Wednesday 23 September 2020

फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली.



🗝 फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे.


🗝 या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे.

या यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे 61 व्या स्थानावर आहेत.


🗝 तर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे 3.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 238 व्या स्थानावर आहेत.


🗝 ऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत 299 वं स्थान देण्यात आलं आहे.


🗝 तयांच्याकडे 2.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे 2.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 353 व्या स्थानावर आहेत.


🗝 शरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती  आहे.तर राकेश गंगवा यांना या यादीत 359 वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे 2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...