Wednesday, 26 August 2020

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे



📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे

📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात

📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.

📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते

🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰

  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर

  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक

  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा

  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर
 
  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार

  🎇 तोरणा 1,404 मी पुणे

  Trick 👇👇
🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆

  🌸 क  = कळसुबाई
  🌸 सा  = साल्हेर
  🌸 मी  = महाबळेश्वर
  🌸 हा   = हरिश्चंद्रगड
  🌸 स   =सप्तश्रृंगी
  🌸 तो   = तोरणा
  🌸 अ  =  अस्तंभा
  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर
  🌸 तिला =  तौला
  🌸 वि    = विराट
  🌸 चा    = चिखलदरा

सहावी पंचवार्षिक योजना


☀️कालावधी➖1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
🔅भर➖दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती
🌀परतिमान➖अलन मान व अशोक रुद्र

🔥कार्यक्रम

⏩1980➖एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
⏩1980➖राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
⏩1983➖गरामीन भूमिहीन रोजगार हमी योजना

✍️1982➖गरामीण भागातील महिला व मुलाचा विकास(डेन्मार्क च्या मदतीने)

🔥दोन पोलाद प्रकल्प

🔘विशाखापट्टणम
🔘सालेम पोलाद

✍️15 एप्रिल 1980➖6 बँक राष्ट्रीयीकरण

🔘1982➖एक्सझीम बँक
🔘जलै 1982➖नाबार्ड

👉या दरम्यान देशाला अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले
👉सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते

🔥वद्धी दर

👁‍🗨सकल्पित➖5.2 टक्के
👁‍🗨साध्य➖5.54 टक्के
________________________________

सरपंच समिती



     तालुक्यातील ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीशी योग्य समन्वय राहावा यासाठी सरपंच समितीची स्थापना केली जावी अशी शिफारस १९७० च्या ल. ना. बोनगीरवार समितीने केली होती. सरपंच समिती  हि सल्लागार स्वरूपाची समिती आहे.

सदस्य संख्या      :  १५ ( १/५ सरपंचाची निवड पंचायत संती क्षेत्रामधून या समितीवर होते फिरत्या पद्धतीने )

कार्यकाळ           :  १ वर्ष

पदसिद्ध अध्यक्ष    :  पंचायत समितीचे उपसभापती

पदसिद्ध सचिव     :   पंचायत समितीचे विस्तार अधिकार

बैठका               :   दार महा एक बैठक ( एकूण १२ बैठका )

* सरपंच समितीची कार्य :

१) ग्रामपंचायतीच्या कार्यात सुसूत्रता आणणे.

२) ग्रामपंचायत व पंचायत समिती मध्ये समनव्यय साधने.

३) ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

४) तालुका स्तरावर विकास योजना राबविताना जिल्हा परिषदेला शिफारशी करणे.

नक्की वाचा :- भारतात घडलेल्या पहिल्या गोष्टी



●  चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश : अमेरिका

● पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात प्रेक्षेपित करणारा देश : रशिया

●  पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश : द. आफ्रिका

●  पहिली चेहरारोपण शस्त्रक्रिया करणारा देश : फ्रान्स

● भारतातील पहिली विज्ञान नगरी : कोलकाता

●  भारतातील पहिला महासंघ : परम 10,000

●  भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र : नवी दिल्ली (1959)

●  भारतातील पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र : पृथ्वी (1988)

●  भारतातील पहिले कुटुंबनियोजन केंद्र : मुंबई (1925)

●  भारताचा पाहीला उपग्रह : आर्यभट्ट

●  भारतातील पहिला दूरसंवेदन उपग्रह : आय.आर.एस-1ए

●  भारतातील पहिली अणूभट्टी : अप्सरा (1954)

●  भारतातील पहिली जनगणना : ए.स. 1872

●  भारतातील स्वदेशी निर्मिती पहिली आण्विक पाणबुडी : आय.एन.एस.अरिहंत

●  भारतातील पहिली अणुचाचणी : पोखरण (1974)

खारफुटी जंगले



♻️आतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️

🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते.

🔸मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती,
🔸इग्रजीत मॅंग्रोव्ह असे म्हणतात.
🔸 तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.

🔷या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.

🔺भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे.


🔶जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत.
🔹तयापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत.
🔹पश्चिम किनार पट्टीवर २७,
🔹पर्व किनार पट्टीवर ४०,
🔹अदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.

♻️उपयुक्तता♻️

🔘खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते.

🔘मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते.

🔸कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही.

🔘तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो.
🔸टनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.

🔘निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात.

🔘चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात.

🔘खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात.

🔘मस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.

 🔘Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो.

 🔘तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.

🔴या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा.🔴

✅ गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे. ✅

"सिंधू"च्या चर्चेवर भारत आणि पाकिस्तानची चकमक वाढली



🔷 Indus Water Treaty 🔷

🔶पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू नदी पाणी वाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

🔶जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता.

🔶या संदर्भातील वाद तंटे सोडवण्यासाठी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली.

🔶करारानुसार बियास , रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारतात विनाअट वापर करू शकणार.

🔶पश्चिमेकडील नद्यांतून भारताला एकूण पाण्यापैकी 20 टक्के पाणी उपलब्ध आहे.

🔶सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान प्राधान्याने वापरू शकणार.

🔶भारत या पश्चिमेकडील नद्यांवर 3.6 दशलक्ष एकर फूट इतक्या पाणी साठवणीच्या सुविधा बांधू शकतो.

🔴 सिंधू नदी 🔴

🔷ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे.

🔷तिबेट , भारत व पाकिस्तान मधून वाहणारी नदी.

🔷उगम - मानसरोवर , तिबेट.

🔷मुख - अरबी समुद्र, कराची.

🔷उपनद्या - गिलगिट , काबुल , सतलज , बियास , चिनाब , झेलम , रावी.

काय आहे गल्फा प्रवाह?



📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*

📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.

📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.

📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो

📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.

📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.

*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*

📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.

📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.

📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.

📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.

 📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

ओझोन चे संरक्षण कवच



🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो.

🔰ओझोन  वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे  सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे.

🔰सर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही
किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील  सजीवांचे रक्षण होते.

🔰वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड  करण्यासाठी वापरला जाणारे
📌 कलोरोफ्लुरोकार्बन्स तसेच 
📌 कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास  ओझोनच्या थराचा नाश होतो. 

🔰ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी  १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’  म्हणून मानला जातो.

महणी व अर्थ



🌷एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत------
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत


🌷एका हाताने टाळी वाजत नाही------
भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे असत नाही


🌷एकाच माळेचे मणी------
येथून तेथून सगळे सारखेच


🌷एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी विडी------
दुसऱ्याच्या अडचणीचा किंवा दुःखाचा विचार न करता, स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे


🌷एकादशीच्या घरी शिवरात्र------
एका दरिद्री माणसाला दुसऱ्या दरिद्री माणसाचा काहीच उपयोग नाही


🌷एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये------
एकाने वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहानशी देखील वाईट गोष्ट करु नये


🌷ऐकावे जनाचे करावे मनाचे------
सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे


🌷ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही------
जो सांगितलेले ऐकत नाही, त्याला उपदेश करण्यात काय अर्थ?


🌷ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ------
कष्ट केल्याविना खाण्याची सवय असणारा, जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारुन घेतो

Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...