Thursday 5 March 2020

अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे

-  केंद्रीय अर्थसचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे सध्या महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते सध्याचे अर्थ सचिव राजीव कुमार यांची जागा घेतील.

- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पांडे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. पांडे हे 1984च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

-  पांडे हे "युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या म्हणजेच आधारच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. या विभागात ते सप्टेंबर 2010 पासून तब्बल नऊ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अर्थ खात्यात महसूल सचिवपदी निवड झाली होती.

- पांडे आयआयटी कानपूरचे पदवीधर आहेत. तसेच, त्यांनी मिनिसोटा युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, "पीएचडी'ही केली आहे.
————————————————

सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे नियंत्रण वाढविण्यासाठी विधेयक

- या विधेयकामुळे पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेसारखे पेच निर्माण होणार नाहीत

- सहकारी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या कडक र्निबधांखाली आणण्याबाबतचे विधेयक संसदेच्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. बँकिंग नियमन कायद्यानुसार या बँकांना नियम लागू केले जाणार आहेत.

- या विधेयकामुळे पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेसारखे पेच निर्माण होणार नाहीत. देशात १५४० सहकारी बँका असून त्यांचे ठेवीदार ८.६० कोटी आहेत. त्यांच्या ठेवी एकूण ५ लाख कोटींच्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती, त्यात बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली असून सहकारी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या र्निबधानुसार काम करावे लागणार आहे.

- अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू होत असून अधिवेशन ३ एप्रिलला संपणार आहे. ठेवादारांचे पैसे सुरक्षित रहावेत यासाठी सरकारने हे विधेयक आणण्याचे ठरवले होते.

- सरकारने पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना आता विमा संरक्षण दिले आहे. सार्वजनिक बँका, खासगी बँका, आयएल अँड एफएस, एनबीएफसी, गृह वित्त महामंडळे यातील अनेक  गैरप्रकार सरकारने दूर करण्यास सुरूवात केली आहे.

- बँकिंग क्षेत्रात जबाबदारीचे तत्त्व रूजवण्यासाठी वित्त सेवा विभागाने गेल्या दोन वर्षांत बरेच प्रयत्न केले.

- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ४ लाख कोटी रुपये देऊन फेरभांडवलीकरण करण्यात आले असून अनुत्पादक मालमत्ता कमी होत आहेत. दोन वर्षांपूर्वी २१ पैकी १९ बँका तोटय़ात  होत्या, आता १८ पैकी १२ बँका या नफ्यात आहेत.

मानवी शरीर - अस्थी

●शरीरातील सर्वात लहान अस्थी - स्टेप्स(मध्यकर्णात)

●शरीरातील सर्वात मोठी अस्थी - फिमर (मांडीमध्ये)

●शरीरातील सर्वात मजबूत अस्थी - मँडीबल (जबड्यात)

●शरीरातील सर्वात लहान स्नायू - स्टेपिडीयस(मध्यकर्णात)

●शरीरातील सर्वात मोठा स्नायू - ग्लुटेअस मँक्झिमस(मांडीमध्ये)

महत्त्वाचे प्रश्नसंच

1)कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
(A) 1 दशलक्ष डॉलर
(B) 4 दशलक्ष डॉलर.  √
(C) 3 दशलक्ष डॉलर
(D) 5 दशलक्ष डॉलर

2)भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
(A) संयुक्त अरब अमिराती
(B) दक्षिण आफ्रिका
(C) अर्मेनिया.  √
(D) न्युझीलँड

3)शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो?
(A) 1 मार्च.  √
(B) 2 मार्च
(C) 3 मार्च
(D) 29 फेब्रुवारी

4)मार्च 2020 या महिन्यात भारत सरकारने UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किती स्थळांचे नामांकन दिले?
(A) 1
(B) 3
(C) 2.  √
(D) 5

5)कोणत्या व्यक्तीची मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली?
(A) मुकेश अंबानी
(B) रतन टाटा.  √
(C) सी. रमेशचंद्र
(D) राघव राजपुरोहित

6)राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला गेला?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020. √
(D) 1 मार्च 2020

7)केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषदेचे उद्घाटन झाले?
(A) 7 वा
(B) 8 वा
(C) 9 वा
(D) 11 वा.  √

8)‘केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019’ राज्यसभेत चर्चेसाठी कधी मांडले गेले?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020
(D) 2 मार्च 2020.  √

9)जुन्या आयफोन संचांचा वेग कमी केल्याचा आरोपाखाली दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी अॅपल कंपनीने किती रक्कम देण्याचे मान्य केले?
(A) 600 दशलक्ष डॉलर
(B) 300 दशलक्ष डॉलर
(C) 200 दशलक्ष डॉलर
(D) 500 दशलक्ष डॉलर.  √

10)सौदी अरबचे ‘प्रीमियम नागरिकत्व’ मिळविणारा पहिला भारतीय कोण आहे?
(A) फारुख अब्दुल्ला
(B) ख्वाजा अब्दुल घानी
(C) गुलाम मोहम्मद अब्दुल खादर
(D) युसुफ अली.  √

प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.
1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल
2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √
3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी
4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल

प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.
अ. पृथ्वीचे परीभ्रमण
ब. पृथ्वीचे परिवलन
क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे   
ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे

1) अ,ब
2) ब, क, ड
3) सर्व कारणीभुत घटक   √
4) अ,ब व क

प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.
अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह

1) अ,ब, क
2) अ, ब, ड
3) अ,ब,ड √
4) वरील सर्व

प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.
अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.
ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.
क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.

1) अ,क
2) अ
3) अ,ब
4) वरील सर्व. √

प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.
अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी
इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच
उ. भुस्तंभ

1) सर्व योग्य
2) सर्व अयोग्य
3) क, ड, इ, ई, उ
4) इ, ई.  √

प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.
अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.
ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.
क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.

1) अ
2) ब
3) क
4) यापैकी नाही.  √

प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?
अ. ऑस्टे्रलिया
ब. नामिबिया
क. ब्राझिल
ड. चिली

1) अ,ब,क
2) ब व क
3) अ,ब, क
4) सर्व योग्य.  √

प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.
अ. छोटा नागपूर
ब.माळवा
क. बुंदेलखंड
ड. बाघेलखंड

1) ब,क,ड,अ.  √
2) क,ब,ड,अ
3) अ,क,ड,ब
4) ब,क,अ,ड

प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)
अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.
क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची
आहे.

1) अ व ब
2) ब व क
3) अ व क
4) सर्व योग्य.  √

प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.

1. चिरोली  
2. गरमसूर
3. गाळणा
4. मुदखेड

.      अ     ब      क    ड
1)    3     4      2     1.  √
2)    3     4      1     2
3)    1     2      3     4
4)    1     2      4     3

चालू घडामोडी प्रश्नसंच 6/3/2020

1)केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषदेचे उद्घाटन झाले?
(A) 8 वा
(B) 9 वा
(C) 10 वा
(D) 11 वा.  ✓

2)‘केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019’ राज्यसभेत चर्चेसाठी कधी मांडले गेले?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020
(D) 2 मार्च 2020.   ✓

3)जुन्या आयफोन संचांचा वेग कमी केल्याचा आरोपाखाली दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी अॅपल कंपनीने किती रक्कम देण्याचे मान्य केले?
(A) 600 दशलक्ष डॉलर
(B) 300 दशलक्ष डॉलर
(C) 200 दशलक्ष डॉलर
(D) 500 दशलक्ष डॉलर  ✓

4)सौदी अरबचे ‘प्रीमियम नागरिकत्व’ मिळविणारा पहिला भारतीय कोण आहे?
(A) फारुख अब्दुल्ला
(B) ख्वाजा अब्दुल घानी
(C) गुलाम मोहम्मद अब्दुल खादर
(D) युसूफ अली.  ✓

5)जागतिक श्रवण दिवस कधी साजरा केला जातो?
(A) 1 मार्च
(B) 12 मार्च
(C) 3 मार्च.  ✓
(D) 5 मार्च

6)पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ खेळांमध्ये चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने किती पदके जिंकली?
(A) 33
(B) 46.  ✓
(C) 11
(D) 122

7)वन्यजीवनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो?
(A) जागतिक वन्यजीवन दिन. ✓
(B) जागतिक वन्य प्राणी दिन
(C) जागतिक प्राणी सुरक्षा दिन
(D) जागतिक प्राणी संवर्धन दिन

8)काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासाठी व्याघ्र प्रकल्प योजनेच्या अंतर्गत किती रक्कम वाटप करण्यात आली?
(A) रु. 10 कोटी
(B) रु. 20 कोटी
(C) रु. 100 कोटी
(D) रु. 33 कोटी.  ✓

9)कोणती व्यक्ती रोखीच्या संकटात अडकलेल्या राज्यात संसाधनांची जमवाजमव करण्यात मदत करण्यासाठी नेमण्यात आलेले आंध्रप्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांचे नवे सल्लागार आहेत?
(A) सुभाष चंद्र गर्ग. ✓
(B) चंद्र बाबू नायडू
(C) कमल हसन
(D) सुब्रमण्यम स्वामी

10)वर्तमानात मलेशियाचे पंतप्रधान कोण आहेत?
(A) महाथिर मोहम्मद
(B) मुहिद्दीन यासीन.  √
(C) नजीब रझाक
(D) होसेन ओन

11)कोणत्या बँक आणि हवाई सेवा कंपनीने 'का-चिंग' नावाचे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर करण्यासाठी भागीदारी केली?
(A) HDFC बँक आणि इंडिगो.  ✓
(B) अ‍ॅक्सिस बँक आणि गो एअर
(C) भारतीय स्टेट बँक आणि एअर इंडिया
(D) इंडसइंड बँक आणि विस्तारा

12)बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचा अंदाजित खर्च किती आहे?
(A) रु. 10,000 कोटी
(B) रु. 12,908 कोटी
(C) रु. 20,000 कोटी
(D) रु. 14,849 कोटी.  ✓

13)भारतीय हवाई दलाने विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक अभ्यास विभागात ‘चेअर ऑफ एक्सलेन्स’ हे पद तयार करण्यासाठी कोणत्या विद्यापीठासोबत करार केला?
(A) दिल्ली विद्यापीठ
(B) सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ पुणे
(C) महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी
(D) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.  ✓

14)2019-20 या आर्थिक वर्षात NABARDने ग्रामीण बँकिंग प्रणालीत किती निधी गुंतवला?
(A) रु. 2 लक्ष कोटी
(B) रु. 4.45 लक्ष कोटी
(C) रु. 3.67 लक्ष कोटी
(D) रु. 1.46 लक्ष कोटी.  ✓

1)"डू यू नो" ट्विटर शृंखला _ याच्याशी संबंधित आहे.
(A) बँकिंगविषयी जागृती
(B) कौटुंबिक निवृत्तीवेतन.  √
(C) भारताविषयी जाणून घेण्यासाठी
(D) यापैकी नाही

2)भारतीय रेल्वेनी  या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले.
(A) असनसोल स्थानक.  √
(B) नवी दिल्ली स्थानक
(C) जयपूर स्थानक
(D) लखनऊ स्थानक

3)2020 या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना काय आहे?
(A) विमेन एम्पोवरमेन्ट अँड जेंडर इक्वलिटी
(B) जेंडर इक्वलिटी अँड विमेन एम्पोवरमेन्ट
(C) आय एम जेनेरेशन इक्वलिटी: रियलाईजिंग विमेन्स राइट्स.  √
(D) आय एम रियलाईजिंग विमेन्स राइट्स: जेनेरेशन इक्वलिटी

4)संशोधकांना ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ नावाचा जीव आढळला. ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ हा __ आहे.
(A) ऑक्सिजनद्वारे जीवंत राहू शकणारा प्राणी
(B) ऑक्सिजनशिवाय जीवंत राहू शकणारा प्राणी.  √
(C) विषाणूचा एक प्रकार
(D) जिवाणूचा एक प्रकार

5)“RAISE 2020” कार्यक्रम _ या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे.
(A) लखनऊ
(B) नोएडा
(C) शिमला
(D) नवी दिल्ली.  √

6)‘राष्ट्रीय तपास संस्था’ (NIA) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ही केंद्रीय दहशतवादरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून काम करते.

2. ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

7)कोणत्या राज्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत सहा उपकरणे व्यवस्थापन केंद्रांची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करार केला?
(A) मेघालय
(B) त्रिपुरा.  √
(C) आसाम
(D) उत्तरप्रदेश

8)‘ऑफशोअर पेट्रोल व्हसेल-6’ या जहाजाचे _ येथे अनावरण झाले.
(A) गोवा
(B) चेन्नई.  √
(C) मुंबई
(D) केरळ

9)अकरावी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद 2020’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.
(A) पुणे
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली.  √

10)29 फेब्रुवारी 2020 रोजी _ या शहरात ‘पेन्शन अदालत’ आणि ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ (NPS) जागृती व तक्रार निवारण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
(A) जम्मू.  √
(B) दिल्ली
(C) हैदराबाद
(D) चेन्नई

General Knowledge

▪ ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : कोलकाता

▪ भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
उत्तर : अर्मेनिया

▪ कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
उत्तर : 4 दशलक्ष डॉलर

▪ कोणत्या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा 2020’ आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ 29 फेब्रुवारी 2020 रोजी ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक कुठे पार पडली?
उत्तर : तामिळनाडू

▪ 'डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो?
उत्तर : राजकारण

▪ सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली.
उत्तर : गुजरात

▪ कोणत्या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 1 मार्च

▪ ‘एकम महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ ‘अतुल्य भारत’च्या संकेतस्थळावर कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आलं आहे?
उत्तर : चिनी, अरबी, स्पॅनिश

▪ भारतातल्या कोणत्या शहरात सर्वाधिक डिजिटल व्यवहार झालेत?
उत्तर : बंगळुरू

▪ भुवनेश्वरमध्ये एका कार्यक्रमात कोणाकडून ‘1000 स्प्रिंग्ज’ पुढाकारांची घोषणा करण्यात आली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪ “EASE 3.0” धोरण कशाशी संबंधित आहे?
उत्तर : बँकिंग क्षेत्रात सुधारणा

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय MSME पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ पूर्व क्षेत्र परिषदेची 24वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : भुवनेश्वर

▪ राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र कोणत्या शहरात आहे?
उत्तर : हैदराबाद

▪ ‘किनारपट्टी आपत्ती निवारण व स्थितिस्थापकत्व विषयक परिषद’ कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणत्या मंत्रालयाने “मार्केट इंटेलिजेंस अँड अर्ली वॉर्निंग सिस्टम” (MIEWS) सादर केली?
उत्तर : अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

▪ ताज्या ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’मध्ये भारताला कोणता क्रमांक प्राप्त झाला?
उत्तर : 77 वा

▪ भारतीय विधी आयोग हे कोणते मंडळ आहे?
उत्तर : अवैधानिक मंडळ

▪ कोणत्या व्यक्तीला ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ देण्यात आला?'
उत्तर : कॅप्टन अमरिंदर सिंग

▪ ‘राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद 2022’ ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार?
उत्तर : चंदीगड

▪ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मकता शिबीर’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले?
उत्तर : सिक्किम

▪ कोणत्या व्यक्तीने ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2020’ जिंकला?
उत्तर : डॉ. नीती कुमार

▪ पक्के व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

▪ ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ला कोणत्या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत?
उत्तर : कर्नाटक आणि तामिळनाडू

▪ सार्वजनिक वाचनालय कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते होते?
उत्तर : तामिळनाडू (मद्रास)

▪ शास्त्रज्ञांना कोणत्या राज्यात एक नवीन प्रकारचा गुहेमध्ये राहणारा मासा सापडला?
उत्तर : मेघालय

▪ 34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर : डी. गुकेश

▪ ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ कोणाकडून सादर करण्यात आले?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...