Monday 30 January 2023

महाराष्ट्रातील पहिल्या घटना -



महाराष्ट्रातील पहिले ग्रामन्यायालय -उरुळीकांचन (पुणे)


महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत - हिंगोली


जिल्हा सेतू सुविधा ऑनलाईन करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा - नाशिक


महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो (रानम्हैस) अभयारण्य - गडचिरोली


महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा - सिंधुदुर्ग


महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद - ठाणे


महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना - सांगली


महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य - रायगड



आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग - बोल्डावाडी (हिंगोली)


महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र - अंधेरी


महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा - पालघर


महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली -यवतमाळ


महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र -चंद्रपूर



महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर - चंद्रपूर


महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा - गडचिरोली


महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका - इस्लामपूर (सांगली)


महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव - पाचगाव (नागपूर)


महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे शहर - इस्लामपूर (सांगली)


महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत - परसोडी (यवतमाळ)


महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव - लेखामेंडा (गडचिरोली)


महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष - चंद्रपूर एस.टी. आगार


महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद -चंद्रपूर जिल्हापरिषद


महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र - पुणे


महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल  -मेळघाट

MIDC Question Paper 2021



20 ऑगस्ट 2021 रोजी झालेला पेपर


FIRST SHIFT


1. सुधागड कोणत्या राज्यात आहे ?

महाराष्ट्र


2. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणते राज्य आहे ?

गुजरात


3. महाराष्ट्राचे पहिले राजघराणे कोणते ?

सातवाहन


4. RBI चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास


5. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील प्रकरण तीन कशाशी संबंधित आहे ?

महामंडळाची कामे आणि अधिकार


6. वित्त व्यवस्था, लेखा व लेखापरीक्षण याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कोणत्या प्रकरणांमध्ये दिली आहे ?

प्रकरण चार


7. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 7 कशाशी संबंधित आहे ?

महामंडळाच्या सभा


8. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे याच्याशी संबंधित कलम कोणते ?

कलम 39


9. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये नुकसान भरपाईची रक्कम करारानुसार ठरवण्यात येईल याची माहिती कोणत्या कलमा मध्ये दिली आहे ?

कलम 36


10. लघु उद्योग म्हणजे काय ?

दहा लाखांपेक्षा कमी गुंतवणूक असलेला उद्योग


11. औद्योगिक विकास महामंडळाला येणे असलेल्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे याच्याशी संबंधित कोणते कलम आहे ?

कलम 51


12. गट ग्रामपंचायत असेल तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जमीन द्यायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे ?

संबंधित ग्रामसभा व संबंधीत पंचायत समिती ( कलम 32 )


13. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संबंधित नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

राज्य शासन ( कलम 63 )


14. सर्वात पहिले चंद्रावर पाऊल कोणी टाकले ?

नील आर्मस्ट्रॉंग


15. PUC  चा  फुल फॉर्म सांगा.

Pollution under control certificate


16. भारतामध्ये हरित क्रांती केव्हा झाली ?

1966 – 67 मध्ये


17. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सोलापूर


18. नागौर येथील गुरांची जत्रा प्रसिद्ध आहे ती कोणत्या राज्यात भरते ?

राजस्थान


19. चाचा चौधरी हे व्यंगचित्र कोणी तयार केले ?

प्राण कुमार शर्मा


20. LIC ची स्थापना केव्हा झाली ?

1956


21. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. त्यादिवशी कोणाची जयंती असते ?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


22. श्रीलंका या देशाचे चलन कोणते आहे ?

श्रीलंकन रुपया


23. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत ?

यशवंतराव चव्हाण


24. अमेरिकेच्या 49 व्या उपराष्ट्रपती कोण आहेत ?

कमला हॅरीश

————————————————


SHIFT 12:45 ते 2:45


1. IFFCO चा फुल फॉर्म सांगा.

Indian Farmers Fertiliser Cooperative Limited


2.  Tom and Jerry या व्यंगचित्रांचे निर्माते कोण आहेत ?

विलियम हण्णा व जोसेफ बारबरा


3. काबुल कोणत्या देशाची राजधानी आहे ?

अफगाणिस्तान


4. OPEC या संघटनेचे सदस्य देश किती आहेत ?

11


5. टूर डी फ्रान्स कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

सायकलिंग


6. ईसापुर धरण कोणत्या राज्यात आहे ?

महाराष्ट्र


7. पांझरा धरण कोणत्या राज्यात आहे ?

महाराष्ट्र


8. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

उद्धव ठाकरे


THIRD SHIFT 5 ते 7 Batch


1. मेजा धरण कोणत्या नदीवर आहे ?

कोठारी


2. मिशन गोकुळ कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?

कृषी मंत्रालय


3. तोतलाडोह हे धरण कोणत्या राज्यात आहे ?

महाराष्ट्र


4. तेरावी BRICS शिक्षण मंत्र्यांची परिषद कोणत्या देशात झाली ?

भारत


5. फ्रन्टलाइन पत्रकारांना 50 लाख रुपयांचा विमा कोणत्या राज्यांने घोषित केला आहे ?

आसाम


6. कम्युनिटी किचन ही योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?

उत्तर प्रदेश


मराठी 20 question


1)काळ ओळखा 2 question

2) उतारा वाचून 5 question

3)  व्याकरण 5question

4) म्हणी 2question

5) शब्द संग्रह


English


1) Error 5 question

2) synonyms word 3 question

3) Antonyms 3 question

4) use of idioms


Gk 20 question


1) PUC  FULL form

2) महाराष्ट्र उजनी धरण

3) महाराष्ट्र सगळ्यात पहिले राजघराणे

4) तक्योवाद खेल कोण खेलतो

5)  सध्याचे गव्हनर


बुद्धीमापन


1) setting arrangement

2) table arrangement

3) clock

4) bodmas

5) तक॔


Midc act 20 question


1) 1961 act

2) special economic zone

3) कलम 53,43,61, चे प्रश्न

प्रश्न मंजुषा

 1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.

 A. 1/2 सदस्य संख्या

 B. 1/3 सदस्य संख्या✅

 C. 1/4 सदस्य संख्या

 D. 1/10 सदस्य संख्या.


________________________


2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

 A. 30 दिवस

 B. 60 दिवस

 C. 90 दिवस✅

 D. वरीलपैकी काहीही नाही.


________________________


3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

 A. राज्य शासन

 B. स्थायी समिती✅

 C. जिल्हा परिषद

 D. मुख्य कार्यकारी अधिकारी.


________________________


4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.

 A. सहाय्यक अधिकारी

 B. सल्लागार समिती

 C. कक्ष अधिकारी✅

 D. मुख्य अधिकारी.


________________________


5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

 A. सरपंच

 B. गट विकास अधिकारी

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरील सर्वांना.✅


________________________


6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

 A. डॉ. बी.आर, आंबेडकर

 B. वल्लभभाई पटेल✅

 C. जवाहरलाल नेहरू

 D.  डॉ. राजेंद्र प्रसाद.


________________________


7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

 A. (a) आणि (b)

 B. (b), (c) आणि (d)

 C. (a), (c) आणि (d)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✅


________________________


8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.


पर्यायी उत्तरे : 

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (c), (d)

 D. (a), (b), (c), (d). ✅


________________________


9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.

 A. संसद ठराव करून

 B. संसद कायदा तयार करून✅

 C. राष्ट्रपती आदेश पारित करून

 D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.


________________________


10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते. 

 A. वित्त विधेयक

 B. विनियोजन अधिनियम ✅

 C. वित्तीय अधिनियम

 D. संचित निधी अधिनियम.





१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅




२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?

१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 




३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅




४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 




५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 




६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 




७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅




८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅




९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅



१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद



११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६



१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅




१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा




१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅




१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?

👉 ११ July १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.



१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?

Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.

नियामक कायदा (1773) :-



कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने कंपनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतुने नियामक कायदा 1773 मध्ये मंजूर केला.


▪️कायदा मंजूर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे-


बंगालमध्ये अत्याचार - कंपनीच्या नोकरांनी बंगालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार केला.


कारागिराकडून जबरदस्तीने स्वस्त दरात माल घेणे, दंड करणे कारागृहात पाठविणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून जबरदस्तीने कर्जाचे रोखे लिहून घेणे यामुळे इंग्लडची जनता कंपनी शासनावर टीका करुन कंपनी सरकार बरखास्त केले.


कंपनीचे शासन म्हणजे व्यापारी धोरण - प्लासीच्या युध्दाने राजकारणात प्रवेश तर बक्सारच्या युध्दाने सत्ता स्थिर झाली. संरक्षण परराष्ट्रीय धोरण, करार, तह इ. महत्वाचे अधिकार कंपनीला मिळाले शासनविषयक सज्ञ्ल्त्;ाा व्यापारी संघटनेकडे असणे योग्य नाही असे मत राजनीतिज्ञम्प्;म्पनी व्यक्त केले.


व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हटले जाते.


ब्रिटिश पार्लमेंटला संधी - कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अनेक मार्गाने मोठया प्रमाणात पैसा स्वत:साठी गोळा केला.


कंपनीने सतत युध्दाचे धोरण स्वीकारले त्यामूळे आर्थिक स्थिती कोलमडली होती. यासाठी कंपनीने पार्लमेंटकडे आर्थिक मदत मागितली.


1772 मध्ये संसदेने कंनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सदस्य असलेल्या प्रवर समिती व त्याचबरोबर 13 सदस्यअसलेल्या गुप्त समितीची नेमणूक केली. समितीच्या अहवालाच्या आधारे 14 लाख पौंड रक्कम कर्जाऊ दिली.


त्याचवेळी 1 ऑक्टोबर 1773 रोजी नियंत्रणाचा कायदा मंजूर केला.

----------------––-----------------------

ब. जीनांचे चौदा मुद्दे



1) भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी.

2) शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

3) सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.

4) सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

5) केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

6) स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.

7) पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

8) सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

9) कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.

10) मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.

11) राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत.

12) मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

13) केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

14) केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.


♦️शिक्षक अभियोग्यता चाचणी(TAIT )2023 चे नोटिफिकेशन आले आहे .परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार..🙏

 


ग्रामसेवक जवळ आली रे मित्रांनो

 


Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...