Thursday 12 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

   1) धरसोड करणे    2) टंगळमंगळ करणे    3) सोडून देणे    4)  पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

2) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) परात्म      2) ऐतखाऊ      3) घरकोंबडा    4) एकलकोंडा

उत्तर :- 3

3) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

   1) अमिबा      2) अमीबा      3) अब्मिबा    4) अम्बिमा

उत्तर :- 1

4) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

   1) सजातीय      2) विजातीय      3) संयुक्त      4) –हस्व

उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

   1) कवीश्वर      2) दुरात्मा      3) सज्जन    4) गणेश

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.

   अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
   ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

   1) अ      2) दोन्ही      3) ब      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

7) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

   1) भाववाचक    2) सामान्यनाम    3) क्रियावाचक    4) धातुसाधित

उत्तर :- 1

8) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

   1) नऊ    2) तीन      3) चार      4) सात

उत्तर :- 1

9) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) सर्वनाम साधित विशेषण    2) धातुसाधित विशेषण
   3) अव्ययवसाधित विशेषण    4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

10) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

   1) आख्यात    2) वाख्यात    3) ताख्यात    4) लाख्यात

उत्तर :- 2

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नाहीच, संयुक्त राष्ट्राचा पाकला दणका

 📌काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात आलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही दणका दिला आहे.

📌भारत आणि पाकिस्तानने हा विषय चर्चेने सोडविण्याचा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे.

📌 विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचं संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

📌संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.

📌 यूएनचे सेक्रेटरी जनरलचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मध्यस्थेबाबतची आमची भूमिका कायम आहे.

📌 त्यात काही बदल होणार नाही. तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाने दोन्ही देशांच्या सरकारशी संपर्कही साधला आहे, असं दुजारिक यांनी स्पष्ट केलं.

📌दोन्ही देशांनी काश्मीरचा मुद्दा शांततेत आणि चर्चेने सोडवावा. दोन्ही देशांना काश्मीरवर शांततेनेच तोडगा काढावा लागेल, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

📌काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय

ईशान्येकडील राज्यांचा विशेष दर्जा हटवण्याचा कोणताही विचार नाही : अमित शाह

🔰आसाममध्ये नुकतीच एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आसामचा दौरा केला. नॉर्थ ईस्ट काऊन्सिलच्या बैठकीसाठी शाह उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या ३७१ व्या कलमाला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सराकर त्याचा सन्मान करते, असे शाह यावेळी म्हणाले.

🔰भारतीय संविधानात ईशान्येकडील राज्यांना देण्यात आलेल्या विशेषाधिकाऱ्यांच्या ३७१ व्या कलमाला विशेष स्थान देण्यात आले असून भाजपा त्याचा आदर करते. भाजपा सरकार यामध्ये कोणताही बदल करणार नाही. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. कलम ३७० आणि कलम ३७१ या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचे शाह यांनी नमूद केले. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर कलम ३७१ बाबतही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. या कलमांतर्गत भारतीयांना त्या ठिकाणी संपत्ती खरेदी करता येत नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा - नेमबाज मेहुली घोषला दुहेरी विजेतेपद

पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातही बाजी मारत राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अनहद जावंडा आणि पारुल कुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे विजेतेपद मिळवले. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने १० मीटर एअर रायफलमध्ये मध्य प्रदेशच्या श्रेया अगरवाल हिच्यावर मात करत २५२ गुणांनिशी विजेतेपद संपादन केले. श्रेयाला २५१.२ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली राजस्थानची अपूर्वी चंडेला २२९.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

कनिष्ठ गटात, मेहूलीने पंजाबच्या खुशी सैनी हिचे आव्हान मोडीत काढत २५२.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. खुशीने २४८.८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशची मानसी कठैत २२७.५ गुणांसह तिसरी आली. अनहद याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. केरळचा थॉमस जॉर्ज तिसरा आला.

​​​​ मोदींचे आमसभेत २७ सप्टेंबरला भाषण

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७४व्या सत्रात भाषण करणार आहेत.

◾️मोदी यांच्या या आठवडाभराच्या दौऱ्यामध्ये विविध द्विपक्षीय आणि बहुस्तरीय चर्चा-बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.

◾️मोदी यांच्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही २७ सप्टेंबर रोजी आमसभेत भाषण देणार आहेत.

◾️आमसभा २४ ते ३० सप्टेंबर या काळात होणार आहे.

◾️या सत्रामध्ये ११२ देशांचे प्रमुख, ४८ देशांतील सरकारांचे प्रमुख आणि ३० परराष्ट्रमंत्री आमसभेत भाषण करतील.

◾️दरम्यान, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे नरेंद्र मोदी यांना 'ग्लोबल गोलकीपर अवार्ड'ने गौरवण्यात येणार आहे.

◾️मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय, मोदी २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टनला पोहोचण्याची शक्यता असून, तेथे भारतीय-अमेरिकन नागरिकांसमोर भाषण करणार आहेत.

◾️ या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त भारतीय हजर राहण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ला सुरुवात झाली

√दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस अश्या रोगांना लक्ष्य करीत देशव्यापी ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ याचा आरंभ करण्यात आला.

√केंद्र सरकारने या योजनेसाठी येत्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2024 सालापर्यंत 12,652 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

■कार्यक्रमाविषयी

√प्राण्यांमध्ये आढळून येणार्‍या पाय व मुखरोग (FMD) या धोकादायक रोगाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरातल्या गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे अश्या 500 दशलक्षाहून अधिक जनावरांचे लसीकरण करणे हे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. शिवाय ब्रुसेलोसिस रोगाविरूद्धच्या लढाईत दरवर्षी 36 दशलक्ष गायीच्या मादा वासरांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

■कार्यक्रमाचे दोन घटक –

√2025 सालापर्यंत रोगांवर नियंत्रण आणणे

✅ 2030 सालापर्यंत पाय व मुखरोगांचे (FMD) निर्मूलन करणे

गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकर इत्यादी पशूंमध्ये पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस हे रोग सामान्यपणे आढळून येतात. जर दुधावर असलेले पशू रोगाची लागण झाली असेल तर शंभर टक्क्यांपर्यंत दुधाचे नुकसान होऊ शकते जे जवळपास चार ते सहा महिने टिकू शकते. त्यामुळे उत्पादकाला अत्याधिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवविला जात आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

■अनुसूचित जातीतील विध्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी

🔸दरवर्षी २५ हजार विध्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट.

🔸प्रति विद्यार्थी 43 हजार ते 60 हजार रुपये वार्षिक अनुदान

🔸DBT द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात होते अनुदानाचे वितरण

सराव प्रश्नमालिका 12/9/2019

1. एका देशात आठवडा शुक्रवार पासून सुरु होतो तर त्या आठवडयातील चौथा दिवस कोणता?
शुक्रवार
शनिवार
रविवार
सोमवार

● उत्तर - सोमवार

2. एका लिप वर्षात स्वातंत्रदिनी शुक्रवार होता तर, त्याच वर्षात गांधी पुण्यतिथी कोणत्या दिवशी येईल?
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार

● उत्तर - बुधवार

3. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
aab, _ c, _ a, abb
ac, aa
bb, cc
ac, b
aa, cc

● उत्तर - bb, cc

4. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
8: 20: : 10 :
16
24
25
27

● उत्तर - 25

5. अ, ब, क आणि ड या प्रत्येकाजवळ आहेत अ हा व ला देतो क हा ड कडून घेतो ड ला व कडून व अ कडून मिळाले क ने अ ला दिले तर सर्वात कमी रक्कम कोणाजवळ व किती आहे?
अ, 400 रु
व, 150 रु
क, 425रु
ड, 175 रु

● उत्तर - अ, 400 रु

6. एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या संचालनात खेळाडू पुढीलप्रमाणे आपल्या देशाचे ध्वज हातात धरून चालत होते इंग्लंडचा व रशिया यांच्या मध्यभागी जर्मनीची ध्वज असून रशियाचा ध्वज सर्वात शेवटी आहे. ओस्ट्रेलियाचा ध्वज प्रथम स्थानी असून ओस्ट्रेलिया व जपान व इंग्लंड यांच्यामध्ये भारताचा ध्वज आहे तर सर्वात मध्यभागी कोण आहे?
जपान
जर्मनी
भारत
अमेरिका

● उत्तर - भारत

7.
एका सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल?
16
36
45
60

● उत्तर - 36

8. साडे वारा वाजता घडयाळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल?
160°
165°
175°
180°

● उत्तर - 165°

9.
एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे “green colour book”, म्हणजे “ blue colour cover” आणि 794 म्हणजे “ green colour earth” तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?
green
colour
cover
earth

● उत्तर - earth

10. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
0, 6, 20, 42, _, 110.
62
65
90
72

● उत्तर - 72

वैश्विक नवकल्पकता निर्देशांकमध्ये भारत 52 व्या क्रमांकावर

🌸 कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD, संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) आणि GII नॉलेज पार्टनर्स यांनी यावर्षीचा ‘वैश्विक नवकल्पकता निर्देशांक 2019’ (global innovation index) प्रसिद्ध केला.

🌸 त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या देशांच्या यादीत भारत 52 व्या क्रमांकावर आहे.

🌸 यादीमध्ये स्वित्झर्लंड अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ स्विडन, अमेरीका, नेदरलँड, ब्रिटन, फिनलँड, डेन्मार्क, सिंगापूर, जर्मनी आणि इस्राएल या देशांचा क्रम लागतो आहे.

‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’  ठराव कायद्यात रूपांतरित.

💢 6 सप्टेंबर 2019 रोजी ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठरावाला क्रोएशियाने (मंजुरी देणारा 97वा देश) मान्यता दिल्यानंतर आता हा आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे.

💢 ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ कायदा हा जागतिक पातळीवर कचरा फेकण्याला प्रतिबंध करणारा कायदा आहे.

💢 नवा कायदा 5 डिसेंबर 2019 रोजी जगभरात लागू केला जाणार आहे.

            ⭕️ बेसल प्रतिबंध करारनामा 
   आणि दुरूस्ती ⭕️

💢 1995 साली सर्व सदस्य देशांनी बेसल प्रतिबंध करारनामा स्वीकारला.

💢 करार घातक टाकावू पदार्थांच्या प्रतिकूल परिणामापासून मानवी आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या उद्देशाने तयार करण्यात आला आहे

💢 सुधारित कायद्यानुसार, आर्थिक सहकार्य व विकास संघटना (OECD) समुहाचे सदस्य असलेल्या 29 श्रीमंत देशांकडून OECD-सदस्य नसलेल्या देशांकडे इलेक्ट्रॉनिक कचरा तसेच जीर्ण झालेले जहाज याच्यासोबतच घातक टाकावू पदार्थांची सर्वप्रकाराची निर्यात करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

💢 या करारात किरणोत्सर्गी टाकावू पदार्थांच्या दळणवळणाची बाबी समाविष्ट करण्यात आलेली नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी वन लाइनर्स,12 सप्टेंबर 2019.


✳ डॉ पीके मिश्रा यांनी पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला

✳ पीके सिन्हा पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त

✳ आंध्र सरकार पुढील शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमिक वर्ग 1 ते इयत्ता 8 पर्यंत परिचय करुन देणार आहे

✳ पायलट निखिल राथ इस्त्रोच्या मिशन गगनयानवर जाण्यासाठी शॉर्टलिस्टेड

✳ एशियन ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धा फिलिपिन्समध्ये सुरू होईल

✳ एशियन ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत अनिकेत पाटील कांस्य जिंकले

✳ राग श्री आशियाई ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत कांस्यपदक जिंकले

✳ आशिया सायकलिंग चषक 2019 चा ट्रॅक दिल्ली येथे संपन्न

✳ ट्रॅक एशिया कप 2019 मध्ये एसो अल्बेनने सुवर्णपदक जिंकले

✳ भारताने 25 पदकांसह आशिया चषक पदकांची कमाई केली

✳ सिराज चौधरी यांची एनसीएमएलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक

✳ जॅकलिन फर्नांडिजने लोटस व्हाईट ग्लोसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली

✳ बंडारू दत्तात्रेय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारतात

✳ कलराज मिश्रा यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला

✳ एक्स्पेट्ससाठी भारत हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक आहे

✳ *यूएस शीर्ष ग्लोबल बौद्धिक मालमत्ता निर्देशांक 2019*

✳ जागतिक बौद्धिक मालमत्ता निर्देशांक 2019 मध्ये यूके दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ ग्लोबल बौद्धिक मालमत्ता निर्देशांक 2019 मध्ये स्वीडनचा तिसरा क्रमांक आहे

✳ ग्लोबल बौद्धिक मालमत्ता निर्देशांक 2019 मध्ये भारताचा 44 वा क्रमांक आहे

✳ ब्रिटनचे संसदेचे अध्यक्ष जॉन ब्रेको 31 ऑक्टोबरपर्यंत खाली येतील

✳ मार्गारिटिस शिनास युरोपियन कमिशन व्ही.पी.

✳ ऑलिम्पिक 2020 मध्ये टॉप्समध्ये 10 बॉक्सरपैकी मेरी कोमचा समावेश

✳ अंडर -17 महिला विश्वचषक 2020 भारत मध्ये होणार आहे

✳ अंडर 17 महिला विश्वचषक 2020 साठी 5 भारतीय शहरांची तपासणी

✳ बुद्धीबळ विश्वचषक 2019 रशियाच्या खांटी मानसीस्क येथे

✳ येन्ग गुआओने फिलीपिन्स नॅशनल बास्केटबॉल टीम प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला

✳ हिमा दास वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोरला पात्र ठरविण्यात अपयशी ठरले

✳ जागतिक कुस्ती स्पर्धा 2019 कझाकस्तानमध्ये होणार आहे

✳ डीआरडीओ तिसर्‍या पिढीतील अँटी-टँक मिसाईलची यशस्वी चाचणी करतो

✳ डीआरडीओने सेकंड 'नेत्र' इअर वॉरिंग सिस्टमला आयएएफला दिले

✳ त्रिपुरा नवीन आरोग्य सेवा योजना "आयुष्मान त्रिपुरा" सुरू करणार

✳ पंतप्रधान मोदींनी रांचीमध्ये "किसान मनुष्य धन योजना" सुरू केली

✳ पंतप्रधान मोदींनी "स्वच्छता हाय सेवा (एसएचएस)" अभियान सुरू केले.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 11 सप्टेंबर 2019

✳ डॅनियल झांग अलीबाबा समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील

✳ एन लिंडे स्वीडनचे नवीन परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त

✳ पॉल लिटल ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष नियुक्त

✳ एस हाशिमोटो यांनी जपानचे ऑलिम्पिक मंत्री म्हणून नियुक्ती केली

✳ टी मेल्सकानु रोमानियन सिनेटचे अध्यक्ष निवडले

✳ केंद्र सरकार दुर्गम भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 462 एकलव्य शाळा सुरू करणार आहे

✳ जीओटीटी प्रकल्प स्थापनेसाठी पंजाब केंद्र सरकारसह सामंजस्य करार करण्यासाठी पहिले राज्य बनले

✳ '10 हफ्ते 10 बाजे 10 मिनिट' दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी डेंग्यूविरूद्ध मोहीम सुरू केली

✳ राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पॅरालंपिक ऑफ इंडियाची निलंबित

✳ पंतप्रधान मथुरामध्ये राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करणार आहेत

✳ विक्रम नाथ यांनी गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली

✳ भारतीय विद्यार्थ्यांना पदवीनंतर दोन वर्ष यूकेमध्ये राहण्याची मुभा दिली जाईल

✳ नाइट फ्रँक इंडियाने एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांक सोडला

✳ बीजिंग अव्वल स्थानी असलेला एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांक

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात टोकियो दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात शांघाय तिस्या क्रमांकावर आहे

✳ आशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात हाँगकाँगचा चौथा क्रमांक आहे

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात मुंबईचा 5 वा क्रमांक आहे

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात नवी दिल्ली 11 व्या स्थानावर आहे

✳ आशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात बेंगळुरूचा 19 वा क्रमांक आहे

✳ 2017 मध्ये जागतिक मलेरिया प्रकरणांमध्ये भारताचा चौथा क्रमांक: लँसेट रिपोर्ट

✳ दक्षिण-पूर्व आशियात भारतातील आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहेः डब्ल्यूएचओ

✳ कराची जगातील सर्वात मोठा गांजाचा ग्राहक आहेः अहवाल

✳ दिल्ली हा गांजा जगातील तिसरा सर्वोच्च ग्राहक आहेः अहवाल

✳ मुंबई हा गांजा जगातील सहावा सर्वोच्च ग्राहक आहेः अहवाल

✳ तैवानची हेल्थकेअर सिस्टम जगातील सर्वोत्तम: सीईओवर्ल्ड

✳ दक्षिण कोरियाची हेल्थकेअर सिस्टम जगातील दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ जपानची हेल्थकेअर सिस्टम जगातील तिसर्‍या या क्रमांकावर आहे

✳ ऑस्ट्रियाच्या हेल्थकेअर सिस्टमचा जगातील चौथा क्रमांक आहे

✳ डेन्मार्कची हेल्थकेअर सिस्टम जगातील पाचव्या क्रमांकावर आहे

✳ थायलंडची हेल्थकेअर सिस्टम जगातील सहाव्या क्रमांकावर आहे

✳ स्पेनच्या हेल्थकेअर सिस्टमचा जगातील 7 वा क्रमांक आहे

✳ फ्रान्सची हेल्थकेअर सिस्टम जगातील 8 व्या क्रमांकावर आहे

✳ बेल्जियमची हेल्थकेअर सिस्टम जगातील 9 व्या क्रमांकावर आहे

✳ ऑस्ट्रेलियाची हेल्थकेअर सिस्टम जगातील दहाव्या क्रमांकावर आहे

✳ व्हेनेझुएलाला 2019 मध्ये सर्वात वाईट आरोग्य सेवा प्रणाली म्हणून नाव देण्यात आले

✳ सरकारने शेतकर्‍यांसाठी 'सीएचसी फार्म मशीनरी' मोबाइल अॅप सुरू केले

✳ बेस्टने प्रवाश्यांसाठी ‘बेस्ट प्रवास’ मोबाइल अॅप सुरू केले

✳ यूपी पोलिसांनी एड कम्युनिटी पोलिसिंगसाठी नवीन ‘सी-प्लॅन’ अ‍ॅप लाँच केले

✳ दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांसाठी '70 वाजता संविधान' अभियान राबविले

✳ बीसीसीआयचे आकाशवाणीसह भागीदार लाइव्ह रेडिओ कमेंटरी प्रदान करण्यासाठी

✳ फिफा डब्ल्यूसी क्वालिफायरमध्ये ड्रॉ करण्यासाठी एशियन चॅम्पियन्स कतार भारताने धरली

✳ गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. प्रकाश यांनी राजीनामा दिला

✳ पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये भारताच्या दुसर्‍या बहु-मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत

✳ उत्तर प्रदेशाने 2024 पर्यंत शेती निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

✳ राजनाथ सिंह पुढच्या महिन्यात 1 ला राफळे यांचे वितरण घेण्यासाठी फ्रान्सला भेट देतील.

चालू घडामोडी प्रश्नसंच 12/9/2019

📌कोणत्या पुरुष टेनिसपटूने यूएस ओपन 2019 ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?

(A) रॉजर फेडरर
(B) राफेल नदाल✅✅✅
(C) अँडी मरे
(D) यापैकी कुणीही नाही

📌प्रस्तावित प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) या समूहात किती देशांचा समावेश आहे?

(A) 25
(B) 21
(C) 16✅✅✅
(D) 17

📌कोणत्या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले?

(A) भारत
(B) थायलंड✅✅✅
(C) दक्षिण कोरिया
(D) सिंगापूर

📌कोणत्या शहरात UNCCD याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन करण्यात आले?

(A) जिनेव्हा
(B) क्योटो
(C) ग्रेटर नोएडा✅✅✅
(D) शांघाय

📌सप्टेंबर 2019 या महिन्यात राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक झाली?

(A) कल्याण सिंग
(B) शिवराज पाटील
(C) रघुकुल टिळक
(D) कलराज मिश्रा✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

(A) विजय कुमार चोपडा✅✅✅
(B) विनीत जैन
(C) रवीश कुमार
(D) विनोद दुआ

ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बडतर्फ

✍अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांची मंगळवारी सकाळी हकालपट्टी केली.

✍त्यांच्या अनेक कल्पना मला अमान्य असल्याने ही कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

✍नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची निवड पुढील आठवडय़ात जाहीर होईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, मी स्वत: सोमवारी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उद्या पाहू, असे ट्रम्प मला म्हणाले होते. मी वाट पाहून सकाळी त्यांना राजीनामा पाठवला.

✍त्यानंतर त्यांनी माझी बडतर्फी जाहीर केली आहे, असे ट्विट बोल्टन यांनी केले आहे.

✍ट्रम्प यांच्या कारकिर्दीतले बोल्टन हे चौथे आणि सर्वाधिक काळ पदावर राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.पहिले सल्लागार मिशेल फिन फक्त २४ दिवस पदावर होते.

इस्त्रो पुन्हा घेणार चंद्रभरारी

✍चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत.

✍लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या 2.1 कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला.

✍तर एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील 14 दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

✍इस्त्रोचे ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-2 मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमून गोळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जपान आणि भारताची अवकाश संशोधन संस्था संयुक्तरित्या ही मोहिम राबवणार आहे.

✍भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए)  एकत्रपणे या मोहिमेत काम करणार आहेत.

✍2024 मध्ये इस्त्रो आणि जाक्सा या मोहिमेवर काम सुरु करणार आहे. याआधी भारत 2022 ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची चर्चा पहिल्यांदा 2017 साली झाली होती.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...