Wednesday 10 February 2021

म्यानमारमध्ये निदर्शने सुरूच; इंटरनेट सेवा पूर्ववत.🔰म्यानमारमध्ये लष्कराने गेल्या आठवड्यात केलेल्या बंडाला विरोध दर्शवण्यासाठी हजारो  लोकांनी रविवारी राजधानी यांगूनच्या रस्त्यांवरून मोर्चे काढले. आदल्या दिवशी बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा बहाल करण्यात आल्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला होता.


🔰यांगूनच्या निरनिराळ्या भागांत निदर्शने सुरू झाली. त्यानंतर शहराच्या बाजारपेठेतील सुले पॅगोडा येथे निदर्शक एकत्र आले आणि त्यांनी ‘लाँग लिव्ह मदर सू’ आणि ‘लष्करी हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा घोषणा दिल्या.


🔰शनिवारी निदर्शने मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा बंद केल्या होत्या.  मात्र, रविवारी दुपारी आपल्या मोबाइल फोन्सवरील डेटा अ‍ॅक्सेस पुन्हा सुरू झाल्याचे यांगूनमधील नागरिकांनी सांगितले. गेल्या सोमवारी लष्कराने बळकावलेली सत्ता सोडून द्यावी अशी निदर्शकांची मागणी असून, देशाच्या पदच्युत नेत्या आंग सान सू की, तसेच त्यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी’ पक्षाचे इतर उच्चपदस्थ नेते यांची सुटका करावी अशीही मागणी ते करत आहेत.


🔰गल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याची तक्रार आपण केली होती, मात्र सू की व त्यांच्या पक्षांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा लष्कराचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने मात्र या दाव्याला पुष्टी देणारा काही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...