Friday 8 October 2021

स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तके


1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे 

                                २) बाळासाहेब शिंदे

2) इंग्रजी व्याकरण-  १) बाळासाहेब शिंदे

                               २) एम जे शेख

3) अंकगणित -      १) नितीन महाले

                             २)पंढरीनाथ राणे

4) बुद्धीमत्ता चाचणी- १)जी. किरण

                                 २) सतिष वसे

5) इतिहास -            १) ग्रोव्हर, बेल्हेकर

                                २) जयसिंग पवार

6) भूगोल -               १)ए. बी. सवदी

                                  २) खतीब

7) अर्थशास्त्र -       १) रंजन कोळंबे

                              २)किरण देसले 

8) राज्यव्यवस्था  -    १) रंजन कोळंबे

                                  २) किशोर लवटे

9) सामान्य विज्ञान-   १) सचिन भस्के

                                 २) रंजन कोळंबे

10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड  

                              १) एकनाथ पाटील

                              २) प्रकाश गायकवाड

वरील पुस्तकांपैकी प्रत्येक विषयाचे किमान एक तरी पुस्तक आपल्या कडे असावे.

    तर लागा तयारीला... All The Best

राज्यसेवा परीक्षा 2021 नियोजनअभ्यासासाठी टिप्स--- जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे

-- दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये

-- मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका

-- तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका

-- जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा

-- परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका

-- या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा

-- या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका

--CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत

-- उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा

-- बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.

-- सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते 70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.

-- इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.

-- भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल  व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा

-- राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कम कुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.

-- जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी 

पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.

-- लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका

--- आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.

-- फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2022 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद -- यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा

महत्त्वाचे युद्ध सराव


🌺 कोप इंडिया 2019 (हवाई) 

✍️ भारत-अमेरिका

✍️ कलाईकुंडा & अर्जनसिंह हवाईतळावर (पश्चिम बंगाल)

✍️ 3 ते 14 डिसेंबर दरम्यान

✍️ 2014 पासून


🌺 कोकण 18 (नौदल) 

✍️ भारत-इंग्लंड

✍️ गोव्याच्या समुद्रकिनारपट्टीनजीक

✍️ 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान

✍️ 2004 पासून


🌺 शिन्यू मैत्री - 18 (हवाई)

✍️ भारत-जपान

✍️ आग्रा हवाईतळावर (उत्तर प्रदेश व)

✍️ 3 ते 7 डिसेंबर दरम्यान

✍️ हा पहिलाच सराव


🌺 'इंद्र नेव्ही' (नौदल) (10th) (https://t.me/joinchat/AAAAAEANaOYJb535HKO_TA)🌺

✍️ भारत-रशिया

✍️ विशाखापट्टणम समुद्रकिनारपट्टीनजीक (आंध्र प्रदेश)

✍️ 9 ते 16 डिसेंबर दरम्यान

✍️ 2003 पासून


🌺 'हँड इन हँड' (लष्करी) (7th) 

✍️ भारत-चीन

✍️ चगडू (चीन)

✍️  डिसेंबर 2018

✍️ 2007 पासून


🌺 इंम्बेक्स (IMBEX) 2018-19 ' 

【लष्करी】

✍️ भारत-म्यानमार

✍️ चडी मंदिर (पश्चिम कमांडचे मुख्यालय) (हरियाणा)

✍️  जानेवारी 2019

✍️ 2018 पासून


🌺 सी व्हिजिल (Sea Vigil) 2019 【नौदल】🌺

✍️ भारतीय नौदलाने तटरक्षक दलाच्या साहाय्याने

✍️ भारताचा 7517 km लांबीचा संपूर्ण समुद्रकिनारा, EEZs आणि 13 तटीय राज्ये व केंद्रशासित प्रदेश व्यापणारा पहिलाच बहू-एजन्सी सराव ठरला.

✍️  22-23 जानेवारी 2019


🌺 'IAFTX 2019' सराव' 【लष्करी】 (https://t.me/joinchat/AAAAAEANaOYJb535HKO_TA) 🌺

✍️ भारत-आफ्रिकन देश (12 देश)

✍️ औध, पुणे

✍️  18 ते 27 मार्च 2019


🌺 'कटलास एक्सप्रेस 2019 【नौदल】

✍️ बहुराष्ट्रीय सागरी सराव (15 देश सहभागी)

✍️ जिबुती, मोझाम्बीक, आणि सेशेल्स या देशांच्या किनाऱ्यानजीक

✍️  27 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2019


🌺 'कोब्रा गोल्ड 2019' 【लष्करी】 (38th) 

✍️ बहुराष्ट्रीय लष्करी सराव

✍️ थायलंड येथे 【अमेरिका आणि थायलंडचे लष्कर संयुक्त यजमान】

✍️  फब्रुवारी 2019

✍️ 1982 पासून


🌺 'तोपची 2019' सराव 【लष्करी】

✍️ भारतीय सेनेद्वारे

✍️ दवळाली【नाशिक】

✍️  12 फेब्रुवारी 2019


🌺 'वायू शक्ती 2019' हवाई सराव 【लष्करी】 🌺

✍️ भारतीय हवाई सेनेद्वारे

✍️ पोखरण【राजस्थान】

✍️  8 te 18 फेब्रुवारी

✍️ वायू शक्ती आणि गगन शक्ती हे भारतीय हवाई दलातर्फे आयोजित केले जाणारे मोठे सराव आहेत.


🌺 'मैनामती मैत्री 2019' सराव' 【लष्करी】

✍️ भारताचे सीमा सुरक्षा दल 【BSF】आणि 'बॉर्डर गार्ड्स बांगलादेश' यांच्यामध्ये

✍️ तरिपुरा-बांगलादेशच्या सीमावर्ती भागात आयोजन

✍️  फब्रुवारी 2019


🌺 'संप्रिती 2019' सराव' 【लष्करी】【8th】 ( 🌺

✍️ भारत-बांगलादेश

✍️ तगेल 【बांगलादेश】

✍️  18 ते 27 मार्च 2019

✍️ 2009 पासून


🌺 'अल नागाह ३' सराव 【लष्करी】

✍️ भारत-ओमान

✍️ ओमान

✍️  12 ते 25 मार्च 2019


🌺 'AFINDEX 2019' सराव' 【लष्करी】

✍️ भारत-आफ्रिकन देश (16 देश)

✍️ औध, पुणे

✍️  18 ते 27 मार्च 2019


🌺 'TROPEX 2019' सराव' 【नौदल】 🌺

✍️ भारतीय सेना दल, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, आणि भारतीय तटरक्षक दल सहभागी

✍️ अदमान आणि निकोबार बेटांवर

✍️  जानेवारी ते मार्च 2019

✍️ 2005 पासून


🌺 'IND-INDO CORP-T 2019' सराव' 【नौदल】 

✍️ भारत- इंडोनेशिया

✍️ अदमान आणि निकोबार 【एप्रिल 2019】


🌺 'मित्र शक्ती -6 ' सराव 【लष्करी】

✍️ भारत- श्रीलंका 【एप्रिल 2019】


🌺 'AUS INDEX 2019' सराव' 【नौदल】

✍️ भारत- ऑस्ट्रेलिया

✍️ विशाखापट्टणम 【एप्रिल 2019】


🌺 'बोल्ड कुरुक्षेत्र 2019' सराव' 【लष्करी】

✍️ भारत- सिंगापूर

✍️ झाशी 【उत्तर प्रदेश】


🌺 'वरुण 2019' सराव' 【नौदल】

✍️ भारत- फ्रान्स

✍️ गोवा 【मे 2019】


🌺 'ADMM+ सागरी सराव' 【नौदल】

✍️ ADMM+ चे 18 सदस्य देश सहभागी 【भारतासह】

✍️ सिंगापूर आणि द. कोरिया संयुक्त आयोजन


 🌺 'SIMBEX 2019' सराव' 【नौदल】

✍️ भारत- सिंगापूर 【मे 2019】

✍️ 1993 पासून🌺 'IMCOR' 【8th】

✍️ भारत-म्यानमार समन्वयित गस्त


🌺 'खड्ग प्रहार' सराव【लष्करी】

✍️ भारतीय सेना दलाचा प्रशिक्षण सराव

✍️ अबाला 【पंजाब】【जून 2019】


महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प♦️महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

 

*खोपोली - रायगड              

*भिरा अवजल प्रवाह- रायगड                              

*कोयना - सातारा                

*तिल्लारी - कोल्हापूर          

*पेंच - नागपूर                      

*जायकवाडी - औरंगाबाद


♦️महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प                 

*तारापुर - ठाणे                    

*जैतापुर - रत्नागिरी              

*उमरेड - नागपूर(नियोजित)


♦️महाराष्ट्रातील पवन विद्युत  प्रकल्प                     

*जमसांडे - सिंधुदुर्ग             

*चाळकेवाडी - सातारा           

*ठोसेघर - सातारा               

*वनकुसवडे - सातारा           

*ब्रह्मनवेल - धुळे                 

*शाहजापूर - अहमदनगर

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ...


• डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)


• राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर


• नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)


• कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)


• बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)


• महात्मा फुले- पुणे


• महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)


• गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)


• गोपाळ हरी देशमुख- पुणे


• न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)


• सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)


• बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)


• आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-

शिरढोण (रायगड)


• आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)


• स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)


• सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)


• विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)


• गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)


• विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)


• डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)


• साने गुरुजी- पालघर (रायगड)


• संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)


• सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)


• संत ज्ञानेश्वर- आपेगाव


• संत एकनाथ- पैठण-


• समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी


👉  दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन 


👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल 


👉  लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल


👉 झांशी - सर ह्यु रोज 


👉 बनारस- कर्नल जेम्स नील


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🎯सवदेशी चळवळीचे नेतृत्व


👉पणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक


👉 पजाब - लाला लजपतराय , अजित शिंह


👉 दिल्ली - सय्यद हैदर रझा 


👉मद्रास - चिदम्बरम पिलई

पचायत राज


🔰 भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.


🔰 लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.


🔰 सथानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959


🔰 सथानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार - 1 नोव्हेंबर 1959


🔰 पचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र


🔰 सथानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले


🎯 बलवंतराय मेहता समिती:-


🔰 भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.


🔰 या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.


🔰 या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.


🎯 यासमितीने केलेल्या शिफारशी:-


📌 लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.


📌 पचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.


📌 जया गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.


📌 गरामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.

ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.


📌 जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.


📌 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)


अशोक महेता समिती नियुक्ती - 1977 . शासनास अहवाल सादर - 1978.


🎯 महत्वाच्या शिफारशी:-


🔰 पचायत संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जनतेच्या सहभागास महत्व दिले गेले पाहिजे.


🔰 पचायत संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे बंधनकारक करावे.


🔰 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी.

पंचायत पद्धती व्दिस्तरीय असावी.

महत्वाचे ब्रँड अँबेसिडर


👍1)  महाराष्ट्राचे व्याघ्रदूत :- अमिताभ बच्चन 


👍2) महाराष्ट्र हरितदूत :- सचिन तेंडुलकर 


👍3) युनिसेफ :- प्रियांका चोप्रा  


👍4) नेपाळ क्रिकेट संघटना :- महेंद्रसिंग धोनी 


👍5) केरळ पर्यटन व आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर :- स्टेफी ग्राफ 


👍6) हरियाना राज्याचे ब्रँड अँबॅसेडर :- बाबा रामदेव 


👍7) तेलंगाना राज्य :- सानिया मिर्झा  


👍8) बेटी बचाओ बेटी बढाओ :- माधुरी दीक्षित 


👍9) महाराष्ट्र सरकार व्यसन मुक्ती अभियान :- सिंधुताई सपकाळ 


👍10) युनेसेफ सदभावना राजदूत :- सचिन तेंडूलकर 


👍11) तंबाखु नियंत्रण अभियान :- राहुल द्रविड 


7 पीएम-मित्र केंद्रांची उभारणी करण्यास मंजुरी

🔰केंद्रीय सरकारने 7 “मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपरल पार्क (PM MITRA)” अर्थात “भव्य एकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्र आणि परिधान केंद्रे (पीएम-मित्र)” स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.

🔰प्रकल्पांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योग नकाशात भारताला समर्थपणे स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

🔰पीएम-मित्र केंद्रे पंतप्रधानांच्या 5F संकल्पनेपासून प्रेरित आहेत. ही 5F संकल्पना म्हणजे “शेत ते धागा; धागा ते कारखाना; कारखाना ते फॅशन ते परदेश” अशी पाच सूत्रे होय. अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आणखी वाढीसाठी ही एकात्मिक संकल्पना उपयुक्त ठरणार आहे.

🅾ठळक मुद्दे

🔰पीएम-मित्र केंद्रे वेगवेगळ्या इच्छुक राज्यांमध्ये असलेल्या ग्रीनफील्ड / ब्राउनफील्ड ठिकाणी स्थापन केली जाईल. ज्या राज्यांमध्ये विद्यमान वस्त्रोद्योग परिसंस्थेच्या लगत एक हजार एकरांहून मोठा व विनापाश भूखंड उपलब्ध असेल, त्या राज्यसरकारांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

🔰ग्रीनफील्ड क्षेत्रातील सर्व पीएम मित्र केंद्रांसाठी जास्तीतजास्त 500 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ (DCS) आणि ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पीएम मित्र केंद्रांसाठी जास्तीतजास्त 200 कोटी रुपयांचे विकास भांडवली पाठबळ (DCS) सामायिक पायाभूत विकासासाठी (एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के) दिले जाणार आहे.

🔰पीएम मित्र केंद्रांमध्ये लवकरात लवकर वस्त्रोद्योग सुरु करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला 300 कोटी रुपयांचे स्पर्धात्मकता प्रोत्साहन पाठबळ (CIS) दिले जाणार आहे. राज्यात जागतिक स्तराचे उद्यम नगर स्थापित करण्यासाठी इतर प्रोत्साहनांबरोबरच राज्य सरकारतर्फे 1000 एकर जमीन दिली जाईल.

🔰ग्रीनफील्ड / ब्राऊनफील्ड क्षेत्रातील पीएम मित्र केंद्रांसाठी भारत सरकारचा विकास भांडवली निधी (DCS) एकूण प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के परंतु जास्तीतजास्त 500 कोटी रुपये दिला जाईल.

🔰ब्राऊनफील्ड क्षेत्रांसाठी, मूल्यमापनानंतर, प्रकल्पातील विकासाधीन असलेल्या पायाभूत सुविधा व प्रकल्पाला सहाय्य्यभुत असलेल्या इतर सुविधांसाठी येणाऱ्या खर्चाच्या 30 टक्के, व जास्तीतजास्त 200 कोटी रुपयांपर्यंत विकास भांडवली निधी (DCS) दिला जाईल.

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...