Monday 21 November 2022

भारतातील काही महत्त्वाची नवाश्मयुगीन स्थळे :


१. भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश 

पहिल्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ७००० ते ६०००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ६००० ते ४५००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती.


२. जम्मू आणि काश्मीर 

काश्मीरमधील बुर्झोम आणि गुफक्राल येथे इसवी सनापूर्वी २५०० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


३. उत्तर प्रदेश 

उत्तर प्रदेशातील चोपनी मांडो, कोलढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी ६००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


४. बिहार 

बिहार येथील चिरांड, सेनुवार यांसारखी स्थळे. येथे इसवी सनापूर्वी २००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली. 


५. ईशान्य भारत 

आसाममधील दाओजाली हाडिंग येथील उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मयुगाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम उजेडात आला. तेथील गाव वसाहतींची सुरुवात इसवी सनापूर्वी २७०० च्या सुमारास झाली. येथे मिळालेली नवाश्मयुगीन हत्यारे चीनमधील नवाश्मयुगीन हत्यारांशी अधिक साम्य दर्शवणारी आहेत.


६. दक्षिण भारत 

कर्नाटकातील संगणकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा, तमिळनाडूतील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे चौथ्या ते तिसऱ्या शतकांत नवाश्मयुगाची सुरुवात झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...