायरस अशा विविध आरएनए विषाणूंचा प्रसार यशस्वीरित्या कमी करू शकलो आहोत.
---------------------------------------------------

महामारीच्या काळात सुरक्षित कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी TRIFED आणि UNICEF यांच्यात भागीदारी

- भारतातल्या आदिवासी जमातीचे लोक सुरक्षितपणे आपले काम चालू ठेवण्यासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेनी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर भागीदारी केली आहे.

- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याविषयीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बचत गटांसाठी (SHG) डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक डिजिटल संपर्क धोरण’ विकसित करणे, हे या भागीदारीचे लक्ष्य आहे.

- भागीदारीनुसार, UNICEF बचत गटांना डिजिटल मल्टीमीडिया सामग्रीच्या रूपात माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती मदत देणार. तसेच महामारीला प्रतिसादासाठी आभासी प्रशिक्षण देण्यासाठी आभासी कार्यशाळा, मुख्य प्रतिबंधक वर्तन; सामाजिक अंतर राखण्याविषयी सोशल मीडिया मोहीमा; आणि वन्य रेडिओ याविषयी आवश्यक ती मदत दिली जाणार.

- हा उपक्रम सर्व 27 राज्यांमध्ये राबावविला जाणार आहे. देशात सुमारे 18,075 वन धन बचत गट आहेत. त्यापैकी 15 हजार बचत गट डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून वन धन सामाजिक अंतर जनजागृती नि उपजीविका केंद्र’ म्हणून नेमले जाणार आहेत. ही केंद्रे महामारीच्या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी जागरूकता निर्माण करणार.

- आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) याची स्थापना 1987 साली झाली. आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करणारी ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था आहे.

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (United Nations Children's Fund –UNICEF) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे जी जगभरातल्या बालकांपर्यंत मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरविण्यासाठी जबाबदार आहे.

- या संघटनेची उपस्थिती 192 देश आणि प्रातांमध्ये आहे. संघटनेची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्युयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.
---------------------------------------------------

नेशनल पार्क - राज्यवार

🌴राजस्थान
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

🌴मध्य प्रदेश
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

🌴अरुणाचल प्रदेश
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

🌴हरियाणा
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

🌴उत्तर प्रदेश
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

🌴झारखंड
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

🌴मणिपुर
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

🌴सिक्किम
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

🌴तरिपुरा
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

🌴तमिलनाडु
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

🌴ओडिसा
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

🌴मिजोरम
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

🌴जम्मू-कश्मीर
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

🌴पश्चिम बंगाल
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

🌴असम
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

🌴आध्र प्रदेश
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूगवामी नेशनल पार्क
4. श्री वेंकटेश्वरम राष्ट्रीय पार्क
5. कावला राष्ट्रीय पार्क
6. नागार्जुन सागर राष्ट्रीय पार्क
7. नेलापत्तु पक्षी राष्ट्रीय पार्क

🌴महाराष्ट्र
1. बोरीवली ( संजय गांधी ) राष्ट्रीय पार्क
2. चांदोली राष्ट्रीय पार्क
3. तबोड़ा राष्ट्रीय पार्क
4. गुग्गामल राष्ट्रीय पार्क
5. नवागांव राष्ट्रीय पार्क
6. तन्सा नेशनल पार्क, थाणे
7. मेलघाट राष्ट्रिय अभ्यारण्य

🌴अण्डमान-निकोबार
1. सैडिल पीक राष्ट्रीय उद्यान
2. महात्मा गाँधी मैरीन ( वंदूर ) राष्ट्रीय उद्यान
3. फोसिल राष्ट्रीय पार्क
4. कैंपबैल नेशनल पार्क
5. गलेथा राष्ट्रीय पार्क
6. माऊंट हैरिट नेशनल पार्क
7. रानी झांसी मैरीन राष्ट्रीय पार्क

🌴हिमाचल प्रदेश
1. पिन वैली पार्क
2. ग्रेट हिमालय राष्ट्रीय पार्क
3. रोहल्ला राष्ट्रीय पार्क
4. किरगंगा राष्ट्रीय पार्क
5. सीमलबरा राष्ट्रीय पार्क
6. इन्द्रकिला नेशनल पार्क
7. शिकरी देवी अभ्यारण्य

🌴गजरात
1. गिर राष्ट्रीय पार्क
2. मरीन राष्ट्रीय पार्क
3. ब्लेक बुक राष्ट्रीय पार्क
4. गल्फ आफ कच्छ
5. वंसदा नेशनल पार्क

🌴उत्तराखण्ड
1. जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क
2. वैली आफ फ्लावर राष्ट्रीय पार्क
3. नन्दा देवी राष्ट्रीय पार्क
4. राजाजी नेशनल पार्क
5. गोविन्द पासू विहार नेशनल पार्क
6. गंगोत्री राष्ट्रीय पार्क

🌴छत्तीसगढ
1. कांगेर घाटी ( कांगेर वैली ) राष्ट्रीय पार्क
2. इन्द्रावती राष्ट्रीय पार्क
3. गुरू घासीदास ( संजय ) राष्ट्रीय उद्यान

🌴करल
1. साइलेंट वैली राष्ट्रीय पार्क
2. पेरियार नेशनल  पार्क
3. मैथीकेतन नेशनल पार्क
4. अन्नामुदाई नेशनल पार्क
5. एर्नाकुलम नेशनल पार्क

🌴कर्नाटक
1. बांदीपुर राष्ट्रीय पार्क
2. नागरहोल ( राजीव गांधी ) राष्ट्रीय उद्यान
3. अंसी राष्ट्रीय पार्क
4. बनेरघाटला नेशनल पार्क
5. कुडूरमुख नेशनल पार्क
6. तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क

🌴 पंजाब
1. हरिकै वैटलैण्ड नेशनल पार्क

🌴 तेलंगाना
1. महावीर हरीना वनस्थली नेशनल पार्क
2. किन्नरसानी अभ्यारण्य

🌴 गोवा
1. सलीम अली बर्ड सैंचुरी
2. नेत्रावली वन्यजीव पार्क
3. चौरा राष्ट्रीय पार्क
4. भगवान महावीर नेशनल पार्क

🌴 बिहार
1. वाल्मिकी नेशनल पार्क
2. विक्रमसिला गंगटिक डॉल्फिन सैंचुरी
3. कंवर लेक बर्ड सैंचुरी

🌴 नागालैण्ड
1. इंटांग्की अभ्यारण्य, कोहीमा

🌴 मेंघालय
1. बलफकरम नेशनल पार्क
2. सीजू अभ्यारण्य
3. नांगखिलेम अभ्यारण्य
4. नोकरेक
=➖=➖=➖=➖=➖=➖=➖=➖

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने....

1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _________ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ________ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 ✔
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 ✔
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश ✔
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ✔
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस ✔
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 ✔

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही ✔

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे ✔
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका ✔
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे ✔
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन ✔
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 ✔

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ ✔

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO ✔
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर ✔
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी ✔
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _________ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा ✔
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP ✔

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी ✔
D. सातारा

30. ___________ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी ✔

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 ✔
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600 ✔
D. सन 1650

33. प्लासीची लढाई __________ रोजी झाली.

A. 23 जानेवारी 1757
B. 23 जून 1757 ✔

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...