चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे

कोणत्या दिवशी उत्तराखंडमध्ये 'हिमालय दिवस' साजरा करतात?
उत्तर : ९ सप्टेंबर

कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले स्वदेशी हाय ॲश कोल गॅसिफिकेशन आधारित मेथनॉल उत्पादन संयंत्र स्थापन करण्यात आले?
उत्तर : BHEL संशोधन आणि विकास केंद्र, हैदराबाद

९ सप्टेंबर २०२१ रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) प्रथम डेलीवरेबल फायरिंग युनिट (FU) MRSAM प्रणाली _ याकडे सोपवली.
उत्तर : भारतीय हवाई दल

कोणत्या व्यक्तीला पर्यावरणविषयक कठीण समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्नांसाठी ‘२०२१ इंटरनॅशनल यंग इको-हिरो’ हा सन्मान देण्यात आला?
उत्तर : अयान शंकता

कोणती व्यक्ती औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांसाठी नवीन कायदे तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ८ जणांच्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
उत्तर : डॉ वेणुगोपाल जी सोमाणी

कोणत्या मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२’ अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१" या उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर : जलशक्ती मंत्रालय

कोणत्या क्रूझ सेवा कंपनीसोबत IRCTC याने १८ सप्टेंबर २०२१ पासून भारतात लक्झरी क्रूझ सेवा पुरवण्यासाठी करार केला?
उत्तर :  कॉर्डेलिया क्रूझेस

कोणत्या मंत्रालयाने 'मैं भी डिजिटल ३.०' या मोहिमेचा प्रारंभ केला?
उत्तर : गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.

🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर...