२३ सप्टेंबर २०२०

शब्दयोगी अव्यय

· वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दां शी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

· शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडूनच येतात.

· शब्दयोगी अव्ययवाचे पंधरा प्रकार पडतात.



2. स्थलवाचक :

· आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.

· उदा. 1. पुस्तक टेबलाजवळ ठेवले आहे.

2. घरामध्ये मोठा साप घुसला आहे.



4. हेतुवाचक :

· करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.

· उदा.   1. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.

            2. जगण्यासाठी अन्न हवेच.



5. व्यतिरेकवाचक :

· विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त

· उदा. 1. तुझ्याशिवाय माला करमत नाही.

2. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.



6. तुलनात्मक :

· पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.

· उदा. 1. माणसांपेक्षा मेंढरं बारी.

           2. गावामध्ये केशर सर्वात हुशार आहे.



7. योग्यतावाचक :

· समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.

· उदा. 1. तो ड्रेस माझा सारखा आहे.

           2. आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.


8. संग्रहवाचक :

· सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त,इ.

· उदा. 1. मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.

           2. रामही भक्तासाठी धावून येईल.



9. कैवल्यवाचक :

· च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.

· उदा. 1. विराटच आपला सामना जिंकवेल.

          2. किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.


10. संबंधवाचक :

· विशी, विषयी, संबंधी इ.

· उदा. 1. देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.

           2. त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.



11. संबंधवाचक :

· संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.

· उदा. 1. त्याने सर्वांबरोबर जेवण केले.

           2. आमच्या सह तो पण येणार आहे.



12.विनिमयवाचक :

· बद्दल, एवजी, जागी, बदली इ.

· उदा. 1. त्याच्या जागी मी खेळतो.

           2. सूरजची बदली पुण्याला झाली.



13. दिकवाचक :

· प्रत, प्रती, कडे, लागी इ.

· उदा. 1. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.

           2. त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.



14. विरोधवाचक :

· विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.

· उदा. 1. भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.

           2. त्याने उलट माझीच माफी मागितली.


15. परिणामवाचक :

· भर

· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.

           2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.



15. परिणामवाचक :

· भर

· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.

           2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा