Tuesday 15 September 2020

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.



🧩लोकसंख्या :

1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद

🅾️निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

🅾️कार्यकाल - 5 वर्ष

🅾️विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

🧩आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)

गरामपंचायतीच्या सभासदांची पात्रता.



1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

🅾️गरामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

🅾️सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

🅾️सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

🧩राजीनामा :

🅾️सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

🅾️उपसरपंच - सरपंचाकडे

🅾️निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

🅾️सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

🧩अविश्वासाचा ठराव :

🅾️सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾️बठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

🅾️अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

🅾️तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

🅾️अदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

🅾️आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती.



🅾️जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

🅾️रचना - प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

🅾️सभासद संख्या - प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

🅾️सभासदांची निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

🅾️पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

🅾️आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

🅾️तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

🅾️कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

🅾️अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

🅾️कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

🧩राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

🅾️अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾️सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

🅾️बठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

🧩मख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :

🅾️ परत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

भारतीय वित्तीय व्यवस्था.


🅾️कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.
V
🅾️विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

🧩अर्थ -

🅾️वयापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

🅾️ उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

🅾️ वयापर्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

🅾️ सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

🅾️ अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस 'वित्तीय व्यवस्था' (Financial System) असे म्हणतात.

💠💠भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना.💠💠

🅾️ वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात. 

1. भारतीय नाणे बाजार -

🅾️ वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

🅾️ नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

🅾️भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

🅾️ असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो. 

🅾️ सघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो. 

2. भारतीय भांडवल बाजार -

🅾️वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात. 

🅾️भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते. 

🅾️ भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो. 

1. व्यापारी बँका

2. विकास वित्तीय संस्था. उदा. IFCI, IDBI, ICICI, SFCs, SIDCs, इ.

3. विकास कंपन्या - LIC आणि GIC.

4. मर्चंट बँका.

5. म्युचुअल फंड्स - UTI

6. पतदर्जा ठरविणार्‍या संस्था CRISIL, CARE, ICRA

🅾️ तसेच, भांडवल बाजारात कर्ज घेणार्‍यांना (ऋणको) व कर्ज देणार्‍यांना (धनको) एकत्र आणणारे रोखे बाजार (Stock exchanges) व त्यातील दलाल महत्वाची भूमिका पार पाडतात. 

🅾️भारतात बँक व्यवसायाचे अस्तित्व प्राचीन काळापासूनच असले तरी आधुनिक बँक-व्यवसाय मात्र ब्रिटिश काळापासूनच सुरू झाला.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.



🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

🔶 मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

🔶 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

🔶पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

🔶 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

🔶 जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

🔶 पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

🔶 आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

🔶 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

🔶 अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

🔶 पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

🔶 जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

🔶 सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

🔶 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

🔶 शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )

Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा

Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )

Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ

Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )

Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट

Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
--  3 ते 5 फेब्रुवारी 2021

Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
--  रशिया

Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची

Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत

संयुक्त राष्ट्रात चीनला झटका; भारताला मिळालं ‘ECOSOC’चं सदस्यत्व



🔶संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका लागला आहे. चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

🔶“प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो. आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो,” अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

🔶भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मतं मिळाली नाहीत. बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचं (१९९५) यावर्षी २५ वं वर्ष आहे. असं असतानाही चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.

१०० वर्ष झालेली एक महत्तवपुर्ण घटना



🔰डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेलाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ३० मे १९२० रोजी पहिल्यांदा नागपूरला आले आणि त्यानंतर भेटी वाढत जाऊन नागपूरकरांशी त्यांचे ऐतिहासिक ऋणानुबंध निर्माण झाले.

🔰३०, ३१ मे आणि १ जून १९२० रोजी नागपूर येथे

🔰 अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद आयोजित करण्यात आली होती.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्कांच्या मागण्यासंबंधीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली राष्ट्रीय स्तरावरील ही "पहिलीच" बाहिष्कृत समाजाची परिषद होती. त्यामुळे या परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व होते.

🔰कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते. गोंदियाचे बाबू कालिचरण नंदागवळी हे स्वागताध्यक्ष आणि गणेश आकाजी गवई व किशन फागुजी बनसोडे हे सेक्रेटरी होते.

🔰साऊथबरो कमिटीपुढे २७ जानेवारी १९१९ रोजी मतदानाच्या संदर्भात अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांची कैफियत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या परिषदेत बोलावण्यात आले होते. कस्तूरचंद पार्क (तेव्हाचा आर्सेनल ग्राऊंड)वर ही परिषद बोलावण्यात आली होती.

🔰परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा व्यासपीठावर होते. त्यांचे भाषण झाले नाही. परंतु अस्पृश्यांचे राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या परिषदेतील त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे ठरले.

🔰 ‘अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व न देता त्यांचे हितसंरक्षण उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधींच्या हाती सोपवावे,’ असे मत डिप्रेस्ड क्लास मिशनचे वि. रा. शिंदे यांनी साऊथबरो कमिटीसमोर मांडले होते. याविरुद्धचा ठराव डॉ. आंबेडकरांच्या पुढाकारानेच या परिषदेत मंजूर करण्यात आला.

🔰पहिल्या दिवशीच्या सभेनंतर रात्री नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत बाबासाहेबांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे यांचे मत बहिष्कृत समाजासाठी कसे घातक ठरेल हे पटवून दिले. त्यानंतर एकमताने याविरुद्धचा ठराव मंजूर झाला.

🔰यासोबतच या परिषदेत बहिष्कृत समाजास राजकीय प्रतिनिधित्व देणे, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र खाते निर्माण करणे, स्थानिक स्वराज्य संस्थानात प्रतिनिधी घेणे आणि मुलांना आणि मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, असे महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरावही परिषदेत मंजूर करण्यात आले. या परिषदेनंतर बाबासाहेबांचे काम अधिक गतीने सुरू झाले. आंदोलने झाली. नागपूरकर त्यांच्या कार्याशी, चळवळीशी अधिक जुळले. दुसºया गोलमेज परिषदेत बाबासाहेबांना सहभागी करून घेण्यासाठी नागपुरातून लंडनला अनेक तारा करण्यात आल्या. पुढे अनेक महत्त्वाच्या परिषदा, निवडणूक यानिमित्ताने त्यांचे नागपूर व विदर्भात येणे वाढले आणि शेवटी बौद्ध धम्माची ऐतिहासिक धम्मदीक्षा घेण्यासाठीही त्यांनी नागपूरचीच निवड केली.

🔴छत्रपती शाहू महाराजांची भव्य मिरवणूक

🔰छत्रपती शाहू महाराज यांचे नागपूरच्या भारतीय बहिष्कृत परिषदेला येणे ही अस्पृश्यांच्या चळवळीच्या दृष्टीने फार मोठी घटना होती. नागपुरात छत्रपती शाहू महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. महाराजांच्या या मिरवणुकीत कोणताही लवाजमा नव्हता. ही मिरवणूक साधी परंतु ऐतिहासिक होती. नागपुरातील अस्पृश्य बांधवांनी अतिशय आपुलकीने ही मिरवणूक ३० मे १९२० रोजी काढली होती. तत्पूर्वी शाहू महाराज यांच्या रेल्वे प्रवासातही त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रेल्वे स्टेशनच्या वरच्या माळ्यावर त्यांच्यासाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. बफसाहेब यांच्या बंगल्यावर त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली गेली. सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीने त्यांना परिषदेच्या ठिकाणी नेण्यात आले.

"डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस अर्थात राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस.."



विश्वेश्वरैयांचे कार्य -

१८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी व शुद्धिकरणासाठी त्यांनी प्रसिद्ध ‘सक्कर’ बंधाऱ्याची योजना केली व या योजनेच्या यशामुळे त्यांना “केसर ए हिंद” नावाने गौरविण्यात आले.

बैंगलोर, पूणे,म्हैसूर, बड़ौदा, कराची, हैदराबाद, ग्वालियर, इंदौर, कोल्हापुर, सूरत, नाशिक, नागपुर, बीजापुर, धारवाड़ सहित अनेक भागांत जलसिंचन व्यवस्था करुन जलसमृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.

१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली ही कृषी सिंचन क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल.

तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित दरवाजाची रचना केली.

त्यांनी शिवसमुद्रम, शिंशा, गिरसप्पा, कृष्णराजसागरसाठी अनेक धरणांच्या योजना आखून कार्यवाही केली, त्यामुळे घराघरांतून वीज खेळविली गेली व अनेक कारखाने सुरू झाले.

डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली व त्याच्या नजीकच वृंदावन बगच्याची रचना केली हा बगिचा आजही पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली.

विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

याचबरोबर मा.महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळकांबरोबर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी कार्य केले.

व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या वाढीसाठी त्यांनी ‘बँक ऑफ म्हैसूर’ च्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता..

डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान व दारिद्‌र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली.

म्हैसूर सोप फॅक्टरी,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.

त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटांनी त्यांची टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती. या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले.

देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे, यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर ‘प्लॅन्ड इकोनॉमी फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले आहे.

समाजसेवक बाबा आमटे.



कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचा आज जन्मदिवस.

🗣मिळालेले पुरस्कार👌👌👌

- पद्मश्री पुरस्कार : (1971)
- रमण मॅगसेसे पुरस्कार : (1985)
- पद्म विभूषण : (1986)
- मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार : (1988)
- गांधी शांती पुरस्कार : (1999)
- राष्ट्रीय भूषण : (1978)
- जमनालाल बजाज अवार्ड : (1979)
- एन.डी. दीवान अवाॅर्ड : (1980)
- रामशास्त्री अवार्ड : (1993) ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
- इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड : (1985)
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी 
- राजा राममोहन राॅय अवार्ड : (1986) दिल्ली सरकार
- फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड : (1987)
- जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड : (1987)
- आदिवासी सेवक अवार्ड :  (1991) भारत सरकार
- मानव सेवा अवार्ड : (1997) यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
- सारथी अवाॅर्ड : (1997) नागपुर
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी 
- महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड : (1997) नागपुर
- कुमार गंधर्व पुरस्कार : (1998)
- सावित्रीबाई फुले अवाॅर्ड : (1998) भारत सरकार
- फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर ऑफ काॅमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिी अवार्ड : (1988)
- आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार : (1998)
- महाराष्ट्र भुषण अवार्ड : (2004) महाराष्ट्र सरकार

सन्मानीत पदव्या

- डी.लिट : टाटा इंस्टीटयुट ऑफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
- डी.लिट : 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
- डी लिट : 1985-86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
- देसिकोत्तमा : 1988  सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...