तलाठी भरती..

 जाणुन घ्या या परिक्षेच्या तयारी संदर्भात


  शैक्षणिक अर्हता 

तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.

संगणक/ माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

.

 वयोमर्यादा

तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्षे अशी राहील.( याबाबत ऍड मध्ये अधिक माहिती स्पष्ट होईल )

.

 पदभरतीचा कार्यक्रम : जिल्हा निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून लेखी परीक्षा देण्यापर्यंतचा कालावधी 50 ते 60 दिवसांचा असतो. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच या परीक्षेची चांगली तयारी केल्यास लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत प्रवेश करता येतो. तलाठी पदाकरिताही आता हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढते. शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी आता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.


 परीक्षेचा दर्जा

शासनाच्या तरतुदीनुसार ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील; परंतु, मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) दर्जाच्या समान राहील.


 अभ्यासक्रम

तलाठी पदाच्या परीक्षेला 

1) मराठी, 

2) इंग्रजी, 

3) सामान्यज्ञान 

4) बौद्धिक चाचणी 


या विषयांवरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण असून, एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.


 परीक्षेचे स्वरूप

तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. त्यासाठी 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असेल.


 अभ्यास घटक 

या परीक्षेसाठी जे चार अभ्यासघटक दिलेले आहेत, त्यावर 1) मराठी- 25 प्रश्न, 2) इंग्रजी- 25 प्रश्न, 3) सामान्यज्ञान- 25 प्रश्न, 4) बौद्धिक चाचणी- 25 प्रश्न याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारले जातील.


 परीक्षेची तयारी 

या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्वाचे पाठीमागील प्रश्न पत्रीकांचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतोय. विद्यार्थ्यांना बौद्धिक चाचणी व इंग्रजी हे घटक अवघड वाटतात; परंतु या घटकातील प्रश्नांचा रोज सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात. गुणवत्ता यादीत स्थान पटकावयाचे असेल, तर चारही अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत, हे लक्षात असू द्या. सामान्यज्ञान या अभ्यासघटकाची व्याप्ती देखील भरपूर आहे, याची जाणीव सतत असू द्या. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रविषयक सामान्यज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील जिल्हे अशा अनेक विषयांचा समावेश यात आहे. म्हणूनच या परीक्षेची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.


याप्रमाणे अभ्यास कसून केल्यास आपणास नक्की यश मिळेल...


पचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास


पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यावयाचा झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसते. 


अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्याचे स्वरूप खूपच वेगळे होते.

गावातील हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची. 


गावातील चावडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी बसायची आणि गावातील लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करावयाची.


 गावामध्ये काही वाद, भांडणे झाल्यास त्यामध्ये लक्ष घालून सोडविणे, गावचा विकास होण्यासाठी योजना आखणे, गावाचा कारभार चालविणे, गावाचा कर गोळा करून राजाला खंड वसूली देणे इ. कामे ही पंचमंडळी पार पाडीत असत.


 गावात त्यांना फार मान होता. गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत.

मौर्याच्या काळामध्ये तर त्यांना ग्रामशासनाचा अधिकार होता. व त्या दृष्टीने ह्या पंचायती खूपच विकसित झालेल्या होत्या. 


सन ८०० ते १००० च्या दरम्यान बोल घराण्याच्या इतिहासातील एकल येथील चौदा शिळा खऱ्या ग्रामपंचायतीच्या निर्देशक आहेत. आजच्या ग्रामपंचायती करीत असलेली विविध गाव विकासाची कामे या ग्रामपंचायती त्या वेळी करीत होत्या. 


ग्रामपंचायतीची निवडणूक दरसाल होत असे व सर्व सभासद लोकनियुक्त असत. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांची देखरेखीसाठी नेमणूक होई.


 ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या निधी असायचा.न्याय निवाडे ही पंचायत करी, फाशीची शिक्षा क्वचितच अंमलात येई. देवळात नंदादीप लावणे अगर पंचायतीस अमुक इतक्या गाई पुरविणे या गोष्टी शिक्षा म्हणून देत असत.



भारतात अनेक साम्राज्ये आली होती. बाहेरून आलेल्या मोगलांनी ही पद्धत स्विकारली. भारता सारख्या खंडप्राय खेडया पाड्यात विखुरलेल्या देशाला विकेंद्रित शासनाचीच जरुरी होती.


 त्यामुळेच ही पद्धत अनेक वर्षे टिकून होती. त्यातूनच खेडी स्वयंपूर्ण बनत होती. ग्रामीण कारागीर, कष्टकरी यांना पोट भरण्याकरीता व्यवसाय मिळत होता.



शिवाजी महाराजांच्या काळात

 ग्रामपंचायतीची पद्धत चोहीकडे चालू होती. तीच रयतेच्या सोयीची वाटल्यावरून महाराजांनी कायम ठेवली.


 रयतेला न्याय मिळवण्यासाठी लांब कुठे जावे लागू नये म्हणून गावातील पंचांनीच फुकट न्याय दयावा हे अभिप्रेत होते. छत्रपतीच्या काळात ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे चालू होत्या.



ब्रिटीशांच्या आगमनानंतर त्यांनी मात्र आपल्या आपल्या स्वार्थासाठी गावगड्यांची चालू व्यवस्था मोडीत काढून तलाठी पोलीस पाटील यांच्यापासून ते कलेक्टर पर्यंत नोकरशाहीची फौज निर्माण केली. 


१८८२ साली लॉर्ड रिपनने मर्यादित स्वरुपात स्थानिक स्वराज संस्थेचा कार्यक्रम अंमलात आणला. परंतु आरोग्य आणि प्राथमिक सोयी सुविधा पुरतेच त्यांचे उद्दिष्ट मर्यादित होते. 


त्यामध्ये स्वराज्याचा मागमूसही नव्हता. याच काळात तालुका लोकल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड व काही मोठया गावात ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही काही काळ चालू होत्या.



देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशाच्या पुनुरुत्थापनाचा व नवनिर्माणाचा विचार सुरु झाला. त्यामध्ये गाव विकासाच्या दृष्टीने विचार होणे स्वाभाविक होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवा मुलभूत आणि व्यापक अर्थ मिळाला. 


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि घटना समितीची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढयात लोकांनी उराशी बाळगलेल्या ध्येयात ग्राम स्वराज्य हे सूत्र होते. 


त्यामुळे देशाची घटना होत असताना ग्रामपंचायतीचा स्वतंत्र तिसरा सत्र असावा अशी सूचना मांडण्यात आली. त्या सूचनेला घटना समितीतील काही लोकांनी विरोध केला. 


भारतीय समाज व्यवस्था जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर आधारीत असल्यामुळे तथाकथित उच्च वर्गीय जातींना पंचायत व्यवस्थेत पंच म्हणून स्थान मिळत असे.


 तसेच गांवातील उच्च जातीय लोकच निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असत. अशा रितीने या पूर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि तथा कथित खालच्या जातींना कोणतेही स्थान नव्हते..


 ही व्यवस्था समानतेवर आधारीत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता. 


🔹परस्तावना🔹


आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली. या पंचायत राज्य पद्धतीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे.

महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा केला गेला. या कायद्यानेही प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा निर्माण केल्या होत्या. त्यांना आता ७३ वी घटना दुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामसभा संदर्भामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा मारून १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत ‘सुधारणा अध्यादेश’ काढलेला आहे. त्यामुळे ग्रामसभांना अनन्य साधारण महत्त्व दिलेले असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी एकूण सहा ग्रामसभा अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. तसेच महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक आहे. ग्रामसभांना या दुरुस्तीमुळे इतरही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत.


🔹गरामसभेचे सदस्य 🔹


पूर्वी राजे राज्य करीत. आता लोक राज्यकारभार पाहतात. ज्या कारभारात सर्व लोक सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या पद्धतीला प्रत्यक्ष सरकार अथवा प्रत्यक्ष [ स्थानिक पातळीवरची ] लोकशाही असे म्हणतात. ज्या कारभारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि राज्यकारभाराचे निर्णय घेतात त्या कारभार पद्धतीला अप्रत्यक्ष सरकार किंवा प्रतिनिधीचे सरकार असे म्हणतात.


🔹आपली ग्रामपंचायत ही अप्रत्यक्ष🔹


 कारभाराचे उदाहरण आहे तर ग्रामसभा ही प्रत्यक्ष कारभाराचे उदाहरण आहे आणि ग्रामपंचायतीच्या मतदारांची संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या गावातील व वाड्यावस्त्यामधील ग्रामपंचायतीचे मतदार हे ग्रामसभेचे सदस्य आहेत.


🔹गरामसभेचा कारभार 🔹


ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे. ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे. याशिवाय ग्रामसभेने, ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी. ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत. ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.


🔹गरामसभेचे पदाधिकारी 🔹


ग्रामसभेला पदाधिकारी नाहीत. ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे. निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो. इतर ग्रामसभासाठी ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहूमताने अध्यक्ष म्हणून निवड करावी लागते. [ सन १९५९ चा अधिनियम क्रमांक ३ ]

अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीने ग्रामसभेची संपूर्ण बैठक पार पडेपर्यंत बैठकीचे नियमन करावे लागते. सुरुवातीस विषय पत्रिकेतील विषयांची यादी सर्वांना वाचून दाखवावी लागते. विषयास सुसंगत असा प्रश्न विचारण्याचा अधिकार ग्रामसभा सदस्यांना आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षाने तोंडी दयावी लागतात. विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया सभासदास चर्चा करण्यास किती वेळ द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. विषय पत्रिकेत नमुद केलेल्या विषयाशिवाय इतर विषयावर अध्यक्षांच्या परवानगी शिवाय चर्चा करता येत नाही.


🔴राज्य घटनेत करण्यात आलेला बदल🔴


७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाने “पंचायती” या शिर्षकाखाली “भाग ९-अ” हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम २४३ ते कलम २४३-ओ अशी कलमे समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय या कायदयाने राज्य घटनेला ११ वे परिशिष्ट जोडले असून त्यामध्ये पंचायत राज संस्थाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विषयांची माहिती दिली आहे.

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची “घटनात्मक जबाबदारी” ठरली आहे. राज्य घटनेच्या २४३-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्राम, मध्य व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करता येईल. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी असेल अशा राज्यात मध्यस्तरावरील पंचायतीची स्थापना केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आली आहे.


🔴घटना दुरुस्तीचा मुख्य उद्देश🔴

पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारे आता पंचायत राज्य संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप व मनमानी करू शकत नाहीत. पंचायत राज्य संस्थांच्या निवडणूका घेणे किंवा त्यांना अधिकार देणे या गोष्टी आता राज्य सरकारच्या मर्जीवर पूर्वीप्रमाणे अवलंबून राहीलेल्या नाहीत. बऱ्याचशा वेळा राज्यामध्ये शासन करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक घेण्याकरीता अनुकूल परिस्थिती नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलल्या जात असत. महाराष्ट्रात एकेकाळी निवडणुकींना मुदतवाढ देऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तब्बल १२ वर्षानंतर घेण्यात आल्या होत्या. आता दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. घटना दुरुस्तीमुळे राज्य घटनेमध्ये ज्याकाही तरतूदी असतील त्यांचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे.


तलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका


१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते?

अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र


२………………या भारतीय वेज्ञानिकाने वनस्पती संबंधी केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.

वनस्पतींनाही संवेदना असतात, असे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केले.

अ) प्रफुल्लचंद्र राय ब) सी.व्ही. रमन क) जगदीशचंद्र बोस✅ द) डॉ. सुब्रह्मण्यम भारती


३. रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपैकी कोणती सज्ञा आहे?

अ) एलिझा टेस्ट ब) बायोप्सी✅ क) अन्जिओ ब्लास्ट द) वेस्टर्न ब्लॉक टेस्ट


४. धवलक्रांती जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?

अ) डॉ. एम.एस. स्वामिनाथन ब) वर्गीस कुरियन✅

क) डॉ. रघुनाथ माशेलकर द) डॉ. राजा रामण्णा


५. जनागणना २०११ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारतात व महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील दर हजार मुलामागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे …………..व …………….आहे.

अ) ९१४ व ८८३ ब) ९२७ व ९१३✅ क) ९४५ व ९४६ द) यापैकी नाही


६…………….रोजी ग्याट चे रुपांतर जागतिक व्यापार संघटने मध्ये केले गेले.

अ) १ जानेवारी १९९४ ब) १ एप्रिल १९९४ क) १ जानेवारी १९९५✅ द) १ एप्रिल १९९५


७. खालीलपैकी कोणता कर एखाद्या वस्तूंची किंमत वाढण्यास प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत नाही.

अ) विक्रीकर ब) आयात कर क) स्थानिक कर द) प्राप्तिकर✅


८. पंचायत समिती पातळीवर ( तालुका पातळीवर ) ग्रामीण विकास कार्याची जबाबदारी प्रमुख्याने पुढीलपैकी कोणावर असते?

अ) ग्रामसेवक ब) ग्रामविकास अधिकारी

क) गट विकास अधिकारी✅ द) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी


९. महाराष्ट्र …………हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे.

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री क) जिल्हाधिकारी✅ द) लोकायुक्त


१०. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा …………तासांनी पुढे आहे.

अ) अडीच ब) साडेचार क) साडेपाच✅ द) साडेसात


११. खाली भारतातील काही राज्ये व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैके कोणती जोडी चुकीची आहे?

अ) नागालँड : कोहिमा ब) मेघालय : शिलॉंग

क) अरुणाचल प्रदेश : इटानगर द) त्रिपुरा : इम्फाळ✅


१२. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान………..

अ) संपूर्णत : बरोबर आहे✅ ब) संपूर्णत : चुकीचे आहे

क) अंशत : बरोबर आहे द) असंदिग्ध स्वरूपाचे आहे


१३. मंडोलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी………….. हा ग्रंथ लिहिला

अ) अर्कीक होम इन द वेदाज ब) गीता रहस्य✅

क) ओरायन द) प्रतियोगिता सहकार


१४. ” जय जवान, जय किसान” हि घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती?

अ) जवाहरलाल नेहरू ब) लालबहादूर शास्त्री✅

क) इंदिरा गांधी द) जयप्रकाश नारायण


१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते.

ब) ते भारताच्या घटना समितीचे सचिव होते.

क) त्यांनी भारताच्या घटना समितीचा राजीनामा दिला.

द) ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.✅


१६. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील…………या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार (VETO) वापरता येतो.

अ) अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रांस✅

ब) अमेरिका, रशिया, तेवान, ब्रिटन व फ्रांस

क) अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन व फ्रांस

द) अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायल व ब्रिटन


१७. सन २०११ सालासाठीचा म्यागसेस पुरस्कार बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणा-या …….यांना जाहीर करण्यात आला?

अ) हरीश हांडे ब) प्रकाश आमटे क) किरण बेदी द) नीलिमा मिश्रा✅


१८. मुंबई क्रिकेट असोशिएशन चे अध्यक्ष ………..हे आहेत.

अ) शरद पवार✅ ब) शशांक मनोहर क) विलासराव देशमुख द) यापैकी नाही.


१९. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री……….आहेत.

अ) फौजिया खान ब) प्रकाश सोळंके क) राजेंद्र गावित द) वर्षा गायकवाड इ) दिवाकर रावते✅


२०. महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशनची व्याप्ती वाढवून नुकतेच त्यामध्ये …….जिल्हे व …..तालुक्यांचा समावेश केला आहे.

अ) २२ व १२५ ब) १२ व २५✅ क) सर्व जिल्हे व तालुके द) यापैकी नाही


२१. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढून…….. झालेले आहे.

अ) ८२.९ %✅ ब) ७६.९ % क) ८६.० % द) ६७ %


२२. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.

अ) खाद्य तेल ब) सिमेंट क) अन्नधान्य द) खनिज तेल✅


२३. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केले जाते?

अ) ग्रामसेवक ब) तलाठी✅ क) पोलीस पाटील द) सरपंच


1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?

१) सामासिक शब्द✔️

२) अभ्यस्त शब्द

३) तत्सम शब्द

४) तद्भव शब्द


2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?

१) धष्टपुष्ट शरिर

२) तोष✔️

३) लंबक

४) तुळई


3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?

१) शब्दयोगी अव्यय✔️

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियाविशेशन अव्यय

४) केवलप्रयोगी


4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.

" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."

१) कर्तरी प्रयोग✔️

२) कर्मनी प्रयोग

३) भावे प्रयोग

४) संकिर्ण प्रयोग


5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?

१) कानडी✔️

२) डच

३) पोर्तुगीज

४) अरबी


6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.

१) साधित विशेषन

२) नामसाधित विशेषन✔️

३) अविकारी विशेषन

४) परिनाम दर्शक विशेशन


7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?

१) षष्ठी

२) प्रथमा

३) द्वितिया

४)सप्तमी✔️


8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.

१) कर्मनी

२) अकर्मक कर्तरी

३) भावे✔️

४) सकर्मक कर्तरी


9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.

१) तत्पुरुष

२) बहुव्रिही✔️

३) द्विगु

४) मध्यमपदलोपी


10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्रवाक्य✔️

४) आज्ञार्थी वाक्य


11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.

१) बहुव्रिही✔️ 

२) कर्मधार्य

३) तत्पुरुष 

४) अव्ययीभाव


12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.

१) अत्यंत उत्सुक असने

२) जबाबदारी स्विकारने

३) दुर्मिळ संधी मिळने✔️

४) माघार घेने


13) कवितेचे रस किती आहेत?

१) चार

२) पाच

३) नऊ✔️

४) सात


14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.

१) भट

२) भाट

३) कुत्रा

४)बोका✔️


15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.

१) ज्

२) र

३) ग

४) म्


16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे

" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?

१) न्युनत्वबोधक✔️

२) परिनामबोधक

३) विकल्पबोधक

४) समुच्तयबोधक


17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.

१) पाच 

२) चार✔️

३) एक

४) तिन


18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?

१) युद्ध✔️

२) सैन्य

३) राजा

४) सेनापती


19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "

१) जोम✔️

२) अभिनय

३) प्रवेश 

४) अभियान


20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.

1) The , A✔️

2) no article ,a

3) The , an

4) The, the


21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.

1) in , to

2) by ,to✔️

3) on,in

4) an,in


22) Use correct word in the sentence .

We ------ obey our parents.

1) should

2) will

3) can

4) must✔️


23) The meaning of beech--

1) sea shore

2) a tree✔️

3) an animal

4) a vegetable


24) choose the correct word from the following.

1) commutes

2) committee✔️

3) committing

4) committee


25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.

1) to , to✔️

2) to, for

3) to, with

4) to, no article


26) Select the correct meaning of the word " error"

1) wrong

2) true

3) incorrect

4) mistake✔️


27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?

१) ३६

२) ३४✔️

३) ३५

४) ३३


२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?

१) २३%

२) ४०%

३) ९८%

४) २१%✔️


२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?

१) लुई पाष्चर

२) रोनॉल्डरॉस✔️

३) बेनडेर

४) डिओडर श्वान


३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?

१) ७२✔️

२) ६०

३) ४०

४) ३०


३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?

१) २०००°

२) १०००°

३) ३०००°✔️

४) १५००°


३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?

१) काविळ

२) अतिसार

३) विषमज्वर

४) यापैकी सर्व✔️


३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?

१)टेफ्लॉन✔️

२) जिप्सम

३) इथिलीन

४) फॉक्झिन


३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?

१) ६५%✔️

२) ८०%

३) ६०%

४) ४०%


३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?

१) यकृत✔️

२) किडनी 

३) फुफ्फुस

४) र्हदय


३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?

१) १८५५

२) १८५६

३) १८५७

४) १८५८✔️


३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?

१) सुधारक

२) केसरी

३)दिनबंधू✔️

४) प्रभाकर


३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?

१) नाशिक 

२) मुंबई

३) रत्नागिरी

४) महाड✔️


३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?

१) वासुदेव बळवंत फडके

२) अनंत कान्हेरे

३) दामोदर हरीचाफेकर✔️

४) सुरेंद्र बोस


४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?

१) अति पर्जन्याचा प्रदेश

२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️


महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम

🔅विषय अभ्यासक्रम

1.मराठीसमानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार,
शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण,
क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी,
वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द

2.Englishvocabulary Synoms & anytoms, proverbs,
tense & kinds of tense, question tag,
use proper form of verb, spot the error,
verbal comprehension passage etc,
Spelling, Sentence, structure,
one word substitution, phrases.

3.चालू घडामोडी
(Current Affairs)सामाजिक, राजकीय, आर्थिक ,क्रीडा, मनोरंजन.

4.सामान्य ज्ञान
(General Knowledge)महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना,
भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र,
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य,
भारताच्या शेजारील देशांची माहिती.

5.बुद्धिमत्ता
(Aptitude)अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे,
समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.

6.अंकगणित
(Arithmetic)गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी,
चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.

👉(मोठी जाहीरात येण्याची दाट शक्यता आहे चालूद्या जोरदार अभ्यास🔥🔥)

(तलाठी भरती चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा)🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...