Wednesday 9 March 2022

भारतातील सर्वात लांब


1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
___________________________________

General Knowledge

● पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?
उत्तर : देखो मेरी दिल्ली

●  कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले?
उत्तर : NASA

● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?
उत्तर : नजला बौडेन रोमधाने

● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०१ ऑक्टोबर

●  कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
उत्तर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी

● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
उत्तर : सी. के. मिश्रा

● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : पद्मजा चुंडुरू

●  खालीलपैकी कोण "क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ" हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?
उत्तर : वोले सोयिंका

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


शिखराचे नाव    उंची(मीटर)   जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर         1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर               1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट             1264     पुणे
त्र्यंबकेश्वर           1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती
___

सोलापुरात पदव्युत्तर शिक्षणामध्ये मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर.

🎪कालानुरूप घडलेल्या सामाजिक बदलांमुळे मुलांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्याही पुढे झेप घेऊन मुलींची वाटचाल सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही मागील पाच वर्षांत हे आश्वासक चित्र पाहायला मिळते. देशात शंभर वर्षांपूर्वी महिलांना दुय्यम स्थान तर होतेच, शिवाय शिक्षणाचे धडेही त्यांना दिले जात नव्हते.

🎪क्रांतिज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. प्रतिकूल परिस्थितीत टप्प्या-टप्प्याने महिला शिक्षण घेऊन पुढे येत राहिल्या. अलीकडे तर संपूर्ण जगात कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांची नावे सर्व परिचित झाली आहेत. शिक्षणात तर महिलांची झेप सुरूच आहे.

🎪मागील पाच वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांपेक्षा मुलींनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतला आहे. यात २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात एकूण २६९५ मुले तर २८७९ मुलींनी यशस्वी पद्धतीने उच्चशिक्षण घेतले आहे. १८४ संख्येने मुलींची संख्या अधिक आहे.

🎪जागतिक महिला दिन साजरा होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला हे सकारात्मक आणि आश्वासक चित्र समोर आहे. विशेषत: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र आदी महत्त्वाच्या पदव्युत्तर ज्ञानशाखांकडे मुलींचा ओढा वाढला आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - रिदम-अनिष जोडीला सुवर्ण .

🪀भारताच्या रिदम सांगवान आणि अनिष भानवाला या जोडीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले.

🪀सोमवारी रिदम-अनिष या जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत थायलंडच्या पादुका चाविसा आणि राम खांहाएंग या जोडीला १७-७ अशी धूळ चारली. त्यांच्या या कामगिरीमुळे विश्वचषकाअखेरीस भारताने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा सात पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

🪀रिदम-अनिष या जोडीने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटातील पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत ४०० पैकी ३७० गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या चाविसा आणि खांहाएंग जोडीने ३८१ गुणांसह अग्रस्थान कमावले होते. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. भारताच्या इशा सिंग आणि भावेश शेखावत या जोडीनेही पात्रतेची दुसरी फेरी गाठली होती; परंतु त्यांना ३५६ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🪀त्याआधी भारताने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या ख्रिस्टियन रित्झ, गेस ऑलिव्हर आणि पीटर फ्लोरियन या त्रिकुटाने भारताच्या गुरप्रीत सिंग, अनिष आणि भावेश शेखावत या त्रिकुटावर मात केली. कैरो येथे झालेल्या या विश्वचषकात ६० देशांच्या ५०० हून अधिक नेमबाजांचा सहभाग होता. एकूण २२ देशांना या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले. गुणतालिकेत भारताने चार सुवर्णपदकांसह अव्वल, नॉर्वेने तीन सुवर्णपदकांसह (एकूण सहा पदके) दुसरा, तर फ्रान्सने तीन सुवर्णपदकांसह तिसरा क्रमांक पटकावला.

जागतिक महिला दिन

🔹👉 महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

🔸दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.

🔹भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला.

🔸८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

🔹पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले.

🔸काही देशात जसे  बल्गेरिया  आणि  रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.

🔹इटलीमध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.

🔸थीम 2022 : 'Gender Equality Today for a Sustainable Tomorrow' ✅

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

🔸आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
🔹महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

🔸अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी
: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

🟠आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :

🔸डॉ. अरुणा देरे - 2019✅
🔹विजया ध्यसा- 2001
🔸शांता शेलड़े- 1996
🔹दुर्गा भागवत - 1973
🔸कुसूमावती देशपांडे - 1961

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

🔸कालावधी :  ३, ४ व ५ डिसेंबर २०२१
🔹स्थळ : नाशिक
🔸अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅
🔹स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :✅

🔹स्थळ : उदगीर ✅
🔸अध्यक्ष : भारत सासणे ✅

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...