Sunday 10 November 2019

नागालॅड मध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर

🔸राष्ट्रीय नमूना सर्वेक्षणने जुलै २०१९ रोजी बेरोजगारी दर प्रकशित केले ‘

🔸या अहवालानुसार नागालॅड (21.4%) मध्ये सर्वाधिक बेरोजगार आढळून आला आहे त्यानंतर गोवा (13.9%) दुसऱ्या स्थानावर तर मणिपुर (11.6%) तिसऱ्या स्थानावर आहे.

🔸सर्वात कमी बेरोजगार दर मेघालय (1.5%), छत्तीसगढ़ (3.3%) व सिक्किम (3.5%) या राज्यांमध्ये आहे.

🔸 या अहवालानुसार ग्रामीण क्षेत्रात ५.३% तर शहरी क्षेत्रात ७.८% बेरोजगारी दर आहे. यामध्ये पुरुष बेरोजगारी दर ६.२ तर महिलांमध्ये बेरोजगारीचा दर ५.७ एवढा आहे.

🔸या अहवालात उच्च महिला बेरोजगार दर सर्वाधिक नागालॅड (34.4%), गोवा (26.0%) आणि केरळ (23.3%) असा आहे तर सर्वात कमी उच्च महिला बेरोजगारी दर मेघालय मेघालय (1.9%), मध्य प्रदेश (2.1%) व राजस्थान (2.3%) असा आहे.

🔸 पुरुषांचा सर्वाधिक बेरोजगार दर नागालॅड (18.3%), मणिपुर (10.2) व दिल्ली (9.4%) असा आहे तर सर्वात कमी बेरोजगार दर मेघालय (1.3%) सिक्किम (2.6%) व छत्तीसगढ़ (3.3%) असा आढळून आला आहे

भारताची प्राकृतिक माहिती

♦️भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,  38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.

♦️भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो. 

♦️भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश.

♦️भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे. 

♦️भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.

♦️भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.

♦️भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.

♦️जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.

♦️21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.

♦️जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.

♦️के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.

♦️कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळ च्या सीमेवार आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.

♦️देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.

♦️भारतात एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.

♦️क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.

♦️लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.

♦️चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.

♦️देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे. 

♦️भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील

♦️राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.

♦️भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.

♦️भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.

♦️भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.

♦️भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.

♦️देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.

♦️देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.

♦️देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.

♦️सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1)  ...................... ! धोनी आऊट झाला.
   1) अरेरे    2) बापरे     
   3) अहो    4) अबब
उत्तर :- 1

2) ‘मुले गडावर चढतात’ या वाक्याचे वर्तमानकाळी नकारार्थी रूप शोधा.

   1) मुले गडावर चढत नाहीत    2) मुले गडावर चढली नव्हती
   3) मुले गडावर चढणार नाहीत    4) मुले गडावर चढत नसतील

उत्तर :- 1

3) खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळया लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा.

   1) कन्या, दुहिता, पोरगी, बेटी    2) रुमाल, पगोटे, पगडी
   3) लोटा, लोटी, लाटणे      4) झरा, ओढा, नदी

उत्तर :- 2

4) पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. – लेखणी

   1) लेखणे    2) लेख     
   3) लेखण्या    4) लेखी

उत्तर :- 3

5) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना
      .................. असे म्हणतात.
   1) वचन    2) लिंग      3) अव्यय    4) विभक्ती

उत्तर :- 4

6) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

   1) पाय घसरला म्हणून पडलो    2) पाय घसरून पडलो
   3) पाय घसरला व पडलो      4) यापैकी नाही

उत्तर :- 2

7) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

   1) विलासरावांचा थोरला    2) मुलगा   
  3) क्रिकेटचा सामना    4) चांगला खेळला

उत्तर :- 4

8) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग    2) कर्तरी प्रयोग    3) भावे प्रयोग    4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

9) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

   1) कर्मधारय    2) व्दंव्द      3) व्दिगू      4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

10) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
     ‘केवढयाला झाली ही खरेदी
....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

   1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह      2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
   3) स्वल्पविराम वा पूर्णविराम    4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2

तेजस्विनी सावंत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

◾️कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंतने जगाच्या नकाशावर महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

◾️तेजस्विनी सावंत पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

◾️तेजस्विनीने दोहा इथं सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात चौथं स्थान पटकावलं आहे.

◾️या कामगिरीसह तिने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटंही कन्फर्म केलं आहे.

◾️ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली तेजस्विनी ही भारताची 12वी नेमबाज ठरली आहे.

◾️ तेजस्विनी 1171 गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. त्यानंतर अंतिम फेरीत तिनं 435 गुणांची कमाई करत चौथं स्थान पटकावलं.

◾️39 वर्षांच्य़ा तेजस्विनी सावंतने याआधी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं आहे.

◾️2010 सालच्या म्युनिकमध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनीने 📌सुवर्णपदक जिंकलं होतं.

◾️ 2006 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं 10 मीटर्स एअर रायफलमध्ये दुहेरीत आणि 📌वैयक्तिक सुवर्ण जिंकलं होतं.

◾️2018 साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन प्रकारात 📌सुवर्णपदकाची कमाई केली होती.

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग 


1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)

2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)

3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)

4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)

5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)

6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)

7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)

8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)

9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)

10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)
 

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...