Monday 3 August 2020

दिल्लीत नायट्रोजन डायऑक्साइड वायूच्या पातळीत 70 टक्क्यांची घट झाली.


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ  कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात हवेच्या प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट दिसून आली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे.

🔰या काळात राजधानी नवी दिल्लीमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) वायूच्या पातळीत 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, असे समजले. तसेच जागतिक पातळीवर बेल्जियम देशामध्ये NO2 ची पातळी 40 टक्क्यांनी खाली घसरली तर अमेरिका देशात हे प्रमाण 20 टक्क्यांचे आहे.

🔴नायट्रोजन डायऑक्साइड हानिकारक का आहे?

🔰नायट्रोजन डाय ऑक्साइड लालसर तपकिरी रंगाचा, पाण्यात काही प्रमाणात विरघळणारा वायू आहे. तापमान जास्त असताना झालेले वादळ आणि मातीतील सूक्ष्म जिवाणू तसेच जीवाश्म इंधन वापरणारी औष्णिक विद्युत केंद्रे आणि वाहनांमधून या वायूचे हवेत उत्सर्जन होते.

🔰या वायूमुळे डोकेदुखी, श्वासनलिकेचा व फुप्फुसाचा दाह इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.

🔰हा वायू आम्लवर्षां, जमिनीलगतचा ओझोन, प्रकाश-रासायनिक धुके अशा पर्यावरणास हानीकारक गोष्टींच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो.
हा हवेची गुणवत्ता कमी करतो. यामुळे खालचा ओझोन थर कमी होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...