Tuesday 7 April 2020

16वी घटनादुरुस्ती 1963

1)  राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या हितार्थ भाषण आणि अभिव्यक्ती, शांततापूर्व एकत्र जमणे आणि संघटना, संस्था स्थापन करणे या मूलभूत हक्कांवर आणखी निर्बंध लादण्याचे अधिकार प्रदान.

2) कायदेमंडळाला निवडणूक लढविणारे उमेदवार कायदेमंडळाच्या सदस्य, मंत्री, न्यायाधीश आणि भारताचे महालेखापरीक्षक यांनी करावयाच्या सत्य विधान आणि शपथेच्या प्रारूपामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा समावेश

15वी घटनादुरुस्ती 1963

1)  एखादी कृती, गुन्हा, कृत्य एखाद्या उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात घडलेले असेल तर त्या संबंधातील खटल्याच्या न्यायनिवाड्यात उच्च न्यायालय त्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिसत्तेला न्यायालयीन आदेश बजावू शकते.

2) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय ६० वरून ६२ करण्यात आले.

3) उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशाला त्याच उच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद

4) एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली केलेल्या न्यायाधीशाला हानिपूरक भत्ता देण्याची तरतूद

5) उच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा अस्थायी न्यायाधीश म्हणून कार्य करू शकते.

6) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वय निश्चितीची कार्यपद्धती.

General Knowledge

▪ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

▪ तंजावूर हे शहर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : तामिळनाडू

▪ कोणत्या राज्यात ‘मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना’ लागू करण्यात आली?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪ 21 जानेवारीला कोणत्या राज्याने राज्याचा 48 वा स्थापना दिन साजरा केला?
उत्तर : मेघालय

▪ कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये संविधानाची प्रस्तावना याचे वाचन अनिवार्य केले आहे?
उत्तर : महाराष्ट्र

▪ ‘कार्बन डिसक्लोजर प्रोजेक्ट 2019’ या अहवालात भारत कोणत्या क्रमांकावर आहे?
उत्तर : 5 वा

▪ कोणत्या राज्यात ‘फिट इंडिया सायक्लोथन’ आयोजित केले गेले?
उत्तर : गोवा

▪ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 18 जानेवारी

▪ कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
उत्तर : मिझोरम

▪ कोणत्या कंपनीने 3.5 अब्ज डॉलर एवढ्या रकमेसह भारतातली ‘उबर इट्स’ ही कंपनी विकत घेतली?
उत्तर : झोमॅटो

▪ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश

▪ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : उत्तराखंड

▪ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?
उत्तर : 24 जानेवारी

▪ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : दिव्यांश सिंग पनवार

▪ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?
उत्तर : ICICI बँक

▪ ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)

▪ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी

▪ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
उत्तर : झारिया

▪ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : क्रिकेट

▪ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

▪ कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?
उत्तर : पणजी

▪ IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
उत्तर : अरविंद कृष्ण

▪ ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला कोण ठरल्या?
उत्तर : एमियर नून

▪ कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪ कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर : डोनाल्ड ट्रम्प

▪ भारतात कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो?
उत्तर : 30 जानेवारी

▪ कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
उत्तर : राणी रामपाल

▪ ‘संप्रीती’ हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे?
उत्तर : भारत आणि बांग्लादेश

▪ कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
उत्तर : फरीदाबाद

▪ कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
उत्तर : तेलंगणा

पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा

👉🏻 कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे.

👉🏻 अशी स्वच्छ हवा 75 वर्षानंतर पृथ्वीवर आढळते आहे. यापूर्वी, दुसर्‍या महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती.

👉🏻 कोरोनामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरात प्रदुषणाचं प्रमाण कमी झालं आहे.

👉🏻 ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटलं की, यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 5 टक्के घट झाली आहे.

👉🏻 याआधी  2008 च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झालं होतं. त्यामुळे 1.4 टक्के घट पाहायला मिळाली होती.

👉🏻 संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 7.6 टक्के घसरण झाली तरच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 1.5 डिग्री सेल्सियसची कमतरता येईल.

👉🏻 वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जनमध्ये 10 ते 20 टक्के घट झाली आहे.

👉🏻 पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण 2021 च्या सुरुवातीला हे पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढायला लागतील.

कोरो फ्लू’ लशीची भारतात निर्मिती

भारत बायोटेक कंपनीचा पुढाकार; तीस कोटी डोसचे जगभरात वितरण
हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), लस कंपनी फ्लुजेन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत असून त्यात भारत बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी ही लस तयार करण्याचे काम सुरू केले असून या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनी लस तयार करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहे.
या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्लू जेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे, असे मत भारत बायोटेकचे उद्योग विकास प्रमुख डॉ. राचेश एला यांनी व्यक्त केले आहे.
या लसीचा भविष्यातील वापर प्रभावीरित्या केला जाऊ शकतो, त्यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे या वेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
करोनाला रोखण्याचे तंत्र
करोनावर उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जोरात काम सुरू असून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू मानवी पेशीत ज्या दरवाजांनी प्रवेश करतो ते बंद करण्यासाठी एक अभिनव उपचार पद्धती विकसित केली जात आहे. ‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार सार्स सीओव्ही २ विषाणूला पेशींमध्ये प्रवेश नाकारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे जोस पेनिंगर यांनी म्हटले आहे की, यातील निकाल उत्साहवर्धक असून संबंधित औषध रक्तवाहिन्या व मूत्रपिंडावर कसा परिणाम करते याचीही माहिती उपलब्ध आहे. एसीई २ हे पेशींवरील प्रथिन सध्या या विषाणूच्या प्रवेशास कारण ठरत आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूवरील ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटवली जाते व विषाणू पेशीत घुसून थैमान घालतो असे दिसून आले आहे. २००३ मध्ये सार्स सीओव्ही १ विषाणूतही ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटून तो विषाणू पेशीत घुसण्यात यशस्वी होत होता. कुठल्याही विषाणूरोधक औषधात नेमकी विषाणूची पेशीत घुसण्याची क्रिया रोखली जात असते. यात एपीएन ०१ या औषधाने हवा तो परिणाम साधला जातो

महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे


1. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

2. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

3. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

4. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

5. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

6. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

7. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

8. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

9. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

10. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भूगोल प्रश्नसंच

◾️कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?

1) लघु शुष्क ऋतृचा मोसमी प्रकार
2) उष्णकटिबंधीय सॅव्हाना ✅
3) उष्ण वाळवंटी प्रकार
4) ध्रुवीय प्रकार

◾️2) " एल निनो " हा ऊबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ------- आहे.

1) अर्जेटिना
2) पेरू ✅
3) ब्राझील
4) चीली

◾️3) -----------% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापरेंत पोहचत नाही .

1) 79 %
2) 59 %
3) 49 %✅
4) 39 %

◾️4) असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही.

1) फ्रान्स
2) स्वित्झलंड ✅
3) स्वीडन
4) पेरू

5) पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात.

1) अमेरिका आणि मेक्सिको
2) अमेरिका आणि कॅनडा ✅
3) ब्राझील आणि अर्जेटिना
4) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

जागतिक आरोग्य दिन: 7 एप्रिल

दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो.

यावर्षी म्हणजेच 2020 साली “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज” ही या दिनाची संकल्पना आहे.

यावर्षी जागतिक आरोग्य दिन आरोग्य सेवा पुरविण्यात सर्व परिचारिका आणि सुईणींची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका जगापुढे मांडत आहे आणि त्यांचे कार्यदल बळकट करण्यासाठी जगाला आवाहन करीत आहे.

दिनाचा इतिहास

1948 साली जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रथम ‘जागतिक आरोग्य सभा’ आयोजित केली होती. त्या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वर्ष 1950 पासून प्रभावी करण्यात आला.

प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो. विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती केली जाते.

जागतिक आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा - जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण आठवडा, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.

ऑक्सिजन चक्र (Oxygen Cycle )


◾️पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावरण आणि शिलावरण अशा तीनही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो.

◾️वातावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते.
तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो.

◾️ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो.

◾️रेण्वीय ऑक्सिजन (O), पाणी (H,O), कार्बन डाय ऑक्साईड (CO.) व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते.

◾️प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...