Thursday 27 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २७ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२७ जून २०१९ .

● २७ जून : Micro - Small & Medium-Sized Enterprises Day

● २९ जून : International Day Of The Tropics 

● संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीतील अस्थायी सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचा पाठिंबा

● रॉ च्या प्रमुखपदी सामंत गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे

● इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी अरविंद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली

● पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेसाठी जपानमध्ये दाखल

● भारतीय संघ ताज्या वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने न्युझीलंडला ६ गडी राखून पराभूत केले

● निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना २ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली

● २८ ते ३० जून दरम्यान १२ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार

● गोवा मराठी चित्रपट महोत्सवातर्फे दिला जाणारा कृतज्ञता पुरस्कार सुमित्रा भावे यांना जाहीर

● ६९ व्या महाराष्ट्र राज्य सीनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले

● क्रोएशियाच्या मारिजा बुरीक यांची युरोप परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

● टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजनेत ४ तिरंदाजांचा समावेश करण्यात आला आहे

● अभिनेत्री विजय निर्मला यांचे निधन झाले , त्या ७३ वर्षांच्या होत्या

● केंद्र सरकार लवकरच २५५ जिल्ह्यांमध्ये ' जल शक्ती अभियान ' सुरू करणार

● दिल्ली सरकारने " सेहतमंद दिल्ली " अन्न सुरक्षा मोहिम सुरू केली

● आंतरराष्ट्रीय लघु - मध्यम उद्योग संमेलन २०१९ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार

● एस के शर्मा यांची स्टेट ट्रेडींग कॉरपोरेशन ऑफ इंडियाचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली

● पी. आचार्य यांना मणिपूरचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार देण्यात आला

● उत्तराखंडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे ५ वे भर्ती केंद्र उघडण्यात येणार

● अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी २ दिवसीय दौऱ्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल

● २०१८-१९ मध्ये भारताने २३५.२ दशलक्ष टन कोळसा आयात केला : अहवाल

● जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी ओसाका , जपान येथे पोहचले

● जी-२० परिषदेदरम्यान जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली

● नरिंदर बत्रा यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली

● उत्तराखंड सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सशक्तीकरण प्रकल्पासाठी जागतिक बँकेने ३१.५८ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

● सोफिया केनिन ने २०१९ मॉलोरका ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● बिम्सटेक डे २०१९ ढाका , बांगलादेशमध्ये साजरा करण्यात आला

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये जपान अव्वल स्थानावर

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये नाॅर्वे दुसऱ्या क्रमांकावर

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये भारत ४१ व्या क्रमांकावर

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये चीन २९ व्या क्रमांकावर

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये श्रीलंका ५८ व्या क्रमांकावर

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये बांगलादेश ७१ व्या क्रमांकावर

● फ्यूचर ब्रँड देश निर्देशांक २०१९ मध्ये पाकिस्तान ७३ व्या क्रमांकावर

● २०१९ सर्वात प्रभावी शहरांच्या यादीत न्युयॉर्क अव्वल स्थानावर

● २०१९ सर्वात प्रभावी शहरांच्या यादीत लंडन दुसऱ्या क्रमांकावर

● २०१९ सर्वात प्रभावी शहरांच्या यादीत नवी दिल्ली १३ व्या क्रमांकावर

● देशातील सर्वोत्तम १० पोलिस स्टेशनच्या यादीत राजस्थानमधील कालु पोलिस स्टेशन अव्वल स्थानावर

● देशातील सर्वोत्तम १० पोलिस स्टेशनच्या यादीत अंडमान निकोबारमधील कॅम्पबेल बे पोलीस स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर

● देशातील सर्वोत्तम १० पोलिस स्टेशनच्या यादीत पश्चिम बंगालमधील फरक्का पोलीस स्टेशन तिसऱ्या क्रमांकावर

● एस. रघुपती यांची जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिल-एशिया पॅसिफिक नेटवर्कचे अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली

● ओडिशाचे अॅडव्होकेट जनरल म्हणून अशोक पारीजा यांनी पदभार स्वीकारला

● भारताविरुद्ध कसोटी मालिकेनंतर ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार

● इंटरनॅशनल बीड टेस्टिंग असोसिएशनची ३२ वी सभा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली .

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...