Sunday 8 March 2020

येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध

👉YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

👉तर या बँकेवर कर्जाचा बोजा चांगलाच वाढल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. तसेच ग्राहकांना खात्यातून 50 हजार रुपयेच काढता येतील  असंही RBI नं म्हटलं आहे.तसेच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

👉खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे.खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या या YES बँकेवर 30 दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...