Thursday 31 March 2022

पहिल्यांदाच जे MPSC ची परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी..


MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या... 



📚आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..



1. Name of examination

2. Roll number

3. Question booklet number

4. Question booklet series

(A, B, C, D)

5. Subject CODE 👉  012 

(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच.)

6. तुमची सही..

candidate signature

7. ⚠️ invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )

8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही.. 

9. Question किती attempt केले ते लिहणे ही जुनी OMR असल्यामुळे यात उल्लेख नाही.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात.. 🙏


⚠️एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना,  A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..


👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 11 ते 12  या वेळेला पेपर आहे. वेळेआधीच परीक्षा सेंटर वर जा.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..


⚠️ सर्वात महत्वाचे हॉलतिकिट(कलर प्रिंट आवश्यकता नाही) दोन काळे बॉल पेन,id ची झेरॉक्स,मास्क,साधे घड्याळ सोबतीला राहूद्या.. 


परीक्षा साठी शुभेच्छा.. तब्बेतीची काळजी घ्या.. 💐💐

अखील भारतीय मराठी साहित्य संमेलने


▪️2018(91वे)
▪️बडोदा= गुजरात
▪️अध्यक्ष =लक्ष्मीकांत देशमुख

▪️2019(92वे)
▪️यवतमाळ =महाराष्ट्र
▪️अध्यक्ष =अरुणा ढेरे

▪️2020  (93वे)
▪️उस्मानाबाद =महाराष्ट्र
▪️अध्यक्ष =फ्रान्सीस दिब्रिटो

▪️2021  (94वे)
▪️नाशिक =महाराष्ट्र
▪️अध्यक्ष =जयंत नारळीकर

▪️2022 (95 वे)
▪️उदगीर जी.लातुर = महाराष्ट्र
▪️अध्यक्ष = भारत ससाने


.🟠अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन🟠

🔹सुरुवात : १९०५

🔸कोण भरवते : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

🔹१ ले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : इ.स. १९०५
-ठिकाण : पुणे 
-अध्यक्ष : ग.श्री. खापर्डे

🔸त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते.

🔹९४वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख :  इ.स. २०१४
-ठिकाण : सांगली 
-अध्यक्ष : अरुण काकडे

🔸९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : २२ ते २५ फेब्रुवारी २०१९,
-ठिकाण : नागपूर 
-अध्यक्ष : प्रेमानंद गज्वी

🔹१००वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : २७ ते २९ मार्च २०२०, 
-ठिकाण : सांगली 
-अध्यक्ष : डॉ. जब्बार पटेल✅

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

महत्वाचे दिनांक.

23 मे 1498  ➖ वास्को द गामा भारतात प्रवेश.
31 डिसेंबर 1600 ➖ ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.
19 फेब्रुवारी 1630 ➖ छ. शिवाजी महाराजांचा जन्म.
14 मे 1657 ➖ छ. संभाजी महाराजांचा जन्म.
05 एप्रिल 1663 ➖ शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
10 नोव्हेंबर 1659 ➖ अफझलखानचा वध.
19 ऑगस्ट 1666 ➖ राजेंची आग्रा कैदेतून सुटका.
06 जून 1674 ➖ छत्रपतींचा शिवराज्यभिषेक.
03 एप्रिल 1680 ➖ छ. शिवरायांचे निधन.
11 मार्च 1689 ➖ छ. संभाजी राजेंचे निधन.
23 जून 1757 ➖ प्लासीची लढाई.
22 ऑक्टोंबर 1764 ➖ बक्सार चे युद्ध.
19 डिसेंबर 1773 ➖ बोस्टन टी पार्टी.
03 मार्च 1776 ➖ पुरंदरचा तह.
04 जुलै 1776 ➖ अमेरिकेला स्वातंत्र्य.
17 मे 1782 ➖ साल्बाईचा तह.
31 डिसेंबर 1802 ➖ वसईचा तह.
11 एप्रिल 1827 ➖ महात्मा फुलेंचा जन्म.
28 ऑगस्ट 1828 ➖ ब्राम्हो समाजाची स्थापना.
26 ऑगस्ट 1852 ➖ बॉम्बे असोसिएशनची स्थापना.
16 एप्रिल 1853 ➖ भारतात रेल्वेची सुरुवात.
23 जुलै 1856 ➖ लो. टिळकांचा जन्म.
10 मे 1857 ➖ 1857 चा उठावाला सुरवात.
31 मे 1857 ➖ 1857 च्या उठावाची नियोजित तारीख.
01 नोव्हेंबर 1858 ➖ अलाहाबाद राणीचा जाहीरनामा .
12 जानेवारी 1863 ➖ स्वामी विवेकानंदांचा जन्म.
31 मार्च 1867 ➖ प्रार्थना समाजाची स्थापना.
2 ऑक्टोंबर 1869 ➖ महात्मा गांधीजींचा जन्म.
24 सप्टेंबर 1873 ➖ सत्यशोधक समाजाची स्थापना.
26 जून 1874 ➖ राजश्री शाहू महाराजांचा जन्म.
10 एप्रिल 1875 ➖ आर्य समाजाची स्थापना.
17 नोव्हेंबर 1875 ➖ थिओसोफिकल सोसायटी स्थापन.
18 मे 1882 ➖ स्था. स्वराज्य कायदा पास.
25 डिसेंबर 1885 ➖ राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.
28 नोव्हेंबर 1890 ➖ महात्मा फुले यांचे निधन.
14 एप्रिल 1891 ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म.
11 सप्टेंबर 1893 ➖ शिकागो धर्मपरिषदेत स्वा. विवेकानंद.
10 मे 1897 ➖ रामकृष्ण मिशनची स्थापना.
22 जून 1897 ➖ चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
26 जुलै 1902 ➖ शाहूचे मागास.  50% आरक्षण.
16 ऑक्टोंबर 1905 ➖ बंगालची फाळणी.
30 डिसेंबर 1906 ➖ मुस्लिम लीगची स्थापना.
01 जुलै 1909 ➖ कर्झन वायलीची हत्या.
21 डिसेंबर 1909 ➖ ब्रिटिश अधिकारी जॅक्सन ची हत्या.
12 डिसेंबर 1911 ➖ बंगालची फाळणी रद्द.
28 एप्रिल 1916 ➖ महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.
13 एप्रिल 1919 ➖ जालियनवाला बाग हत्याकांड.
1 ऑगस्ट 1920 ➖ लो. टिळकांचा मृत्यू.
5 फेब्रुवारी 1922 ➖ चौराचौरी येथील हत्याकांड.
20 जुलै 1924 ➖ बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.
9 ऑगस्ट 1925 ➖ काकोरी कट.
20 मार्च 1927 ➖ चवदार तळ्याचा सत्याग्रह.
25 डिसेंबर 1927 ➖ मनुस्मृती ग्रंथाचे दहन.
03 फेब्रुवारी 1928 ➖ सायमन कमिशन भारतात आले.
17 फेब्रुवारी 1928 ➖ सॉंडर्स ची हत्या(भगतसिंग-राजगुरू)
8 एप्रिल 1929 ➖ भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.
02 मार्च 1930 ➖ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
12 मार्च 1930 ➖ महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.
12 डिसेंबर 1930 ➖ ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान.
23 मार्च 1931 ➖ भगतसिंग,  राजगुरू, सुखदेव फाशी.
16 ऑगस्ट 1932 ➖ रॅम्से मॅकडोनाल्ड जातीय निवाडा.
24 सप्टेंबर 1932 ➖ गांधी व आंबेडकर  पुणे करार.
23 ऑक्टोंबर 1935 ➖ आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा.
13 मार्च 1940 ➖ ओडवायरची हत्या ( उद्धम सिंग ).
23 मार्च 1942 ➖ क्रिप्स कमिशन भारतात आले.
18 जुलै 1942 ➖ शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
24 ऑक्टोंबर 1945 ➖ संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
16 मे 1946 ➖ त्रिमंत्री योजना जाहीर.
9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेची पहिली बैठक.
11 डिसेंबर 1946 ➖ राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष
18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित.
15 ऑगस्ट 1947 ➖ भारताला स्वातंत्र्य मिळाले.
29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब.
23 ऑक्टोंबर 1947 ➖ जम्मू काश्मीर भारतात विलीन.
20 फेब्रुवारी 1948 ➖ जुनागड संस्थान भारतात विलीन.
17 सप्टेंबर 1948 ➖ हैदराबाद संस्थान भारतात विलीन.
10 डिसेंबर 1948 ➖ मानवी हक्काचा जाहीरनामा.
26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.
26 जानेवारी 1950 ➖  राज्यघटनेची अंमलबजावणी.
28 सप्टेंबर 1953 ➖ नागपूर करार.
14 ऑक्टोंबर 1956 ➖ डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण.
1 नोव्हेंबर 1956 ➖ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना.
06 डिसेंबर 1956 ➖ बाबासाहेबांचा महापरीनिर्वान दिवस.
1 मे 1960 ➖ महाराष्ट्र राज्याची स्थापना.
19 डिसेंबर 1961 ➖ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.
1 मे 1962 ➖ महाराष्ट्रात पंचायतराज सुरुवात.

महत्त्वाचे प्रश्नसंच

प्र. अलीकडेच कोणत्या शहरात जागतिक औषध केंद्र स्थापन करण्यासाठी WHO ने भारतासोबत करार केला?

उत्तर :- जामनगर

प्र. अलीकडेच, "सैफ अंडर-18 महिला चॅम्पियनशिप 2022" या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

उत्तर :- भारत

प्र. नुकतेच निओ बँक अ‍ॅव्हेल फायनान्सचे संपादन कोणी जाहीर केले आहे?

उत्तर :- ओला

प्र. अलीकडेच AAI ने स्वदेशी हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी कोणाशी करार केला आहे?

उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

प्र. अलीकडे २६ मार्च २०२२ रोजी कोणत्या देशाने ५१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला?

उत्तर :- बांगलादेश

प्र. अलीकडेच संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे

प्र. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संरक्षण दल हेल्प डेस्क सुरू केला?

उत्तर :- उत्तराखंड

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' किती काळासाठी वाढवली आहे?

उत्तर :- सप्टेंबर २०२२

प्र. अलीकडेच भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

उत्तर :- हिमंता बिस्वा सरमा

प्र. अलीकडे संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे?

उत्तर :- २१

प्र. अलीकडेच, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आला आहे?

उत्तर :- १ वर्ष

प्र. अलीकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे महासंचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले आफ्रिकन कोण बनले आहे?

उत्तर :- गिल्बर्ट होंगबो

प्र. नुकताच संडे स्ट्रीट इनिशिएटिव्ह कोणाकडून सुरू करण्यात आला?

उत्तर :- मुंबई पोलीस

----------------------------------------

तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत.

⏹रशियाने शक्तिशाली सैन्याच्या जोरावर युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. युक्रेनला जगापासून तोडण्यासाठी रशियाने युक्रेनच्या ब्रॉडबँड सेवेची यंत्रणाही बेचिराख करण्यास सुरुवात केली.

⏹या पार्श्वभूमीवर युक्रेनचे उपपंतप्रधान आणि डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मिकायलो फेडोरोव्ह यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली. यामुळे युक्रेनचा जगाशी संपर्क तोडण्याचा रशियाचा हेतू अपूर्ण राहणार आहे.

⏹एलोन मस्क यांनी स्वतः युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत युक्रेनमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केल्याची माहिती दिली. युक्रेनच्या मंत्र्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर १० तासात एलोन मस्क यांनी युक्रेनमध्ये ही सेवा सुरू झाल्याचं कळवलं.

युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट ; WHO ने देखील व्यक्त केली भीती.

🌸युक्रेनमध्ये युद्धादरम्यान एक नव संकट निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे की, कीव्हसह इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमध्ये ६०० रुग्णालये आहेत. तेथे अजूनही १७०० करोनाचे रुग्ण दाखल आहेत.

🌸डब्ल्यूएचओने आपल्या असेही म्हटले आहे की, करोना रुग्णांव्यतिरिक्त युक्रेनमधील नवजात, गर्भवती महिला आणि वृद्धांनाही वेळोवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते. युद्धाच्या काळात लोकांच्या मनस्थितीवर परिणाम झाल्याने परिस्थितीही चिंताजनक बनली आहे.

🌸कठीण परिस्थितीमुळे तेथील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जवळपास संपला आहे. ऑक्सिजन जनरेटर प्लांटमधून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत.

🌸रशियाने युक्रेनवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा आजचा पाचवा दिवस आहे. देशभरात आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालयांवर म्हणजेच आरोग्य सेवांवरही गंभीर संकट निर्माण झाले आहे. तसेच रुग्णवाहिकेतून रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना त्यांच्यावर गोळीबार होण्याचा धोकाही वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवेवरील स्थगितीला मुदतवाढ.

🎨नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणावर असलेल्या स्थगितीची मुदत ‘पुढील आदेशापर्यंत’ वाढवण्यात आली असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी सांगितले. यापूर्वी १९ जानेवारीला या स्थगितीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

🎨करोना महासाथीच्या फैलावानंतर भारतात २३ मार्च २०२० पासून नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित करण्यात आली आहे. तथापि, काही देशांसोबत करण्यात आलेल्या करारानुसार (एअर बबल अरेंजमेंट) भारत आणि सुमारे ४५ देशांदरम्यान जुलै २०२० पासून विशेष प्रवासी सेवांचे संचालन होत आहे.

🎨‘भारतातून जाणाऱ्या व भारतात येणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांवरील स्थगितीची मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमान सेवा आणि डीजीसीएने खास करून मंजुरी दिलेल्या उड्डाणांना लागू होणार नाहीत’, अ्से डीजीसीएने सोमवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे.

🎨एअर बबल व्यवस्थेंतर्गतच्या विमानोड्डाणांवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०२१ पासून भारत नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू करेल, असे डीजीसीएने २६ नोव्हेंबर २०२१ ला जाहीर केले होते.

🎨दुसऱ्याच दिवशी, करोनाच्या ओमायक्रॉन या उपप्रकाराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय व डीजीसीए यांना केले होते. यानंतर, या विमानसेवेवरील स्थगिती किती काळ कायम राहील याचा उल्लेख न करता डीजीसीएने १ डिसेंबर २०२१ रोजी आपला २६ नोव्हेंबरचा निर्णय फिरवला होता.

युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी यांचे निधन.

🌛🌷ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ व सातारा येथील युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण ऊर्फ पी. एन. जोशी (वय ९०) यांचे साताऱ्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

🌛🌷बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील नामवंत जाणकार म्हणून त्यांची देशभर ओळख होती. त्यांनी रिझव्‍‌र्ह बँक, सारस्वत बँक, बँक ऑफ इंडियात विविध पदांवर काम केले. सातारच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. निवृत्तीनंतर ते साताऱ्यात स्थायिक झाले होते. सातारच्या सामाजिक, सांस्कृतिक व इतर कामांत त्यांचा मोठा सहभाग होता.

🌛🌷बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील सरकारच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी लोकसत्ता आणि विविध माध्यमांतून लिखाण केले. त्यांची ‘माय मेमरीज-गिलीम्सेस ऑफ चेंजिंग बँकिंग सिनॅरिओ’, ‘बँकिंग आणि वित्त धोरण – एक परामर्श’, ‘बदलत्या बँकिंगच्या छटा - माझ्या आठवणी’ (मराठी) व ‘नॅशनल बँकिंग पॉलिसी फॉर इनक्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ ही पुस्तकं गाजली. खासगी बँक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यांचे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अर्थशास्त्रात नियमित वाचन होते. बँकिंग साक्षरतेसाठी त्यांनी राज्यभर लोकजागृती करण्याचे मोठे काम केले.

राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात घट.


🔄राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुमारे १३०० कोटींनी घट झाली आहे. ओमायक्रॉनच्या लाटेत लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

🔄फेब्रुवारी महिन्यात राज्यात वस्तू आणि सेवा कराचे १९ हजार ४२३ कोटींचे संकलन झाले. जानेवारी महिन्यात राज्यात २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले होते. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात संकलनात १२८२ कोटींची घट आली. राष्ट्रीय पातळीवर जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत ५.६ टक्के घट झाली. महाराष्ट्रातही हा कल कायम राहिला.

🔄फेब्रुवारीत २८ दिवस असल्याने जानेवारीच्या तुलनेत संकलन कमीच होते. पण याबरोबरच ओमायक्रॉनच्या लाटेमुळे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीत लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी याचा संकलनावर परिणाम झाल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांची तुलना केल्यास फेब्रुवारीतील संकलन घटले आहे.

आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी.

📛रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचे युद्ध सुरूच असून रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.

📛तसेच युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून, या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे. मारिओपोल, चेर्निव्ह आणि खारकीव्ह येथे तीव्र संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे आपण युक्रेनशी चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलंय.

📛रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोट केल्याचे आरोप फेटाळत  आपल्या मागण्या मान्य झाल्यास युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलंय. रशियाचे अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनने म्हटले आहे की युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोटांचे वृत्त खोटे आणि बनावट आहेत.

📛युक्रेनची राजधानी किव्ह आणि इतर प्रमुख शहरांमध्ये रशियाने हवाई हल्ला केल्याच्या बातम्या खोट्या असून आमचा अपप्रचार करण्यात येतोय, असं ते म्हणाले. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनसोबत चर्चा शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, या युद्धासंदर्भात युक्रेन आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची अट ठेवली आहे.

चीनच्या लाँग मार्च-8 रॉकेटने 22 उपग्रह अवकाशात सोडले.


🔻चीनच्या दुसऱ्या लाँग मार्च 8 रॉकेटने विविध व्यावसायिक चिनी अंतराळ कंपन्यांसाठी देशांतर्गत विक्रमी 22 उपग्रह प्रक्षेपित केले. 

🔺चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (CASC) ने नंतर प्रक्षेपण यशस्वीतेची पुष्टी करून , लाँग मार्च 8 ने 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10:06 वाजता वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून उचलले .

🔻या उपग्रहांचा वापर प्रामुख्याने व्यावसायिक रिमोट सेन्सिंग सेवा, सागरी पर्यावरण निरीक्षण, जंगलातील आग प्रतिबंध आणि आपत्ती निवारणासाठी केला जाईल. 

🔺या मोहिमेने लाँग मार्च वाहक रॉकेटचे ४०९ वे उड्डाण केले.

⚠️सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे : 

🌀चीनची राजधानी: बीजिंग;

🌀चीनचे चलन: रॅन्मिन्बी;

🌀चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

कोव्होवॅक्स लशीला मंजुरी.

💡सीरम इन्स्टिटय़ूटच्या १२ ते १७ वर्षे वयोगटासाठीच्या कोव्होवॅक्स लशीचा आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. करोनाविषयक तज्ज्ञ समितीने गेल्या आठवडय़ात या वयोगटासाठी कोव्होवॅक्स लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरीची शिफारस केली होती़ 

💡त्यानुसार केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून ही मंजुरी मिळाली आहे. १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी सशर्त दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.

💡१२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार ७०७ मुलांवरील दोन अभ्यासांमधील आकडेवारीनुसार कोव्होवॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिबंधक, सुरक्षित असल्याचे औषध महानियंत्रकांकडे करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होत़े.

💡  १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली कोव्होवॅक्स ही चौथी लस आह़े

💡१५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सरसकट लसीकरणाबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

💡लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि लसीकरणासाठी लोकसंख्येच्या समावेशाची व्याप्ती किती वाढवायची, याबाबत सतत तपासणी केली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Russia Ukraine War:”…तर तिसरं महायुद्ध होईल”; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा गंभीर इशारा.

🍄अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. रशियाने जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल असं बायडन म्हणाले आहे. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. तसंच नाटो आणि क्रेमलिनच्या दरम्यान भिडल्यास तिसरं महायुद्ध होईल, असा इशाराही ज्यो बायडन यांनी दिला आहे. तसंच युक्रेनसोबतच्या लढाईत रशिया कधीच जिंकणार नाही, असंही बायडन म्हणाले आहेत.

🍄२४ फेब्रुवारी रोजी रशियाच्या सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. २७ फेब्रुवारीला मॉस्कोने युक्रेनमधली दोन वेगळी क्षेत्रं डोनेट्स्क आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्यो बायडन यांनी सांगितलं की आम्ही युरोपात आमच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणं सुरूच ठेवणार आहोत.

🍄आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नाटो क्षेत्राच्या इंच न इंच भागाचं रक्षण करू आणि नाटोमधल्या अन्य देशांनाही यासाठी प्रेरित करू. त्यांनी सांगितलं की आम्ही युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. बायडन यांनी सांगितलं की नाटो आणि रशिया थेट भिडल्यास तिसर महायुद्ध होईल. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करू.

🍄या आधी बायडन यांनी रशियाची दारू, सी-फूड आणि हिऱ्यासह अन्य व्यापारी संबंधांवर निर्बंध लावण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी बायडन म्हणाले की आता जग पुतीन यांचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहे.

राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर ; तूट २० हजार कोटींनी वाढली, प्रमुख स्रोत आटले.

✅पुढील आर्थिक वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा हा साडेसहा लाख कोटींवर जाणार आहे. यंदाच्या वर्षांत तूट ही २० हजार कोटींनी वाढली आहे. करोनाचा फटका लागोपाठ दुसऱ्या वर्षांही राज्याच्या तिजोरीला बसला असून, जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, वाहन कर, उत्पादन शुल्क या मुख्य आर्थिक स्त्रोतात घट झाली आहे. 

✅गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना १० हजार २२६ कोटींची तूट अपेक्षित होती. नैसर्गिक आपत्ती आणि चक्रीवादळामुळे खर्चात वाढ झाली. परिणामी तूट २० हजार कोटींनी वाढली व ती ३० हजार कोटींवर जाणार आहे. २०२०-२१ मध्ये महसुली तूट ही ४१,१४२ कोटी होती. यंदाच्या वर्षांत ती ३० हजार कोटी असून, पुढील आर्थिक वर्षांत ती तूट २४ हजार ३५३ कोटी होईल, असा अंदाज आहे. प्रत्यक्ष तूट वाढू शकते. आकस्मिक खर्च २३ हजार कोटी झाला आहे.

✅नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले. २०२०-२१ या वर्षांत ६५ हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. पुढील वर्षांत ७७ हजार कोटींचे कर्ज काढण्याचे उद्दिष्ट आहे.  राज्य सकल उत्पन्नाच्या तीन टक्के कर्ज काढण्यास मान्यता असल्याने तेवढय़ा रक्कमेचे कर्ज काढण्यात आले. ही मर्यादा वाढविण्यात आली तरी राज्याने अतिरिक्त कर्ज काढण्याचे टाळले होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...