Monday 20 February 2023

राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🟣1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🟣2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🟣3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🟣4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🟣5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🟣6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🟣7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🟣8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🟣9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🟣10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

विज्ञान प्रश्नसंच.

 खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 
⚫️ चाल☑️
 गती
 त्वरण 
_________________________________

 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन
⚫️ हॅड्रोजन
 कार्बन डायऑक्साईड☑️
 नायट्रोजन
_________________________________

 न्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️संवेग☑️
⚫️बल
त्वरण
घडण

 कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा
⚫️बिटा
गॅमा☑️
क्ष-किरण
_________________________________

 रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मेलॅनिन
⚫️इन्शुलिन☑️
यकृत
कॅल्शियाम
_________________________________

  मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रंग तयार करणे
⚫️विद्युत रोधक म्हणून☑️
विद्युत सुवाहक म्हणून 
वरील सर्व कारणांसाठी 
_________________________________

 धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️
⚫️मायका
मोरचुद
कॉपर टिन
_________________________________

 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी
⚫️लहान☑️
दुप्पट
तिप्पट
_________________________________

 वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते
⚫️निमपट होत
चौपट होते
दुप्पट होते ☑️
_________________________________

 ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .
⚪️स्थायू 
⚫️द्रव
वायू
निर्वात प्रदेश ☑️
_____________________________________

जिल्हापरिषद.

🧩जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:

🅾जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

🧩रचना :-

🅾प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

🧩सभासद संख्या -

🅾प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

🧩सभासदांची निवडणूक -

🅾प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

🧩पात्रता (सभासदांची) -

🅾जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

🧩आरक्षण :

🅾1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

🅾तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

🧩कार्यकाल :

🅾5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

🧩अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

🅾जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

🧩कार्यकाल :

🅾अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

🧩राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे
2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

🧩मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-
अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

🧩बैठक :

🅾जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

🅾मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

🦋 🦋 🦋  🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋  🦋

mPassport Police App: पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी फक्त 5 दिवसात.



🔸कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या कॉन्सुलर, पासपोर्ट आणि व्हिसा विभागाद्वारे विकसित केलेले “mPassport पोलिस अॅप, दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या कर्मचार्‍यांना 350 टॅब्लेटसह आणले जात आहे . 


🔹हे कर्मचारी पासपोर्ट अर्जदारांच्या पूर्ववर्तींच्या पडताळणीसाठी जबाबदार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने विकसित केलेल्या आणि नवी दिल्लीत आणलेल्या नवीन अॅपमुळे पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणीसाठीचा वेळ पाच दिवसांपर्यंत कमी होईल आणि प्रक्रियेचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल. 


🔸नवी डिजिटल सेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांच्या 76 व्या स्थापना दिवस परेडमध्ये सुरू केली.




▪️प्रसिद्ध यक्षगान गायक आणि पटकथा लेखक बलिपा नारायण भागवत यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. 


▪️त्यांनी गायनाच्या एका अनोख्या शैलीत प्रभुत्व मिळवले होते, त्यामुळे चाहत्यांनी याला ‘बलिपा स्टाईल’ असे नाव दिले आहे. 


▪️आवाजाने समृद्ध असलेल्या भागवतांनी 30 हून अधिक यक्षगान ‘प्रसंग’ (लिप्या) लिहिल्या आहेत.


कोल्लम जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी 2021-22 ची स्वराज ट्रॉफी जिंकली.

  



▪️कोल्लम जिल्हा पंचायतीने 2021-22 आर्थिक वर्षासाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीची स्वराज ट्रॉफी जिंकली आहे. 


▪️या क्रमवारीत कन्नूर जिल्हा पंचायत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


▪️कोल्लम जिल्हा, भारताच्या केरळ राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी एक आहे. 


▪️जिल्ह्यामध्ये केरळच्या नैसर्गिक गुणधर्मांचा क्रॉस-सेक्शन आहे.


Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...