Thursday 15 December 2022

जाणून घ्या - पृथ्वीची परिभ्रमन गती

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीची परीभ्रमण किंवा पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात.

पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365.25 दिवस लागतात.

पृथ्वीच्या आसाने परीभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 66 1/2° अंशाचा कोन केला आहे.

पृथ्वीचे उत्तर ध्रुवाकडील टोक सतत धृव तार्‍याकडे रोखलेले राहते. याला पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा असे म्हणतात.

पृथ्वीच्या परीभ्रमणामुळे व आसाच्या तिरपेपणामुळे पृथ्वीवर खालील गोष्टी घडून येतात.

सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन – पृथ्वीच्या परिभ्रमन काळात (एका वर्षात) सूर्याचे निरीक्षण केल्यास सूर्य 23 1/2° उत्तर ते 23 1/2° दक्षिण या दोन अक्षांशामध्ये प्रवास करीत असल्याचे दिसतो. यालाच सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात. या घटनेमुळे सूर्य 21 जून रोजी कर्कवृत्तावर (23 1/2° उत्तर) असतो. 21 जून नंतर सूर्य दक्षिणेकडे प्रवास करू लागतो. याला सूर्याचे दक्षिणायन असे म्हणतात. 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (23 1/2° दक्षिण) पोहचतो. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रावास करू लागतो. याला सूर्याचे उत्तरायण काळ म्हणून ओळखला जातो.

असमान दिवस व रात्र – पृथ्वीचे परीभ्रमण व आसाचे तिरपेपण यामुळे पृथ्वीवर असमान दिवस व रात्र निर्माण झालेले आहेत.

पृथ्वीवर 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर (उत्तर गोलार्धात) असतो, या दिवशी कर्कवृत्तावर दिवस मोठा व रात्र लहान असते आणि मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) दिवस लहान व रात्र मोठी असते.

21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र बारा तासाची असते.

22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) असतो. या दिवशी मकरवृत्तावर सर्वात मोठा दिवस व रात्र लहान असते आणि याच दिवशी कर्कवृत्तवार (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठी रात्र व दिवस लहान असतो.

काल्पनिक वृत्ते – सूर्याच्या दक्षिणायन व उत्तरायणामुळे पृथ्वीवर उत्तर गोलार्धात 23 1/2° उत्तर अक्षांशावर कर्कवृत्त व दक्षिण गोलार्धात 23 1/2° दक्षिण आक्षांशावर मकरवृत्त हे काल्पनिक वृत्त निर्माण झालेले आहे.

पृथ्वीवर कटीबंध – पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवरील 23 1/2° 1/2° उत्तर आणि 23 1/2° दक्षिण ते 66 1/2° दक्षिण अक्षांक दरम्यानचा प्रदेश समशीतोष्ण कटीबंध म्हणून व 661/2° ते 90° उत्तर किंवा दक्षिण या भागातील प्रदेश शीत कटीबंध म्हणून ओळखला जातो.

पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती – पृथ्वीवरील असमान दिवस रात्र यामुळे ऋतू निर्माण झालेले आहेत.

उन्हाळा ऋतू – 21 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठा असल्यामुळे प्रकाश व उष्णता जास्त वेळ मिळते. या कारणामुळे या भागात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो.

हिवाळा ऋतू – 23 सप्टेंबर ते 21 मार्च या काळात उत्तर गोलार्धात दिवस लहान व रात्र मोठी असते. यामुळे तेथे उष्णता व प्रकाश कमी काळ मिळतो आणि उष्णता उत्सर्जनाचा काळ जास्त असतो. या कारणामुळे उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.

वातावरणाचे थर


🔶वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 🔴 वातावरणाचे मुख्य थर ...


 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


स्थितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


 स्थितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


सदोष मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न उत्तरे.

➡️ हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

🔰बियास


➡️ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

🔰 तिरुवनंतपुरम


➡️ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

🔰 मध्य प्रदेश


➡️ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

🔰 औरंगाबाद


➡️ हडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

🔰रांची


➡️ फकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

🔰जळगाव


➡️ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

🔰 लक्षद्वीप


➡️ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

🔰 १२ लाख चौ.कि.मी.


➡️ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

🔰 दख्खनचे पठार


➡️ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

🔰 मध्य प्रदेश


➡️ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

🔰 उत्तर


➡️ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

🔰 निर्मळ रांग


➡️ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

🔰 नदीचे अपघर्षण


➡️ दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

🔰 Lignite


➡️ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

🔰 औरंगाबाद


➡️ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

 🔰पाचगणी


➡️ हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

🔰 आसाम


➡️ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

🔰 मणिपूर


➡️ पथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

🔰 मरियाना गर्ता


➡️ गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

🔰 राजस्थान


➡️ घमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

🔰दर्गा


➡️ गरेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

🔰 परशांत महासागर


➡️ कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

🔰 शक्र


➡️ कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

🔰 गोदावरी


➡️ भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

🔰आसाम


➡️ जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

🔰 मणिपुरी


➡️ भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

🔰 महाराष्ट्र


➡️ इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

🔰 आध्र प्रदेश


➡️ पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

🔰 अरूणाचल प्रदेश


➡️ वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

🔰 महाराष्ट्र


➡️ लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

🔰हिमाचल प्रदेश


➡️ फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

🔰 गजरात

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

🏆 पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🏆 उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🏆 उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🏆 विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🏆 अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🏆 रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

🏆 स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

Latest post

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️ ▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ▶️ ...