Sunday 8 March 2020

प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठीचे प्रयत्न


- 1974 चा जल (प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण) कायदा
- 1977 चा जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) उपकर कायदा
- 1981 चा हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा
- 1986 चे पर्यावरण (संरक्षण) नियम
- 1986 चा पर्यावरण (संरक्षण) कायदा
- 1989 चे घातक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम
- राष्ट्रीय पर्यावरण न्यायाधिकरण कायदा 1995
- रासायनिक अपघात (आणीबाणी, नियोजन, तयारी आणि प्रतिसाद) 1996 चे नियम
- 1998 चा जैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम
- पुनर्प्रक्रिया केलेले प्लास्टिक उत्पादन आणि वापर नियम 1999
- ओझोन कमी करणारे पदार्थ (नियमन) 2000 चे नियम
- ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) 2000 चे नियम
- नगरपालिका घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) चे नियम 2000
- बॅटरी (व्यवस्थापन आणि हाताळणी) 2001 चे नियम.
- महाराष्ट्र बायो-डिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) अध्यादेश 2006
- 2006 ची पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना. 

कोरोनावर रामबाण औषध सापडले; 'जन्मदात्या' चीनचाच दावा

🔴ठळक मुद्दे

📌 इटलीहून आलेले 16 पर्यटक यामध्ये आहेत. त्यांच्या तब्बल 216 जण संपर्कात आले होते.
📌 आज कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने पेटीएम कंपनीलाही टाळे ठोकावे लागले आहे.
📌 यामुळे हा व्हायरस भारतभर पसरण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे

📌 चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने पेटीएम कंपनीलाही टाळे ठोकावे लागले आहे. तर या जिवघेण्या व्हायरसचे उगमस्थान असलेल्या चीननेच रामबाण औषध शोधल्याचा दावा केला आहे. लवकरच या औषधाचे वितरण करण्यात येणार असल्याचेही चीनने म्हटले आहे.

📌 कोरोना व्हायरसमुळे जगभरातील जवळपास 50 हून अधिक देश त्रस्त झाले आहेत. भारतातही गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण आढळू लागले आहेत. इटलीहून आलेले 16 पर्यटक यामध्ये आहेत. त्यांच्या तब्बल 216 जण संपर्कात आले होते. यामुळे हा व्हायरस भारतभर पसरण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, चीनने त्रस्त झालेल्या जगाला आनंदाची बातमी दिली आहे.

📌 चीनने कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा केला आहे. हे औषध चीनी सैन्याच्या त्याच मेजर जनरलच्या टीमने शोधले आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी सार्स आणि इबोलासारख्या खतरनाक व्हायरसवर औषध शोधले होते. या औषधाच्या शोधामुळे त्याने जगाला मोठ्या संकटापासून वाचविले होते. आता पुन्हा असा चमत्कार होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

📌 गेल्या महिन्याभरापासून चीनी सैन्याची एक वैद्यकीय टीम कोरोना व्हायरसवर लस शोधण्याच्या कामी लागली होती. पिपल्स लिबरेशन आर्मीचे वैद्यकीय तज्ज्ञ शेन वेई यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यातय येत होते. चायना सेंट्रल टेलिव्हिजनने याचे वृत्त दिले आहे. वेई यांच्या टीमने कोरोनावर लस शोधण्यात यश मिळविले आहे.

▪️याच संशोधकाने जगाला दोनदा वाचविले

📌53 वर्षांच्या वेई यांनी सांगितले की, त्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत होती. याच टीमने 2002 मध्ये सार्स आणि 2014 मध्ये इबोला सारख्या भयंकर व्हायरसवर लस शोधली होती. त्यांच्या टीमने मिलिट्री मेडिकल सायन्स अकादमीसोबत मिळून हा शोध लावला आहे.
या अकादमीमध्ये 26 तज्ज्ञ, 50 हून अधिक वैज्ञानिक आणि 500 हून जास्त अनुभवी वैद्यकीय अधिकारी काम करतात. ही लस लवकरच उपचारासाठी उपलब्ध करण्याचा दावा चीनने केला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये 1.4.2020 पासून विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

🔱1.4.2020 पासून सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार.
 
🔱पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे 4 बँकांमध्ये विलिनीकरण करायला मंजुरी दिली. यामध्ये

🌀ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण

🌀सिंडीकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण

🌀आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण

🌀अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलिनीकरण

🌀1 एप्रिल 2020 पासून हे विलिनीकरण केले  जाईल.

🔱यातून सार्वजनिक क्षेत्रातील सात मोठ्या बँकांची निर्मिती होईल ज्यांची राष्ट्रीय व्याप्ती मोठी असेल आणि एकत्रित व्यवसाय आठ लाख कोटी रुपये इतका असेल. या व्यापक विलिनीकरणामुळे जागतिक बँकांशी तुलना करता येईल आणि देशात तसेच परदेशात स्पर्धा करायची प्रभावी क्षमता असलेल्या बँकांची निर्मिती करता येईल.

🔱 या विलिनीकरणामुळे खर्चात बचत होईल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका भारतीय बँकिंग व्यवस्थापनेत स्पर्धात्मकता आणि सकारात्मकतेचा प्रभाव पाडू शकतील.
या विलिनीकरणामुळे बँकांना मोठ्या प्रमाणावर कर्जे देता येऊ शकतील.

🔱विलिनीकरण केलेल्या सर्व बँकांमध्ये सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केल्यास बचत होईल तसेच जोखीम व्यवस्थापनात सुधारणा होईल. व्याप्ती वाढल्यामुळे वित्तीय समावेशकतेच्या उद्दिष्टाला चालना मिळेल.

🔱सर्व बँकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास मोठा डेटाबेस मिळेल आणि बँका वेगाने डिजिटल होतील आणि स्पर्धेचा लाभ उठवू शकतील.
 

बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय

🔰 कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू या शहरात प्रेस्टीज फाल्कन टॉवर्स या ठिकाणी “म्यूजियम ऑफ इंडियन पेपर मनी” या बँकनोटांच्या संग्रहालयाचे उद्घाटन उद्योजक रेझवान रझाक ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हे देशातले द्वितीय तर दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय आहे. पहिल्या संग्रहालयाची भारतीय रिझर्व्ह बँकेनी मुंबईत स्थापना केलेली आहे.

🔴सग्रहालयाची वैशिष्ट्ये

🔰 ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ असा संदेश मिळाला होता अश्या स्वातंत्र्यपूर्व युगात चलनात असलेल्या नोटा, ‘जय तेलंगणा’ या राजकीय संदेशाला अनुसरून असलेल्या नोटा, 1000 रुपयांची नोट अश्या सर्व बँकनोटांचा समावेश या नव्या संग्रहालयात करण्यात आला आहे.

🔰 ब्रिटीश राजवटीआधीच देशात विकसित झालेल्या कागदी नोटांनी भरलेल्या या संग्रहालयात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतल्या 700 हून अधिक कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.

🔰 सर्वात जुनी नोट म्हणजे 1812 साली प्रसिद्ध झालेली नोट होय. तसेच पोर्तुगीज सरकारने गोव्यामध्ये 1924 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रु. 50 आणि रु. 500 इतके मूल्य असलेल्या नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत.

🔰 तिथे 10,000 रुपये इतके उच्च मूल्य असलेली पूर्वीची नोट देखील प्रदर्शनात ठेवली गेली आहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

औरंगाबाद विमानतळाचं नामांतर

👉औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्यात आलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचं नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तशी माहिती दिली आहे.

👉त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

👉यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

👉दरम्यान, मार्च २०१९मध्ये तत्कालिन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी केली होती. त्या आधी २०११मध्येही विधानसभेत या नामकरणाचा अशासकीय ठराव आला होता. या नामांतरासाठी वायकरांनी पाठपुरावाही केला होता.

2 नवीन राज्यांची नोंद किंवा स्थापना

संसद कायद्यानुसार यथायोग्य अटी व शर्तींवर युनियनमध्ये नवीन राज्ये स्थापन किंवा प्रस्थापित करू शकते.

. 2 अ [ सिक्कीम केंद्रीय संबद्ध करणे.] - संविधान (Cttiswan सुधारणा) अधिनियम, 1975 च्या कलम 5 (सह 26-4-l975) रद्द. 

New. नवीन राज्ये तयार करणे आणि विद्यमान राज्यांची नावे, हद्दी किंवा नावे बदलणे - संसद, कायद्यानुसार-

(अ) त्याचे राज्य एका राज्यापासून विभक्त करून किंवा दोन किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचा भाग एकत्र करून किंवा एखाद्या प्रदेशाच्या एखाद्या भागासह एकत्र करून नवीन राज्य तयार करा;

(ब) राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे;

(क) एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करा;

(ड) एखाद्या राज्याची सीमा बदलणे;

()) राज्याचे नाव बदलू शकते:

[परंतु या हेतूसाठी, कोणतेही विधेयक राष्ट्रपतींच्या सूचनेशिवाय नसेल आणि विधेयकातील समाविष्ट करण्याच्या अंमलबजावणीचा प्रभाव [ the ] क्षेत्राच्या सीमा, किंवा कोणत्याही राज्याच्या नावावर असेल, जोपर्यंत त्या राज्याच्या विधिमंडळाने मान्यता दिली नाही.) परंतु विधेयक सूचनांमध्ये निर्दिष्ट केलेल्या मुदतीत किंवा राष्ट्रपतींनी परवानगी दिलेल्या अशा अतिरिक्त कालावधीत जाहीर करावे हे राष्ट्रपतींनी निर्देशित केलेले नाही आणि म्हणूनच निर्दिष्ट किंवा परवानगी कालावधी संपला नाही, तो कोणत्याही संसदेच्या सभागृहात सादर केला जाणार नाही. 
स्पष्टीकरण १- या लेखाच्या कलम (अ) च्या कलम (इ) मध्ये, राज्याखालील एक केंद्र शासित प्रदेश आहे, परंतु (अ) राज्याखालील केंद्र शासित प्रदेश नाही. 
स्पष्टीकरण २- कलम (अ) द्वारे संसदेत प्रदान केलेल्या अधिकाराखाली नवीन राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश कोणत्याही इतर राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशात विलीन करायचा आहे.

Article. पहिल्या अनुसूची आणि चौथ्या वेळापत्रकात दुरुस्ती करण्यासाठी आणि पूरक, प्रसंगोपयोगी आणि परिणामी बाबींची तरतूद करण्यासाठी कलम २ आणि कलम under अंतर्गत बनविलेले कायदे.

Current Affairs - 09/03/2020

1)भारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?
(A) 6 जानेवारी
(B) 7 जानेवारी.  √
(C) 5 जानेवारी
(D) 8 जानेवारी

2)भारतीय रिझर्व्ह बँकेनी 5 मार्च 2020 रोजी कोणत्या बँकेचे व्यवहार एका महिन्यासाठी मर्यादित केले?
(A) येस बँक.  √
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बंधन बँक
(D) AU स्मॉल फायनान्स बँक

3)कोणत्या वर्षी नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने ईशान्य क्षेत्र मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड’ याची स्थापना केली?
(A) 2014
(B) 2015
(C) 2016
(D) 2017.  √

4)‘फ्रिडम हाऊस’ या संस्थेच्या “फ्रीडम इन द वर्ल्ड 2020’ अहवालातल्या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?
(A) 81
(B) 83.  √
(C) 84
(D) 80

5)2020 साली 'बेंगळुरू इंडिया नॅनो' या परिषदेची कितवी आवृत्ती संपन्न झाली?
(A) 14 वी
(B) 13 वी
(C) 12 वी
(D) 11 वी.  √

6)भारतीय रेल्वेच्या कोणत्या जुन्या रेलगाडीला नवे रूप दिले जाणार आहे?
(A) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स
(B) लाईफलाईन एक्सप्रेस
(C) डेक्कन क्वीन एक्सप्रेस.  √
(D) द गोल्डन चॅरियट

7)“प्रज्ञान परिषद 2020” याच्या पहिल्या सत्राचा विषय काय होता?
(A) ट्रान्सफॉर्मेशन इन द बॅटल स्पेसेस.  √
(B) ट्रान्सफॉर्मेशन इन द आर्मी
(C) इनोव्हेशन इन द बॅटल स्पेसेस
(D) इनोव्हेशन अँड आर्मी

8)1 एप्रिल 2020 पासून कोणत्या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन होणार?
(A) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि बंधन बँक
(B) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया.  √
(C) आंध्र बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया
(D) आंध्र बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया

9)कोणत्या राज्य सरकारने उच्च शिक्षणासाठी कर्जासाठी हमी देण्याची घोषणा केली आहे?
(A) आंध्रप्रदेश
(B) हरयाणा.  √
(C) छत्तीसगड
(D) उत्तराखंड

10)बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची किरकोळ किंमत मर्यादित करण्याचे आदेश ___ राज्य सरकारने दिले.
(A) आंध्रप्रदेश
(B) केरळ.  √
(C) छत्तीसगड
(D) उत्तराखंड

T-20 ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी


◾️ ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद मिळवले

🏆🔰 वनडे वल्ड कप-🔰

◾️ महिला वनडे वर्ल्ड कपला १९७३ साली सुरूवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ११ वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आहेत.

◾️यापैकी सर्वाधिक विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवली आहेत.

◾️ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कपची ६ विजेतेपद मिळवली आहेत.

◾️सर्व प्रथम त्यांनी
📌१९७८ साली दुसऱ्या वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते.
📌 त्यानंतर १९८२ आणि
📌१९८८ अशी सलग तीन विजेतेपद मिळवून ऑस्ट्रेलियाने हॅटट्रिक केली.

🔰 सर्वाधिक विजेतेपदाबाबत ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडचा क्रमांक लागतो.

◾️ त्यांनी १९७८, १९८२, १९८८, १९९७ आणि २००७ अशी चार वेळा तर

◾️न्यूझीलंडने २००० मध्ये एकदा विजेतेपद मिळवले आहे. 

🏆🔰 टी-२० वर्ल्ड कप 🔰

आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची सुरूवात २००९ मध्ये झाली.

◾️तेव्हापासून आतापर्यंत ७ वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आहेत.

◾️त्यापैकी ५ वेळा ऑस्ट्रेलियाने चषक उंचावला आहे. यावरून ऑस्ट्रेलिया संघाची टी-२० वर्ल्ड कपमधील मक्तेदारी दिसून येते.

◾️ ऑस्ट्रलियानंतर इंग्लंडने (२००९) आणि

◾️ वेस्ट इंडिजने (२०१६) प्रत्येकी एकवेळा टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भूगोल महत्त्वाचे प्रश्नसंच

1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?
   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.
   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.
   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.
   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर :- 1

2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?
   1) समभूज त्रिकोण    2) काटकोन त्रिकोण   
  3) सरळ रेषा      4) वरीलपैकी कोणतीही  नाही
उत्तर :- 2

3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.
   अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.    ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
   क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.    ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
   1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) फक्त क
उत्तर :- 3

4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
   1) जोग    2) नायगारा    3) कपिलधारा    4) शिवसमुद्र
उत्तर :- 1

5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
   1) वाघ      2) हत्ती      3) सिंह      4) गेंडा
उत्तर :- 3

1) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.
   1) रावी    2) बियास    3) चिनाब    4) व्यास
उत्तर :- 3

2) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.
   1) महानदी    2) सोन      3) सुवर्णरेखा    4) गंगा
उत्तर :- 3

3) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
   1) दिल्ली ते आग्रा    2) मुंबई ते ठाणे
   3) हावडा ते खडकपूर    4) चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर :- 2

4) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र    4) ओरिसा
उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?
   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.
   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.
   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.
   4) वरील कोणतेही नाही.
उत्तर :- 4

1) 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण .....................% आहे.
   1) 76.88%    2) 88.76%    3) 71.42%    4) 42.71%
उत्तर :- 1

2) प्रकाशामध्ये (दृश्य)........................ असतात.
   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी
   2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी
   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी
   4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी
उत्तर :- 1

3) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण
उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?
   1) बॅक्टेरिया      2) निमॅटोडस्‍   
   3) ॲक्टीनोमायसेटस्‍    4) फंगी
उत्तर :- 2

5) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................. असते.
   1) 470 W/m²      2) 770 W/m²     
   3) 1170 W/m²      4) 1370 W/m²
उत्तर :- 4

1) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन आणि पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान    2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन        4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?
   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक
   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार
उत्तर :- 1

3) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस
   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा डायव्हिंग – तारकर्ली
उत्तर :- 3

4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
   1) सह्याद्री    2) सातपुडा   
   3) मेळघाट    4) सातमाळा
उत्तर :- 2

5) 1 जुलै 1998 रोजी ..................... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
   1) उस्मानाबाद    2) धुळे     
   3) परभणी    4) भंडारा
उत्तर :- 2

विज्ञान प्रश्नसंच

1) इथीनच्या रेणुसूत्रामध्ये दोन कार्बन बंधांमधील अंतर ...................... एवढे असते.
   1) 121 पिकोमीटर    2) 130 पिकोमीटर   
   3) 133 पिकोमीटर    4) 135 पिकोमीटर
उत्तर :- 3

2) खालीलपैकी कोणते शैवाल आयोडीन बनवण्यासाठी उपयुक्त आहे.
   अ) लेमिनेरिया    ब) फ्युकस    क) एकलोनिया    ड) सर्व
   1) अ, क    2) ब, क      3) अ, ब      4) ड
उत्तर :- 4

3) अ) अल्केनमध्ये कार्बन – कार्बन बंध लांबी 154 पिकोमीटर असते.
    ब) अल्कीनमध्ये त्यापेक्षा कमी असते.
   1) अ बरोबर, ब चूक    2) अ चूक, ब बरोबर
   3) अ व ब दोन्ही बरोबर    4) अ व ब दोन्ही चूक
उत्तर :- 3

4) खालीलपैकी आलूचा खाण्यायोग्य भाग कोणता ?
   1) जड      2) कलिका    3) फल      4) तना
उत्तर :- 2

5) गर्भनिरोधक गोळयांमध्ये कशाचा वापर करतात ?
   1) अल्केन    2) अल्कीन    3) अल्काईन    4) विवृत्त गट
उत्तर :- 3

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

1. सनदी कायदा 1813
2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
6. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
7. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
8. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
9. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
10. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
11. सार्जंट योजना (1944)
12. राधाकृष्णन आयोग (1948)
13. कोठारी आयोग (1964)

कुपोषणमुक्त भारत तयार करण्याच्या उद्देशाने “सुपोषित माँ अभियान”

🔰 भारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “सुपोषित माँ अभियान” राबविण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला ह्यांच्या हस्ते या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थानच्या कोटा या शहरात करण्यात आले.

🔰 या मोहिमेद्वारे किशोरवयीन मुली आणि देशातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार प्राप्त व्हावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भावी पिढ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

🔴 योजनेचे स्वरूप

🔰 कार्यक्रमाच्या प्रारंभीक टप्प्यात 1 महिना आणि 12 दिवस या कालावधीत 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार दि जाणार आणि आवश्यक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी यासारख्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार सरकार उचलणार आहे.

🔰 गहू, हरभरा, मका, बाजरीचे पीठ, गूळ, डाळी, मसूर, तूप, शेंगदाणे, तांदूळ आणि खजूर इ. पौष्टिक वस्तू प्रत्येक कुटुंबातल्या एका गर्भवती महिलेस देण्यात येणार.

🔰 उद्घाटनाला 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार असलेल्या 17 किलोग्राम इतक्या वजनाच्या अन्न पदार्थांचे 1000 संच वितरित करण्यात आले.

जागतिक महिला दिन 8 मार्च

◾️जगभरात ८ मार्चला मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

◾️ महिलांच्याप्रती आदर, सन्मान व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

🔰 जगातील पहिला महिला दिन

◾️सर्वात पहिल्यांदा १९०९ मध्ये 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.

◾️मात्र १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरू केली. तेव्हापासून याला अधिकृत जागतिक मान्यता मिळाली.

◾️महिला दिनाची पहिली थीम 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर' अशी होती

◾️ इतिहासात १९७५ हे साल 'रेड लेटर इअर' म्हणून पाहिले जाते. कारण याच वर्षी युनायटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर १९७६ ते १९८५ हे महिलांचे दशक म्हणून ओळखले जावू लागले.

🔰मार्च हा महिना 'वुमन्स हिस्ट्री मंथ

◾️अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०११ मध्ये मार्च हा महिना 'वुमन्स हिस्ट्री मंथ' (Women's History Month) असल्याचे घोषित केले.

🔰जागतिक महिला दिन आणि जांभळा रंगाचे कनेक्शन काय ?

◾️ जांभळ्या रंगाकडे Gender Equality म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.

🔰भारतातील महिला दिन

◾️भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला.

🔰यंदाच्या महिला दिनाची थीम काय?

◾️१९९६ पासून महिला दिन एका थीमसह सातत्याने साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे यंदाच्या महिला दिनाची थीम 📌'I am Generation Equality: Realizing Women's Rights' म्हणजेच मला जनरेशन समानता आणि महिलांच्या अधिकारांची जाणीव आहे. या थीमसह यंदाचा महिला दिन जगभरात साजरा करण्यात येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...