07 June 2025

रक्ताभिसरण संस्था

           
"हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण संस्था म्हणतात".

रक्ताभिसरण संस्था हृदय(Heart), रक्त(Blood), रक्तवाहिन्या(Blood Vessels) या पासून बनलेली आहे.

शोध : विल्यम हार्वे 1628  मध्ये
( फादर ऑफ अँजिओलॉजी, विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हणतात)

शरीरातील महत्त्वाचा घटक हृदय.

       *प्रकार *
1)खुली रक्ताभिसरण संस्था .
2)बंद रक्ताभिसरण संस्था.
1) खुली रक्ताभिसरण संस्था:
रक्तवाहिन्या नसतात.
" मॉलुस्का" आणि "आर्थोपोडा" या गटातील सजीव  यात येतात. शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते .
अपवाद ऑक्टोपस ऑक्टोपस व स्क्विड  हे प्राणी बंद रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये येतो.
2)बंद रक्ताभिसरण संस्था:
यात रक्तवाहिन्या असतात .
शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळत नाही.
या संस्थेत उभयचर ,पृष्ठवंशीय ,सरपटणारे प्राणी येतात.

             *मानवी रक्त*
मानवी शरीरात रक्तवाहिन्या ची लांबी 97000 किलोमीटर आहे.
रक्तवाहिन्या(Blood Vessels): 3 प्रकार
1)धमनी(Arteries):
हृदयाकडून  शरीरांच्या सर्व भागांना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा .
अपवाद- हृदयाकडून फुप्फुसाकडून  ऑक्सिजन विरहीत रक्त वाहून नेणारी एक अपवादात्मक धमणी असते जिला फुप्फुसभिगा /फुप्फुस धमणी (Pulmonary Arteryअसे म्हणतात
शरीराच्या खोलवर भागात असतात .
धमन्यांमध्ये झडपा नसतात .
धमन्या कमी लवचिक असतात.
  रक्तदाब जास्त असतो धमणी मध्ये सुमारे  सरासरी रक्तदाब 100mmHg असतो.

2)शिरा(Veins):
  शरीराच्या सर्व कविवा कडून ऑक्सिजन विरहीत रक्त हृदयाकडे पोचवतात.
अपवाद- फुप्फुसाभिगा शिरा(Pulmonary Vein) पुरुषाकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त  रक्त वहन करते.
शिरा जास्त लवचिक/ स्थितिस्थापक असतात.
शिरांमध्ये झडपा असतात.
शिरांमधील रक्तदाब दमण यांच्या मानाने खूप कमी म्हणजे 2mmHg असतो.

3) केशवाहिन्या(Capillaries)
केशवाहिन्या एकत्र येऊन शिरा तयार होतात केशवाहिन्या च्या धमनीका आणि शिरा यांना जोडतात.
केशवाहिन्याचा शरीरातील पेशी प्रत्यक्ष संबंध असतो म्हणजे केशवाहिन्या आणि पेशी यांच्या दरम्यान सतत ऑक्सिजन, कार्बनडाय-ऑक्साइड ,पोषकद्रव्ये ,हार्मोनस ,टाकाऊ पदार्थ यांची देवाण-घेवाण चालू असते.

       *रक्तदाबनुसार *
शिरांमधील रक्तदाब कमी असतो .
केशवाहिनी मधील रक्तदाब हा शिरा पेक्षा जास्त असतो व धमनी पेक्षा कमी असतो.
धमणी मध्ये सर्वाधिक रक्तदाब असतो.

        *जाडीनुसार*
केशवाहिन्या ह्या कमी जाडीच्या व आतून पोकळी जास्त असते . शीरा ह्या केशवाहिनी पेक्षा जाड असतात व धमणी पेक्षा कमी जाड असतात .
धमनी सर्वात जास्त जाड असते व आतून पोकळी कमी असते.

         *रक्त(Blood)*
खारट चव.
दोन घटकांनी बनलेले आहे

 
1】रक्तद्रव(Plasma):
  रंग-फिकट पिवळा रंग किंवा रंगहीन
सर्व रक्तापैकी 55% रक्तद्रव यापैकी 90%पाणी+7%प्रथिने+3% असेंद्रिय घटक
【7%प्रथिने
1-ग्लोब्ल्यूलिन: प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडी) तयार करते, प्रतिकार शक्ती नियंत्रित करते.
2-अलब्यूमिन: शरीरातील पाण्याचे नियंत्रण ठेवते.
3-प्रोथॉम्बिंन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.
4-फायब्रीनोजन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.】


2】रक्तपेशी(Corpuscle):
तीन प्रकार


1]RBC(Red Blood Cell)/लाल/तांबड्या/लोहित पेशी:
केंद्रकविरहित( अपवाद- उंट)
संख्या: A) पुरुष 52 लाख/mm^3 of Blood
          B) स्त्री 47 लाख/mm^3 of Blood
           RBC:WBC=  7:1 प्रमाण
आकार: गोल द्विअंतर्वक
निर्मिती: अस्थीमज्जा(Bone marrow)
आयुष्य: 125 -127 दिवस.
नाश: यकृतात (liver)
कार्य: RBCs मध्ये हिमोग्लोबिन असते.
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन व कार्बन डायॉक्साईडचे अल्पप्रमाणात वहन करते.
हिमोग्लोबिन मुळे रक्ताला लाल रंग येतो.
त्वचेला deep cherry red रंग carboxy haemoglobin मुळे येतो.
संबंधित रोग: १) ॲनिमिया रोग हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे.
                   २) थॅलॅसेमिया रोग.


2]WBC(White Blood Cell)/श्वेत/पांढऱ्या/सैनिकी पेशी:
केंद्रक असते.
संख्या: 9 ते 10 हजार/mm^3 of Blood
निर्मिती: अस्थीमज्जा(bone marrow)
आकार:आकारहीन /अमिबसदृश्य
आयुष्य: 15 दिवस.
नाश: यकृतामध्ये
कार्य: शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणे म्हणून त्यांना सैनिकी पेशी म्हणतात.
संसर्ग झाल्यावर यांची संख्या वाढते.
संबधित रोग: १)रक्ताचा कॅन्सर (Leucamia) WBC वाढल्यावर
                २)एड्स -HIV T4 Lymphocytes वर हल्ला करतो.


3) रक्तबिंबिका /रक्तपट्टीका (platelets):
द्विबहिर्वक्र आकार .
रंगहीन
या फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात.
केंद्र नसते .
अतिशय लहान असतात.
संख्या:2.5 ते 4 लाख/mm^3 of Blood
निर्मिती:अस्थीमज्जा(bone marrow)
कार्य: रक्त गोठण्याची क्रिया सुरू होण्यासाठी.
(डेंगू मलेरिया टाइफाइड इत्यादी रोगांमध्ये रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.)

यकृत कार्य

👉यकृत रक्तातील बहुतेक रासायनिक पातळीचे नियमन करते आणि पित्त नावाच्या उत्पादनास उत्सर्जित करते. हे यकृत पासून कचरा उत्पादने वाहून नेण्यास मदत करते. 


👉पोट आणि आतडे सोडणारे सर्व रक्त यकृतामधून जाते. यकृत या रक्तावर प्रक्रिया करते आणि तोडतो, संतुलित होतो, आणि पोषकद्रव्ये तयार करतो आणि औषधे शरीरात उर्वरित वापरण्यास सोपी किंवा नॉनटॉक्सिक अशा फॉर्ममध्ये चयापचय करते. 


👉यकृत सह 500 हून अधिक महत्त्वपूर्ण कार्ये ओळखली गेली आहेत. काही अधिक सुप्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे:


👉पित्त उत्पादन, पचन दरम्यान कचरा दूर आणि लहान आतडे चरबी तोडण्यास मदत करते


👉रक्ताच्या प्लाझ्मासाठी काही प्रथिने तयार करणे


👉शरीरात चरबी वाहून नेण्यासाठी कोलेस्टेरॉल आणि विशेष प्रथिने तयार करणे


👉सटोरेजसाठी जास्त प्रमाणात ग्लूकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणे (ग्लायकोजेन नंतर उर्जेसाठी ग्लूकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकते) आणि संतुलन आणि आवश्यकतेनुसार ग्लूकोज बनवणे. 


👉अमीनो idsसिडच्या रक्ताच्या पातळीचे नियमन, जे प्रथिने बनवण्याचे ब्लॉक बनवते


👉हिमोग्लोबिनची लोह सामग्री वापरण्यासाठी प्रक्रिया (यकृत लोह साठवते)


👉विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतरण (युरिया हे प्रथिने चयापचयातील एक शेवटचे उत्पादन आहे आणि मूत्रात उत्सर्जित होते)


👉औषधे आणि इतर विषारी पदार्थांचे रक्त साफ करणे


👉रक्त गोठण्यास नियमित करणे


👉रोगप्रतिकारक घटक बनवून आणि रक्तप्रवाहापासून बॅक्टेरिया काढून संक्रमणांना प्रतिकार करते


👉लाल रक्तपेशींपासून देखील बिलीरुबिनचे क्लीयरन्स. जर बिलीरुबिनचे संचय होत असेल तर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. 


👉जव्हा यकृत हानिकारक पदार्थांचा नाश करतो तेव्हा त्याची उप-उत्पादने पित्त किंवा रक्तात मिसळतात.


👉 पित्त-उप-उत्पादने आतड्यात प्रवेश करतात आणि मलच्या स्वरूपात शरीर सोडतात. मूत्रपिंडांद्वारे रक्ताद्वारे-उत्पादनांना फिल्टर केले जाते आणि शरीर मूत्र स्वरूपात सोडते.

विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)



१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन



1) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.

 A. १९७५

 B. १९८२

 C. १९७८✅

 D. १९८०


2) अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

 A. १०

 B. २०

 C. १५

 D. २५✅


3 ) कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

 A. हरियाना

 B. जम्मू-काश्मिर

 C. पंजाब

 D. राजस्थान✅


4) एच.आय.व्ही. काय आहे  ?

 A. वरीलपैकी सर्व

 B. एड्स ची चाचणी 

 C. विषाणू  ✅

 D. असाध्य रोग


5) ‘सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?

 A. प्रकाशापेक्षा कमी वेगवान       

 B. ध्वनीपेक्षा कमी   

 C. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान✅

 D. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान


6) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

 A. निकाल्स

 B. निकोटीन✅

 C. कार्बोनेट

 D. फॉस्फेट


7) रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

 A. तुळस✅

 B. सिंकोना

 C. अडूसळा

 D. सदाफुली


8) संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.

 A. ड✅

 B. क

 C. ई

 D. अ



9) प्रौढ माणसाच्या १०० मि.लि. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ……….. आहे .

 A. ८ ग्रॅम 

 B. १० ग्रॅम 

 C. १४ ग्रॅम✅

 D. १८ ग्रॅम


10) बीसीजी व्हक्सीन ही खालील पद्धतीने देतात.

 A. Infra muscular✅

 B. Sub cutuneous

 C. Intradermal

 D. Inravenous


11) शरीराच्या सर्व भागांतील रक्त ह्दयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ……….. म्हणतात.

 A. केशवाहिनी   

 B. रक्तकेशिका 

 C. शिरा (नीला)✅

 D. रोहिणी (धमन्या)


12) गंडमाळ / गॉयटर म्हणजे ………… च्या ग्रंथिना आलेली सूज होय .

 A. वृषण 

 B. थॉयराईड     ✅

 C. अॅड्रेनल

 D. थायमस


13) रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …………म्हणतात.

 A. दृष्टीपटल 

 B. रंजीत पटल      ✅

 C. श्वेत पटल

 D. पार पटल


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान.

🅾️ ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.


🅾️ ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’शरीरातीलप्रतिकारशक्ती वाढविते.


🅾️ आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.


🅾️० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्केघनपदार्थ

असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,३.५ ते३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व

०.६ ते०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,म्हणूनदुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.


🅾️मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम

दुधाची आवश्यकता असते.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोगहोतो.


🅾️ मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधितआहे.


🅾️माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंशसेल्शिअसअसते.


🅾️ डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारातकेला जातो.


🅾️ मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.


🅾️ इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.


🅾️मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.रक्तामध्ये

मँगेनिज हे द्रव्य असते.


🅾️ ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर

कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.


🅾️ मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटकजास्तप्रमाणात असते.


🅾️ मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.


🅾️ कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोगकरतात.


🅾️ तबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्येकॅफीन हेअपायकारक द्रव्य असते.


🅾️ रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढझाल्यासब्लड कॅन्सर होतो.


🅾️पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वरवकावीळ.


🅾️हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय वइन्फ्लुएंझा


🅾️ मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळेहोतो.


🅾️मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम वलॅप्सो स्पायरसी


🅾️ रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्णदगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.


🅾️नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.


🅾️सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.


🅾️ हदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेलेअसते.


🅾️परुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोकेअधिक असतात.


🅾️रक्तदाबाच्या विकारावर तुळस हीवनस्पती उपयुक्तआहे.


🅾️शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यानेहृदयविकाराचा झटका येतो.


🅾️ रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारेकोलेस्टेरॉलरक्तातून वाहते.


🅾️ शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारेमोजलेजाते.


🅾️ शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’

हा घटक करतो.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

पर्यावरणासंबंधी काही महत्त्वपूर्ण दिवस.

⭐️ ०२ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन

🐻 ०३ मार्च : जागतिक वन्यजीव दिन

🌊 १४ मार्च : नद्यांसाठी कृती दिन

🌳 २१ मार्च : जागतिक वन दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☂️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🐟 २२ मे : जागतिक जैवविविधता दिन

🌴 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

🌊 ०८ जून : जागतिक समुद्र दिन

🍃 १५ जून : जागतिक वारा दिन

🏜️ १७ जून : वाळवंटीकरण प्रतिरोध दिन

🌳 २८ जुलै : पर्यावरण संवर्धन दिन

⭐️ ३१ जुलै : जागतिक रेंजर दिन 

👨‍🔬 १० ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय जैवइंधन दिन

⭐️ १६ सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन 

🦁 ०४ ऑक्टोबर : जागतिक प्राणी दिन

🏭 ०२ डिसेंबर : राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

⛰️ ११ डिसेंबर : जागतिक पर्वत दिन

☀️ १४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

महाराष्ट्राचा भूगोल वनलाईन नोट्स


🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी.


🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा.


🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध.


🔶रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार.


🔶महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड.


🔶सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा.


🔶सजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू.


🔶मळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास.


🔶सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर.


🔶एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर.


🔶कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६.


🔶भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर.


🔶मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे.


🔶महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता


🔶पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ.


🔶समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री.


🔶सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट.


🔶हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा.


🔶हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर.


🔶पणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड.


🔶‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर.


🔶भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद).


🔶चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर).


🔶औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर.


🔶औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग.


🔶बलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा.

पोलिस भरती-खनिजद्रव्य त्याचे उपयोग व होणारे परिणाम

1. *फॉस्फरस* :   


स्त्रोत : अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या.

उपयोग : हाडे व स्नायू यांचे संवर्धन, ए.टी.पीची निर्मिती.

अभावी होणारे परिणाम : चयापचय क्रियेत अडथळे व हाडे ठिसुळ होतात.


2. *पोटॅशियम* :


स्त्रोत : सुकी फळे.

उपयोग : चेतापेशीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : चेतापेशीवर परिणाम होतो.


3. *कॅल्शियम* : 


स्त्रोत : तीळ व पालेभाज्या.

उपयोग : हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : हाडे कामकूवत व नरम होतात. तसेच ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.


4. *लोह* : 


स्त्रोत : हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी.

उपयोग : रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनचे पोषण, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणणे व प्रतिरोध संस्थेला मदत करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  


5. *तांबे* :


स्त्रोत : पालेभाज्या.

उपयोग : हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.


6. *सल्फर* :


उपयोग : प्रथिनांची निर्मिती करणे. अस्थी व नखे यांचे आरोग्य राखणे.

अभावी होणारे परिणाम : केस, हाडे कमकूवत होतात.


7. *फ्लोरिन* : 


उपयोग : दातांचे रक्षण करणे.

अभावी होणारे परिणाम : दंतक्षय होतो.


8. *सोडीयम* : 


उपयोग : रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधणे.

अभावी होणारे परिणाम : रक्तदाबावर परिणाम होतो.  


9. *आयोडीन* :   


उपयोग : थायराईड ग्रंथीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : गलगंड नावाचा आजार होतो.

मान्सूनचे स्वरूप

*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

*क) मान्सूनचा खंड

*ड) मान्सूनचे निर्गमन


🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

1) आर्द काल व शुष्क काल

👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2 पाऊसचे  वितरण

👉बगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

👉बगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;

👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*

👉  पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


🚺क) मान्सूनचा खंड

👉 नऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*

पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....


🔹 पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 


🔹उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.


🔹भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 

🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे

 पाऊस पडत नाही . 

तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


🚺ड) मान्सूनचे निर्गमन


👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते . मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

___________________________

TCS_IBPS वर आधारित प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा

12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग

13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए

14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर

15,) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ

16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च

18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार

19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड

20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक

21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
उत्तर- 21 कि.मी

22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- 2:3

23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
उत्तर- कॅलरीज

24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड

25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड

26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
उत्तर- महात्मा गांधी

27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?
उत्तर- मुंबई

28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन

30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा

31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी

32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे

34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक

35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर-  ल्युकेमिया

36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती

37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
उत्तर- तलाठी

38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर-  महात्मा गांधी

39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
उत्तर- डॉक्टर विजय भटकर

40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
उत्तर- वाहन

41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
उत्तर- कुसुमाग्रज

42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर- 13

44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- रायगड

45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- अहमदनगर

46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- कोल्हापूर

48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- ऑस्ट्रेलिया

49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर- इक्वेडोर

50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर- तुर्कस्तान

51) झुलू जमात कोठे आढळते ?
उत्तर- दक्षिण आफ्रिका

52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर

53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
(मार्गदर्शक दशरथे सर): उत्तर- कावेरी

55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद

56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- हंगेरी

57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
उत्तर- राष्ट्रकूट

58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी

59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा

60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
उत्तर- सुभाषचंद्र बोस

61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
उत्तर- लोकमान्य टिळक

62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला?
उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858

63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
उत्तर- 1909

64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर- लॉर्ड आयर्विन

65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
उत्तर- सविनय कायदेभंग

66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
उत्तर- दादाभाई नौरोजी

67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?
उत्तर- 26 जानेवारी 1930

68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते
उत्तर- फाजलअली

70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
उत्तर- 3

71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार

72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
उत्तर- स्वर्णसिंह समिती

73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे? 
उत्तर- कलम 123

74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
उत्तर- 22

75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
उत्तर- 11

76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 3 डिसेंबर

77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
उत्तर- श्रीलंका

78) सुजय कशाशी संबंधित आहे?
उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल

79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
उत्तर- ॲल्युमिनियम

80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
उत्तर- यकृत

81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
उत्तर- डेसिबल

82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
उत्तर- तुर्कस्तान

83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?
उत्तर- 1991

84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष

85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी

86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान

87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5

88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज

89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी

90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016

91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया

92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर

93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज

94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन

95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट

96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌

97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड

98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
उत्तर- पुणे

99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर

100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य

101) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल

102) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार

103) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे  दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949

104) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड

105) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते

106) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी

107) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?
उत्तर- कृष्णराव साबळे

108) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?
उत्तर- 1913

109) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा

110) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
: उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे?
उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय?
उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत?
उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
उत्तर- व्यंकटेश माडगूळकर

201) संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
उत्तर- तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)

202) सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर- सिमुक

203) चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- हेमाद्री

204) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर- भाऊ महाजन

205) कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?
- प्लासी

पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न

१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ४५१ कि.मी

२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.

= लिपस निग्रीकोलीस

३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.

= काटकोन त्रिकोण

४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..

= ऊस

५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर

६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?

= वैनगंगा

७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?

= इंद्रावती

८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.

=मुंबई उपनगर

९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?

= शुक्र

१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?

= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.

= धरमतर

१२) कसारा घाट’ म्हणजेच …..

= थळघाट

१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

= १ मे

१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.

= १ नोव्हेंबर, १९५६

१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

= गुजरात

१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.

= सह्य

१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.

= नागपूर

१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.

= गंगापूर

१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.

= सह्य

२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

= कृष्णा

२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.

= सन २०१९

२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?

= ३६ टक्के

२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.

= सिंधुदुर्ग

२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

= खानदेशी

२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.

= ९.४

२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?

= सातवा

२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.

= १६.४७ टक्के

२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

= ७.१६ टक्के

२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?

= शुष्क पानझडी वृक्षांची वने

३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.

= सह्य

३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.

= मालवण

३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.

= ६४० कि. मी.

३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.

= गोदावरी

३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.

= भीमा

३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.

= कुरुगड्डी

३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ७३२ कि. मी.

३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

= आमदार आदर्श ग्राम योजना

४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.

= जळगाव, नंदुरबार व धुळे

४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.

= मोडकसागर

४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.

= सातपुडा

४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.

= ४५.१० लाख

४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.

= गोदावरी

४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.

= जुन ते सप्टेंबर

४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.

= विदर्भ

४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.

= प्रस्तरभंग

४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.

= प्रतिरोध

५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.

= पानझडी वृक्षांची अरण्ये

५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती

५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….

= माडिया-गोंड

५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.

= मराठवाडा

५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

= महादेव डोंगररांग

५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.

= गोदावरी व भीमा

56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.

= सातपुडा

57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.

= १,६४६ मीटर

58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.

= उल्हास

59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.

= दहिसर

६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.

= कसारा

६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी

६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.

= १९८३

६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

= सहावा

६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.

= रुपये ६००/

६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.

= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)

६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….

= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी

६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.

= कोकण व पठार (देश)

६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.

= लोह व जस्त

७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे

= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा

७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.

= विदर्भ

७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.

= धुळे, नंदुरबार, जळगाव

७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= वैनगंगा

७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.

= तमिळनाडू (४८.४० टक्के)

७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.

= गोदावरी

७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

= चंद्रपूर व गडचिरोली

७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.

= नागपूर, गोंदिया व भंडारा

७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.

= रत्नागिरी व सिंधुदुर्ग

८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.

= सातारा व सांगली

८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= पूर्णा

८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..

= आंबोली

८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

= तापी

८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.

= पनवेल व अंबरनाथ

८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….

= मध्य प्रदेश

८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .

= वर्धा व वैनगंगा

८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..

= आंबेनळी

८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

= खान्देश व विदर्भ

८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.

= तापी

९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .

= भीमा

९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .

= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ

९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.

= खान्देशी

९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.

= २२८ कि .मी .

९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

= कृष्णा

९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

= ३१

९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?

= राज्यपाल

९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .

= २५ ओक्टोम्बर ,१७७२

१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

👉 महाराष्ट्राविषयी माहिती 


•  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


•  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


• महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


•  महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


•  महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


•  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


•  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


•  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


•  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


•  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


•  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


• पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


• गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


•  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


• गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


•  जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


•  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


•  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


•  महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


°  कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


•  कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


• विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


•  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


•  महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


•  विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


•  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


• संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


•  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


•  ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


•  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


• पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


•  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


•  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


•  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


•  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


•  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


•  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


•  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


•  महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


•  शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


•  ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


• तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

वाचा :-भूगोल प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी 


Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी 


Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड

Latest post

महाजनपद आणि त्यांची माहिती:

1. अंग 🟢    - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार    - राजधानी: चंपा 🏰    - राजा: दशरथ 👑    - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️ 2...