Sunday 8 March 2020

भूगोल महत्त्वाचे प्रश्नसंच

1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?
   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.
   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.
   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.
   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर :- 1

2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?
   1) समभूज त्रिकोण    2) काटकोन त्रिकोण   
  3) सरळ रेषा      4) वरीलपैकी कोणतीही  नाही
उत्तर :- 2

3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.
   अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.    ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
   क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.    ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
   1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) फक्त क
उत्तर :- 3

4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
   1) जोग    2) नायगारा    3) कपिलधारा    4) शिवसमुद्र
उत्तर :- 1

5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
   1) वाघ      2) हत्ती      3) सिंह      4) गेंडा
उत्तर :- 3

1) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.
   1) रावी    2) बियास    3) चिनाब    4) व्यास
उत्तर :- 3

2) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.
   1) महानदी    2) सोन      3) सुवर्णरेखा    4) गंगा
उत्तर :- 3

3) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
   1) दिल्ली ते आग्रा    2) मुंबई ते ठाणे
   3) हावडा ते खडकपूर    4) चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर :- 2

4) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र    4) ओरिसा
उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?
   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.
   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.
   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.
   4) वरील कोणतेही नाही.
उत्तर :- 4

1) 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण .....................% आहे.
   1) 76.88%    2) 88.76%    3) 71.42%    4) 42.71%
उत्तर :- 1

2) प्रकाशामध्ये (दृश्य)........................ असतात.
   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी
   2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी
   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी
   4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी
उत्तर :- 1

3) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण
उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?
   1) बॅक्टेरिया      2) निमॅटोडस्‍   
   3) ॲक्टीनोमायसेटस्‍    4) फंगी
उत्तर :- 2

5) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................. असते.
   1) 470 W/m²      2) 770 W/m²     
   3) 1170 W/m²      4) 1370 W/m²
उत्तर :- 4

1) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन आणि पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान    2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन        4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?
   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक
   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार
उत्तर :- 1

3) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस
   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा डायव्हिंग – तारकर्ली
उत्तर :- 3

4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
   1) सह्याद्री    2) सातपुडा   
   3) मेळघाट    4) सातमाळा
उत्तर :- 2

5) 1 जुलै 1998 रोजी ..................... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
   1) उस्मानाबाद    2) धुळे     
   3) परभणी    4) भंडारा
उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...