Tuesday 2 February 2021

रामसर करारासंबंधित महत्वपूर्ण माहिती.




🔰 १९७१ साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलँड्स’ ह्या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते


🔰 हयाच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापरासंबंधीचे निर्णय घेण्यात आले


🔰 पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो


✍️ भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले.


🌍 सध्या जगातील २,४४१ पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे


🇮🇳 भारतातील ४२ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे


🗓 जगभरात दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ दिन’ म्हणून साजरा केला जातो


🔰 ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे (१९८१)


🔰 नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे (जानेवारी , २०२०)


🔰 लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे (नोव्हेंबर , २०२०).


अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा :



Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. करोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून करोना प्रतिबंधक लसीचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय देशात शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु असताना शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.


महाराष्ट्राबद्दल बोलायचं गेल्यास नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा करण्यात आलेली असून नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली असून सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा


- नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद

- प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणीसाठी तरतूद

- १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा

- आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींच्या निधीची तरतूद

- कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

- १५ वर्षे जुन्या वाहनांसाठी 'स्क्रॅपिंग पॉलिसी

- देशभरात ७ मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार

- कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी

- डीएफआयसाठी ३ वर्षांकरिता ५ लाख कोटींच्या निधीची तरतूद

- दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाईनचा विस्तार करणार

- कापड उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या ३ वर्षात ७ टेक्स्टाईल पार्कची निर्मिती

- रस्ते विभागासाठी १ लाख १८ हजार कोटींचा निधी

- मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

- २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर

- रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटींच्या निधीची तरतूद

- २०३० पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार

- गरज पडल्यास सरकार कोरोना लसीकरणासाठी आणखी निधी मंजूर करणार

- सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी

- नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा

- नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद

- विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ वरून ७४ टक्क्यांवर

- सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद

- या वर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार

- बीपीसीएल,एअर इंडिया, पवनहंस, आयडीबीआयची निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करणार

- मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीमधून १ लाख ७५ हजार कोटींचा निधी उभारणार

- शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट

- गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद

- पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलिगुडी राष्ट्रीय महामार्गाची घोषणा

- १६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट

- १०० नवीन सैनिक स्कूलची घोषणा

- असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल निर्माण करणार

- सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न

- आदिवासी भागात ७५० 'एकलव्य' शाळा उभारणार

- पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी ६४ हजार कोटींची तरतूद

- लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूद

- गगनयान मिशन डिसेंबर महिन्यात सुरु करणार

- ५ वर्षात सागर मिशन अंतर्गत अभूतपूर्व संशोधनाचं लक्ष्य

- डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद

- समुद्र संशोधन करण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद

- देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये जल जीवन मिशन राबवण्यात येणार असून या - महत्त्वकांक्षी योजनेसाठी २.८७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती

- सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज; ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना

- उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १ कोटीने वाढवणार

- लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद

- लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणीची घोषणा

- देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती, त्यासाठी कायद्यात सुधारणा करणार

- सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीने स्किल ट्रेनिगवर काम सुरु

- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी १,१८,१०१ कोटींची तरतूद

- ३ वर्षात ५ लाख कोटींचा निधी उभारण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटशनची स्थापना करणार.

Budget 2021: निर्मला सीतारामण यांचं बजेट भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.  


▪️छोट्या करदात्यांसाठी डिस्प्युट रिझोल्युशन कमिटिची स्थापना


▪️कराशीसंबंधीत वाद सोडवण्यासाठी ही समिती मदत करणार


▪️कर चुकवणाऱ्यांसाठी पुन्हा केस रिओपन करणाऱ्यांना 6 वर्षाच्या कालावधिवरून 3 वर्षांचा कालावधि करण्यात येणार 


▪️75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आणि पेन्शनर असलेल्यांना ITRमधून सूट


▪️डायरेक्ट टॅक्स

कॉर्पोरेट टॅक्सचा दर कमी केला होता. 2014च्या तुलनेत ITR भरणाऱ्यांची संख्या अधिक 


▪️परवडणाऱ्या भाड्याच्या घरांसाठी असलेल्या स्कीममध्ये 1 वर्षाने वाढ


▪️परवडणारी घर बांधणाऱ्या बिल्डरसाठी टॅक्समध्ये 1 वर्षासाठी सूट


▪️परदेशी गुंतवणूकदारांनासुद्धा काही प्रमाणात TDSवर सूट 


▪️वयावसायिकांसाठी 5 कोटी उत्पन्न असणाऱ्यांनाच ऑडिट बंधनकारक


▪️कपनीला PF कापल्यानंतर कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करणं बंधनकारक


▪️PF कापला जातो पण खात्यावर जमा होत नसेल तर त्याचा लाभ कंपनीला मिळणार नाही


▪️लोखंड आणि स्टील स्वस्त होणार


▪️सोनं आणि चांदी स्वस्त होणार


▪️मोबाईल आणि चार्जर महागणार 


▪️मोबाईल पार्टमध्ये 0 कस्टम ड्युटी असलेल्यांना 2 टक्के लागणार


▪️GST- 80 न लागू होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द


▪️fy22 सीएसएक्स 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेईल


▪️वित्तीय वर्ष 22 मध्ये 6.8% वित्तीय तूट उद्दिष्ट


▪️आर्थिक वर्ष 21 मधील वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5% असेल


▪️करारासंदर्भात असलेला वाद सोडवण्यावर भर


▪️इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही


▪️आयकरात कोणताही बदल नाही


▪️२० वर्षापेक्षा जुनी वाहनं भंगारात काढणार


▪️नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रूपयांची घोषणा


▪️डिजिटल पेमेंटसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद


▪️भारतात पहिल्यांदा डिजिटल जनगणना होणार


▪️चहा व्यवसायिकांसाठी 1000 कोटींची तरतूद


▪️15 हजार शाळांना आदर्श शाळा बनवणार


▪️एग्रिकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड बनवला जाईल


▪️गरामीण विकासासाठी ४० हजार कोटी रूपये 


▪️शहरांसाठी जल जीवन मिशन सुरू 


▪️मासेमारी साठी ५ बंदर. फिशिंग हब बनेल


▪️अर्बन क्लीन इंडिया १.४१ कोटी


▪️माइक्रो इरेगेशन साठी ५ हजार कोटी 


▪️पतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी 64 हजार कोटींची तरतूद


▪️डिजिटल ट्रान्झाक्शन वाढवण्यासाठी मोदी सरकारचं एक पाऊल


▪️डिजिटल ट्रान्झाक्शनसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद


▪️उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करणार


▪️उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थींचा समावेश असेल 


▪️आदिवासी भागात ७५० एकलव्य शाळा उभारणार 


▪️कष कर्जासाठी मोदी सरकारनं 16.5 लाख कोटींची तरतूद- अर्थमंत्री


▪️100 सैनिकी शाळा देशभरात उघडल्या जाणार


▪️विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधांचा लाभ


▪️मजुरांसाठी विशेष पोर्टल लॉन्च करणार


▪️शतकरी आणि महिलांसाठी बजेटमध्ये महत्त्वाच्या तरतुदी


▪️शिक्षणासाठी मोठ्या घोषणा 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झालं.


▪️किमान आधारभूत किंमतपेक्षा दीडपट अधिक भाव देणार


▪️गव्हाच्या MSPमध्ये दीड पटीने वाढ, गहूचं पीक घेणाऱ्यांची संख्या वाढली


▪️१६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करणार


▪️शतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी 75 हजार कोटींची तरतूद


▪️शतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी MSPपेक्षा 1.5 पट अधिक किंमत देणार


▪️शती आणि त्याला पुरक व्यावसाय किंवा जोड व्यावसायांसाठी ही योजना देण्याचं लक्ष्य


▪️करेडिट पॉलिसमध्ये 16 टक्क्यांची वाढ


▪️या वर्षी एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार


▪️हमीभावात दीडपट वाढ करणार


▪️एअर इंडिया विकणार 


▪️सरकारी बँकांना २२ हजार कोटी रूपयांची मदत देणार


▪️#IDBI बँकेचा खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवणार


▪️नागपूर, नाशिक मेट्रोचा विस्तार6


▪️11,000 किलोमीटर महामार्गांचं काम पूर्ण, मार्च 2022पर्यंत 8500 किलोमीटर अंतराचे महामार्ग पूर्ण करण्यावर भर


▪️नागपूर मेट्रो फेज-2 आणि नाशिक मेट्रोसंदर्भात घोषणा


▪️टायर -2, टियर -3 शहरांमध्ये गॅस पाइपलाइनचा विस्तार केला जाईल. 2021-22 मध्ये 4.39 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य आहे


▪️दशात सध्या 702 किमी अंतराचं मेट्रोचं जाळं आहे. तर 1000 किमीपेक्षा अधिक किमी अंतराचं जाळं तयार करण्यावर भर


▪️शहरी भागांमध्ये मेट्रोच्या सुविधेसोबत बसची संख्या वाढवणार


▪️मट्रोचं जाळं वाढवण्यावर यापुढील काढात मोदी सरकारचा भर


▪️इन्फ्रा क्षेत्राला चालना देण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्स कंपन्यांवर 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


▪️35 हजार कोटींची कोरोना लशीसाठी तरतूद करण्यात आली आहे. 


▪️परत्येक वाहनाची तपासणी आणि चाचणी केली जाणार


चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


प्रश्न१) कोणत्या प्रदेशात पोंग धरण-तलाव आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) ल्हासा

(C) हिमाचल प्रदेश√√

(D) काठमांडू


प्रश्न२) कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय रोखे आयोग संघटना (IOSCO) आहे?

(A) दिल्ली

(B) माद्रिद√√

(C) पॅरिस

(D) बेसेल


प्रश्न३) कोणत्या सेवेसाठी “मिस कॉल सुविधा” सुरू करण्यात आली आहे?

(A) कार विषयक नोंदणी

(B) भूमी विषयक नोंदणी

(C) एलपीजी टाकी भरण्याविषयक नोंदणी√√

(D) यापैकी नाही


प्रश्न४) कोणत्या देशाने ‘राष्ट्रगीत’मधल्या शब्दामध्ये बदल केला?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) ऑस्ट्रेलिया√√


प्रश्न५) कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचा स्थापना दिन साजरा केला जातो?

(A) 30 डिसेंबर

(B) 31 डिसेंबर

(C) 01 जानेवारी√√

(D) 02 जानेवारी


प्रश्न६) कोणत्या व्यक्तीने भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला?

(A) शशांक प्रिया

(B) पुनीत कंसल

(C) हरिनंद राय

(D) सोमा मोंडल√√


प्रश्न७) कोणत्या अनुसूचित भारतीय उद्योग महासंघाने (CII) ‘पर्यटन’ क्षेत्राचा समावेश करण्याची मागणी केली आहे?

(A) पाचवी

(B) सहावी

(C) चौथी

(D) सातवी√√


प्रश्न८) कोणत्या राज्यात भारतातले पहिले परागणकर्ता उद्यान आहे?

(A) जम्मू व काश्मीर

(B) उत्तराखंड√√

(C) हिमाचल प्रदेश

(D) पंजाब


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश सरकारच्यावतीने ‘तानसेन सन्मान 2020’ देण्यात आला?

(A) शिव कुमार शर्मा

(B) हरिप्रसाद चौरसिया

(C) झाकीर हुसेन

(D) पं. सतीश व्यास√√


प्रश्न१०) कोणती व्यक्ती ‘त्रावणकोर रेडिओ’ची प्रथम इंग्रजी बातमीदार होती?

(A) शुभा जोशी

(B) इंदिरा जोसेफ वेन्नीयूर√√

(C) उत्तरा केळकर

(D) यापैकी नाही


TOPPER9 चालूघडामोडी, [01.02.21 09:45]

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे 


▪️दिनांक :- ०२/०१/२०२१


🔘माहिती संकलन :- Amar chavan


प्रश्न१) ‘आशा-भारत’ योजनेचे पूर्ण नाव काय आहे?

(A) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(B) अॅम्प्लिफाइड सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(C) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अॅक्सेलेरेटर√√

(D) यापैकी नाही


प्रश्न२) कोणत्या राज्यात ‘दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान’ आहे?

(A) मणीपूर

(B) मिझोरम

(C) आसाम√√

(D) त्रिपुरा


प्रश्न३) कोणत्या राज्यात पारादीप बंदर आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) अंदमान

(C) ओडिशा√√

(D) तामिळनाडू


प्रश्न४) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात√√

(D) आंध्रप्रदेश


प्रश्न५) कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?

(A) इटानगर

(B) लेह√√

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता


प्रश्न६) ‘इन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?

(A) न्यायमूर्ती राजिंदर सचार√√

(B) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

(C) न्यायमूर्ती उदय यू. ललित

(D) न्यायमूर्ती अशोक भूषण


प्रश्न७) विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?

(A) आकाश-एनजी

(B) करंज-जी

(C) कलवरी-जी

(D) सहायक-एनजी√√


प्रश्न८) कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?

(A) महेश कृष्णमूर्ती

(B) निरंजन बनोडकर√√

(C) अतुल भेडा

(D) सुनील मेहता


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीची "ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन" या संस्थेच्या GAVI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?

(A) अमित शाह

(B) राजनाथ सिंग

(C) डॉ. हर्ष वर्धन√√

(D) यापैकी नाही


प्रश्न१०) कोणत्या मंत्रालयाने “डिजिटल ओशन” अॅप तयार केले?

(A) पृथ्वी विज्ञान मंत्रालय√√

(B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(C) रसायन व खते मंत्रालय

(D) यापैकी नाही


प्रश्न२१) कोणती व्यक्ती महापौर पदाची जबाबदारी स्वीकारणारी देशातली सर्वात तरुण व्यक्ती ठरली?

(A) आदित्य के.

(B) कांती पईकरा

(C) आर्या राजेंद्रन√√

(D) भार्नेश्वरी निर्मलकर


प्रश्न२२) कोणत्या तारखेला पहिला ‘आंतरराष्ट्रीय महामारी सज्जता दिन’ साजरा करण्यात आला?

(A) ३०डिसेंबर २०२०

(B) २९ डिसेंबर २०२०

(C) २८ डिसेंबर २०२०

(D) २७ डिसेंबर २०२०√√


प्रश्न२३) ‘पेडलंदरिकी इल्लू’ योजना कश्यासंबंधी आहे?

(A) सर्व गरीबांसाठी घरे(आंध्रप्रदेश)√√

(B) पहिल्या दोन बाळांच्या जन्मासाठी स्त्रियांना ४००० रुपयांचे रोख अनुदान

(C) योगदान-आधारित निवृत्तीवेतन प्रणाली

(D) वार्षिक १२ रुपयांच्या प्रीमियमसह अपघाती विमा


प्रश्न२४) कोणत्या प्रदेशात ‘भसन चर’ बेट आहे?

(A) बांगलादेश√√

(B) अंदमान

(C) निकोबार

(D) श्रीलंका


प्रश्न२५) अलीकडेच निधन झालेले सुनील कोठारी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते?

(A) शास्त्रीय गायक

(B) वैज्ञानिक

(C) नृत्य-इतिहासकार√√

(D) पत्रकार


प्रश्न२६) कोणत्या संस्थेनी “न्युमोसील” या ब्रांड खाली स्वदेशी लस विकसित केली?

(A) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया√√

(B) इंडियन असोसिएशन फॉर मेडिकल इन्फॉर्मेटिक्स

(C) AIIMS नवी दिल्ली

(D) भारतीय आरोग्य व्यवस्थापन संशोधन संस्था


प्रश्न२७) कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले?

(A) दिल्ली√√

(B) बंगळुरू

(C) कोलकाता

(D) चेन्नई


प्रश्न२८) कोणती व्यक्ती 'सुत्रनिवेदनाची सूत्रा – एक अणभव' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(A) ए. कृष्ण राव

(B) डॉ. रूपा च्यारी√√

(C) श्रीपाद नाईक

(D) यापैकी नाही


प्रश्न२९) कोणत्या शहरात थोबल बहुउद्देशीय प्रकल्प आहे?

(A) कोहिमा

(B) दिसपूर

(C) इम्फाळ√√

(D) आगरतळा


प्रश्न३०) कोणती कंपनी घन-इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?

(A) कोलिन्स एरोस्पेस

(B) एनआरसी एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(C) स्कायरूट एरोस्पेस√√

(D) स्कंद एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड


प्रश्न३१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?

(A) सुनील अरोरा

(B) ओम प्रकाश रावत

(C) अचल कुमार ज्योती

(D) उमेश सिन्हा✅


प्रश्न३२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?

(A) त्रिपुरा

(B) सिक्किम

(C) मेघालय

(D) नागालँड✅


प्रश्न३३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.

(A) पोलीस श्वान✅

(B) पोलीस घोडे

(C) पोलीस उंट

(D) यापैकी नाही


प्रश्न३४) कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?

(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी

(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती

(C) कर्नल नरेंद्र✅

(D) मेजर हेमंत राज


प्रश्न३५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात✅

(D) आंध्रप्रदेश


प्रश्न३६) कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?

(A) एम. व्यंकय्या नायडू

(B) ए. कृष्ण राव✅

(C) A आणि B

(D) यापैकी नाही


प्रश्न३७) ‘राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021’ याचा विषय काय होता?

(A) अॅडव्हांसेस इन मेट्रोलॉजी

(B) मेट्रोलॉजी फॉर द ग्रोथ ऑफ द नेशन

(C) मेट्रोलॉजी फॉर द इन्क्लूसिव ग्रोथ ऑफ द नेशन✅

(D) यापैकी नाही


प्रश्न३८) कोणत्या संस्थेनी “कोची-मंगळुरू वायू पाईपलाईन प्रकल्प” तयार केला?

(A) NTPC लिमिटेड

(B) भारतीय पोलाद प्राधिकरण

(C) GAIL (इंडिया) लिमिटेड✅

(D) ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन


प्रश्न३९) कोणत्या व्यक्तीची दिल्ली सरकारने स्थापना केलेल्या ‘तामिळ अकादमी’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली?

(A) एन. राजा✅

(B) सेनगोट्टीयन के. ए.

(C) पी. थांगमणी

(D) एस. पी. वेलुमानी


प्रश्न४०) कोणता देश 2023 सालापर्यंत लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार?

(A) भारत

(B) जपान✅

(C) चीन

(D) रशिया


प्रश्न४१) कोणत्या चक्रीवादळामुळे डिसेंबर 2020 या महिन्याच्या शेवटी फिजी देशाचे मोठे नुकसान झाले?

(A) लुसी चक्रीवादळ

(B) उला चक्रीवादळ

(C) दमण चक्रीवादळ

(D) यासा चक्रीवादळ✅


प्रश्न४२) _ आणि _ या राज्यांच्या सीमेवर ‘दजूको खोरे’ आहे.

(A) नागालँड आणि मणीपूर✅

(B) नागालँड आणि मिझोरम

(C) मणीपूर आणि त्रिपुरा

(D) यापैकी नाही


प्रश्न४३) कोणत्या दिवशी ‘जागतिक ब्रेल दिन’ साजरा करतात?

(A) 1 जानेवारी

(B) 3 जानेवारी

(C) 5 जानेवारी

(D) 4 जानेवारी✅


प्रश्न४४) कोणत्या देशाने फाशीची शिक्षा रद्द केली?

(A) बेलारूस

(B) कझाकस्तान✅

(C) ताजिकिस्तान

(D) चीन


प्रश्न४५) नव्या विधेयकानुसार, केंद्रीय सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्याचे वय किती निश्चित केले आहे?

(A) 18 वर्ष

(B) 25 वर्ष

(C) 24 वर्ष

(D) 21 वर्ष✅


प्रश्न४६) कोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या ‘मानवी हक्क कक्ष’चे प्रथम प्रमुख म्हणून नेमणूक झाली?

(A) जनरल बिपिन रावत

(B) लेफ्टनंट जनरल सतिंदर कुमार सैनी

(C) मेजर जनरल गौतम चौहान✅

(D) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग


प्रश्न४७) कोणत्या देशात हिमयुगात अस्तित्वात असलेल्या ‘लोकरीने आच्छादित असलेला गेंडा’ याचे अवशेष सापडले?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) रशिया✅

(D) चीन


प्रश्न४८) कोणत्या व्यक्तीने आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची जागा घेतली?

(A) पोनी मा हुआटेंग

(B) जॅक मा

(C) अनिल अंबानी

(D) झोंग शांशां✅


प्रश्न४९) चीनच्या पहिल्या मंगळ मोहीमेचे नाव काय आहे?

(A) झेंगहे

(B) तियानवेन-1✅

(C) शेनझोऊ

(D) चांग’ए प्रोजेक्ट


प्रश्न५०) कोणत्या मंत्रालयाने 'उद्योग मंथन' कार्यक्रमाचे आयोजन केले?

(A) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(B) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

(D) वाणिज्य व उद्योग मंत्रालय✅


प्रश्न५१) तांदळाचा तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणत्या देशाने अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच भारताकडून तांदूळ खरेदी करण्यात सुरुवात केली?

(A) चीन

(B) व्हिएतनाम✅

(C) मलेशिया

(D) थायलँड


प्रश्न५२) खालीलपैकी कोणते विधान ‘राज्यपाल’ पदाविषयी अचूक नाही आहे?

(A) राज्यपालाचे नामांकन केंद्र सरकार देते.

(B) राज्यपाल राज्याचा नाममात्र कार्यकारी प्रमुख असतो.

(C) कार्यालयाच्या कार्यकाळात संसदेकडून राज्यपालाचे वेतन कमी केले जाऊ शकते.✅

(D) राज्य महाधिवक्ता पदाची याची नियुक्ती राज्यपाल करतात.


प्रश्न५३) कोणता देश ‘आफ्रिकेचे शिंग’ याचा भाग नाही?

(A) इरिट्रिया

(B) सोमालिया

(C) जिबूती

(D)सर्व ‘आफ्रिकेचे शिंग’चे भाग आहेत✅


प्रश्न५४) कोणत्या संस्थेनी ‘स्वस्थ वायु’ नामक व्हेंटिलेटर यंत्र तयार केले?

(A) CSIR-NAL✅

(B) CSIR-CEERI

(C) CSIR-CDRI

(D) CSIR-CCMB


प्रश्न५५) कोणती संस्था ‘कामधेनू गौविज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा’ घेणार आहे?

(A) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)

(B) राष्ट्रीय कामधेनू आयोग (RKA)✅

(C) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)

(D) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)


प्रश्न५६) IUCN संस्थेनी कोणत्या गटात ‘भारतीय खवल्या मांजर’ जातीला समाविष्ट केले आहे?

(A) माहितीची कमतरता

(B) धोक्यात येण्याच्या जवळपास

(C) संकटात असलेली✅

(D) असुरक्षित


प्रश्न५७) कोणत्या राज्यात ‘किसान सूर्योदय योजना’ राबविली जात आहे?

(A) झारखंड

(B) उत्तरप्रदेश

(C) हिमाचल प्रदेश

(D) गुजरात✅


प्रश्न५८) कोणत्या नदीवर भारत पाण्यावर तरंगणारा जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणार आहे?

(A) गोदावरी

(B) कृष्णा

(C) नर्मदा✅

(D) तापी


प्रश्न५९) कोणत्या राज्यात ‘ट्रायफूड पार्क’ उभारण्यासाठी TRIFED आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला?

(A) मध्यप्रदेश✅

(B) आसाम

(C) उत्तरप्रदेश

(D) कर्नाटक


प्रश्न६०) कोणत्या व्यक्तीची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली?

(A) पी. आर. व्ही. राजा

(B) भारत सिंग चौहान

(C) डी. व्ही. सुंदर

(D) संजय कपूर✅


प्रश्न६१) चटरगाला बोगदा _ या ठिकाणांना जोडतो.

(A) कठुआ आणि दोडा✅

(B) जम्मू आणि बारामुल्ला

(C) राजौरी आणि कुपवाडा

(D) कठुआ आणि उधमपूर


प्रश्न६२) जानेवारी 2021 मध्ये चर्चेत आलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?

(A) इन्फ्लूएंझा टाइप-बी विषाणू

(B) व्हॅरिसेला-झोस्टर विषाणू

(C) इन्फ्लूएंझा टाइप-ए विषाणू✅

(D) एचएसव्ही-2


प्रश्न६३) __ या ठिकाणांना जोडणारी जगातली पहिली डबल स्टॅक लाँग हल 1.5 किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत झाली.

(A) कोटा आणि अंबाला

(B) अजमेर आणि फरीदाबाद

(C) जोधपूर आणि गुडगाव

(D) अटेली आणि किशनगड✅


प्रश्न६४) 'नवी दिल्ली स्कूल बॅग’ धोरणानुसार, स्कूल बॅगचे वजन किती असावे?

(A) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे

(B) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे✅

(C) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 18 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे

(D) विद्यार्थ्याच्या शारीरिक वजनाच्या 16 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे


प्रश्न६५) कोणत्या संस्थेनी ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट’ अहवाल प्रसिद्ध केला?

(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

(B) जागतिक व्यापार संघटना

(C) जागतिक बँक✅

(D) युनेस्को


प्रश्न६६) कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तींचे AI-आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले?

(A) हार्वर्ड विद्यापीठ

(B) कॅंब्रिज विद्यापीठ

(C) स्टॅनफोर्ड विद्यापीठ

(D) ऑक्सफोर्ड विद्यापीठ✅


प्रश्न६७) कोणत्या देशासोबत भारताने "विशिष्ट कौशल्य कामगार" संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला?

(A) जपान✅

(B) चीन

(C) अमेरिका

(D) रशिया


प्रश्न६८) कोणती बँक RBI कडून लघु वित्त बँकेचा परवाना मिळविणारी भारतातली पहिली शहरी सहकारी बँक ठरली?

(A) राजकोट सहकारी बँक मर्यादित

(B) शिवालिक मर्केंटाईल सहकारी बँक✅

(C) राजानगर सहकारी बँक मर्यादित, बेंगळुरू

(D) पालमूर सहकारी अर्बन बँक मर्यादित


प्रश्न६९) कोणत्या देशासोबत भारताने मध्यम-श्रेणीच्या पृष्ठभाग-ते-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (MRSAM) संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली?

(A) रशिया

(B) जर्मनी

(C) जपान

(D) इस्त्रायल✅


प्रश्न७०) कोणती व्यक्ती ‘अयोध्या’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(A) माधव भंडारी✅

(B) देवेंद्र फडणवीस

(C) उद्धव ठाकरे

(D) भागवत सिंह कोश्यारी


प्रश्न७१) ‘जम्मू व काश्मिर IDS २०२१’ या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे?

(A) दिव्यांग व्यक्तींना मदत

(B) माजी सैनिकांसाठी योजना

(C) हातमाग विणकरांना वर्धित विमा संरक्षण

(D) रोजगार निर्मिती✅


प्रश्न७२) ‘राइट अंडर युवर नोज’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

(A) आर. गिरीधरन✅

(B) शक्तीकांत दास

(C) रघुराम रंजन

(D) उर्जित पटेल


प्रश्न७३) कोणत्या व्यक्तीने अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला?

(A) व्यंकटरामन रामकृष्णन

(B) राज अय्यर✅

(C) अभिजित बॅनर्जी

(D) मंजुल भार्गव


प्रश्न७४) कोणत्या देशाने ‘फतह-1’ नामक स्वदेशी विकसित अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली?

(A) तुर्कमेनिस्तान

(B) अफगाणिस्तान

(C) पाकिस्तान✅

(D) उझबेकिस्तान


प्रश्न७५) अमेरिकेची ‘कॅपिटोल हिल’ इमारत कश्यासाठी ओळखली जाते?

(A) अमेरिका संघ सरकारच्या विधानसभेचे बैठकीचे स्थळ✅

(B) सत्ताधारी सरकारचे आसन

(C) संयुक्त राज्ये अमेरिका देशातल्या सर्वात मोठ्या विभागाची प्रशासकीय इमारत

(D) यापैकी नाही


प्रश्न७६) कोणती संस्था दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे?

(A) भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण

(B) दूरसंचार विभाग✅

(C) माहिती व प्रसारण मंत्रालय

(D) भारतीय रोखे व विनिमय मंडळ


प्रश्न७७) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार पक्ष सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीला त्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी नाही?

(A) आठवी अनुसूची

(B) सहावी अनुसूची

(C) दहावी अनुसूची✅

(D) पाचवी अनुसूची


प्रश्न७८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “LASI WAVE-1 इंडिया रीपोर्ट” या अहवालाच्या शीर्षकामधील “LASI” या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे?

(A) लॅटिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(B) लेबर एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(C) लेबलिंग एजिंग स्टडी ऑफ इंडिया

(D) लोंजिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया✅


प्रश्न७९) जी. किशन रेड्डी समिती _ याच्याशी संबंधित आहे.

(A) नगरपालिकेच्या कर्ज रोख्यांच्या विकासाशी संबंधित धोरणात्मक बाबींविषयी सल्ला देणे

(B) लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचे रक्षण करणे✅

(C) अ-वैयक्तिक महितीशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करणे

(D) यापैकी नाही


प्रश्न८०) ‘काराकल’ हे काय आहे?

(A) मांजर✅

(B) सरडा

(C) फूल

(D) हत्ती


प्रश्न८१) खालीलपैकी कोणते शहर ‘सुवर्ण चतुर्भुज’ प्रकल्पाद्वारे जोडले जाणार नाही?

(A) दिल्ली

(B) अहमदाबाद✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


प्रश्न८२) कोणत्या देशाला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘कंट्री इन फोकस’ म्हणून घोषित केले गेले आहे?

(A) बांगलादेश✅

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) नेपाळ


प्रश्न८३) कोणत्या संस्थेने इब्रमपूर, वेलिंग आणि पर्रा या गावांमध्ये ‘मेरा गांव मेरा गौरव’ उपक्रमाच्या अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला?

(A) केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था

(B) राष्ट्रीय अॅटलस संघटना

(C) भारतीय कृषी संशोधन परिषद✅

(D) विज्ञान प्रसार


प्रश्न८४) कोणत्या संवर्गात जम्मू व काश्मिर अधिकाऱ्यांचा संवर्ग विलीन झाला आहे?

(A) झारखंड

(B) उत्तरप्रदेश

(C) गुजरात

(D) AGMUT✅


प्रश्न८५) कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करतात?

(A) स्वामी विवेकानंद✅

(B) महात्मा गांधी

(C) सारडा देवी

(D) अरबिंदो घोष


प्रश्न८६) अमेरिकेकडून दिला जाणारा H-1B व्हिसा ____ याच्याशी संबंधित आहे.

(A) प्रवेश व्हिसा

(B) विशिष्ट व्यवसायात पदवीधर कामगारांची नोकरी✅

(C) इतर राष्ट्रांच्या राजदूतांना दिला जाणारा व्हिसा

(D) यापैकी नाही


प्रश्न८७) आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे?

(A) मेसियर 87

(B) मिल्की वे

(C) सेगीटेरियस ए*✅

(D) एस2


प्रश्न८८) कोणता भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे?

(A) दुगोंग

(B) घडियाल

(C) ब्लूफिन ट्यूना

(D) गंगा नदी डॉल्फिन✅


प्रश्न८९) केन-बेटवा जोड प्रकल्प कशाशी संबंधित आहे?

(A) नदी जोड प्रकल्प✅

(B) स्वदेश दर्शन

(C) उडान योजना

(D) प्रधानमंत्री वंदना योजना


प्रश्न९०) कोणत्या राज्यात ‘कलरीपयट्टू’ हा युद्धकलेचा प्रकार प्रसिद्ध आहे?

(A) आंध्रप्रदेश

(B) कर्नाटक

(C) तामिळनाडू

(D) केरळ✅


प्रश्न९१) चर्चेत असलेले ‘पार्लर’ हे काय आहे?

(अ) जॉर्डनच्या सीमेवरील एक ठिकाण

(ब) पक्ष्याची नवीन जात

(क) कोविड-१९ वरचे औषध

(ड) एक सोशल नेटवर्क व्यासपीठ✅


प्रश्न९२) कोणत्या मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड (NEVF)’ याची स्थापना केली?

(अ) वित्त मंत्रालय

(ब) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय✅

(क) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय

(ड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय


प्रश्न९३) वेस्ट बँक या भूपरिवेष्टित प्रदेशाला कोणत्या समुद्राची सीमा लागलेली आहे?

(अ) काळा समुद्र

(ब) लाल समुद्र

(क) मृत समुद्र✅

(ड) यापैकी नाही


प्रश्न९४) भारतात २६/११च्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी कोणती कवायत आयोजित करण्यात येते?

(अ) इंद्र नाव्ह

(ब) सी व्हिजिल✅

(क) मलबार

(ड) नसीम अल बहर


प्रश्न९५) कोणता देश ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२१’ याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?

(अ) सिंगापूर

(ब) दक्षिण कोरिया

(क) भारत

(ड) जपान✅


प्रश्न९६) कोणती व्यक्ती “द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

(अ) व्ही. एस. संपत

(ब) एच. एस. ब्रह्मा

(क) एस. वाय. कुरैशी✅

(ड) ओ. पी. रावत


प्रहन९७) कोणत्या संघटनेने क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली?

(अ) म्हैस व्यापारी कल्याण संघटना✅

(ब) रेड पॉव्ज रेस्क्यू

(क) संजय गांधी अ‍ॅनिमल केअर सेंटर

(ड) स्ट्रे रिलीफ अँड अ‍ॅनिमल वेलफेअर (STRAW) इंडिया


प्रश्न९८) UAPA कायद्याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

(अ) UAPA याचा अर्थ ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक अधिनियम’ असा आहे.

(ब) UAPA अंतर्गत भारतीय आणि विदेशी अश्या दोन्ही नागरिकांवर आरोप केला जाऊ शकतो.

(क) हा कायदा 1967 साली लागू झाला.

(ड) सर्व विधाने अचूक आहेत.✅


प्रश्न९९) कोणती व्यक्ती जगातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलेल्या महिला वैमानिकांच्या चमूचा भाग नव्हती?

(अ) कॅप्टन सुनीता ठाकूर✅

(ब) कॅप्टन झोया अग्रवाल

(क) कॅप्टन थनमाई पापगरी

(ड) कॅप्टन आकांक्षा सोनवणे


प्रश्न१००) कोणत्या अंतराळ संस्थेने “स्पेस लॉंच सिस्टम” या नावाचा अग्निबाण तयार केला?

(अ) ISRO

(ब) रोसकॉसमॉस

(क) CNSA

(ड) NASA✅


प्रश्न१०१) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?

उत्तर :- निकोलाई स्नेसारेव


प्रश्न१०२) कोणती व्यक्ती वर्तमानात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आहे?

उत्तर :- अजित डोवाल


प्रश्न१०३) कोणत्या देशात लेणीमध्ये चित्रित केलेले जगातले सर्वात प्राचीन ज्ञात भित्तिचित्र शोधले गेले?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न१०४) कोणत्या अंतराळ संस्थेने ‘पार्कर’ नामक सौरयान तयार केले आहे?

उत्तर :- नासा


प्रश्न१०५) कोणत्या मंत्रालयाला ‘स्कॉच चॅलेंजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर :- आदिवासी विकास मंत्रालय


प्रश्न१०६) कोणत्या व्यक्तीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?

उत्तर :- दुष्यंत दवे


प्रश्न१०७) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीने आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला?

उत्तर :- फायनॅनष्यल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स


प्रश्न१०८) कोणत्या व्यक्तीची इंटेल कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली?

उत्तर :- पॅट जेलसिंगर


प्रश्न१०९) भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमान्वये ‘सुओ मोतू’च्या अधिकाराची तरतूद आहे?

उत्तर :- कलम 32 आणि कलम 226


प्रश्न११०) कोणत्या देशात ‘सुलावेसी बेट’ आहे?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न१११) केवडिया हे गुजरातच्या _ जिल्ह्यामधले एक शहर आहे.

उत्तर :- नर्मदा जिल्हा


प्रश्न११२) कोणत्या व्यक्तीला प्रतिष्ठित "चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन" सन्मान देण्यात आला?

उत्तर :- अमरेश कुमार चौधरी


प्रश्न११३) उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांचे निधन झाले, ते _ घरान्यातले होते.

उत्तर :- रामपूर-सहसवान घराना


प्रश्न११४) “आर्टेमिस 1” ही एक _ मोहीम आहे.

उत्तर :- चंद्र


प्रश्न११५) CRPF आणि DRDO या संस्थांनी तयार केलेल्या ‘दुचाकी रुग्णवाहिका’चे नाव काय आहे?

उत्तर :- रक्षिता


प्रश्न११६) किती वर्षानंतर प्रथमच, २०२१ साली पॅलेस्टाईनमध्ये राष्ट्रीय निवडणुका घेतल्या जाणार आहेत?

उत्तर :- चौदा


प्रश्न११७) कोणत्या मंत्रालयाने ‘हरित व स्वच्छ ऊर्जा’ विषयक जनजागृती करण्यासाठी ‘सक्षम’ मोहीम आयोजित केली?

उत्तर :- पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय


प्रश्न११८) कोणत्या बँकेने निरोगीपणा या विषयावर आधारित क्रेडिट कार्ड प्रस्तुत करण्यासाठी ‘आदित्य बिर्ला वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत करार केला?

उत्तर :- येस बँक


प्रश्न११९) कोणत्या व्यक्तीची २०२१ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद (UNHRC) याच्या अध्यक्ष पदावर निवड झाली?

उत्तर :- नजात शमीम खान


प्रश्न१२०) कोणत्या संस्थेने ‘डॉपलर वेदर रडार’ तयार केले?

उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड


TOPPER9 चालूघडामोडी, [01.02.21 09:45]

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे 


▪️दिनांक :- २०/०१/२०२१


🔘माहिती संकलन :- Amar chavan


प्रश्न१२१) कोणत्या शहरात विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय आहे?

उत्तर :- कॅलिफोर्निया


प्रश्न१२२) कोणत्या देशात ‘सेमेरू ज्वालामुखी’ आहे?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न१२३) कोणत्या कवीच्या स्मृतीत बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ उभारले जात आहे?

उत्तर :- बसवेश्वरा


प्रश्न१२४) जल्लीकट्टू  हा खेळ कोणत्या राज्यात खेळण्यात येतो ?

उत्तर :- तामिळनाडू


प्रश्न१२५) कोणत्या संस्थेने ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ तयार केले? Topper9 चालू घडामोडी

उत्तर :- नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया


प्रश्न१२६) कोणत्या राज्यात ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण आहे?

उत्तर :- पंजाब


प्रश्न१२७) कोणत्या राज्यात ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र आहे?

उत्तर :- पश्चिम बंगाल


प्रश्न१२८) 'नागी-नक्ती पक्षी अभयारण्य’ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचे नाव काय आहे?

उत्तर :- कलरव


प्रश्न१२९) कोणत्या साली आफ्रिका खंडात ‘ग्रेट ग्रीन वॉल’ नामक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली?

उत्तर :- २००७


प्रश्न१३०) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?

उत्तर :- निकोलाई स्नेसारेव


प्रश्न१३१) ‘एक्स-डेझर्ट नाइट-२१’ ही भारत आणि _ या देशांच्या हवाई दलांची हवाई कवायत आहे.

उत्तर :- फ्रांस


प्रश्न१३२) कोणती व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या पथप्रदर्शनात भाग घेणारी प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरणार आहे?

उत्तर :- भावना कांत


प्रश्न१३३) 'त्रिशूल’ पर्वत कुठे आहे?

उत्तर :- उत्तराखंड, भारत


प्रश्न१३४) कोणत्या राज्यात ‘ओर्वाकल विमानतळ’ आहे?

उत्तर :- आंध्रप्रदेश


प्रश्न१३५) कोणत्या नेत्याची जयंती जयंती “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे?

उत्तर :- सुभाषचंद्र बोस


प्रश्न१३६) कोणत्या देशात ‘सक्करा’ नामक ठिकाण आहे?

उत्तर :- इजिप्त


प्रश्न१३७) कोणत्या राज्यात ‘वन स्कूल वन IAS’ योजना राबवली जात आहे?

उत्तर :- केरळ


प्रश्न१३८) 'डिजिटल रिव्होल्यूशन स्कोरकार्ड २०२०’ याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

उत्तर :- चौथा


प्रश्न१३९) कोणत्या दिवशी ‘भारतीय लष्कर / भुदल दिन’ साजरा करतात?

उत्तर :- १५ जानेवारी


प्रश्न१४०) कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान भारतातली प्रथम ‘हवाई टॅक्सी’ सेवा आरंभ करण्यात आली आहे?

उत्तर :-  गुरुग्राम आणि कर्नाल


प्रश्न१५१) कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- पियुष गोयल


प्रश्न१५२)  कोणती बँक “टू बिग टू फेल” यादीत समाविष्ट करण्यात आली आहे?

उत्तर :- भारतीय स्टेट बँक,आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक


प्रश्न१५३) कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे?

उत्तर :- कर्नाटक


प्रश्न१५४) कोणत्या व्यक्तीची किर्गिजस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली?

उत्तर :- सादीर झापारोव्ह


प्रश्न१५५) कोणत्या दिवशी भारतीय सशस्त्र दलांचा ‘माजी सैनिक दिन’ साजरा करतात?

उत्तर :-  14 जानेवारी


प्रश्न१५६) कोणत्या मंत्रालयाने पाचव्या राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा केली?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


प्रश्न१५७) कोणती व्यक्ती डिजिटल कर्ज सेवांचे नियमन करण्यासाठी RBIने नेमलेल्या कार्य गटाचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- सौरव सिन्हा


प्रश्न१५८) कोणत्या संस्थेने ‘तेजस’ नामक हलके लढाऊ विमान तयार केले?

उत्तर :- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


प्रश्न१५९) कोणत्या देशात “विलियूचिन्स्की धबधबा” आहे?

उत्तर :- रशिया


प्रश्न१६०) कोणत्या काळात ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2021’ पाळला गेला?

उत्तर :- 18 जानेवारी - 17 फेब्रुवारी


प्रश्न१४१) ‘रीसा’ कापड हा हाताने विणलेला पारंपारिक कापड आहे, ज्याचा उपयोग _ राज्यातला आदिवासी समुदाय करतो.

उत्तर :- त्रिपुरा


प्रश्न१४२) __ येथे भारतीय सैन्य ‘एक्झरसाइज कवच’ ही संयुक्त सैन्य कवायत आयोजित करणार आहे.

उत्तर :- अंदमान समुद्र ,बंगालचा उपसागर


प्रश्न१४३) कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री बागायत विकास अभियान” जाहीर केले?

उत्तर :- गुजरात


प्रश्न१४४) कोणत्या कंपनी मदतीने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारतात ‘क्वांटम कंप्युटिंग अॅप्लिकेशन्स प्रयोगशाळा’ उभारणार आहे?

उत्तर :- अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस


प्रश्न१४५) कोणत्या राज्यात ‘नामरूप’ गाव आहे?

उत्तर :- आसाम


प्रश्न१४६) कोणत्या संस्थेने ‘स्मार्ट अॅंटी एअरफिल्ड वेपन’ (SAAW) विकसित केले आहे?

उत्तर :- DRDO


प्रश्न१४७) ‘सॅल्वेटोर मुंडी’ हे शीर्षक असलेले चित्र _ यांनी काढले आहे.

उत्तर :- लिओनार्डो दा विंची


प्रश्न१४८) कोणत्या नावाखाली ‘ड्रॅगन फ्रूट’चे पेटंट घेण्यासाठी गुजरात सरकारने अर्ज केला?

उत्तर :- कमलम


प्रश्न१४९) कोणत्या देशांनी 2021 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतला मतदानाचा हक्क गमावला आहे?

उत्तर :- इराण, नायजर,दक्षिण सुदान, झिम्बाब्वे,कांगो ब्राझाव्हिल, लिबिया


प्रश्न१५०) कोणत्या रेलगाडीचे नाव बदलून ‘नेताजी एक्सप्रेस’ असे ठेवण्यात आले?

उत्तर :-  हावडा-कालका मेल


प्रश्न१६१) जोयमोती कोनवारी ही कोणत्या राजघराण्याची राजकन्या होती?

उत्तर :- अहोम साम्राज्य


प्रश्न१६२) कोणत्या कवीने लिहिलेल्या कवितासंग्रहाचे इंग्रजीत “नॉट मेनी, बट वन” या शीर्षकाखाली अनुवाद करण्यात आले आहे?

उत्तर :- श्री नारायण गुरु


प्रश्न१६३) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021’ प्रसिद्ध केला?

उत्तर :- जागतिक आर्थिक मंच (WEF)


प्रश्न१६४) कोणत्या राज्यात नागौर-गंगानगर खोरे आहे?

उत्तर :- राजस्थान


प्रश्न१६५) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले?

उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय


प्रश्न१६६) टायटन (शनी ग्रहाचा चंद्र) यावरील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव काय आहे?

उत्तर :- क्रेकन मेर


प्रश्न१६७) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात भारतातल्या सर्वात दीर्घ कमानी रस्ता-पूलाचे उद्घाटन झाले?

उत्तर :- मेघालय


प्रश्न१६८) कोणत्या भारतीय उपग्रहाने ‘मिल्की वे’ आकाशगंगेमध्ये दुर्मिळ असे उष्ण अतिनील-चमकदार तारे शोधले?

उत्तर :- अ‍ॅस्ट्रोसॅट


प्रश्न१६९) कोणत्या राज्यात नवा थलतेज-शिलाज-रणचरदा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात आला?

उत्तर :-  गुजरात


प्रश्न१७०) ‘लाँगऑप्स / LongOps’ प्रकल्प हा __ या देशांचा एक संयुक्त उपक्रम आहे.

उत्तर :- ब्रिटन आणि जपान


प्रश्न१७१) कोणत्या ठिकाणी ‘MeerKAT रेडिओ दुर्बिण’ आहे?

उत्तर :- दक्षिण आफ्रिकेचा उत्तर केप


प्रश्न१७२) कोणत्या सैन्य दलाने भारतात “सर्द हवा” मोहीम राबविण्यास सुरुवात केली?

उत्तर :-  सीमा सुरक्षा दल


प्रश्न१७३) 'विश्वाचे गुंजन’ नामक विशिष्ट ध्वनी मृत ताऱ्याच्या एका प्रकारापासून प्रक्षेपित होतो, ज्याला _ असे म्हणतात.

उत्तर :- पल्सर


प्रश्न१७४) कोणत्या तारखेला नवा अण्वस्त्रे बंदी करार संपूर्णपणे लागू झाला?

उत्तर :- 22 जानेवारी 2021


प्रश्न१७५) कोणत्या राज्य सरकारने ‘अवलोकन’ सॉफ्टवेअर तयार केले?

उत्तर :- कर्नाटक


प्रश्न१७६) कोणत्या संस्थेत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची नवी पद्धत विकसित करनेत आली आहे?

उत्तर :- CSIR-केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर


प्रश्न१७७) ‘WASP-107b’ हे काय आहे?

उत्तर :-  बाह्य-ग्रह


प्रश्न१७८) कोणता यूरोपमधला सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे?

उत्तर :- फ्रान्सिस्को पिझारो प्रोजेक्ट


प्रश्न१७९) नवीन ‘स्टार्ट’ करार हा _ या देशांमध्ये झालेला एक करार आहे.

उत्तर :- रशिया आणि अमेरिका


प्रश्न१८०) नव्याने सापडलेली ‘ऊसेरेया जोशी’ ही जात कोणत्या प्रजातीची आहे?

उत्तर :-  मुंगी


प्रश्न१८१) कोणत्या अंतराळ संस्थेने एकाच अग्निबाणाने १४३ उपग्रह प्रक्षेपित करून ISRO संस्थेचा विक्रम मोडीत नवीन जागतिक विक्रम रचला?

उत्तर :- स्पेसएक्स


प्रश्न१८२) कोणता देश अमेरिकेला मागे टाकत २०२० साली प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीचा (FDI) सर्वाधिक प्राप्तकर्ता ठरला आहे?

उत्तर :- चीन


प्रश्न१८३) कोणत्या राज्याने मुलींसाठी ‘पंख अभियान’ची सुरुवात केली?

उत्तर :- मध्यप्रदेश


प्रश्न१८४) कोणत्या व्यक्तीची पोर्तुगाल देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली?

उत्तर :- मार्सेलो रेबेलो डी सूसा


प्रश्न१८५) कोणता पुरस्कार अपवादात्मक यशासाठी १८ वर्ष वयोगटाखालील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे?

उत्तर :- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार


प्रश्न१८६) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा करतात?

उत्तर:- २४ जानेवारी


प्रश्न१८७) कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिन साजरा करतात?

उत्तर :-  २५ जानेवारी


प्रश्न१८८) कोणत्या प्रदेशात “ॲम्फेक्स-२१” नामक संयुक्त त्रि-सेवा कवायत झाली?

उत्तर :- अंदमान व निकोबार बेटसमूह


प्रश्न१८९) कोणते लढाऊ विमानांसाठी द्रुतगती मार्गांवर दोन हवाईपट्ट्या असलेले पहिले राज्य / केंद्रशासित प्रदेश आहे?

उत्तर :- उत्तरप्रदेश


प्रश्न१९०) जर्मनवॉच संस्थेच्या ‘जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

उत्तर :- ७


प्रश्न१९१) कोणती व्यक्ती एस्टोनिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?

उत्तर :- काजा कलास


प्रश्न१९२) "जारोसाइट" हे एक _ आहे.

उत्तर :- खनिज


प्रश्न१९३) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन २०२१’ साजरा करण्यात आला?

उत्तर :- २६ जानेवारी


प्रश्न१९४) कोणता देश ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020)’ याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर :- न्यूझीलँड,डेन्मार्क


प्रश्न१९५) कोणत्या शहरात ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरम’ची बैठक आयोजित केली जाते?

उत्तर :- रियाध


प्रश्न१९६) कोणत्या मंत्रालयाच्या कार्यकक्षेत नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) ही संस्था येते?

उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


प्रश्न१९७) कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय आहे?

उत्तर :- पॅरिस


प्रश्न१९८) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘कला उत्सव’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो?

उत्तर :-  मनुष्यबळ विकास मंत्रालय


प्रश्न१९९) ऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या ‘कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स’ या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

उत्तर :- ८६


प्रश्न२००) कोणत्या देशात ‘मेरापी पर्वत’ आहे?

उत्तर :- इंडोनेशिया


प्रश्न२०१) कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे?

उत्तर :-  हुगळी नदी


प्रश्न२०२) कोणती आकाशगंगा “लॉस्ट गॅलक्सी” म्हणून ओळखली जाते?

उत्तर :- एनजीसी 4535


प्रश्न२०३) कोणत्या संस्थेने अंदमानमध्ये सेवेत आणलेली विजेरी बस विकसित केली आहे?

उत्तर :- NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड


प्रश्न२०४) कोणते देशातच विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले लढाऊ-बॉम्बर विमान आहे?

उत्तर :- HAL HF-24 मारुत


प्रश्न२०५) कोणत्या संस्थेने “बर्ड्स ऑफ द सुंदरबन बायोस्फीअर रिझर्व” या शीर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध केली?

उत्तर :- भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग


प्रश्न२०६) कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले?

उत्तर :- IG देव राज शर्मा


प्रश्न२०७) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ आखण्याचा प्रस्ताव दिला आहे?

उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय


प्रश्न२०८) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 25 जानेवारी


प्रश्न२०९) कोणत्या मंत्रालयाने ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर :-  पर्यटन मंत्रालय


प्रश्न२१०) कोणत्या व्यक्तीला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :- बिश्वजित चटर्जी


प्रश्न२११) कोणत्या देशामध्ये लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प आहे?

उत्तर :- नेपाळ


प्रश्न२१२) EIU संस्थेच्या ‘एशिया-पॅसिफिक पर्सनलाइज्ड हेल्थ इंडेक्स २०२१’ याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

उत्तर :- १० वा


प्रश्न२१३) कोणती व्यक्ती आशियाई क्रिकेट परिषद (ACC) याचे नवे अध्यक्ष आहे?

उत्तर :- जय शाह


प्रश्न२१४) भारतीय नौदलाची IN FAC T- ८१ ही युद्धनौका सेवेतून हटविण्यात आली आहे; ती कोणत्या श्रेणीतली नौका आहे?

उत्तर :- सुपर ड्वोरा MK II


प्रश्न२१५) कोणत्या कंपनीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट जिंकले?

उत्तर :-  लार्सन अँड टुब्रो


प्रश्न२१६) कोणत्या व्यक्तीची आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी पदावर नेमणूक झाली?

उत्तर :- आर. एस. शर्मा


प्रश्न२१७) कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करतात?

उत्तर :- जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार


प्रश्न२१८) कोणत्या भारतीय व्यक्तीच्या स्मृतीत ३० जानेवारी हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळला जातो.

उत्तर :- मोहनदास करमचंद गांधी


प्रश्न२१९) २०२१ साली कोणत्या दिवशी ‘थाईपुसम उत्सव’ साजरा करण्यात आला?

उत्तर :- २८ जानेवारी


प्रश्न२२०) कोणत्या देशाने ‘जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अॅक्शन (JCPOA)’ या करारावर स्वाक्षरी केलेली नाही?

उत्तर :- भारत


चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे



प्रश्न२०१) कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे?

उत्तर :-  हुगळी नदी


प्रश्न२०२) कोणती आकाशगंगा “लॉस्ट गॅलक्सी” म्हणून ओळखली जाते?

उत्तर :- एनजीसी 4535


प्रश्न२०३) कोणत्या संस्थेने अंदमानमध्ये सेवेत आणलेली विजेरी बस विकसित केली आहे?

उत्तर :- NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड


प्रश्न२०४) कोणते देशातच विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले लढाऊ-बॉम्बर विमान आहे?

उत्तर :- HAL HF-24 मारुत


प्रश्न२०५) कोणत्या संस्थेने “बर्ड्स ऑफ द सुंदरबन बायोस्फीअर रिझर्व” या शीर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध केली?

उत्तर :- भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग


प्रश्न२०६) कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले?

उत्तर :- IG देव राज शर्मा


प्रश्न२०७) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ आखण्याचा प्रस्ताव दिला आहे?

उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय


प्रश्न२०८) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 25 जानेवारी


प्रश्न२०९) कोणत्या मंत्रालयाने ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर :-  पर्यटन मंत्रालय


प्रश्न२१०) कोणत्या व्यक्तीला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :- बिश्वजित चटर्जी


Current affairs 2020 in Marathi



 :  91 वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला? 

(अ) बाओ

(ब) रोमा 

(क) ग्रीन बुक ✔️✔️

(ड) स्कीन


:  ' अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट '  या ग्रंथाचे लेखक कोण? 

(अ) कॅरोलिन क्रायडो पेरेझ 

(ब) केविन ओरार्की  ✔️✔️

(क) जेस्पर रॉईन

(ड) थॉमस पिकेटी 


 :  ______ हे सिंगल टाईटल जिंकणारे पहिले पुरुष खेळाडू बनले आहे? 

(अ) जिमी कोनर्स (107 )✔️✔️

(ब) रॉजर फेडरर  (100)

(क) आंद्रे आगासी 

(ड) राफेल नदाल 


 :  ______ हे सिंगल टाईटल जिंकणारी पहिली महिला खेळाडू बनलीआहे? 

(अ) सिमोना हॅलेप 

(ब) नाओमी ओसाका 

(क) सेरेना विलियम्स 

(ड) मार्टिना नवरातिलोवा (167)✔️✔️


  IIC अंडर- 19 क्रिकेट वर्ल्ड कप - 2019 स्पर्धा कोठे पार पडल्या? 

(अ) द. आफ्रिका 

(ब) ऑस्ट्रेलिया 

(क) भारत  

(ड) वेस्ट इंडिज 



 : IIC अंडर- 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कोणत्या देशांनी सर्वात जास्त ते सर्वात कमी वेळा विश्वचषक जिंकला तो पर्याय निवडा? 

(अ) ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश

(ब) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांग्लादेश ✔️✔️

(क) भारत, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, पाकिस्तान

(ड) भारत, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान

आज एमपीएससी मुंबई ला वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.



1) यावर्षी होणाऱ्या सर्व परिक्ष्यांच्या प्रश्नपत्रिका ह्या जुन्याच असणार आहेत.


2) सध्यातरी या वर्षीची मुख्य परीक्षा ऑनलाइन नाही.


3) PSI  physical या वर्षी qualify नाही.पुढच्या वार्षिसाठी विचार सुरू. मराठा आरक्षण विषयात सुस्पष्टता नंतर PSI physical.


4) engg sevices mains exam  online होऊ शकते.


5) MPSC -CSAT पुढच्या वर्षीसाठी  qualify बद्दल चर्चा सुरू आहे. यावर्षी CSAT आहे.

6) Engg services Interview, MPSC सदस्य कमी असल्यामुळे थांबलेले आहेत. सदस्य भरती नंतर लवकर सुरू होतील.

विद्यार्थ्यांनी GD की Intetview याबाबत MPSC ला mail द्वारे लवकर  कळवावे जेणेकरून MPSC ला निर्णय घेण्यास सोफ होईल


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...