Monday 3 August 2020

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

​2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)

📚पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी जगभरातल्या देशांच्या सरकारांकडून घेतल्या गेलेल्या पुढाकारांचा आढावा घेणारा ‘2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

📚तसेच 32 निर्देशकांचा वापर करून 180 देशांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आला आहे. हा अहवाल येल आणि कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केला आहे.भारत 27.6 एवढ्या गुणांसह 168 व्या क्रमांकावर आहे.

ठळक बाबी:-

📚डेन्मार्क हा देश या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे लक्झेमबर्ग, स्वित्झर्लंड, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे आणि जर्मनी या देशांच्या प्रथम दहामध्ये समावेश आहे.तर यादीत तळाशी अफगाणिस्तान, म्यानमार यांच्यानंतर शेवटी लाइबेरिया 180 व्या क्रमांकावर आहे.

📚हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणविषयक इतर धोके यामुळे आरोग्यविषयक खालावलेले परिणाम मिळविणारा भारत क्रमवारीच्या तळाशी आला आहे.हवेची गुणवत्ता, आधुनिक स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी दीर्घ काळापासून वचनबद्धता दर्शविल्यामुळे डेन्मार्क पर्यावरणविषयक आरोग्याच्या जवळजवळ प्रत्येक निर्देशांकांमध्ये उत्कृष्ट आहे.

📚मासेमारीचे प्रमाणही कमी झाले असून हा व्यवसाय आज जागतिक अडचणीत आहे. याचा विपरीत प्रभाव बहरीन, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये नोंदवला गेला आहे.इंडोनेशिया, मलेशिया आणि कंबोडिया या सारख्या देशांमध्ये गेल्या पाच वर्षांत अत्याधिक जंगलतोड झाली आहे.

भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प..

🔰कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.

🔴ठळक बाबी...

🔰हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.

🔰कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.

🔰शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

🔰हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.

दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साइड वायूच्या पातळीत 70 टक्क्यांची घट झाली.


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ  कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.

🔰या काळात राजधानी नवी दिल्लीमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) वायूच्या पातळीत 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असे समजले. तसेच जागतिक पातळीवर बेल्जियम देशामध्ये NO2 ची पातळी 40 टक्क्यांनी खाली घसरली तर अमेरिका देशात हे प्रमाण 20 टक्क्यांचे आहे.

🔴नायट्रोजन डायऑक्साइड हानिकारक का आहे?

🔰नायट्रोजन डाय ऑक्साइड लालसर तपकिरी रंगाचा, पाण्यात काही प्रमाणात विरघळणारा वायू आहे. तापमान जास्त असताना झालेले वादळ आणि मातीतील सूक्ष्म जिवाणू तसेच जीवाश्म इंधन वापरणारी औष्णिक विद्युत केंद्रे आणि वाहनांमधून या वायूचे हवेत उत्सर्जन होते.

🔰या वायूमुळे डोकेदुखी, श्वासनलिकेचा व फुप्फुसाचा दाह इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.

🔰हा वायू आम्लवर्षां, जमिनीलगतचा ओझोन, प्रकाश-रासायनिक धुके अशा पर्यावरणास हानीकारक गोष्टींच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो.
हा हवेची गुणवत्ता कमी करतो. यामुळे खालचा ओझोन थर कमी होतो.

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती.


🔰चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

🔰गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

🔰भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

🔰टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.

चंद्रकांत पाटील झाले गुजरात भाजपाचे अध्यक्ष.

🔰भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सीआर पाटील यांची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, सीआर पाटील हे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आहेत.

🔰या अगोदर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जीतूभाई वाघाणी यांच्यकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सीआर पाटील यांची पक्षाने या पदासाठी निवड केली आहे. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

🔰एक टेक्नोसॅव्ही नेता म्हणूनही सीआर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सोशल मीडियाचा वापर करून ते कायम आपला जनसंपर्क वाढवत असतात. त्यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट आहे. १९६० मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले.

एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत आणखी चार राज्यांचा समावेश.

🔰31 जुलै 2020 रोजी केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी “एक राष्ट्र, एक शिधापत्रिका” योजनेचा आढावा घेतला.

🔰1 ऑगस्ट 2020 पासून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेशासह आंध्रप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, सिक्किम, मिझोरम, तेलंगणा, केरळ, पंजाब, त्रिपुरा, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान अशी एकूण 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेशी जोडली गेली आहेत.
जम्मू व काश्मीर, मणिपूर, नागालँड आणि उत्तराखंड अशी आणखी चार राज्ये शिधापत्रिकांच्या राष्ट्रीय सुसूत्रीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहेत.

🔰राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 65 कोटी (म्हणजे सुमारे 85 टक्के) लाभधारकांना या राज्यांत वा केंद्रशासित प्रदेशांत कुठेही  अन्नधान्याचा लाभ संभावत: घेता येणार आहे. उरलेल्या राज्यांना वा केंद्रशासित प्रदेशांना मार्च 2021 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकात्मिकरीत्या जोडण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

🔴योजनेविषयी..

🔰‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-2013’ अंतर्गत देशातल्या सर्व लाभार्थींपर्यंत अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय ग्राहक सेवा, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वतीने 'एक राष्ट्र, एक शिधापत्रिका' ही महत्वाकांक्षी योजना राबवविण्यात येत आहे. ही योजना 1 जून 2020 या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली. देशाच्या कोणत्याही भागात नागरिक असला तरी देखील लाभार्थीला सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मार्फत या योजनेचा लाभ घेता यावा या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे.

🔰प्रामुख्याने कामाच्या शोधार्थ स्थलांतरित होत असणार्‍या कामगारांना शिधेचा पुरवठा अबाधितपणे होत राहावा त्यासाठी तयार केली गेलेली ही योजना सार्वजनिक वितरणातला भ्रष्टाचार लक्षात घेऊन तयार देशभरात राबवली जात आहे.

🔰स्वस्त धान्य दुकानांमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल’ (e-PoS) यंत्रणेमध्ये बायोमेट्रिक-आधार प्रमाणिकरण झाले की, त्यांना शिधापत्रिकावर अन्नधान्य देणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची e-PoS उपकरणे प्रत्येक रास्त धान्य दुकानांमध्ये बसविणे, बायोमेट्रिक-आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थींचा आधार तपशील यंत्रणेमध्ये समाविष्ट करून ही कार्यप्रणाली सक्षम करण्याचे काम सुरू आहे. लाभार्थींना त्यांच्या बोटांचे ठसे अथवा डोळ्यांतील बुबुळांच्या आधारे ओळख पटवून आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

मोहालीच्या INST संस्थेत मोतीबिंदूवरील उपचारासाठी शस्त्रक्रिया-विरहित पद्धती विकसित

🔰मोहाली (पंजाब) इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मोतीबिंदूवरील उपचारासाठी अ‍ॅस्पिरिन औषधापासून नॅनोरोड विकसित केले आहे. अ‍ॅस्पिरिन हे नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग आहे.

🔴मोतीबिंदू विकार....

🔰मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातले नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या भिंगाची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते.

🔰नैसर्गिक भिंग हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नैसर्गिक भिंगाची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नैसर्गिक भिंगाच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

अगरबत्ती उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी MSME मंत्रालयाची नव्या योजनेस मान्यता.

🔰भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (KVIC) प्रस्तावित केलेल्या अनोख्या रोजगार निर्मिती कार्यक्रमास केंद्रिय सूक्ष, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

🔰खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहीम" नावाच्या या कार्यक्रमाचा उद्देश देशातल्या वेगवेगळ्या भागात बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशांतर्गत अगरबत्ती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे हे आहे.

🔴योजनेविषयी...

🔰KVICने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर केलेली योजना कमी गुंतवणुकीची आणि कारखानदार व भांडवलाशिवाय असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

🔰 व्यवसायिक भागीदार म्हणून जे यशस्वी खासगी अगरबत्ती उत्पादक करारावर स्वाक्षऱ्या करणार, त्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत अगरबत्ती बनविणारे स्वयंचलित यंत्र आणि पावडर मिश्रणाचे यंत्र KVIC तर्फे कारागिरांना पुरविण्यात येणार.

🔰यंत्राच्या किंमतीवर 25 टक्के अनुदान देण्यात येणार आणि उर्वरित 75 टक्के खर्च दरमहा कारागीरांकडून सुलभ हप्त्यांमध्ये वसूल करण्यात येणार.

🔰व्यवसाय भागीदार अगरबत्ती बनविण्यासाठी कारागीरांना कच्चा माल पुरवतील आणि त्यांना रोजगाराच्या आधारावर मजुरी देतील.

🔰कारागिरांच्या प्रशिक्षणाची किंमत KVIC आणि खासगी व्यवसायिक भागीदार यांच्यात सामायिक केली जाणार. ज्यात KVIC 75 टक्के खर्चाचा भार उचलणार तर 25 टक्के व्यवसाय भागीदार देय असणार.

🔰केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पुढाकाराने वाणिज्य व अर्थ मंत्रालयाने कच्च्या अगरबत्तीवरील आयात निर्बंध आणि बांबूच्या लाठीवरील आयात शुल्कात वाढ या प्रमुख दोन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ही योजना आखण्यात आली आहे.

🔰हा पथदर्शी प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार असून आणि पूर्ण क्षमतेने प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर, अगरबत्ती उद्योगात हजारो रोजगार निर्माण होतील.

🔰देशात सध्या अगरबत्तीचा वापर दररोज अंदाजे 1490 मेट्रिक टन आहे, तथापि भारताचे दररोज अगरबत्तीचे उत्पादन फक्त 760 मेट्रिक टन आहे.

पतहमी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय.

🔰सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या (एमएसएमई) कर्ज हमी योजनेचा विस्तार करून या योजनेत डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल यांच्या व्यावसायिक कर्जाचाही समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला.यापुढे 250 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यांनाही कर्ज हमीचा लाभ मिळू शकेल.

🔰एमएसएमई कर्ज हमी योजनेच्या विस्ताराची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, या योजनेत व्यवसायासाठी घेतलेल्या व्यक्तिगत कर्जाचा समावेश करण्यात आला असून पात्रता निकषांत बसणाऱ्या या योजनेचा लाभ मिळेल.

🔰ही योजना डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल इत्यादींच्या व्यावसायिक कर्जासाठीही लागू असेल, असे आर्थिक सेवा खात्याचे सचिव देबाशीष पांडा यांनी स्पष्ट केले.

🔰कर्ज हमी योजनेचा लाभ जास्तीतजास्त कंपन्यांना व्हावा यासाठी 29 फेब्रुवारी पर्यंतच्या कर्ज थकबाकीची मर्यादा 25 कोटींवरून 50 कोटी करण्यात आली आहे. त्यासाठी वार्षिक उलाढालीची अटही 100 कोटींवरून 250 कोटी करण्यात आली आहे.

🔰एखाद्या कंपनीसाठी कमाल कर्ज रक्कम पूर्वी 5 कोटी होती ती आता 10 कोटी करण्यात आली आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी सोमवारपासून आणखी काही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पांडा यांनी केले.

स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन परत येत आहे.

🔰अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे.

🔰खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.

🔰मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे.

🔰अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

● 2020 सालाचे 'ख्रिस्तोफ मेरीयूक्स पारितोषिक' कोणत्या शास्त्रज्ञाला  देण्यात आले?
: कुरैशा अब्दुल करीम

● ‘स्पंदन मोहीम’ कोणत्या राज्याच्या पोलीसांनी राबविण्यास सुरुवात केली आहे?
: छत्तीसगड

● ‘नगर वन’ योजनेच्या अंतर्गत किती शहरी वने उभारण्यात येणार आहे?
: 200

● “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रम चालविण्यासाठी कोणत्या संस्थेनी EESL सोबत भागीदारी केली आहे?
: USAID

● कोणत्या संस्थेनी नाविन्यपूर्णतेच्या संवर्धनासाठी अटल नाविन्यता अभियान (AIM) सोबत इच्छापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● पाण्यातून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी कोणत्या संस्थेनी कमी खर्चीक कॅटालिस्ट विकसित केले?
:  सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CeNS)

● ‘पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड’ (PIDF) कोणत्या संस्थेनी तयार केला?
: भारतीय रिझर्व्ह बँक

● ‘#आय कमीट’ मोहिमेचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे?
: वीज मंत्रालय

● ‘IoT: ड्राईव्हिंग द पेटंट ग्रोथ स्टोरी इन इंडिया’ ही शीर्षक असलेला अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?
:  राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM)

● यंदा (2020) जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे?
: फूड सेफ्टी, एव्रीवन्स बिझनेस

● ‘EY वर्ल्ड एंत्रेप्रेन्योर ऑफ द इयर 2020’ हा सन्मान कोणाला दिला गेला?
: किरण मजुमदार शॉ

● मातृत्व वय, मातामृत्यू दर याच्या संबंधित बाबी तपासण्यासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत?
:  जया जेटली

● BAFTA (ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
:  कृष्णेन्दु मजुमदार

● देशात ‘डीप स्पेस ग्राउंड स्टेशन’ उभारण्यासाठी NASA संस्थेसोबत कोणत्या देशाने भागीदारी केली?
: दक्षिण आफ्रिका

● स्वदेशी “नासॉफरेन्जियल” (NP) स्वॅब कोणत्या संस्थेनी विकसित केले?
: राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा

● डिसेंबर 2020 या महिन्यात त्याचा ‘K-FON’ नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कोणते राज्य कार्यरत करणार आहे?
: केरळ

Q1) कोणत्या देशात जगातली सर्वात मोठी प्रयोगात्मक अणुभट्टी तयार केली जात आहे?
उत्तर :- फ्रान्स

Q2) मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे?
उत्तर :-  शिक्षण मंत्रालय

Q3) कोणत्या व्यक्तीला पेटीएम मनी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहे?
उत्तर :- वरुण श्रीधर

Q4) कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन

Q5) कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- झिम्बाब्वे

Q6) कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?
उत्तर :- ब्रिटन

Q7) कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :-  अशोक साहनी

Q8) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?
उत्तर:-  उत्तराखंड

Q9) भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?
उत्तर :-  स्क्वॉड्रॉन 17

Q10) _ संस्थेनी “अस्पायर” नावाने एक ई-संकेतस्थळ कार्यरत केले.
उत्तर :-  इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी

चालू घडामोडी
● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
: गोविंदा राजुलू चिंतला

● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?
: 21 मे

● शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम कोणते राज्य सरकार राबवत आहे?
: महाराष्ट्र

● स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे?
: हरियाणा

● राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?
: राजेश गोयल

● नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा कोणत्या राज्याने केली?
: उत्तरप्रदेश

● आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
: 21 मे

● ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड झाली?
: राजीव गांधी विद्यापीठ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅
(B) जैवतंत्रज्ञान विभाग
(C) गृह मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?

(A) गृह मंत्रालय
(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅
(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?

(A) गुजरात✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?

(A) सेम्पर फोर्टिस
(B) डी ओप्रेसो लिबर
(C) सेम्पर सुप्रा ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

● ‘एव्हरीबडी विल गेट एम्प्लॉयमेंट’ योजना कोणत्या राज्याने सादर केली?
: मध्यप्रदेश

● जगातली सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिडापटू कोण?
: नाओमी ओसाका

● कार्सिनोजेनिक संयुगांचा शोध घेण्यासाठी कोणत्या संस्थेनी इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग व्यासपीठ विकसित केले?
: इंस्टीट्यूट ऑफ अ‍ॅडव्हास्ड स्टडी इन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलजी

● FICCI लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत?
: जाहनबी फुकन

● 2020 साली “हुनर हाट” उपक्रमात कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे?
: लोकल टू ग्लोबल

● संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘आंतरराष्ट्रीय ऑब्स्टेट्रीक फिस्टुला निर्मूलन दिन’ कधी साजरा केला जातो?
: 23 मे

● कोणत्या मंदिराला नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे करणार असल्याची घोषणा केली?
: कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क

● जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप कार्यक्रमाचा आरंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला?
: केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर

• 22 एप्रिल रोजी इराणने ............ हा अंतराळात लष्करी उपग्रहसोडला आहे.
- नूर उपग्रह.

• भारतातली ..................ही सॉफ्टवेअर सेवा कंपनी इस्राएलया देशामध्ये  देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करणार आहे
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस.

• ई-लर्निंग सामुग्रीचा विकास करण्यासाठी आणि योगदानासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा ............... हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे.
- ‘विद्यादान 2.0’.

• ................या विद्यापीठाने ‘कोविड-19 वॉरियर्स स्कॉलरशिप’ची घोषणा केली
- चंदीगड विद्यापीठ.

• आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षा लक्षात घेत.................. या कायद्यात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली
- महामारी रोग कायदा-1897.

• जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) याच्या 'आय अॅम बॅडमिंटन' या जागृती अभियानासाठी ................... हिला सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले आहे.
- पी. व्ही. सिंधू.

• 23 एप्रिल 2020 रोजी ..............या देशाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघाची (SAARC) बैठक आयोजित केली होती.
– पाकिस्तान.

• ................हा देश जगातले पहिले डिजिटल चलन (डिजिटल युआन) सादर करणार देश ठरला आहे.
- चीन.

• ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातली सर्वात श्रीमंत व्यक्ती............ ही आहे.
- मुकेश अंबानी (3.2 अब्ज डॉलर).

▪️ कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?
उत्तर : एमिरेट्स

▪️ कोणत्या कलाकाराच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : लिओनार्डो दा विंची

▪️ कोणत्या बँकेनी सामाजिक अंतर पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफ्टी ग्रिड’ मोहीम चालवली आहे?
उत्तर : HDFC बँक

▪️ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : उर्सुला पापंड्रिया

▪️ ‘किसान रथ’ अॅपचे कार्य काय आहे?
उत्तर : अन्नधान्यांच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे

▪️ 2020 साली जागतिक आवाज दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फोकस ऑन युवर वॉइस

▪️ हांग्जो शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘2022 एशियन पॅरा गेम्स’या स्पर्धांचे शुभंकर काय आहे?
उत्तर : फीफी

▪️ 2020 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : गेट+इनवॉल्व्ड

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सिघाट’ (Cghaat) संकेतस्थळाचे अनावरण केले?
उत्तर : छत्तीसगड

▪️ कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘अॅसेस करो ना’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : दिल्ली

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...