निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन: 7 सप्टेंबरसंयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात सदस्य राष्ट्रांमध्ये 7 सप्टेंबर 2020 रोजी "क्लीन एअर फॉर ऑल" या संकल्पनेखाली पहिला ‘निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन’ साजरा करण्यात आला. 19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनी हा दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता.


दिनाचे उद्दीष्टः


🔸आरोग्य, उत्पादकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण याच्या दृष्टीने स्वच्छ हवेचे महत्त्व पटवून देणे.


🔸हवेच्या गुणवत्तेचा इतर पर्यावरणीय / विकासात्मक आव्हानांशी असलेला जवळचा संबंध दर्शविणे.


🔸कार्यक्षम ज्ञान, सर्वोत्कृष्ट सरावपद्धती, नवकल्पना आणि यशोगाथा सामायिक करून हवेची गुणवत्ता सुधारण्याविषयीच्या उपाययोजना जाहीर करणे आणि उपलब्ध करून देणे.


भारतातला कार्यक्रम


भारतात केंद्रीय पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर  2020 रोजी या दिनानिमित्त एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे नगरविकास व पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...