Monday 3 October 2022

दिनविशेष

  

४ ऑक्टोबर :- घटना

१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१९४०: ब्रेनर पास येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

१९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

१९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.

४ ऑक्टोबर :- जन्म

१८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)

१९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)

१९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २०११)

१९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.

१९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.

१९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)

१९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म).

४ ऑक्टोबर :- निधन

१६६९: डच चित्रकार रेंब्राँ यांचे निधन. (जन्म: (जन्म: १५ जुलै १६०६)

१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)

१९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

१९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)

१९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)

१९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)

१९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.

२००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४).

एका ओळीत सारांश, 03 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

2021 साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ (01 ऑक्टोबर) याची संकल्पना - "रक्त द्या आणि जगाचे विस्पंदन अबाधित ठेवा".

संरक्षण

भारत आणि श्रीलंका यांच्या 'मित्र शक्ती' नामक संयुक्त सैन्य कवायतीची 8 वी आवृत्ती _ येथे 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल - श्रीलंका.

आंतरराष्ट्रीय

भारत आणि ____ यांच्यात औद्योगिक सुरक्षा करार (ISA) शिखर परिषद 27 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली - अमेरिका.

भारतातील महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी अमेरिकेचा सार्वजनिक-खासगी उपक्रम – महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अमेरिका-भारत युती.

राष्ट्रीय

'वेटलँड्स ऑफ इंडिया पोर्टल' (http://indianwetlands.in/) हे _ याच्या भागीदारीत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या "जैवविविधता आणि हवामान संरक्षणासाठी पाणथळ भूमीप्रदेशांचे व्यवस्थापन" प्रकल्पाच्या (वेटलँड्स प्रोजेक्ट) अंतर्गत विकसित केले गेले आहे - जर्मनी (GIZ GmbH).

___ संस्थेने जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज (225 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 1400 किलो वजनाचा) तयार केला आहे, ज्याचे अनावरण लेह येथे करण्यात आले - खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC).

नमामी गंगे कार्यक्रमाचे शुभंकर - चाचा चौधरी (कॉमिक पात्र).

व्यक्ती विशेष

चार वर्षांच्या द्वितीय कार्यकाळासाठी नियुक्ती झालेले ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी’ (UNFPA) याचे कार्यकारी संचालक - नतालिया कानेम (पनामा).

नेपाळमधील धौलागिरी पर्वत (8,167 मीटर उंचीचे जगातील सातव्या क्रमांकाचे शिखर) याच्या शिखरावर यशस्वीरित्या पोहोचल्याने, 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा कोणताही पर्वत परिपूरक ऑक्सिजनशिवाय सर करणारे पहिले भारतीय नागरिक - पियाली बसक (महिला).

क्रिडा

पहिल्या महिला क्रिकेटपटू, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 300 बळी घेण्याचे दुहेरी यश प्राप्त केले - एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया).

राज्य विशेष

_________ सरकार 01 ऑक्टोबर 2021 पासून 'वन्यजीवन आठवडा' राबवित आहे - महाराष्ट्र.

_ राज्याच्या इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - केरळ.

_ राज्याच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - अलिबाग (महाराष्ट्राचा रायगड जिल्हा).

_ राज्याच्या चिन्नोर तांदळाला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - मध्य प्रदेश.

सामान्य ज्ञान

रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) - स्थापना: 21 सप्टेंबर 1968; मुख्यालय: नवी दिल्ली.

आर्थिक गुप्तचर परिषदेची स्थापना - वर्ष 1990.

प्रथम गुन्हे अन्वेषण विभाग (CID) याची स्थापना – वर्ष 1902 (लखनऊ शहरात).

____ या वर्षी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) विशेष शाखा, CID आणि गुन्हे शाखा (CB-CID) या दोनमध्ये विभागली गेली – वर्ष 1929.

महात्मा गांधी यांची 152 व्या जयंती

देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला होता.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं.

आईचे नाव : पुतळाबाई

पत्नीचे नाव : कस्तुरबा गाधी

मुंबईत उच्च शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवून गांधीजी 1891 मध्ये भारतात परतले.

भारतात गांधीजी प्रथम राजकोट व नंतर मुंबईत वकिली करू लागले.

निधन : 30 जानेवारी 1948, दिल्ली.

  महात्मा गांधीजींवर प्रभाव टाकणारे ग्रंथ :
Unto This Last : जॉन रस्कीन,
Leaves of Grass : वॉल्ट हिटमन,
Waldel : हेरन्री डेव्हिड थोर

रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.

  सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा-या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते.

गांधीजीचे कार्य

अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.

त्यानंतर १९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण मधील शेतक-यांना जुलमी कर आणि जमीनदार यांच्याविरोधात एकत्र करुन लढा दिला. त्यानंतर गांधीजीनी केलेल्या दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्वतः ती तत्वं जगले.

एका ओळीत सारांश, 02 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस - 2 ऑक्टोबर.

भारतात, गांधी जयंती - 2 ऑक्टोबर.

संरक्षण

01 ऑक्टोबर 2021 पासून भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (AOC-in-C) - एअर मार्शल अमित देव.

01 ऑक्टोबर 2021 पासून लष्करी परिचर्या सेवा (MNS) याचे अतिरिक्त महासंचालक - मेजर जनरल स्मिता देवराणी.

_ याने 01 ऑक्टोबर 2021 रोजी त्याचा 96 वा स्थापना दिवस साजरा केला - लष्करी परिचर्या सेवा (MNS).

30 सप्टेंबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे (IAF) प्रमुख (Chief of the Air Staff / CAS) - एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी.

01 ऑक्टोबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे (IAF) उप-प्रमुख (VCAS) - एअर मार्शल संदीप सिंग.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 02 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून 'सुदर्शन भारत परिक्रमा' (7,500 किलोमीटर लांब प्रवास) नावाने __ याच्या अखिल भारतीय कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला – नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG).

पर्यावरण

जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या _ मधील 'किलाउआ' ज्वालामुखीचा 29 सप्टेंबर 2021 रोजी उद्रेक झाला - हवाई.

आंतरराष्ट्रीय

27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 या काळात ____ येथे भारत आणि अमेरिका यांच्यात औद्योगिक सुरक्षा करार शिखर परिषद आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली.

30 सप्टेंबर 2021 रोजी, भारत आणि ____ या देशांनी 2022 वर्षाच्या अखेरीस देशांदरम्यानचा मुक्त व्यापार करार (FTA) रद्द करण्याचा निर्णय घेतला - ऑस्ट्रेलिया.

राष्ट्रीय

01 ऑक्टोबर 2021 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वच्छ भारत अभियान – शहरी 2.0” आणि ____ यांचा प्रारंभ केला - अटल शहर पुनरुज्जीवन आणि परिवर्तन अभियान 2.0 (अमृत / AMRUT 2.0).

आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था (IFPRI), भारतीय लोकसंख्याशास्त्र संस्था (IIPS), UNICEF आणि आर्थिक विकास संस्था (IEG) यांच्या संयुक्त प्रयत्नातून _ याने 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ‘द स्टेट न्यूट्रीशन प्रोफाइल्स’ याचे अनावरण केले – नीती आयोग.

30 सप्टेंबर 2021 रोजी __ याने ‘लोक योजना मोहीम 2021 - सबकी योजना सबका विकास आणि व्हायब्रंट ग्राम सभा डॅशबोर्ड’ याचे अनावरण केले - केंद्रीय पंचायतराज आणि ग्रामीण विकास मंत्रालय.

_ याने "जिल्हा रुग्णालयांच्या कामगिरीतील सर्वोत्तम पद्धती" अहवाल प्रकाशित केला, जो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि WHO इंडिया यांच्या सहकार्याचा परिणाम आहे - नीती आयोग.

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASOOCHAM) या संस्थेने आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि आयुष पद्धतींच्या इतर प्रकारांमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी _ यांच्या नेतृत्वात एका राष्ट्रीय स्तरीय आयुष कृती दलाची स्थापना केली - डॉ सुदिप्त नारायण रॉय.

व्यक्ती विशेष

30 सप्टेंबर 2021 रोजी व्हाइस अॅडमिरल विनय बधवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर, भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर - व्हाइस एडमिरल अधीर अरोरा.

क्रिडा

‘महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध विजेतेपद’ स्पर्धेची पाचवी आवृत्ती _ येथे 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल - हिसार, हरियाणा.

_ हिने लिमा (पेरू) येथे झालेल्या ‘ISSF कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटाचे सुवर्णपदक जिंकले - मनु भाकर.

राज्य विशेष

तेलंगणा सरकारने 01 ऑक्टोबर 2021 रोजी _ येथे 'हरा भरा' प्रकल्प सुरू केला, जो सीडकॉप्टर ड्रोनद्वारे चालवली जाणारी भारतातील पहिली हवाई बीजारोपण मोहीम आहे - केबीआर अभयारण्य, हैदराबाद.

_ सरकारने बालविवाह थांबवण्यासाठी 'पोनवक्क' नावाचा एक नवीन प्रकल्प सुरू केला - केरळ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना - 31 जानेवारी 1992.

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना - 11 मे 2000.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना - 12 ऑक्टोबर 1993.

केंद्रीय विद्युत नियमन आयोगाची स्थापना - 24 जुलै 1998.

दिनविशेष

 

२ ऑक्टोबर :- घटना

१९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

१९२५: जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९५५: पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.

१९५८: गिनी देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.

१९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

२००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.

२ ऑक्टोबर :- जन्म

९७१: गझनीचा महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)

१८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)

१८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.

१८९१: पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६७)

१९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)

१९०८: विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)

१९२७: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)

१९३९: भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून २००६)

१९४२: चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.

१९४८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)

१९६८: झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्‍ना यांचा जन्म.

१९७१: संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म).

२ ऑक्टोबर :- निधन

१९०६: चित्रकार राजा रविवर्मा याचं निधन. (जन्म: २९ एप्रिल १८४८)

१९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस याचं निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)

१९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज याचं निधन. (जन्म: १५ जुलै १९०३)

१९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन याचं निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५).

ज्ञान-विज्ञान


ज्ञान-विज्ञान

_ येथील शास्त्रज्ञांच्या चमूने मोठ्या प्रमाणावर रीअॅक्टर विकसित केले आहे जे सूर्यप्रकाश आणि पाणी सारख्या शाश्वत स्त्रोतांचा वापर करून भरपूर प्रमाणात हायड्रोजन तयार करते - इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST), मोहाली.

सामान्य ज्ञान

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) - स्थापनाः 20 फेब्रुवारी 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय निवडणूक आयोग (ECI) - स्थापनाः 25 जानेवारी 1950; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय लेखानियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) याची स्थापना - भारतीय संविधानाच्या कलम 148 अन्वये.

केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची स्थापना - 12 ऑक्टोबर 2005.

केंद्रीय दक्षता आयोग (CVC) याची स्थापना - 11 फेब्रुवारी 1964.

कोणत्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी आकाश प्राइम क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेण्यात आली?
उत्तर :  इंटेग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर

  तैवान समुद्रधुनी ही १८० किलोमीटर रुंदी असलेली समुद्रधुनी असून ती तैवानचे बेट आणि _ खंडाला विभागते.
उत्तर : आशिया

कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात?
उत्तर : २८ सप्टेंबर

_ राज्यामधील प्रसिद्ध ‘सोजात मेहंदी’ला सरकारकडून भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे.
उत्तर : राजस्थान

  २०२१ साली “जागतिक हृदय दिवस”ची संकल्पना कोणती आहे?
उत्तर : यूज हार्ट टू कनेक्ट

कोणत्या मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ या कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर : गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय

‘ऑस्ट्रावा ओपन २०२१ (टेनिस)’ स्पर्धेच्या महिला दुहेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर : सानिया मिर्झा-शुई झांग

कोणत्या दिवशी ‘अन्नाचे नुकसान आणि कचरा कमी करण्याबाबत आंतरराष्ट्रीय जागृती दिवस’ साजरा करतात?
उत्तर : २९ सप्टेंबर

एका ओळीत सारांश, 01 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

2021 साली ‘आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस’ (1 ऑक्टोबर) याची संकल्पना - "डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस".

जागतिक शाकाहारी दिवस - 1 ऑक्टोबर.

अर्थव्यवस्था

NTPC रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (REL) या कंपनीने राजस्थानमधील 470 मेगावॅट सौर प्रकल्प आणि गुजरातमधील 200 मेगावॅट सौर प्रकल्पासाठी त्याच्या पहिल्या हरित कर्जासाठी _ सोबत करार केला – बँक ऑफ इंडिया.

आंतरराष्ट्रीय

आरोग्य आणि जैववैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्य आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन रिसर्च (ICER) याच्यासोबत सहकार्यासाठी भारत आणि _ या देशांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली - अमेरिका.

‘नाइट फ्रँक’ या संस्थेच्या अभ्यासानुसार, रिअल इस्टेटसाठी जगातील सर्वात हरित शहर - लंडन (त्याखालोखाल शांघाय, न्यूयॉर्क, पॅरिस आणि वॉशिंग्टन डीसी).

रिअल इस्टेटसाठी भारतीय हरित शहरे - दिल्ली (जागतिक स्तरावर 63 वा), चेन्नई (224 वा), मुंबई (240 वा), हैदराबाद (245 वा), बेंगळुरू (259 वा) आणि पुणे (260 वा).

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार आणि विकास परिषदेच्या पंधराव्या सत्राचे (UNCTAD15) _ येथे उद्घाटन करतील, जे 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात "सर्वांसाठी विषमता आणि असुरक्षिततेपासून समृद्धीपर्यंत" या विषयाखाली आयोजित केले जाईल - ब्रिजटाउन, बार्बाडोस.

‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ याद्वारे कार्बन न्यूट्रल प्रमाणपत्र मिळवणारे पहिले आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान - माचू पिचू, पेरू.

राष्ट्रीय

30 सप्टेंबर 2021 रोजी श्रम आणि रोजगार मंत्री, श्री भूपेंद्र यादव यांनी _ याला सुरुवात केली, जो तरुणांमध्ये रोजगारक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल कौशल्य कार्यक्रम आहे – डिजीसक्षम / DigiSaksham.

वृद्धाच्या फायद्याची उत्पादने तयार करणाऱ्या स्टार्ट-अप कंपणीची निवड करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा प्रदान करणारे समर्पित संकेतस्थळ-आधारित मंच - 'सीनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन' (SAGE).

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) याने _ येथे पश्चिम क्षेत्रामधील पहिली राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळा (NFL) स्थापन केली - JNPT, नवी मुंबई.

देशभरात विज्ञान संग्रहालयांद्वारे तर्कसंगत विचारसरणी निर्माण करण्यासाठी आणि अनुभवावर आधारित शिक्षण बळकट करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाचे __ आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांनी सामंजस्य करार केला - राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद.

आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळाच्या समितीने पुढील पाच वर्षांसाठी 'पीएम पोषण' योजनेला मंजुरी दिली, ज्याद्वारे विद्यमान मध्यान्ह भोजन योजनेचे नाव बदलून ____ असे केले जाईल - राष्ट्रीय पीएम-पोषण योजना (PM-POSHAN  / POshan SHAkti Nirman).

व्यक्ती विशेष

आयुध कारखाने मंडळ (OFB) याची उत्तराधिकारी संस्था असलेल्या, आयुध संचालनालयाचे पहिले महासंचालक (समन्वय आणि सेवा) - ई. आर. शेख.

यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) कडून घोषित ‘2021 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’चे भारतीय प्राप्तकर्ते - शिव नादर आणि मल्लिका श्रीनिवासन (भारतीय उद्योगपती).

‘कॉमनवेल्थ इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुरस्कार 2021’ याचा भारतीय विजेता - कैफ अली.

22 सप्टेंबर 2021 पासून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - पद्मजा चुंडुरू.

2021-23 या कालावधीसाठी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (CEAMA) याचे अध्यक्ष - एरिक ब्रागांझा.

क्रिडा

भारतात, पहिला एलजी हॉर्स पोलो कप स्पर्धा ____ येथे आयोजित केली गेली - द्रास, लडाख.

भारतीय हॉकी खेळाडू, ज्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली - रुपिंदर पाल सिंह आणि बीरेंद्र लाकरा.

राज्य विशेष

महाराष्ट्र सरकारने ____ येथे एक ‘युद्ध स्मारक-सह-संग्रहालय’ उभारण्याची योजना जाहीर केली - मुंबई.

कर्नाटक सरकारने वर्ष 2020 आणि वर्ष 2021 यासाठी ‘महात्मा गांधी सेवा पुरस्कार’ अनुक्रमे _ आणि श्री सिद्धगंगा शिक्षण संस्था आणि श्री सिद्धगंगा मठ (तुमाकुरू जिल्हा) यांना जाहीर केले - मीराबाई कोप्पीकर.

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.

स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.

स्वीडनच्या स्वांते पाबो यांना यावर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील (Discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution) अभ्यासासाठी हा पुरस्कार जाहीर.

नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी केली घोषणा.

कोण आहेत स्वांते पाबो?
स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक
त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.
ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालक

गेल्या वर्षीचे विजेते :- डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम 

या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता.

10 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...