Wednesday 16 September 2020

जालियनवाला बाग हत्याकांड



🔷पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.


🔷1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.


🔷 तयानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.


🔷गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.


🔷 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.


🔷या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. 


🔷 रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.


वत्तपत्रे व संक्षिप्त माहिती



🔷दिग्दर्शन:


 श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.


🔷समाचार दर्पण:  


२३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.


🔷सोमप्रकाश: 


पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.


🔷तत्त्वबोधिनी पत्रिका: 


देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.


🔷सलभ समाचार :


 केशवचंद्र सेन (१८७८)

रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे



 (जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७) 


🌱ह एक भारतीय कामगार पुढारी होते.


नारायण मेघाजींचे मूळ गाव  पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर. 

🌱माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. 

सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.


 तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.

 त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापली. 

ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते.


🌱 इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.


🌱लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. 

तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.


🌱लोखंडे यांच्या पत्‍नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.


🍀🍀पत्रकारिता 🍀🍀


इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले.

🌱 ह नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. 

लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.


🌱सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली.

 रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.


🍀परस्कार आणि सन्मान 🍀


लॉर्ड लॅन्सडाऊन च्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. 

या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.


ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.


🍀पलेगने मृत्यू 🍀


मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.

बरिटिशकालीन शिक्षण



♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854



♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात.

= चार्ल्स वुड



♦️मबई, कोलकाता, आणि मद्रास येथे केव्हा विद्यापीठे स्थापन झाली.

=इ स 1857



♦️कोणी कलकत्ता येथे स्वखर्चाने 'बेथ्यून कॉलेज' काढले.

= लॉर्ड डलहौसी



♦️हटर आयोग स्थापन.

= 1882



♦️भारतात मुद्रणकलेची सुरुवात कोठे झाली.

= गोवा


♦️मद्रण कलेचा प्रसार करण्याचे श्रेय कोणाला जाते?

= डॉ, कॅरे



♦️महाराष्टात ख्रिश्चन मिशऱ्यानी ग्रंथ छपाई केव्हा सुरू केली?

= इ स 1810

गोपाळ हरी देशमुख




▶️ रव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले.

 पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले.


 ➡️ इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.


इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले.


▶️ हच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ञ. 

▶️‘ लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.


मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी



(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२)

.इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. 

प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. .

 भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटें हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने



1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?

(A) बिजींग, चीन✅
(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड
(C) शांघाय, चीन
(D) टोकियो, जापान

2.  जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.

(A) अफगाणिस्तान
(B) इराक
(C) बांग्लादेश✅
(D) सौदी अरब


3.  कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?

(A) वल्टरी बोटास
(B) सेबेस्टियन व्हेटेल
(C) मॅक्स वर्स्टपेन
(D) लेविस हॅमिल्टन ✅


4.  लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) चीन
(B) जापान
(C) तैवान ✅
(D) क्रोएशिया


5.  कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?

(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे  ✅

(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे

(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा

(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे


6.   मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?

(A) रतन टाटा

(B) डॉ. रघुपती सिंघानीया  ✅

(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय

(D) आनंद महिंद्रा


7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

(A) आयआयटी मद्रास

(B) आयआयटी मुंबई

(C) आयआयटी कानपूर ✅

(D) आयआयएम अहमदाबाद



8.  जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

(A) नामदेव ढसाळ
(B) जे. व्ही. पवार
(C) अरुण कांबळे
(D) राजा ढाले ✅


9.  15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?

(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(B) पंजाब नॅशनल बँक
(C) भारतीय स्टेट बँक ✅
(D) कॅनरा बँक


10.    2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?

(A) नवी दिल्ली ✅
(B) महाराष्ट्र
(C) पश्चिम बंगाल
(D) गोवा


11.  कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?

(A) दिपक मिश्रा
(B) ए. के. सिक्री ✅
(C) मदन लोकुर
(D) टी. एस. ठाकुर


12.   भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.

(A) BSNL
(B) एअरटेल
(C) रिलायन्स जियो ✅
(D) व्होडाफोन


13.   जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?

(A) इंदिरा गोस्वामी
(B) माहीम बोरा
(C) पुरोबी बोर्मूदेय ✅
(D) यापैकी नाही


14.  कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?

(A) आचार्य देवव्रत
(B) कलराज मिश्रा ✅
(C) केशरी नाथ त्रिपाठी
(D) कल्याण सिंग

गणितातील महत्वाची सूत्रे



● a×a = a2

● (a×b) + (a×c) = a (a+c)

●  a × b + b= (a+1) × b

● (a+b)2 = a2 + 2ab + b2

● (a-b)2 = a2 + 2ab + b2

● a2-b2 = (a+b) (a-b)

● a2-b2 / a+b = a-b a2-b2/a-b = a+b

● (a+b)3 / (a+b)2 = a+b (a+b)3 / (a-b) = (a+b)2

● (a-b)3 / (a+b)2 = (a-b) (a-b)3 / (a-b) = (a+b)2

● a3 – b3 = (a-b) (a2 + ab+ b2)

● a × a × a = a3

● (a×b) – (a×c) = a (b-c)

● a × b- b = (a-1) × b ;

● :: a2 + 2ab + b2 / a+b = (a+b)

● :: a2 – 2ab + b2 / a-b = (a-b)

● (a+b)3 = a3 + 3a2b + 3ab2 + b3

● (a-b)3 = a3 – 3a2b + 3ab2 + b3

●  a3 + b3 = (a+b) (a2-ab+b2)

● :: a3+b3 / a2-ab+b2 = (a-b)

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे


● अन्नागुडई - 2695 - केरळ

●  दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू

●  गुरुशिखर - 1722 - राजस्थान

●  कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र

●  महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा

●  मलयगिरी - 1187 - ओडिसा

●  पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी.

● पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे


● अन्नागुडई - 2695 - केरळ

●  दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू

●  गुरुशिखर - 1722 - राजस्थान

●  कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र

●  महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा

●  मलयगिरी - 1187 - ओडिसा

●  पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी.

● पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.

शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :



शिखर ———–ऊंची ———जिल्हा

कळसूबाई—-1646मी. ——अहमदनगर

साल्हेर ——1567मी.—— नाशिक

महाबळेश्वर –1438मी.—— सातारा

हरिश्चंद्रगड –1424मी. ——-नगर

सप्तश्रुंगी —-1416मी.——- नाशिक

तोरणा——-1404मी.——- पुणे

अस्तंभा ——   –    ———नंदुरबार

त्र्यंम्बकेश्वर- 1304मी.——- नाशिक

तौला ——-1231मी. ——–नाशिक

बैराट ——1177मी. ——–गविलगड टेकड्या अमरावती

चिखलदरा –1115मी.——– अमरावती

हनुमान—- 1063मी.——— धुळे

General Knowledge



● ‘अमृत’ योजनेच्या कामगिरीविषयी 2020 सालाच्या मानांकन यादीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला?

*उत्तर* : ओडिशा

● तरूणांना सॉफ्ट कर्ज व अनुदान देण्यासाठी “कर्म साथी प्रकल्प” ही योजना कोणत्या राज्य सरकारने राबविण्यास सुरूवात केली?

*उत्तर* : पश्चिम बंगाल

● वैमानिक-रहीत विमानाच्या संयुक्त विकासासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी करार केला?

*उत्तर* : भारत अर्थ मूव्हर्स मर्यादित (BEML)

● डिजिटल छायाचित्रकारितेचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते?

*उत्तर* : रसेल किर्श

● स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या हेतूने संरक्षण उत्पादन विभागाने कोणते डिजिटल व्यासपीठ तयार केले आहे?

*उत्तर* : “सृजन / SRIJAN” नामक एक ‘वन स्टॉप शॉप’

● महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “ओरुणोदोई” योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?

*उत्तर* : आसाम

● लष्करी व निमलष्करी व्यवसायिकांसाठी “शौर्य KGC कार्ड” नामक एक कृषीकर्ज साधन कोणत्या बँकेनी सादर केले?

*उत्तर* : HDFC (गृहनिर्माण विकास व वित्त निगम)

● ‘यलो चेन’ नामक एक ई-वाणिज्य मंच कोणत्या राज्याने कार्यरत केला?

*उत्तर* : नागालँड

● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?

*उत्तर* : राकेश अस्थाना

● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?

*उत्तर* : लेविस हॅमिल्टन

● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?

*उत्तर* : 2000 साली

● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?

*उत्तर* : गृह मंत्रालय

● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?

*उत्तर* : युरोपीय संघ

● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?

*उत्तर* : इजाई

● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?

*उत्तर* : छत्तीसगड सरकार

● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?

*उत्तर* : 140 देश

● ‘वंदे भारत मिशन’ या अभियानाचा उद्देश काय?

*उत्तर* : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणे.

● येस बँकेनी UDMA टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने कोणते  मोबाइल अ‍ॅप एक डिजिटल वॉलेट सुविधा म्हणून सादर केले.

*उत्तर* : ‘युवा पे’

● भारतीय हवामान विभाग (IMD) याचे वर्तमान महानिदेशक कोण आहे?

*उत्तर* : डॉ. मृत्युंजय महापात्रा

● MSME मंत्री नितीन गडकरी यांनी ‘CGSSD’ योजनेचे उद्घाटन केले. त्या CGSSD याचे पूर्ण नाव काय?

*उत्तर* : Credit Guarantee Scheme for Sub-ordinate Debt

● NASA संस्थेच्या मुख्यालय इमारतीचे नाव कोणाच्या नावावरून ठेवले जाणार आहे.

*उत्तर* : मेरी जॅक्सन (प्रथम आफ्रिकी- अमेरिकी महिला अभियंता)

● फ्लिपकार्टचे माजी सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी स्थापना केलेल्या ‘वित्तीय सेवा’ स्टार्टअप उद्योगाचे नाव काय?

*उत्तर* : “नावी”

● ‘आसाम वायू गळती’ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?

*उत्तर* : न्यायमूर्ती बी. पी. कटाके

● ‘2023 फिफा महिला विश्वचषक’ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

*उत्तर* : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

● ‘स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चॅलेंज’ कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला?

*उत्तर* : इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

● “औषध तारा” नामक किटाणूरोधी पोशाख कोणत्या संस्थेनी तयार केला?

*उत्तर* : डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी

● “लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज” नामक डिजिटल उपक्रमाचा आरंभ कोणत्या बँकेच्यावतीने करण्यात आला?

*उत्तर* : यस बँक

● भारतीय भुदलाने चाचणी घेतलेल्या ‘पिनाका’ अग्निबाणाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली?

*उत्तर* : इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड

● ‘दहशतवाद पीडितांना श्रद्धांजली व स्मृतिचा आंतरराष्ट्रीय दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?

*उत्तर* : 21 ऑगस्ट

● ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ क्रमवारीमध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला?

*उत्तर* : इंदूर

● ‘NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती कोणाची करण्यात आली?

*उत्तर* : रितेश शुक्ला

● 'ट्रायफूड' प्रकल्प कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत आहे?

*उत्तर* : आदिवासी कल्याण मंत्रालय

● भारतीय खते संघ, दक्षिण विभाग (FAI SR) याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर* : किशोर रुंगटा

Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )

Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा

Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )

Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ

Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )

Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट

Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
--  3 ते 5 फेब्रुवारी 2021

Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
--  रशिया

Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची

Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

● यंदाची जागतिक नारळ दिनाची संकल्पना काय होती?
*उत्तर* : इन्व्हेस्ट इन कोकोनट टू सेव्ह द वर्ल्ड

● गेल्या सात वर्षात ग्रँड स्लॅम एकेरीतला मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला?

*उत्तर* :  सुमित नागल

● ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’च्या क्रमवारीत भारताचा क्रमांक काय आहे?

*उत्तर* : 48वा

● गुगल कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित पूराविषयी पूर्वानुमानसाठी कोणत्या देशासोबत भागीदारी करार केला?

*उत्तर* : बांगलादेश

● कोणत्या अक्षय ऊर्जा कंपनीला क्षमतेच्या बाबतीत जगातली प्रथम क्रमांकाची सौर कंपनी ठरविण्यात आले आहे?

*उत्तर* : अदानी ग्रीन

● एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजनेत सामील झाला असून तो योजनेत समाविष्ट होणारे कोणते राज्य वा केंद्रशासित प्रदेश 26 वा ठरले आहे?

*उत्तर* : लडाख आणि लक्षद्वीप

● ‘वॉटर हीरोज कॉन्टेस्ट 2.0’ कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला?

*उत्तर* : जलशक्ती मंत्रालय

● केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘जम्मू व काश्मीर अधिकृत भाषा विधेयक 2020’ याला मंजुरी दिली असून याद्वारे कोणत्या 5 अधिकृत भाषा निश्चित केल्या आहेत.

*उत्तर* : उर्दू, काश्मिरी, डोगरी, हिंदी आणि इंग्रजी

● हरितक्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी कोणत्या राज्याने राज्यातले ‘आय रखवाली’ नामक मोबाइल अॅप तयार केले?

*उत्तर* : पंजाब

● गिझाच्या पिरॅमिडच्या आकारापेक्षा दुप्पट असलेला कोणता लघुग्रह 6 सप्टेंबर 2020 रोजी पृथ्वीच्या जवळून गेला?

*उत्तर* : 465824 2010 FR

● जी-20 सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवित होते?

*उत्तर* : सौदी अरब

● ISROच्या कोणत्या मोहीमेने पृथ्वीच्या वातावरणाचा चंद्रावर होणारा संभाव्य परिणाम स्पष्ट करणारे पुरावे दिले आहेत?

*उत्तर* : चंद्रयान 1

● भारतीय संरक्षण मंत्रीची अफगाणिस्तान व द्विपक्षीय सहकार्य तसेच प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कोणत्या देशासोबत बैठक झाली?

*उत्तर* : इराण

● “बॅक टु व्हिलेज” कार्यक्रमाचा तिसरा टप्पा कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणार आहे?

*उत्तर* : जम्मू व काश्मीर

● RBIच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, प्राधान्य क्षेत्राच्या अंतर्गत वित्तसहाय्य मिळविण्यासाठी स्टार्टअप उद्योगासाठी उलाढालीची मर्यादा किती आहे?

*उत्तर* : 50 कोटी रुपये

● 'द स्टेट ऑफ यंग चाईल्ड इन इंडिया' अहवालात मुलांची काळजी घेण्यासंबंधी तयार केलेल्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे?

*उत्तर* : केरळ

● 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटना (SCO) सरकारांच्या प्रमुखांच्या शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे?

*उत्तर* : भारत

● यूएस-इंडिया स्ट्रेटजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या तृतीय वार्षिक शिखर परिषदेची संकल्पना काय होती?

*उत्तर* : यूएस-इंडिया नेव्हिगेटिंग न्यू चॅलेंजस

● जगातले सर्वात मोठे नौदल कोणत्या देशाकडे असल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली?

*उत्तर* : चीन

● साऊथ इंडियन बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?

*उत्तर* : मुरली रामकृष्णन

● 2020 या वर्षाच्या ‘जी-20 परराष्ट्र मंत्र्यांची असाधारण बैठक’चे यजमानपद कोणत्या देशाकडे होते?

*उत्तर* : सौदी अरब

● भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकिंग कंपनीच्या कामकाजावर प्रतिबंध आणले आहेत?

*उत्तर* : आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक

● भारतीय रेल्वे मंडळाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

*उत्तर* : विनोदकुमार यादव

● ‘टाइम्स हायर एज्युकेशन (THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज 2021’ या मानांकन यादीत 301-350 या क्रम श्रेणीत कोणत्या भारतीय संस्थेला स्थान मिळाले?

*उत्तर* : भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

● दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या कितव्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ साजरा करतात?

*उत्तर* : दुसऱ्या शनिवारी

● सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) विकासासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) सोबत कोणत्या राज्य सरकारने भागीदारी करार केला?

*उत्तर* : राजस्थान

● भारतातल्या सर्वात मोठ्या “पिगेरी अभियान”चा आरंभ कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने केला?

*उत्तर* : मेघालय

● “हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा 2.0” (CSCAF 2.0) कार्यक्रमाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाने केला?

*उत्तर* : गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालय

● स्वच्छता कामगारांसाठी 'गरिमा' योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली आहे?

*उत्तर* : ओडिशा

● सप्टेंबर-2020 महिन्यात इस्रायलसोबत संबंध सामान्य करण्याला कोणत्या अरबी देशाने सहमती दिली?

*उत्तर* : बहरीन

● ब्रिटनने ब्रेक्जिट घटनेनंतरच्या व्यापारासंबंधी पहिला मोठा करार कोणत्या देशासोबत केला?

*उत्तर* : जपान

● ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सीज’ (CBDCs) तपासणी मंच’ कोणत्या संस्थेनी तयार केला?

*उत्तर* : मास्टरकार्ड

Online Test Series

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...