Wednesday 23 September 2020

आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?



 *आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do's And Dont's म्हणजेच निवडणूक 'आचारसंहिता' होय.


 *पक्ष, उमेदवारांवर काय असतात बंधनं?* : 


▪️ पक्षाने आपल्या प्रचारामध्ये असं कोणतंही भाषण, प्रचार सामग्री, घोषणा अथवा आश्वासन देऊ नयेत ज्यामुळं समाजातील जाती, धर्म, वंश, बोलीभाषा इत्यादींमध्ये फुट पडेल तसंच त्यांच्यात वाद निर्माण होतील.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल, जातीबद्दल बोलता येणार नाही. असं केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजण्यात येतो.


▪️ निवडणूकीच्या प्रचारात  मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं, महागड्या वस्तू देणं, मतदारांना अमिष दाखवणं, लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं आहे. 


▪️ कोणताही प्रचार रात्री 10 च्या आतच संपवणं, थांबवणं बंधनकारक आहे. तसंच नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचाराध्ये अडथळा आणण्याचा अधिकार नाही, असे केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.


▪️ कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार, भाषण करता येणार नाही. याकरिता उमेदवारानं आपल्या सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृतीपत्र मिळवणं आवश्यक आहे. तसंच संबंधीत बाबींची पोलीस ठाण्यात माहिती देणं आवश्यक आहे. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या, मनोरंजनात्मक योजनांची घोषणा तसेच अमंलबजावणीही करता येत नाही. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने, हेलिकॉप्टर इत्यादी वाहनांचा निवडणूकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. असं केल्यास याला आचारसंहितेचा भंग मानण्यात येतो.


▪️ आचारसंहिता केवळ निवडणूकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांपुरतीच मर्यादीत नसून ही आचारसंहिता मंत्र्यांवरही लागू असते. 


▪️ निवडणूकीवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली आपल्या आवडीच्या ठिकाणी करता येत नाही. यापैकी कोणतंही काम केल्यास ते थांबवण्याचा संपूर्ण हक्क निवडणूक आयोगाला असतो.


*सोशल मीडियावरही आचारसंहिता* : इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर आचारसंहिते दरम्यान राजकीय पक्षांना जाहिरात पोस्ट करण्याआधी निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर ते जाहिरात पोस्ट करू शकणार आहेत. 


 *तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप्स* : 'समाधान' या वेब पोर्टलवर सामान्य जनता निवडणूक आणि प्रक्रियेबाबत आपल्या प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत. 


तसेच एक असेही अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे ज्याद्वारे मतदाता आचारसंहितेचा भंग होत असल्याचे ती घटना रेकॉर्ड करून निवडणूक आयोगाकडे पाठवू शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच सुविधा नावाचे अ‍ॅप राजकीय पक्षांसाठी लॉन्च करण्यात आले असून याद्वारे उमेदवार, प्रतिनिधी निवडणुकीसाठी लागणार विविध परवानगी अर्ज करू शकणार आहेत.


 *दिव्यांगांसाठी विशेष अ‍ॅप* : दिव्यांग मतदारासाठी इलेक्शन कमीशनने पर्सन विद डिसेब्लिटी (PWD) नावाचे अ‍ॅप लॉन्च केले आहे. याद्वारे मतदान केंद्रावर अशा लोकांना वाहन सेवा, पाणी, रँप सेवा, व्हिलचेअर सेवा आणि ब्रेल बॅलेट पेपर आणि ब्रेल वोटर स्पिल अशा सुविधा पुरवण्यात येईल.

शब्दयोगी अव्यय



· वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दां शी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.


· शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडूनच येतात.


· शब्दयोगी अव्ययवाचे पंधरा प्रकार पडतात.



2. स्थलवाचक :


· आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.


· उदा. 1. पुस्तक टेबलाजवळ ठेवले आहे.

2. घरामध्ये मोठा साप घुसला आहे.



4. हेतुवाचक :


· करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.


· उदा. 1. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.

2. जगण्यासाठी अन्न हवेच.



5. व्यतिरेकवाचक :


· विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त


· उदा. 1. तुझ्याशिवाय माला करमत नाही.

2. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.



6. तुलनात्मक :


· पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.


· उदा. 1. माणसांपेक्षा मेंढरं बारी.

2. गावामध्ये केशर सर्वात हुशार आहे.



7. योग्यतावाचक :


· समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.


· उदा. 1. तो ड्रेस माझा सारखा आहे.

2. आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.


8. संग्रहवाचक :


· सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त,इ.


· उदा. 1. मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.

2. रामही भक्तासाठी धावून येईल.



9. कैवल्यवाचक :


· च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.


· उदा. 1. विराटच आपला सामना जिंकवेल.

2. किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.


10. संबंधवाचक :


· विशी, विषयी, संबंधी इ.


· उदा. 1. देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.

2. त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.



11. संबंधवाचक :


· संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.


· उदा. 1. त्याने सर्वांबरोबर जेवण केले.

2. आमच्या सह तो पण येणार आहे.



12.विनिमयवाचक :


· बद्दल, एवजी, जागी, बदली इ.


· उदा. 1. त्याच्या जागी मी खेळतो.

2. सूरजची बदली पुण्याला झाली.



13. दिकवाचक :


· प्रत, प्रती, कडे, लागी इ.


· उदा. 1. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.

2. त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.



14. विरोधवाचक :


· विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.


· उदा. 1. भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.

2. त्याने उलट माझीच माफी मागितली.


15. परिणामवाचक :


· भर


· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.

2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.



15. परिणामवाचक :


· भर


· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.

2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे


०१) स्टीव्ह इरविन (क्रोकोडाइल हंटर) दिवस कधी साजरा केला जातो?

⚪️  १५ नोव्हेंबर

⚫️ २२ फेब्रुवारी

🔴 २० डिसेंबर 

🔵 १५ फेब्रुवारी


०२) आर्टीफीशियल इंटेलिजन्स (एआय बेस्ड) तंत्रज्ञानाच वापर करून तयार केलेली पहिली महिला न्यूज अँकर शिन शाओमेंग कोणत्या देशाने सादर केली आहे?

⚪️  चीन 

⚫️ जपान

🔴 अमेरिका 

🔵 भारत


०३) दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा सेऊल शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे?

⚪️  डोनाल्ड ट्रम्प

⚫️  नरेंद्र मोदी 

🔴 वलादिमीर पुतीन

🔵 किम जोंग उन


०४) जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो?

⚪️  २१ फेब्रुवारी

⚫️  २२ फेब्रुवारी

🔴 २३ फेब्रुवारी

🔵 २४ फेब्रुवारी


०५) देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन कोठे भरविण्यात येत आहे? 

⚪️ .मुंबई 

⚫️ सांगली 

🔴 कोल्हापूर

🔵 नाशिक


०६) दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता?

⚪️ भारत 

⚫️ पाकिस्तान 

🔴 .श्रीलंका

🔵 बांगलादेश


०७) दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करणारा श्रीलंका हा कितवा संघ ठरला आहे?

⚪️  पहिला 

⚫️ .दूसरा 

🔴 तिसरा 

🔵 चौथा


०८) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतातर्फे १० मी एअर रायफलमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू कोण?

⚪️  .अंजूम मुदगील

⚫️ अपुर्वी चंडेला

🔴 .तेजस्विनी सावंत

🔵 राही सरनोबत


०९)  ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकार खेचणारा दुसरा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?

⚪️  रोहित शर्मा 

⚫️ महेंद्रसिंह धोणी 

🔴 .सुरेश रैना 

🔵 विराट कोहली


१०)  सर्वाधिक परदेश दौरे करणारे भारतीय पंतप्रधान कोण?

⚪️ .इंदिरा गांधी 

⚫️ अटलबिहारी वाजपेयी

🔴 मनमोहन सिंग

🔵 नरेंद्र मोदी


११)  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणाहून होत आहे?

⚪️  गोरखपूर 

⚫️ कानपूर

🔴 सोलापूर

🔵 नागपूर


१२) ९१व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? 

⚪️ .ग्रीन बुक 

⚫️ .ब्लॅक पँथर

🔴 रोमा

🔵 द फव्हरेट


१३) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ४ चेंडूवर ४ बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण? 

⚪️ लसिथ मलिंगा 

⚫️ राशिद खान 

🔴 इरफान पठाण 

🔵 बरेट ली


१४) महात्मा गांधीच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने गांधी विज्ञान संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 

⚪️ .सेवाग्राम वर्धा 

⚫️ गांधीनगर

🔴 मबई

🔵 रायबरेली


१५) 'माय क्रिकेटिंग लाईफ', 'हाऊ टू प्ले क्रिकेट','फेअरवेल टू क्रिकेट' आणि 'दि आर्ट आॅफ क्रिकेट' या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? 

⚪️ डॉन ब्रॅडमन

⚫️ सचिन तेंडूलकर

🔴 सनिल गावसकर

🔵 कपिल देव


🔴उत्तरे🔴

०१) १५ नोव्हेंबर ०२) चीन ०३) नरेंद्र मोदी ०४) २१ फेब्रुवारी ०५) मुंबई ०६) श्रीलंका ०७) तिसरा ०८) अपुर्वी चंडेला ०९) सुरेश रैना  १०) इंदिरा गांधी  ११) गोरखपूर १२) ग्रीन बुक १३) लसिथ मलिंगा १४) सेवाग्राम वर्धा १५) डॉन ब्रॅडमन

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना)


▫️हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 

▫️26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. 

▫️राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

▫️१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. 

१९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या  कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती.

▫️१९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृह मध्ये पार पडली कि, जे आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.

▫️पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते . 

▫️ऑगस्ट १५ १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.


▫️ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. 

अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. 

▫️यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१].नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी



1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते

2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास

3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ

4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस

5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस

6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ

7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस

8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये

9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास

10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस

11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस

12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस

13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास

14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास

15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास

16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस

17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास

18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ

19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात

20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस

21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)

22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस

English उच्चारसाधर्म्य शब्द


1) fair - यात्रा, गोरा, 

fare - भाडे


2) week - आठवडा, 

wick - बत्ती , काकडा , 

weak - अशक्त


3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी 

sell - विकणे 

sail - तरंगत जाणे


4) celler - तळघर 

seller -विक्रेता


5) once - एकदा 

one's - एखाद्याचा


6) sit - बसणे 

seat - आसन


7) wet - ओला 

weight - वजन 

wait - वाट पाहणे


8) test - चाचणी 

taste - चव


9) roe - मृगी , हरिणी ( मादी) 

row - रांग , ओळ।, वल्हवणे 

raw - कच्चा


10) feet - पाऊले 

fit - योग्य 

feat - पराक्रम , योग्यता


11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप) 

throne - सिंहासन


12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप) 

hailed - जयजयकार केला


13) career - व्यवसाय 

carrier - वाहून नेणे


14) our - आमचा, आमची , आमचे 

hour ( अवर) तास


15) bare - उघडा 

bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट 

bear - अस्वल , सहन करणे


16) road - रस्ता 

rod - गज, दांडा 

rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)


17)meat - मटण 

meet - भेटणे


18)leave - सोडणे 

live - राहणे


19)piece - तुकडा 

peace - शांतता


20)hail - गारा, अभिवादन 

hale - तगडा, स्वस्थ 

hell - नरक


21) principle - तत्त्व 

principal - प्राचार्य


22) manager - व्यवस्थापक 

manger - गव्हाण , गोठा


23) letter - पत्र, अक्षर 

later - नंतर


24) dip -बुडविणे, बुडणे 

deep - खोल


25) quite - अगदी, जोरदार 

quiet - शांत 

quiot - लोखंडी कडी


26) deed - कृत्य 

did - केले


27) expect - अपेक्षा करणे 

aspect - पैलू, स्वरूप


28) feel - वाटणे, स्पर्श करणे 

fill - भरणे


29) floor - जमीन 

flour- पीठ 

flower - फूल


30)waste - रद्दी, वाया गेलेले 

waist - कमर , कंबर 

west - पश्चिम 

vest - बनियन


31) fell - पडणे 

fail - नापास


32) story - गोष्ट 

storey- मजला


33) slip - घसरणे 

sleep - झोपणे


34)in - आत, मध्ये 

inn - खानावळ 

yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे


35) whole - संपूर्ण 

hole - छिद्र 

vole - उंदराच्या जातीचा प्राणी


36)hit - टोला मारणे 

heat - उष्णता


37) of - चा, ची चे 

off - बंद करणे


38) self - स्वत:चा 

shelf - मांडणी , फडताळ


39) sheep - मेंढी 

ship - जहाज 

sheaf - गवताची पेंढी


40) beat - मारणे , पराभूत होणे 

bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप) 

beet - चुकंदर 

a bit - थोडेसे


41) wander - भटकणे 

wonder - आश्चर्य


42) rich - श्रीमंत 

reach - पोहचणे


43) deed - कृत्य 

did - केले


44) so - म्हणून, इतका, तर, 

sow - पेरणे 

saw - पाहिला, करवत


45) rain - पाऊस 

reign - शासन , राज्य 

rein - लगाम 

wren - रेन पक्षी ( युरोप)


46) lives - राहतो 

leaves - पाने, सोडून जातो


47) liver - यकृत 

lever - तरफ


48) tent - तंबू 

taint - कलंक , दोष


49) wedge - पाचर, 

wage -पगार, वेतन, खंड


50 ) neat - व्यवस्थित 

nit - लीख 

knit - विणणे 


51) list - यादी 

least - कमीत कमी, किमान 


52) horde - भटकी जमात 

hoard - साठा करणे , 


53) jealous - मत्सरी 

zealous - उत्साही 


54) metal - धातू , रूळ 

mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती 


55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने 

too - सुद्धा 

two- दोन


56) lip - ओठ 

leap - उडी मारणे 


57) sun - सूर्य 

son - पुत्र, मुलगा 


58) pray - प्रार्थना 

prey - भक्ष्य 


59) dear - आदरणीय, प्रिय 

deer - हरिण 


60) root - मूळ 

route - मार्ग


61)full - पूर्ण भरलेला 

fool - मूर्ख 


62) sum - रक्कम , बेरीज 

some - काही , थोडे 


63) lesson - धडा , पाठ 

lessen - कमी करणे 


64) night - रात्र 

knight - सरदार 


65) sin - पाप 

seen - पाहीले 

scene - दृश्य, देखावा


66) gate - फाटक 

get - मिळणे, मिळवणे 

gait - चाल ( चालण्याची पद्धत) 


67) male - पुरूष 

mail - टपाल, कवच


68) higher - अधिक उंच 

hire - हप्ता , भाड्याने घेणे 


69) let - परवानगी देणे 

late - उशीर 


70) tell - सांगणे 

tale - गोष्ट 

tail - शेपूट


71) new - नवा 

knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप) 


72) bore - छिद्र करणे 

boar - रानडुक्कर


73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष 

voice - आवाज , प्रयोग 


74) thirst - तहान 

thrust - खुपसणे 


75) steel - पोलाद 

steal - चोरणे

still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध


76) addition - वाढ, बेरीज 

edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप


77) chick - पक्ष्याचे पिल्लू 

cheek - गाल


78) it - तो, ती ते 

eat - खाणे


79) stationery - लेखन साहित्य 

stationary - स्थिर , न हलणारा


80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक, 

Gk Question


Question: रणथम्भौर का युद्ध किसके मध्य हुआ ?

A: अलाउद्दीन खिलजी और राणा हमीर✔️

B: बाबर और राणा सांगा

C: अलाउद्दीन खिलजी और राणा रतन सिंह

D: मुहम्मद गौरी और पृथ्वीराज चौहान


Question: मोहम्म्द गौरी ने पृथ्वीराज चौहान को कब पराजित किया ?

A: तराइन के प्रथम युद्ध मे

B: तराइन के द्वितीय युद्ध मे✔️

C: पानीपत के प्रथम युद्ध मे

D: पानीपत के द्वितीय युद्ध मे


Question: पृथ्वीराज रासो के अनुसार राजपूतो की उत्पत्ति कहां से हुई है ?

A: अग्निकुंड़ से✔️

B: सूर्य से

C: आकाश से

D: चन्द्रमा से


Question: चौहानो का मूल स्थान माना किसे जाता है ?

A: अजमेर

B: नागौर

C: सपादलक्ष✔️

D: जालौर


Question: सातवी शताब्दी मे अजमेर दुर्ग की स्थापना किसने की?

A: अजयपाल ने✔️

B: कीर्तिपाल ने

C: अर्णोराज ने

D: वासुदेव ने


Question: पृथ्वीराज तृतीय का जन्म कहॉ हुआ ?

A: अन्हिलपाटन✔️

B: जालौर

C: सॉंभर

D: अजमेर


Question: अलाउद्दीन खिलजी ने किस दुर्ग को जीतकर उसका नाम खैराबाद रखा ?

A: सिवाना दुर्ग✔️

B: जोधपुर दुर्ग

C: रणथम्भौर दुर्ग

D: िचतौड़ दुर्ग


Question: सिरोही के किस शासक ने ईस्ट इंडिया कम्पनी से संधि की ?

A: सहासमल

B: लक्ष्मण

C: शिवसिंह✔️

D: इनमें से कोई नहीं


Question: तराइन का मैदान कहां है?

A: पंजाब

B: राजस्थान

C: हरियाणा✔️

D: उत्तर प्रदेश


Question: तराइन के प्रथम युद्ध मे किसकी विजय हुई ?

A: पृथ्वीराज चौहान तृतीय✔️

B: मोहम्म्द गौरी

C: मोहम्म्द गजनवी

D: गोविंदराज


Question: चंपानेर की संधि मालवा और गुजरात के शासको ने सयुक्त रूप से मेवाड़ के किस शासक के विरूद्ध की ?

A: महाराणा कुम्भा✔️

B: महाराणा रायवमल

C: राव चूड़ा

D: महाराणा सांगा


Question: एकलिंग महात्म्य ग्रंथ का लेखन कार्य किस शासक द्वारा पूरा किया गया था?

A: महाराणा रायमल

B: महाराणा सांगा

C: महाराणा कुम्भा✔️

D: राणा लाखा


Question: किस शासक के शासनकाल मे पिछोला झील का निर्माण एक बन्जारे द्वारा किया गया था ?

A: महाराणा रायमल

B: महाराणा सांगा

C: महाराणा कुम्भा

D: राणा लाखा✔️


Question: किस शासक को मानवो का खन्डहर व सैनिको का भग्नावशेष कहा जाता है ?

A: महाराणा कुम्भा

B: महाराणा रायवमल

C: महाराणा सांगा✔️

D: मोकल


Question: अलाउद्दीन खिलजी ने चितौड विजय के उपरान्त चितौडगढ का नाम बदलकर क्या रख दिया था ?

A: मालवा

B: ममूदाबाद

C: खिज्राबाद✔️

D: जलालाबाद


Question: मेवाड का प्रथ्म साका किस शासक शासनकाल मे घटित हुआ था ?

A: रत्नसिंह✔️

B: महाराणा रायवमल

C: राव चूडा

D: महाराणा सांगा


Question: मेवाड का भीष्म पितामह किस शासक को कहा जाता है ?

A: महाराणा कुम्भा

B: महाराणा रायवमल

C: राव चूडा✔️

D: महाराणा सांगा


Question: राणा सांगा का सम्बन्ध कहां से है ?

A: मालवा

B: खजुराहो

C: मांडू

D: मेवाड✔️


Question: गुहिल वंश की प्रारंभिक राजधानी क्या थी ?

A: मालवा

B: चितौडगढ

C: आहड़

D: नागदा✔️


Question: मेवाड का मेराथन युद्ध किसे कहा गया है ?

A: हल्दीघाटी युद्ध

B: दिवेर युद्ध✔️

C: माहोली युद्ध

D: इनमें से कोई नहीं


Question: वह राजपूत रानी कौन थी, जिसने अपने सैकडो अनुयायियो के साथ अलाउद्‌दीन खिलजी के 1303 ई. पू. मे चितौडगढ पर कब्जा करने पर जौहर कर लिया था ?

A: पदमावती

B: पदमिनी✔️

C: कर्मावती

D: रूपमती


Question: कुशाल माता का वह भव्य मंदिर जिसका निर्माण महाराणा कुम्भा ने करवाया था, कहां स्थित है ?

A: ओसियॉ

B: बदनोर✔️

C: कुम्भलगढ

D: उदयपुर

चर्चित शहर/देश /राज्य :-


• अरुणाचल प्रदेश:-

हे राज्य संपूर्णत: हागणदारीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त ठरलेले हे भारतातील सहावे राज्य ठरले. या अगोदर   सिक्किम, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा आणि उत्तराखंड हे पाच राज्य हागणदारीमुक्त ठरले आहे 


• तामिळनाडू:-

राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला .असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले 


• केरळ :-

केरळ देशातील ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले भारतातील  पहिले राज्य  आहे. कोचीन, त्रिवेंद्रम, कालिकत आणि कन्नूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत.


• दिल्ली:-

भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय दिल्लीच्या लुटियन भागात बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय पोलीस दल आणि राज्यांच्या पोलीस दलांच्य इतिहासाचा अभ्यास करण्याची संधी या संग्रहालयामुंळे मिळणार आहे. पोलीसांचे गणवेश आणि पोलीसांशी संबंधित अन्य सामग्रीचा संग्रह यात करण्यात येणार आहे.


• फगवाडा (पंजाब):-

पंजाब (फगवाडा ) येथे सुरु असलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली .


• राजस्थान

राष्ट्रीय जैव इंधन धोरण  (National Biofuel Policy) लागू करणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान ठरले 


• मुंबई :-

केंद्र शासन ,राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागीदारी परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे .२५ वर्षात मुंबईला आयोजक होण्याचा प्रथमच मान मिळाला 


• पाटणा देवी (चाळीसगाव):-

गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोप करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे 


• सातारा

महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा येथे  स्थापन करण्यात येत आहे 


• चंदिगढ़

सैन्य साहित्य महोत्सव-2018’ चे आयोजन चंदिगड या शहरात करण्यात आले होते


• बुडापेस्ट

2023 या वर्षामध्ये आईएएएफ (IAAF) विश्व अथॅलेटिक्स चॅपियनशिप ची स्पर्धा पार पडणार आहे


• भोपाळ

भारतातील पहिला वैश्विक कौशल (Mutti-Skill) पार्क स्थापन होत आहे :- 


• सिंगापुर

6 सप्टेंबर , 2018 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक ने सिंगापुर येथे आशियातील पहिले  डेटा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली 


• बुंदेलखंड एक्सप्रेस-वे

21 ऑगस्ट  2018 रोजी उत्तरप्रदेश सरकाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ बुंदेलखंड एक्सप्रेस-वे चे नाव ‘अटल पथ’ असे केले 


• तेलंगाना

या राज्य सरकार ने बायोटेक आणि बायोफार्मा क्षेत्रासाठी ‘बी. हब’ स्थापित करण्याचा निर्णय घेतला


• गुरुग्राम

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले


• दंतेवाड़ा

अटल बिहारी वाजपेयी एजुकेशन सिटी छत्तीगढ़ मध्ये दंतेवाड़ा या ठिकाणी स्थापन केले  जाणार आहे 


• झारखंड

या राज्यात भारतातील पहिला खादी मॉल स्थापन केला जात आहे 


• उत्तर प्रदेश

या राज्यात विद्युत चोरी बंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हात एंटी पॉवर थेफ्ट पुलिस स्टेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला 


• गुवाहाटी

 हे रेल्वे स्टेशन भारतातील पहिले सौर ऊर्जा संचालित स्टेशन ठरले 


• महाराष्ट्र

डीजीटल स्वाक्षरी असलेले ७/१२ देणारे भारतातील पहिले राज्य कोणते:- 


• पूर्वी गोदावरी (आंध्र प्रदेश )

भारतातील १००% एलईडी स्ट्रीट लाइटिंग असणारा पहिला जिल्हा  


• सूरत (गुजरात)

भारतातील १०० % सौरऊर्जा ने संचालित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र (पीएचसी) असणारा पहिला जिल्हा :-


• तमिळनाडु( तमिळनाडु कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर)

भारतातील पहिले  कीटक  संग्रहालय या राज्यात स्थापन करण्यात येत आहे :-


• फरीदाबाद

भारतातील पहिले पॅरालंपिक भवन येथे स्थापित केले जात आहे 


•  कर्नाटक

या राज्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ‘शक्तिस्थल’ स्थापन करण्यात आले


• गांधीनगर रेल्वे  स्टेशन (जयपुर)

भारतातील संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले या अगोदर मुंबईतील माटुंगा हे ‘ संपूर्ण महिला कर्मचारी असलेले पहिले स्थानक ठरले होते परंतु ते सब-अर्बन (उप-नगरीय) ररेल्वे स्टेशन आहे.


दशातील पहिल्या घटना -



देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

 

देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

 

देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

 

देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

 

देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)

 

देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

 

देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य- उत्तराखंड

 

देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

 

देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

 

देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

 

देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

 

देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज - काटेवाडी

 

देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

 

देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

 

देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

 

देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

 

देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

 

देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

 

देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

 

देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

 

देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

 

देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

 

देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

 

देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

 

देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

 

देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

 

देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

 

देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

 

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

 

देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

 

देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

 

देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

 

देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

 

देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

 

देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

 

देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर - झारखंड

 

देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

 

देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

 

देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य - आंध्रप्रदेश

 

देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

 

देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

 

देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

 

देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

 

देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

 

देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

 

देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

 

देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र - हडपसर  (पुणे)

 

देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

 

देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

 

देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

 

देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

 

देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

 

देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

 

देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

 

देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य



• विटामिन - 'A'

रासायनिक नाम : रेटिनाॅल

कमी से रोग: रतौंधी

स्त्रोत (Source):  गाजर, दूध, अण्डा, फल


• विटामिन - 'B1'

रासायनिक नाम: थायमिन

कमी से रोग: बेरी-बेरी

स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ


• विटामिन - 'B2'

रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन

कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग

स्त्रोत (Source):  अण्डा, दूध, हरी सब्जियाँ

• विटामिन - 'B3'

रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल

कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद

स्त्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मंूगफली


• विटामिन - 'B5'

रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)

कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)

स्त्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू


• विटामिन - 'B6'

रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन

कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग

स्त्रोत (Source): दूध, मांस, सब्जी


• विटामिन - 'H  / B7'

रासायनिक नाम: बायोटिन

कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग

स्त्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा


• विटामिन - 'B12'

रासायनिक नाम: सायनोकोबालमिन

कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग

स्त्रोत (Source): मांस, कजेली, दूध


• विटामिन - 'C'

रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड

कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना

स्त्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी


• विटामिन - 'D'

रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल

कमी से रोग: रिकेट्स

स्त्रोत (Source):  सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा


• विटामिन - 'E'

रासायनिक नाम: टेकोफेराॅल

कमी से रोग: जनन शक्ति का कम  होना

स्त्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध


• विटामिन - 'K'

रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन

कमी से रोग: रक्त का थक्का न बनना

स्त्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध


जगातील विविध स्थळांची टोपननावे किंवा ठळक वैशिष्टये


👉🏾 *इंग्लंडचे उद्यान*

– केंट 


👉🏾 *यूरोपाचे काश्मीर*

– स्वित्झर्लंड 


👉🏾 *वादळी शहर*

– शिकागो 


👉🏾 *पीत नदी*

– हो हँग हो 


👉🏾 *भारताचे स्वित्झर्लंड*

– काश्मीर 


👉🏾 *लवगांचे बेट*

– झांजीबार 


👉🏾 *गुलाबी शहर*

– जयपूर 


👉🏾 *खड़काळ शहर*

– अँबरडीन 


👉🏾 *पायाखालील प्रदेश*

– ऑस्ट्रेलिया 


👉🏾 *पाच नदयाचा प्रदेश*

– पंजाब 


👉🏾 *हजार तळ्यांचा देश*

– फिनलँड 


👉🏾 *निर्जनतम बेट*

– ट्रिस्टन डी क्यूबा 


👉🏾 *भारताचे व्हेनीस*

– अलेप्पी


👉🏾 *पाचूंचे बेट*

– श्रीलंका 


👉🏾 *दक्षिणेतील ब्रिटन*

– न्यूझीलंड 


👉🏾 *भारताचे उद्यान*

– बंगलोर 


👉🏾 *भूकंपाचे शहर*

– फिलाडेल्फिया 


👉🏾 *उत्तरेकडील व्हेनीस*

– स्टॉकहोम 


👉🏾 *कमलपुष्पांचा देश*

– फ़्रान्स व कॅनडा 


👉🏾 *अमर शहर*

– रोम 


👉🏾 *मंदिरांचे माहेरघर*

– बनारस 


👉🏾 *मेपल वृक्षांचा देश*

– कॅनडा


👉🏾 *काळा खंड*

– आफ्रिका 


👉🏾 *श्वेत शहर*

– बेलग्रेड 


👉🏾 *जगाचे छप्पर*

– पामीरचे पठार 


👉🏾 *भारताचा मसाला मळा*

– केरळ 


👉🏾 *भूमध्य समुद्राची किल्ली*

– जिब्राल्टर 


👉🏾 *गोऱ्या माणसाची दफन भूमी*

– गिनीचा किनारा 


👉🏾 *मोत्यांचे बेट*

– बहारीन 


👉🏾 *राजवाडयांचे शहर*

– वॉशिंगटन


👉🏾 *अज्ञात खंड*

– आफ्रिका 


👉🏾 *उंच इमारतीचे शहर*

– न्यूयार्क 


👉🏾 *भव्य अंतराचे शहर*

– कोलकाता 


👉🏾 *कांगारूंचा देश*

– ऑस्ट्रेलिया 


👉🏾 *सूर्यास्ताचा देश*

– ब्रिटन 


👉🏾 *उगवत्या सूर्याचा देश*

– जपान 


👉🏾 *मध्यरात्रीच्या सूर्याचा देश*

– नॉर्वे


विशेष दर्जा देणारं कलम 35A काय आहे:-



📌 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातील कलम 35A च्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. या याचिका सध्या प्रलंबित आहेत. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. मात्र त्यापूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.


काय आहे प्रकरण?


📌कोर्टात प्रलंबित असलेल्या याचिकांमध्ये राज्यघटनेतील कलम 35A रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी, शिक्षण आणि सुविधांपासून वंचित ठेवलं जातं. सोबतच, राज्याच्या बाहेरील व्यक्तीसोबत लग्न केल्यास मुलगीही आवश्यक अधिकार गमावते.


राष्ट्रपतींच्या आदेशाने 35A चा समावेश-


📌तत्कालीन राष्ट्रपतींच्या आदेशाने मे 1954 मध्ये कलम 35A चा राज्यघटनेत समावेश करण्यात आला. राज्यातील नागरिकांची परिभाषा ठरवण्याचा अधिकार जम्मू-काश्मीर विधानसभेला यामुळे मिळाला. याच नागरिकांना संपत्ती ठेवणं, सरकारी नोकरी मिळवणं आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळतो.


📌ससदेत प्रस्ताव आणल्याविनाच या कलमाचा राज्यघटनेत समावेश का केला, असा याचिकाकर्त्यांचा प्रश्न आहे. या आधारावर सुप्रीम कोर्टाने कलम 35A रद्द करावं, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.


एकूण चार याचिका प्रलंबित-


📌35A रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात चार याचिका प्रलंबित आहेत. यामध्ये दोन याचिका वुई द सिटीझन आणि पश्चिम पाकिस्तान निर्वासीत कृती समिती या संस्थांच्या नावाने दाखल आहेत. यामध्ये राज्यात बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या समस्यांवर बोट ठेवण्यात आलं आहे.


📌इतर दोन याचिका चारु वली खन्ना आणि सीमा राजदान भार्गव नावाच्या महिलांनी केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील बाहेरच्या पुरुषासोबत लग्न केल्यास होणाऱ्या भेदभावाचा मुद्दा या महिलांनी आपल्या याचिकांमधून मांडला आहे. त्यांनी घटनेतील कलम 14 म्हणजेच समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचंही म्हटलं आहे.


📌काश्मीरी मुलीसोबत लग्न केल्यास बाहेरच्या पुरुषांच्या मुलांना स्थायी नागरिकत्वाचा दर्जा आणि अनेक अधिकार मिळतात. मात्र राज्यातील बाहेरच्या पुरुषासोबत लग्न केल्यास महिलांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात आली आहे, असं याचिकाकर्त्या महिलांचं म्हणणं आहे.


आतापर्यंत दोन वेळा सुनावणी पुढे ढकलली-


📌कद्र सरकारने आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांचा काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नियुक्त केलं आहे. सरकारने आतापर्यंत दोन वेळा याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यासाठी विनंती केली आहे. या सुनावणीमुळे शांतता प्रस्थापित करण्यात अडचणी येतील, असं सरकारचं म्हणणं आहे.

भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे


·         छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : मुंबई 


·         इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी मुंबई 


·         नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोलकत्ता


·         के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : चेन्नई 


·         डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ : नागपूर 


·         राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : हैदराबाद 


·         गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोहाटी 


·         दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोवा 


·         सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : अहमदाबाद 


·         श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ : श्रीनगर 


·         बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : बंगळूर 


·         मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : मंगळूर 


·         कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ : कलिकत


·         कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची 


·         त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूअनंतपुरम 


·         देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : इंदौर 


·         श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : अमृतसर 


·         जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : जयपूर 


·         वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : पोर्टब्लेअर 


·         कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोईमतूर 


·         तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूचिरापल्ली 


·         चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ : लखनौ 


·         लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ : वाराणशी 

चद्रासंबंधीची माहिती


❇️चद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.


❇️चद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. 


❇️चद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.


❇️चद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.


❇️चद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.


❇️चद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.


❇️चद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.


❇️चद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.


❇️चद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.


❇️चद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.


❇️पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.


❇️अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

एनएमसीत आहे तरी काय?



राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक गुरुवारी राज्यसभेतही मंजूर झाले. या विधेयकावरून देशातील डॉक्टरांनी नुकताच संपही केला होता. हे विधेयक गरीब आणि विद्यार्थीविरोधी असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे, तर ते गरिबांसाठी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.


▪️काय आहे विधेयकात?


- वैद्यकीय क्षेत्रासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची (एनएमसी) स्थापना

- वैद्यकीय प्रवेशासाठी 'नीट'सुरूच राहणार

- वैद्यकीयच्या शेवटच्या वर्षात नॅशनल एक्झिट टेस्ट. यामुळे प्रॅक्टिस करण्यास परवाना दिला जाणार.

- कायदा अस्तित्वात आल्यानंतर तीन वर्षांनी ही तरतूद लागू.

- अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमध्ये एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा द्यावी लागणार. आतापर्यंत ही तरतूद नव्हती.


▪️कॉलेज फी आणि तपासणी


- सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शुल्क नियंत्रण करण्याचा अधिकार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला (एमसीआय) नाही.


- या विधेयकाद्वारे खासगी कॉलेजातील ५० टक्के जागांचे शुल्क निश्चित करण्यासाठी 'एनएमसी' मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार


- एमसीआय सध्या सरकारी कॉलेजातील फॅकल्टीचा वापर करून वैद्यकीय कॉलेजची तपासणी करते.


- या विधेयकामुळे त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेचा वापर करून तपासणी करता येणार.


▪️सल्लागार परिषद स्थापणार


- राज्याच्या एमसीआयमधून ११ अर्धवेळ सदस्यांची वैद्यकीय सल्लागार परिषदेवर नियुक्ती करणार.


- या परिषदेवर एकूण ७२ सदस्य असतील.


- प्रत्येक राज्याला सुमारे १० वर्षे प्रतिनिधीत्व करता येणार.


- ही परिषद एनएमसीला फक्त सल्ला देण्याचे काम करणार.


- या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एनएमसीचे अध्यक्ष असतील आणि त्यात एनएमसीचे २५ सदस्यही असणार.


- परिषदेचा सल्ला स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाणार.


▪️सरकारी प्रतिनिधींचा समावेश


- 'एनएमसी'त एकूण सदस्य २५ असणार.


- त्यातील तीन सदस्य डॉक्टर नसणार. शोध समितीतील एक, वैद्यकीय आढावा आणि रेटिंग बोर्ड व वैद्यकीय नोंदणी बोर्डावरील प्रत्येक एक असे तिघे डॉक्टर नसतील.


- वैद्यकीय सल्लागार परिषदेतही चार सदस्य डॉक्टर नसतील. यात नोकरशहांचाही समावेश असेल.


- केंद्राकडून एनएमसीवर नियुक्त होणारा सचिव डॉक्टर नसू शकतो. कारण या विधेयकात तसे बंधनकारक नाही.


▪️कद्राचे नियंत्रण वाढणार?


- एनएमसीत केंद्राने नियुक्त केलेल्या सदस्यांची संख्याही आहे.


- एथिक्स आणि नोंदणी बोर्डाने घेतलेले निर्णय सोडून अन्य सर्व निर्णयांना केंद्र सरकारकडेच दाद मागावी लागणार. कारण केंद्र सरकार हेच दाद प्राधिकरण असणार.


- धोरणात्मक आदेश देण्याचा अधिकारही केंद्र सरकारला.


▪️कारवाईचा अधिकार सरकारकडे


- आतापर्यंत एमसीआयचे निर्णय राज्य एमसीआयवर बंधनकारक नव्हते. एखाद्या डॉक्टरला निलंबित करण्याचा आदेश जरी एमसीआयने दिला, तरी राज्य एमसीआय तो नाकारत असे.


- विधेयकात मात्र एनएमसीला तसा अधिकार देण्यात आला आहे.


- जर एमसीआयने इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन केले, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आतापर्यंत नव्हता. या विधेयकात आयोगावरील कोणत्याही सदस्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार सरकारला मिळाला आहे.


- एमसीआय सदस्याला समितीवर येताना व जाताना आतापर्यंत संपत्ती व कर्जे यांची माहिती देण्याचे बंधन नव्हते. ते बंधन एनएमसीवरील प्रत्येक सदस्याला घालण्यात आले आहे. ही सर्व माहिती एनएमसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.


▪️सीएचपींची नियुक्ती


- 'आयुष' डॉक्टरसाठीचे ब्रिज कोर्सेसचा उल्लेख वगळला; पण एनएमसीने केंद्रीय होमिओपॅथी परिषद आणि केंद्रीय औषध परिषदेबरोबर वार्षिक बैठक घ्यावी असे म्हटले आहे.


- या बैठकीत सर्व प्रकारच्या औषध प्रकारांमध्ये सूसूत्रता वाढविण्याचा विचार व्हावा.


- या औषध प्रकारांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासाठी आणि वैद्यकीय विविधतेसाठी निर्णय घ्यावा.


- सामाजिक आरोग्य सेवक (सीएचपी) नियुक्त करण्याचेही विधेयकात नमूद.


- या 'सीएचपी'ना औषधे देण्याचा परवाना देणार. या सीएचपींसाठी निश्चित निकष नाहीत.


- ही संख्या सुमारे २.७ लाख असणार


- फक्त प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक औषधे देण्याचा सीएचपींना अधिकार.


▪️नोंदणीचा वाद


- डॉक्टरांनी कायम विशिष्ट कालावधीनंतर सर्व राज्य वैद्यकीय परिषदांकडे त्यांची नोंदणी आणि अधिस्वीकृती करावी असे विधेयकात स्पष्ट म्हटले आहे.


- अनेक देशांमध्ये ही पद्धती आहे.


- मात्र डॉक्टरांचा नकार असल्याने राज्य वैद्यकीय परिषदांना अशी नोंदणी अद्ययावत करणे अशक्य आहे.


- एनएमसीत डॉक्टरांची कार्यपद्धती नियंत्रित करण्याचा किंवा त्यांचे वेतन, भत्ते ठरविण्याची तरतूद नाही.


-🦋आयएमसी कायद्यातही अशी तरतूद नाही.

जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे

     जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर


·         महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर) 


·         सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका)15,42,990 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया 


·         सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल) 


·         सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)  


·         सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे


·         सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी) 


·         सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची 


·         सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार. 


·         सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)


·         सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी. 


·         सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402कि.मी. 


·         सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6मी. 


·         सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी. 


·         सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी) 


·         सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान) 


·         सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000चौ.कि.मी. 


·         सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें. 


·         सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका) 


·         सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी. 


·         सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44हेक्टर) 


·         सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी 


·         सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011) 


·         सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011) 


·         सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला24,411 व्यक्ती. 


·         सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती) 


·         सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70लाख (2000) 


·         सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी. 


·         सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क 


·         सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड) 


·         सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी2,95,000 कि.मी. 


·         सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी. 


·         सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त)162 कि.मी. 


·         सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170कि.मी.


·         सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी. 


·         सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16किमी.) 


·         सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी) 


·         सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क) 


·         सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी. 


·         सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे


·         सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी 


·         सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन,इंची 17.2 मीटर 


·         सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी 


·         सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन  


·         सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक 


·         सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क 


·         सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन


·         सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.

भारतीय निवडणूक आयोग


🅾️ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.


🧩राज्यसभा..


🅾️ ससदेचे उच्च सभागृह.


🅾️ भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात


🅾️ एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त.


🅾️ सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)


🅾️ महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा


🅾️ मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा


🧩लोकसभा..

🅾️ एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)


🅾️ पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952


🅾️16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014


🅾️लोकसभा निवडणूक 2014..


🅾️16 वी लोकसभा निवडणूक.


🅾️ 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान.


🅾️16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना


🅾️एकूण मतदारसंघ: 543


🅾️ एकूण मतदान केंद्र: 927553


🅾️ सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3


🅾️ एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)


🧩 पक्षीय बलाबल

🅾️भारतीय जनता पक्ष: 282

🅾️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

🅾️ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

🅾️ कम्युनिस्ट पक्ष: 01

🅾️ कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

🅾️राज्यस्तीय पक्ष: 182

🅾️नोंदणीकृत पक्ष: 16

🅾️अपक्ष: 03


🧩 वशिष्ट्ये...


🅾️ EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 


🅾️नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला.


🅾️ 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 


🅾️ 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 


🅾️ एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये


🅾️ महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014


🅾️ 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 


🅾️6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 


🅾️ 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.


🅾️एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला.


राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.



🅾️राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.


🅾️ राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-


🅾️ अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश


🅾️ एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश


🅾️ एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति


🅾️ सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.


🅾️ राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.


🅾️राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:


🅾️अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.


🧩समितीची रचना -


🅾️मख्यमंत्री - सभाध्यक्ष


🅾️विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य


🅾️तया राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री - 

विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य


🅾️जया राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य


 🅾️राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:


🅾️राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.


🅾️तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .


🅾️अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -


🅾️तयाने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा


🅾️ मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य  ; किंवा


🅾️राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.


🧩राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:


🅾️अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.


🅾️ पनर्नियुक्ति होवू शकते.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे ‘SPICe+’ डिजिटल व्यासपीठ कार्यरत


🔰कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ‘SPICe+’ (स्पाइस प्लस) नामक डिजिटल व्यासपीठ कार्यरत केले आहे.


🔰कद्र सरकारची तीन मंत्रालये (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि अर्थमंत्रालयातला महसूल विभाग), तसेच एक राज्य सरकार (महाराष्ट्र) आणि विविध बँका यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या 10 सेवा या व्यासपीठामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रक्रिया, लागणारा वेळ आणि खर्च यात घट झाली आहे.


🔴या 10 सेवा खालीलप्रमाणे आहेत –


🔰नाव आरक्षण

🔰निगमन

🔰DIN वाटप

🔰PANचे अनिवार्य वाटप

🔰TANचे अनिवार्य वाटप

🔰EPFO नोंदणीचे अनिवार्य वाटप

🔰ESIC नोंदणीचे अनिवार्य वाटप

🔰वयवसाय कर नोंदणीचे अनिवार्य वाटप (महाराष्ट्र)

🔰कपनीसाठी बँक खाता अनिवार्यपणे उघडणे

🔰GSTIN याचे वाटप (जर अर्ज केला असेल तर)


🔴इतर ठळक बाबी...


🔰नवीन संकेतस्थळ आधारित अर्ज प्रक्रियेमुळे कंपन्यांच्या अखंडित अंतर्भूततेसाठी ऑन-स्क्रीन फाइलिंग आणि रीअल टाइम डेटा प्रमाणीकरण सुलभ होते.


🔰परक्रियेची संख्या आधीच्या 10 च्या तुलनेत 3 करण्यात आली आहे आणि देशात व्यवसाय सुरु करण्याचा कालावधी 18 दिवसांऐवजी 4 दिवस करण्यात आला आहे.

तीन कामगार संहिता चर्चेसाठी लोकसभेत सादर केल्या.

🔰कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार यांनी लोकसभेत तीन कामगार संहिता सादर केल्या आहेत. ही विधेयके पुढीलप्रमाणे आहेत -


🔰औद्योगिक संबंध संहिता, 2020

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळी परिस्थिति विधेयक, 2020

सामाजिक सुरक्षा संहिता, 2020

ही तीन विधेयके कामगार कायद्यांच्या सुलभतेसाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्ग सुलभ करणार आणि संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातल्या देशातल्या 50 कोटी कामगारांसाठी अनेक कामगार कल्याणकारी उपाययोजना तयार करणार.


🔴ठळक बाबी....


🔰सघटित किंवा असंघटित क्षेत्रातल्या सर्व कामगारांना किमान वेतन आणि वेळेवर वेतन देण्याचा वैधानिक हक्क तयार केला गेला आहे. देशातल्या सर्व कामगारांना किमान मजुरीच्या हक्कांची यात तरतूद आहे.सध्या खाणकाम क्षेत्र, वृक्षारोपण, गोदी कामगार, इमारत व बांधकाम कामगार, सफाई व स्वच्छता, उत्पादन क्षेत्रावरील रोजगारासाठी किमान वेतन निश्चित केले आहे.


🔰सपूर्ण सेवा क्षेत्रामध्ये (माहिती तंत्रज्ञान, आतिथ्य, वाहतूक इ.), देशातले कामगार, असंघटित कामगार, शिक्षक यांनाही हा कायदा लागू होणार.किमान वेतन दर निश्चित करण्याची पद्धत सोपी करण्यात आली आहे. सध्याची रोजगारनिहाय वेतनश्रेणी ऐवजी कौशल्ये आणि भौगोलिक स्थान या बाबी विचारात घेतल्या जाणार.


🔰सपूर्ण देशात किमान वेतन दराची संख्या सध्याच्या 10000 ऐवजी 200 असणार.मध्यवर्ती क्षेत्रात 542 च्या तुलनेत फक्त 12 किमान वेतन दर असणार.

दर 5 वर्षांनी किमान वेतनात सुधारणा केली जाणार.‘फ्लोर वेतन’ची वैधानिक संकल्पना मांडण्यात आली आहे.

जागतिक आनंद अहवाल World Happiness Report-2020


🔰UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो


🔰2020 चा हा 8वा अहवाल आहे

एकूण 156 देशांची यादी जाहीर केली

या अहवालात भारताचा 144 या क्रमांक


🔰2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता


🔴2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश

1. फिनलंड


2. डेन्मार्क


3. स्विझरलँड 


4. आइलैंड


5.नार्वे


🔴शवटचे पाच देश


156. अफगाणिस्तान 


155. दक्षिण सुदान


154. झीबॉम्बे


153. रवांडा


152. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक

4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.

🔰करोना संसर्गावर उपयोगी ठरू शकेल असे एक नवीन औषध शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला  आहे.


🔰लॉस एंजल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, 4 फेनिलब्युटिरिक अ‍ॅसिड (4 पीबीए) हे औषध प्राण्यांमध्ये कोविडवर गुणकारी ठरले आहे.


🔰ह संशोधन ‘सायटोकिन व ग्रोथ फॅक्टर्स रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून कोविड रुग्णात सायटोकिन रेणू जास्त सुटत असतात.


🔰4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.

कोविड रुग्णांमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रेसिडेंट प्रोटिन हे पेशींवरचा ताण दाखवणारे रसायन रक्तातील एक निदर्शक खूण म्हणून काम करते.

राज्यसभेत रणकंदन.

🔰नवी दिल्ली : कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या गोंधळात, घोषणाबाजीत दोन्ही कृषीविषयक विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. या गोंधळावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.


🔰शतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्याकडे पाठवली जातील.


🔰लोकसभेत सत्ताधारी भाजपकडे बहुमत असल्याने ही विधेयके विनासायास मंजूर झाली. पण, राज्यसभेत भाजपकडे संख्याबळ नव्हते. त्यामुळे घाईघाईने आवाजी मतदानाने विधेयके मंजूर करून घेण्याचा कुटिल डाव आखला गेल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी केला.

भारतीयांच्या संशयास्पद बँक व्यवहारांवर अमेरिकेत अंकुश.



🔰नवी दिल्ली, मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे २०१३मधील ‘ऑफशोर लिक्स’ प्रकरण, २०१५मधील ‘स्वीस लिक्स’ प्रकरण, २०१६मधील ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि २०१७मधील ‘पॅराडाईज पेपस’ प्रकरण यांपाठोपाठ आता ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले आणखी एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. ‘फिनकेन फाईल्स’ असे त्याचे नाव आहे.


🔰ह ताजे प्रकरण उघडकीस आणताना त्यातील भारतीयांचा समावेश शोधण्यासाठी दोन हजारांहून अधिक गुप्त कागदपत्रांच्या साठय़ांची तपासणी दि इंडियन एक्स्प्रेसने केली. मनी लाँड्रिंग, दहशतवाद, अंमली पदार्थाचा व्यापार किंवा आर्थिक फसवणूक केल्याचा संशय असल्याने भारतीयांच्या या संशयास्पद बँक व्यवहारांना अमेरिकी अर्थखात्याचा ‘वॉचडॉग’ असलेल्या ‘आर्थिक गुन्हे सक्तवसुली संस्थेने’ (फिनकेन) अंकुश लावला आहे. ‘फिनकेन’ने  या कागदपत्रांना ‘सस्पीशियस अ‍ॅक्टिव्हिटी रिपोटर्स’ (सार्स) असे संबोधले आहे.


🔰अशा प्रकारच्या संशयास्पद कागदपत्रांची तपासणी ‘फिनकेन’द्वारे करण्यात येते. संबंधित बँकांच्या अनुपालन अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक गुन्ह्यांचा ठपका असलेल्या व्यवहारांची किंवा त्यात सामील ग्राहकांची माहिती संकलित करण्यात येते. संबंधित बँकांनीच अशा व्यवहारांबद्दल शंका घेऊन या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करण्याचे सुचवले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानेही या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.

इस्लामिक देशांवरही मोदींची जादू; सहा देशांनी प्रदान केलाय सर्वोच्च नागरी सन्मान:



📚पतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये दोन दिवसात दोन देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये २४ ऑगस्ट रोजी ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने मोदींना सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला. मात्र मोदींचा अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम बहुल इस्लामिक राष्ट्रांकडून सन्मान होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 


📚मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. याच सहा खास सन्मानांबद्दल जाणून घेऊयात..


■**संयुक्त अरब** : अमिराती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ ऑगस्ट २०१९ रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला.


■बाहरिन : भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ ऑगस्ट २०१९ रोजी बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


■पॅलेस्टाईन : 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.


■सौदी अरेबिया : 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

अफगाणिस्तान : 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.


■मालदीव : ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020 संसदेत मंजूर:



📚 शिक्षण व संशोधन संस्था विधेयक 2020  आज राज्यसभेत मंजूर झाले.  यापूर्वी 19 मार्च 2020 रोजी हे विधेयक  लोकसभेत मंजूर झाले होते.


📚राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, गुजरातमधील जामनगर येथे अत्याधुनिक आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आयटीआरए)  स्थापन करण्याचा आणि त्याला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा (आयएनआय) प्रदान करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.


📚गजरात आयुर्वेद विद्यापीठ कॅम्पस जामनगर येथे सध्या अस्तित्त्वात असलेल्या आयुर्वेद संस्थाचे एकत्रीकरण एकत्रित करून आयटीआरएची स्थापना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (अ) आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन संस्था, (ब) श्री गुलाब कुंवरबा आयुर्वेद महाविद्यालय, आणि (क) आयुर्वेदिक औषधनिर्माण संस्था, (ड) महर्षि पतंजली योग निसर्गोपचार शिक्षण व संशोधन संस्था (प्रस्तावित आयटीआरएच्या स्वास्तृत्व विभागाचा भाग बनण्यासाठी) या नामांकित संस्थाचा एक समूह असेल. 


📚या संस्था मागील अनेक दशकांपासून अस्तित्वात असून या आयुर्वेद संस्थांचा विशेष समूह आहे.

या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे संस्थेला आयुर्वेद आणि औषध निर्माण विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर  शिक्षणाची पद्धत विकसित करण्यासाठी स्वायत्तता मिळेल अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या संस्थांमधील समन्वयामुळे आयटीआरएला अशा आयुर्वेद शिक्षणात उच्च मानकांचे प्रतिपादन करण्यास आणि संपूर्ण आयुष क्षेत्रामध्ये प्रकाशस्तंभ संस्था म्हणून नावारूपास येण्यात मदत होईल.


📚औषध विज्ञानासह आयुर्वेदातील सर्व महत्वाच्या शाखांमध्ये कर्मचार्‍यांचे उच्च स्तरीय प्रशिक्षण आणि आयुर्वेद क्षेत्रात सखोल अभ्यास व संशोधन करणे अपेक्षित आहे.


📚आयटीआरए ही आयुष क्षेत्रातील आयएनआय दर्जाची पहिली संस्था असेल, आणि यामुळे या अभ्यासक्रमाची सामग्री आणि अध्यापनशस्त्रा बाबतीत स्वतंत्र व नाविन्यपूर्ण निर्णय घेण्यात हि संस्था सक्षम होईल. पारंपारिक ज्ञान-आधारित आरोग्य समाधानासाठी संपूर्ण जगाची रुची वृद्धिंगत होत असताना आणि आयटीआरए आयुर्वेद शिक्षणाला नवीन स्तरावर नेण्याची तयारी दर्शवित असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.

उमेदवारांना सूचना


●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●


🎯विषय :- परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही/उपाययोजना

●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●

▪️कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र

लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure-SOP) नुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सुचित करण्यात येत आहे :-

●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●


(१) परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (Mask) परिधान करणे

अनिवार्य आहे.


(२) परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेलने प्रत्येकी एक किट

उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य

आहे.


(३) परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता (Cle anliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic)

वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ सिम्पलीसिटी करणे आवश्यक आहे.


(४) कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील

पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांना आगाऊ कळवावे.


(५) उमेदवारांनी -आरोग्य सेतु" अॅप डाऊनलोड करणे त्यांच्या हिताचे आहे.


(६) उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा/अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी.


(७) दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.


(८) परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास उमेदवारांना सक्त मनाई आहे.


(९) शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक. सांकेतिक सिम्प्लिफाईड चिन्हे.भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे सर्व उमेदवारांनी कटाक्षाने पालन करावे.


(१०) प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात

आल्यास यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. तसेच संबधित उमेदवाराला

त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएस (Msg) द्वारे कळविण्याची व्यवस्था करण्यात येईल.


(११) परोक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक /परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.


(१२) वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित

कुंडीमध्ये (कचराकुंडी)  टाकावेत.


(१३) कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.


▪️शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.

ECOSOC या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.



ECOSOC ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली.


युक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.


“प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारतानं मिळवलं  आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.


आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं महत्त्वपूर्ण समर्थन देतो.


भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं 54 सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला.


या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. 2021 ते 2025 या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.

स्थलांतरित मजुरांच्या बळींबाबत केंद्र अनभिज्ञ.


करोनामुळे देशभर अचानक लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी कबुली केंद्रीय कामगार मंत्रालयाने लेखी उत्तरात दिली.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने मंत्र्यांकडून तोंडी उत्तरे दिली जाणार नाहीत. मात्र, सदस्यांच्या लेखी प्रश्नांना लेखी उत्तर दिले जाईल, अशी तडजोड सत्ताधारी पक्षाने मान्य केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी करोनाकाळातील स्थलांतरित मजुरांच्या दुरवस्थेसंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आले. टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारने कोणतीही माहिती जमा केलेली नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे उत्तर सरकारने दिले.


करोनाकाळात किती रोजगार नष्ट झाले, याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर सरकारने दिले. मात्र, ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अंदाजानुसार १.८९ कोटी संघटित रोजगार नष्ट झाले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार ४ कोटी स्थलांतरित मजुरांच्या दैनंदिन जगण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका छोटे व्यापारी, फेरीवाले व मजुरांना बसल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली.



🗝 फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे.


🗝 या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे.

या यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे 61 व्या स्थानावर आहेत.


🗝 तर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे 3.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 238 व्या स्थानावर आहेत.


🗝 ऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत 299 वं स्थान देण्यात आलं आहे.


🗝 तयांच्याकडे 2.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे 2.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 353 व्या स्थानावर आहेत.


🗝 शरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती  आहे.तर राकेश गंगवा यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

चीनची दादागिरी मोडण्यासाठी भारत-जपान एकत्र, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार.



🌑इडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचे विस्तारवादी धोरण लक्षात घेऊन भारत आणि जपानने एकत्र येऊन एक महत्त्वाचा लष्करी सहकार्य करार केला आहे. संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपाचने राजदूत सुझूकी सातोशी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.


🌑या करारामुळे संरक्षण सहकार्य दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांच्या सैन्य दलांना परस्परांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत. भारताने अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर सुद्धा अशाच प्रकारचा करार केला आहे. २०१६ साली अमेरिकेबरोबर केलेल्या करारातंर्गत भारताला डिजीबाऊटी, गारसिया, गुआम या तळांवर सैन्य दलाशी संबंधित साधनांमध्ये इंधन भरता येऊ शकते.


🌑ऑगस्ट २०१७ साली डिजीबाऊटी येथे चीनचा परदेशातील पहिला सैन्य तळ कार्यरत झाला. त्यानंतर चिनी नौदलाच्या हिंदी महासागरातील हालचाली वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपलाही पल्ला वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाला या कराराचा फायदा होईल. ग्वादर, कराची या पाकिस्तानी बंदरांमध्ये चिनी युद्धनौका, पाणबुडयांचा विनाआडकाठी मुक्तपणे वावर सुरु असतो.

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी नामांकन



🍂अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे.


🍂२०२१ च्या पुरस्कारांसाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.


🍂यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे. नर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे.


🍂खरिश्चन हे नॉर्वेच्या संसदेमध्ये चौथ्यांदा निवडूण आलेले खासदार आहेत. त्याचप्रमाणे ते 'नाटो'साठी काम करणाऱ्या नॉर्वेच्या संसदीय समितीचे अध्यक्षही आहेत.


🍂यएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितले.


🍂"माझ्या मते इतर कोणत्याही शांतता नोबेल पुरस्कार विजेत्यांपेक्षा ट्रम्प यांनी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी

जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’



ऑक्सफोर्ड पॉवर्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांनी प्रसिद्ध केलेला जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे 107 विकसनशील देशांना व्यापणारी बहुआयामी दारिद्र्याचे आंतरराष्ट्रीय परिमाण आहे.


‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) अहवालातल्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत -


107 विकसनशील देशांमध्ये, 1.3 अब्ज लोक म्हणजेच 22 टक्के लोक बहुआयामी दारिद्रयात जगत आहेत.बहुआयामी दरिद्री लोकांपैकी निम्मे (644 दशलक्ष) 18 वर्षाखालील बालके आहेत.सहापैकी एक प्रौढ यांच्या तुलनेत तीनपैकी एक बालक दरिद्री आहे.


बहुआयामी दरिद्री लोकांपैकीजवळजवळ 84.3 टक्के लोक उप-सहारा आफ्रिका (558 दशलक्ष) आणि दक्षिण आशिया (530 दशलक्ष) प्रदेशात आहेत.67 टक्के बहुआयामी दरिद्री लोक मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत.


भारताने(2005/2006–2015/2016 या काळात) राष्ट्रीय पातळीवर तसेच बालकांपैकी बहुआयामी दरिद्री लोकांची संख्या (273 दशलक्ष) केली असून ती सर्वात मोठी घट आहे. तसेच MPI गुण देखील निम्मे केले.‘2019/2020 जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’मध्ये भारताचा 62 वा (गुण: 0.123) क्रमांक आहे.


🏵इतर ठळक बाबी.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासासंबंधी उच्च-स्तरीय राजकीय व्यासपीठावर दरवर्षी जुलै महिन्यात हा निर्देशांक जाहीर केला जातो. मात्र कोविड-19 महामारीमुळे बऱ्याच राष्ट्रांची संपर्ण माहिती प्राप्त झालेली नसल्यामुळे 2019 साली प्रसिद्ध केलेल्या माहितीचा आधार घेऊन यावर्षीचा अहवाल तयार करण्यात आला.


‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) यावर देखरेख ठेवून त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी नोडल संस्था म्हणून नीती आयोग (भारत) या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.

मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; वरिष्ठ पत्रकाराची मागणी.


 

✳️माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ महिला पत्रकार सागरिका घोष यांनी केली आहे.


✳️दशातील सुमारे २७ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढल्याने मनमोहन सिंग या पुरस्काराचे मानकरी असल्याचं घोष यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे हा मुद्दा उपस्थित केला आहे.


✳️घोष यांनी म्हटलं की, भारताचे १३वे राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं नुकतचं निधन झालं तेव्हा मनमोहन सिंग आपल्या माजी सहकार्याची प्रशंसा करताना थांबत नव्हते. त्यांनी मुखर्जी यांना स्वतंत्र भारतातील महान नेत्यांपैकी एक म्हटलं आहे. घोष पुढे म्हणाल्या, प्रणव मुखर्जींनी दीर्घकाळ सरकारमध्ये असणं ही एक असाधारण गोष्ट आहे. मात्र, एक प्रश्न असाही आहे की, मनमोहन सिंग हे आपल्या सहकाऱ्याच्या तुलनेत भारतरत्नसाठी अधिक योग्य आहेत?


✳️मनमोहन सिंग सन १९९१ मध्ये जेव्हा अर्थमंत्री बनले, तेव्हा त्यांनी अनेक बदल घडवून आणले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पाठिंब्याने त्यांनी दशकांपासून सुरु असलेल्या मजबूत नियंत्रित अर्थव्यवस्थेला मुक्त केले. २००६ ते २०१६ दरम्यान २७१ मिलियन म्हणजेच २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढले. या काळात मोठ्या कालावधीसाठी मनमोहन सिंग हेच देशाचे पंतप्रधान राहिले. भारतातील करोडो लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. आत्ताच्या गरिबांसाठीच्या अनेक योजना जशा वित्तीय समावेशन, मनरेगा आणि आधार कार्ड त्यांच्याच कार्यकाळातील देणं आहे, असं घोष यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन: 7 सप्टेंबर



संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात सदस्य राष्ट्रांमध्ये 7 सप्टेंबर 2020 रोजी "क्लीन एअर फॉर ऑल" या संकल्पनेखाली पहिला ‘निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन’ साजरा करण्यात आला. 19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनी हा दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता.


दिनाचे उद्दीष्टः


🔸आरोग्य, उत्पादकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण याच्या दृष्टीने स्वच्छ हवेचे महत्त्व पटवून देणे.


🔸हवेच्या गुणवत्तेचा इतर पर्यावरणीय / विकासात्मक आव्हानांशी असलेला जवळचा संबंध दर्शविणे.


🔸कार्यक्षम ज्ञान, सर्वोत्कृष्ट सरावपद्धती, नवकल्पना आणि यशोगाथा सामायिक करून हवेची गुणवत्ता सुधारण्याविषयीच्या उपाययोजना जाहीर करणे आणि उपलब्ध करून देणे.


भारतातला कार्यक्रम


भारतात केंद्रीय पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर  2020 रोजी या दिनानिमित्त एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे नगरविकास व पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सहभागी झाले.

हक्कभंग म्हणजे नेमकं काय ?


💫 अभिनेत्री कंगना पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.


⚡️ यावेळी नेमकं हक्कभंग म्हणजे काय? हक्कभंग दाखल झाल्यास पुढे काय होतं?


💁‍♂️ हक्कभंग कधी होतो?:


▪️ खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. 


▪️ या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही.


▪️ आमदार विधानसभेत जे विचार मांडतात. त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.


💁‍♂️ हक्कभंग असा निदर्शनास आणतात :


▪️ सभागृह समितीचा अहवाल

▪️ विधिमंडळ सभासदाकडून तक्रार

▪️ विधानसभा सचिवांचा अहवाल

▪️ याचिका


💁‍♂️ शिक्षा :

1)आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते.


2)  दुसरा कोणी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.


📌 दरम्यान, कंगना रनौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.

Online Test Series

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...