Wednesday 10 February 2021

भारताच्या मदतीने अफगाणिस्तानात शहतूत धरणाच्या बांधकामासाठी सामंजस्य करार झाला


🔰अफगाणिस्तानात लालंदर (शहतूत) धरणाच्या बांधकामासाठी 9 फेब्रुवारी 2021 रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एका सामंजस्य करार झाला.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानाचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद अशरफ घनी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्रमंत्री हनीफ आत्मर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.


💢परकल्पाविषयी


🔰लालंदर (शहतूत) धरण काबूल नदीच्या खोऱ्यात उभारले जाणार आहे. धरण काबूल शहराच्या सुरक्षित पेयजलाची गरज भागवेल आणि जवळपासच्या भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देईल, विद्यमान सिंचन व सांडपाणी जोडणीची पुनर्मांडणी करेल, त्या भागातील पूर संरक्षण आणि व्यवस्थापन प्रयत्नांना सहाय्यभूत ठरेल आणि त्या प्रदेशाला वीज पुरवेल.


🔰अफगाणिस्तानात भारताकडून बांधले जाणारे हे दुसरे मोठे धरण आहे, भारत-अफगाणिस्तान मैत्री धरण (“सल्मा धरण”), ज्याचे उद्‌घाटन जून 2016 मध्ये केले होते.


🔰अफगाणिस्तानाबरोबरच्या भारताच्या विकास सहकार्याचा एक भाग म्हणून, अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांमध्ये भारताने 400 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत.

न्यूझीलंडचा म्यानमारला जोरदार दणका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय


🔰मागच्या आठवड्यात म्यानमारमध्ये लष्कराने उठाव करुन सत्ता ताब्यात घेतली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला संधी देण्याऐवजी अशा प्रकारे सत्ता ताब्यात घेणाऱ्या म्यानमारच्या लष्करावर चहूबाजुंनी टीका सुरु आहे. न्यूझीलंडने फक्त शाब्दीक टीका करण्याऐवजी थेट कारवाईचे पाऊल उचलले आहे.


🔰नयूझीलंडने म्यानमार बरोबरचे सर्व उच्चस्तरीय संबंध स्थगित केले आहेत. त्याशिवाय म्यानमारच्या लष्करी नेत्यांना न्यूझीलंडमध्ये प्रवेशबंदी केली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. “न्यूझीलंडकडून म्यानमारला जी मदत दिली जाते, त्याचा फायदा लष्कर आणि त्यांच्या प्रकल्पांना मिळणार नाही, हे सुनिश्चित करु” असे जेसिंडा आर्डन यांनी सांगितले.


🔰“इथून न्यूझीलंडमधून आम्हाला जो, काही कठोर संदेश देता येईल, तो आम्ही देऊ. म्यानमारसोबत उच्चस्तरीय चर्चा बंद करु तसेच जो निधी आम्ही म्यानमारला देतोय, त्याचा फायदा म्यानमारच्या लष्कराला मिळणार नाही, याची काळजी घेऊ” असे आर्डन यांनी सांगितले.


🔰२०१८ ते २०२१ या काळात न्यूझीलंडकडून म्यानमारला तीन कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत दिली जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. “न्यूझीलंड म्यानमारच्या लष्करी राजवटीला मान्यता देणार नाही. ताब्यात घेतलेल्या सर्व राजकीय नेत्यांना तात्काळ सोडून द्या” असे न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे.

नवकरोनावर फायझरची लस प्रभावी



🔰कोविड १९ च्या ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेतील नवीन विषाणूवर फायझर व बायोएनटेक यांची लस परिणामकारक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.


🔰ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस नवकरोनावर प्रभावी नसल्याने त्या लशीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले लसीकरण दक्षिण आफ्रिकेमध्ये थांबवण्यात आले असतानाच ही आशादायी बाब समोर आली.


🔰‘नेचर मेडिसीन’ या नियतकालिकातील शोधनिबंधानुसार ही लस करोनाच्या ‘एन ५०१ वाय’ व ‘इ ४८४ के’ या दोन उत्परिवर्तनांवर गुणकारी आहे. टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की,  दोन नवीन विषाणू प्रकारांत काटेरी प्रथिनातील अमिनो आम्लांची रचना बदलली असून त्यावर फायझरची लस मात करू शकते.


🔰दशात २४ तासांत ९,११० जणांना लागण देशात गेल्या २४ तासांत आणखी नऊ हजार ११० जणांना करोनाची लागण झाली, तर आणखी ७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. या महिन्यात १० हजारांपेक्षा कमी जणांना करोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे.

यंदाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पुढील वर्षी.



🔰राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारलाही करोनाच्या साथीचा फटका बसला आहे. २०१९-२०चे शिवछत्रपती पुरस्कार यंदा दिले जाणार नाहीत, परंतु पुढील वर्षी ते दिले जातील, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सोमवारी दिली.


🔰१९६९पासून राज्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या काही वर्षांत १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिनाचा मुहूर्त साधून हे पुरस्कार देण्याची प्रथा राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली होती. गतवर्षी गेट वे ऑफ इंडिया येथे २२ फेब्रुवारीला झालेल्या शानदार कार्यक्रमात ६३ जणांना २०१८-१९च्या पुरस्काराने गौरवण्यात आले, परंतु गेले वर्षभर करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा स्पर्धावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यंदाचे पुरस्कार वर्षभरासाठी लांबणीवर पडल्याचे स्पष्टीकरण केदार यांनी दिले.


🔰राज्याच्या क्रीडा विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या क्रीडा खात्याकडून शिवछत्रपती पुरस्कारांची नियमावली संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. यातील नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अभिप्रायार्थ खुले आवाहन करण्यात आले होते. या अभिप्रायांचा आढावा घेऊन नियमावलीत आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी हे निकष लागू करूनच पुरस्कार दिले जातील.

आंदोलन मागे घ्या, चर्चेस या.



🔰कृषी कायद्यांचे समर्थन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना ‘आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस या’ असे आवाहन सोमवारी राज्यसभेत केले.


🔰किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) होते, आहे आणि यापुढेही राहील, बाजारांचे आधुनिकीकरण करण्यात येईल आणि ८० कोटी गरिबांचा स्वस्त धान्यपुरवठाही सुरू राहील, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कृषी सुधारणांबाबतच्या वक्तव्याचा दाखला देत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसने घूमजाव केल्याची टीका केली. कृषी सुधारणा राबवण्याची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.


🔰राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना मोदी म्हणाले, की आता आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत. हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात आहेत.


🔰कषी कायद्यांवर विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. आंदोलनामागील कारणांबाबत विरोधक मूग गिळून आहेत, अशी टीका त्यांनी केली. ‘एफडीआय’चा अर्थ थेट परकीय गुंतवणूक, असा आहे, परंतु त्याऐवजी आता थेट विध्वसंक विचारसरणी असा नवीनच अर्थ देशात लावला जात आहे. त्यामुळे या विचारधारेपासून देशाला वाचवण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

बिल गेट्स म्हणतात, ‘भविष्यात ‘या’ दोन गोष्टींसाठी तयार राहिलो नाही तर लाखो लोकांचा मृत्यू अटळ’.


🔰करोनामधून थोडंफार सावरत असणाऱ्या जगभरातील देशांना मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी येणाऱ्या दोन धोक्यासंदर्भात इशारा दिलाय. बिल गेट्स यांनी भविष्यामध्ये वातावरण बदल आणि जैविक दहशतवाद (Climate Change and Bio-terrorism) या दोन गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल अशी भीती व्यक्त केलीय.


🔰एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी हा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा वर्षांपूर्वी बिल गेट्स यांनी करोनासारख्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची भविष्यवाणी केली होती. भविष्यात पृथ्वीवर अशा विषाणूचा प्रादुर्भाव होईल की ज्यामुळे लोकं बाजारात जायलाही घाबरतील, अशा शब्दांमध्ये गेट्स यांनी साथीच्या रोगासंदर्भात इशारा दिला होता. गेट्स यांनी लोकांना विमान प्रवास करण्यातही अडथळा येईल आणि लोकं विमानप्रवासालाही घाबरतील अशी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिलेला. त्यामुळेच आता गेट्स यांनी पुन्हा नव्याने इशारा दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


🔰डरेक मुलर या युट्यूबरच्या व्हेरिटासीयम या चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी वातावरण बदल आणि जैविक दहशतवाद या दोन मोठ्या धोक्यांविरोधात मानव तयार नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.


🔰“पुढील येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्याही साथीच्या रोगापेक्षा वातावरण बदलामुळे घोषणा घटनांमुळे अनेकांचा मृत्यू होईल. तसेच जैविक दहशतवादाचा धोकाही जगावर आहे. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कोणीही नवीन विषाणूची निर्मिती करु शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणाऱ्या करोना विषाणूपेक्षा या दोन गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाहाकार उडेल,” अशा शब्दांमध्ये बिल गेट्स यांनी इशारा दिलाय.

म्यानमारमध्ये निदर्शने सुरूच; इंटरनेट सेवा पूर्ववत.



🔰म्यानमारमध्ये लष्कराने गेल्या आठवड्यात केलेल्या बंडाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो  लोकांनी रविवारी राजधानी यांगूनच्या रस्त्यांवरून मोर्चे काढले. आदल्या दिवशी बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा बहाल करण्यात आल्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला होता.


🔰यांगूनच्या निरनिराळ्या भागांत निदर्शने सुरू झाली. त्यानंतर शहराच्या बाजारपेठेतील सुले पॅगोडा येथे निदर्शक एकत्र आले आणि त्यांनी ‘लाँग लिव्ह मदर सू’ आणि ‘लष्करी हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा घोषणा दिल्या.


🔰शनिवारी निदर्शने मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा बंद केल्या होत्या.  मात्र, रविवारी दुपारी आपल्या मोबाइल फोन्सवरील डेटा अ‍ॅक्सेस पुन्हा सुरू झाल्याचे यांगूनमधील नागरिकांनी सांगितले. गेल्या सोमवारी लष्कराने बळकावलेली सत्ता सोडून द्यावी अशी निदर्शकांची मागणी असून, देशाच्या पदच्युत नेत्या आंग सान सू की, तसेच त्यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी’ पक्षाचे इतर उच्चपदस्थ नेते यांची सुटका करावी अशीही मागणी ते करत आहेत.


🔰गल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याची तक्रार आपण केली होती, मात्र सू की व त्यांच्या पक्षांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा लष्कराचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने मात्र या दाव्याला पुष्टी देणारा काही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

न्यूयॉर्क विधानसभेने ५ फेब्रुवारी ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित केला; भारत म्हणाला.



🔰अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये पाकिस्तानचे समर्थन करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. या ठरावानुसार ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करण्यात येणार आहे. मात्र या ठरावाविरोधात भारताने कठोर शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे.


🔰भारताने हा ठराव म्हणजे स्वार्थी हेतूने मांडण्यात आलेला ठराव असल्याचं म्हटलं आहे. तसेच जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून त्याला भारतापासून वेगळं करता येणार नाही. तसेच भारताने न्यूयॉर्क राज्यातील नवनिर्वाचित प्रतिनिधिंशी भारतीय समुदायाशीसंबंधित चर्चा करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.


🔰नयूयॉर्क स्टेट असेम्बली म्हणजेच विधानसभेमध्ये पाच फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस घोषित करणारा ठराव गव्हर्नर एण्ड्रू कुओमो यांनी संमत केला. पाकिस्तानमध्ये ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकदा दिवस म्हणून साजरा करतो. या प्रस्तावावर भारताने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत, दोघांमध्ये दुफळी निर्माण करण्याच्या हेतूने जम्मू-काश्मीरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची चुकीची व्याख्या तयार करुन स्वार्थी हेतूने हा ठराव संमत करण्याचा प्रयत्न चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. विधानसभेमधील सदस्य नादर सायेघ आणि अन्य १२ सदस्यांनी हा ठराव मांडला होता.

हिमाचल प्रदेश: ‘ई-मंत्रिमंडळ’ संकल्पना लागू करणारे पहिले राज्य



🔰हिमाचल प्रदेश हे ‘ई-मंत्रिमंडळ’ (किंवा ई-कॅबिनेट) याची अंमलबजावणी करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे आणि याचबरोबर राज्यातला सर्व मंत्रालयीन व्यवहार आता पूर्णपणे कागदरहित झालेला आहे.


🔴ठळक बाबी....


🔰राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी घेण्यापासून ते मेमो/सूचना देण्यापर्यंतचे सर्व व्यवहार / कार्य प्रगत संगणकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पार पाडले जाणार आहेत.


🔰हिमाचल प्रदेश राज्य विधानसभा 2014 सालीच पूर्णपणे डिजिटल झाली होती.

राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘ई-मंत्रिमंडळ’ प्रकल्पासाठी मोबाइल अॅप देखील तयार केला आहे.


🔴हिमाचल प्रदेश राज्य...


🔰हिमाचल प्रदेश हे हिमालयाच्या कुशीतील एक भारतीय घटक राज्य आहे. त्याला 25 जानेवारी 1971 रोजी राज्याचा दर्जा प्राप्त झाला. त्याच्या उत्तरेस जम्मू व काश्मीर, पश्चिमेस पंजाब, नैर्ऋत्येस हरयाणा, दक्षिणेस उत्तर प्रदेश, आग्नेयीस उत्तरा-खंड ही राज्ये आणि पूर्वेस तिबेट हा चीनचा स्वायत्त विभाग आहे. सिमला (उर्फ शिमला) ही हिमाचल प्रदेशाची राजधानी आहे.


🔰सांप्रत हिमाचल प्रदेश राज्यात बिलासपूर, चंबा, हमीरपूर, कांग्रा, किन्नौर, कुलू, लाहूल व स्पिती, मंडी, सिमला, सिरमौर, सोलन व उना असे बारा जिल्हे आहेत. ते भारतीय संघराज्यातील एक घटकराज्य असल्यामुळे राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यपालांच्या संमतीनुसार विधिमंडळाला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ राज्यकारभार पाहते. राज्यात 68 सदस्यांचे एकसदनी विधिमंडळ असून लोकसभेवर राज्यातून 4 सदस्य व राज्यसभेवर 3 सदस्य निवडून दिले जातात.

स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA): जगातली सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण



🔰स्क्वेअर किलोमीटर अॅरे वेधशाळा (SKA) परिषदेने जगातली सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण याच्या बांधकामासाठी त्यासंबंधी प्रस्तावाला मंजूरी दिले.


💢सक्वेअर किलोमीटर अॅरे (SKA) विषयी


🔰कॉम्प्लेक्स स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA) या नावाची पृथ्वीवरची सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिण (telescope) तयार केली जात आहे.


🔰दक्षिण आफ्रिकेच्या पुढाकाराने ‘स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA)’ हा विशाल मल्‍टी-रेडियो टेलीस्‍कोप प्रकल्प राबवला जात आहे, ज्यांचा विकास ऑस्‍ट्रेलिया, न्युझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेत होत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत किमान 3000 चौ. किलोमीटरच्या क्षेत्रफळात रिसीव्हींग स्‍टेशन स्‍थापित केले जात आहेत. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 1 डिश (छत्री) याप्रमाणे दोन्ही खंडामध्ये एकूण 3000 डिश उभारण्यात येत आहे.


🔰ही दुर्बिण कार्यरत झाल्यानंतर इतर कोणत्याही दुर्बिणीच्या 50 पट संवेदनशीलतेच्या तुलनेत 10,000 पट अधिक वेगाने तारांगणाची माहिती घेतली जाऊ शकणार आणि हबल अंतराळ दुर्बिणीच्या पृथक्करण (resolution) गुणवत्तेपेक्षाही अत्याधिक पटीने गुणवत्तापूर्ण प्रतिमा घेतल्या जाणार.

करोनाबाधितांच्या संसर्गात घट झाल्याने WHO ने केलं भारताचं कौतुक


🔰भारतात कोविड-१९ च्या संसर्गाच्या प्रमाणात घट झाल्याने जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) या महामारीच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले आहे. भारताने कोविड-१९वर नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी करुन दाखवली, असं संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ए. गेबरेसस यांनी म्हटलं आहे.


🔰“या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्यास करोनाच्या विषाणूवर आपण सहज मात करु शकतो, हे आपल्याला भारताच्या कामगिरीवरुन दिसतं. या प्रयत्नांमध्ये लसही समाविष्ट झाल्याने आता अधिक चांगले परिणाम घडून येतील अशी आपण आशा करतो,’ असंही WHO च्या प्रमुखांनी म्हटलं आहे.


🔰दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितलं की, देशात सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव घटत असल्याचे दिसते आहे. दररोजच्या आकडेवारीत घट होत आहे, जी सप्टेंबर २०२०च्या मध्यावर सर्वात उच्च पातळीवर पोहोचली होती.

करोना मदत विधेयकाला अमेरिकी सेनेटची मान्यता


🔰अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मांडलेल्या १.९ ट्रिलियन डॉलरच्या करोना मदत योजनेला शीघ्रगतीने मान्यता देण्यासाठी सेनेटने शुक्रवारी रिपब्लिकन सदस्यांच्या पाठिंब्याविना महत्त्वाचे पाऊल टाकले. या वेळी अध्यक्षस्थानी असलेल्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना निर्णायक मत टाकावे लागले.


🔰समसमान मतांमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी हॅरिस यांनी निर्णायक मत टाकून ५१-५० मतांनी प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे जाहीर करताच डेमोक्रॅटिक सदस्यांनी आनंद व्यक्त केला. करोना मदत विधेयकाची अंतिम रूपरेषा मांडण्यासाठीच्या सुधारणांबाबत सेनेट सदस्यांनी मतदान केले.


🔰आता हे विधेयत पुन्हा प्रतिनिधीगृहाकडे पाठविण्यात येणार आहे. सेनेटने त्यामध्ये बदल केल्याने प्रतिनिधीगृहात त्याला पुन्हा मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर या मदत विधेयकाचा मसुदा तयार करण्याचा मार्ग खुला होणार आहे. या बाबतच्या कामकाजाची विभागणी काँग्रेसच्या अनेक समित्यांमध्ये होणार आहे.

विज्ञानदिनी इस्रोकडून स्टार्टअप कंपनीचा उपग्रह अवकाशात



🔰यंदाच्या वर्षांतील पहिली अवकाश मोहीम म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो विज्ञान दिनी २८ फेब्रुवारीला ब्राझीलचा अ‍ॅमॅझोनिया १ व भारताचे तीन उपग्रह सोडणार आहे. त्यातील एक उपग्रह हा भारतीय स्टार्टअप कंपनीचा आहे.


🔰धरुवीय उपग्रह प्रक्षेपक सी ५१ च्या मदतीने चेन्नईपासून १०० कि.मी अंतरावर असलेल्या प्रक्षेपण तळावरून हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. सकाळी दहा वाजून २४ मिनिटांनी त्यांचे उड्डाण होणार आहे.


🔰अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले, की पीएसएलव्ही सी ५१ या उपग्रहाच्या मदतीने हे उपग्रह सोडण्यात येतील. अ‍ॅमेझोनिया हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो ब्राझीलने तयार केलेला आहे. आनंद व सतीश धवन तसेच युनिटीसॅट हे उपग्रह समवेत सोडले जाणार आहेत. आनंद हा उपग्रह पिक्सेल या स्टार्टअप म्हणजे नवोद्योगाचा असून सतीश धवन उपग्रह चेन्नईच्या स्पेस किड्झ इंडिया या संस्थेचा आहे.


🔰यनिटीसॅट उपग्रहात तीन उपग्रहांचे मिश्रण असून त्याची रचना जेपीयार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीपेरूम्पदूर, जी.एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग नागपूर, श्री शक्ती इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी  कोईमतूर  यांनी केली आहे. शिवन यांनी सांगितले,की ही मोहीम आमच्यासाठी व देशासाठी महत्त्वाची असून पिक्सेल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवैस अहमद यांनी सांगितले,की आमचा उपग्रह अवकाशात जाणार असून तो व्यावसायिक व खासगी उपग्रह आहे.

मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ८ मार्चपासून



🔰मराठा आरक्षणप्रकरणी ८ ते १८ मार्च या दहा दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होईल. न्या. अशोक भूषण यांच्या पाचसदस्यीय पीठाच्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्देश दिले.


🔰सर्वोच्च न्यायालयामध्ये दहा दिवसांत प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाल्यास मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरही प्रत्यक्ष सुनावणी होईल. अन्यथा दूरसंचार माध्यमातून सुनावणी घेतली जाईल. वादी व प्रतिवादी यांना युक्तिवादासाठी दिवस नेमून देण्यात आले असून केंद्र सरकारही बाजू मांडेल. 


🔰नया. भूषण यांच्या पीठासमोर २० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर, ५ फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणीची तारीख व सुनावणीचे स्वरूप निश्चित केले जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या तीनसदस्यीय पीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून राज्य सरकार व या प्रकरणी हस्तक्षेप करत याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण पाच वा मोठय़ा पीठाकडे देण्याची विनंती केली होती.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...