काही महत्वपूर्ण मुद्दे


♦️बंगालचे प्रथम गव्हर्नर - रॉबर्ट क्लाईव्ह. 

♦️बंगालचे शेवटचे गव्हर्नर - वॉरेन हेस्टिंग्ज. 

♦️बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल- वॉरेन हेस्टिंग्ज.

♦️बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल- विलियम बेंटिंक.

♦️भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल - विलियम बेंटिंक.

♦️भारताचे अंतिम गव्हर्न जनरल - लॉर्ड कॅनिंग.

♦️भारताचे प्रथम व्हाईसरॉय - लॉर्ड कॅनिंग. 

♦️भारताचे अंतिम व्हाईसरॉय - लॉर्ड माऊंटबॅटन.

♦️स्वतंत्र भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल:- लॉर्ड माऊटबटन.

♦️पहिले भारतीय गव्हर्नर जनरल :- सी. राजगोपालाचारी.

♦️ऑगस्ट घोषणा  (१९१७) :- लॉर्ड माँटेग्यू.

♦️ऑगस्ट प्रस्ताव – (१९४०) - लॉर्ड लिनलिथगो.

♦️ऑगस्ट क्रांती - (१९४२) - चलेजाव आंदोलन.


गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम


♦️ सातारा 1848.

♦️जैतपूर- 1849.

♦️संभलपूर व ओरछा- 1849.

♦️बघाट 1850.

♦️उदयपूर - 1852.

♦️झाशी - 1853.

♦️नागपूर-1854.

♦️करौली- 1855.

♦️अवध - 1856.



⭕️♦️⚠️ गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौज

स्वीकारणारी राज्याचा क्रम:-

♦️हैदराबाद - 1798.

♦️म्हैसूर - 1799.

♦️तंजावर - 1799.

♦️अवध - 1801.

♦️पेशवा - 1802.

♦️भोसले - 1803.

♦️शिंदे - 1804.

प्रमुख राजवंश आणि संस्थापक


▪️ हर्यक वंश                    - बिम्बिसार


▪️ नन्द वंश                      - महापदम नन्द


▪️ मौर्य साम्राज्य              - चन्द्रगुप्त मौर्य


▪️ गुप्त वंश                      - श्रीगुप्त


▪️ पाल वंश                      - गोपाल


▪️ पल्लव वंश                   - सिंहविष्णु


▪️ राष्ट्रकूट वंश                  - दन्तिदुर्ग


▪️ चालुक्य-वातापी वंश     - पुलकेशिन प्रथम


▪️ चालुक्य-कल्याणी वंश  - तैलप-द्वितीय


▪️ चोल वंश                      - विजयालय


▪️ सेन वंश                       - सामन्तसेन


▪️ गुर्जर प्रतिहार वंश         - हरिश्चंद्र/नागभट्ट


▪️ चौहान वंश                  - वासुदेव


▪️ चंदेल वंश                    - नन्नुक


▪️ गुलाम वंश                  - कुतुबुद्दीन ऐबक


▪️ ख़िलजी वंश  - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी


▪️ तुगलक वंश                - गयासुद्दीन तुगलक


▪️ सैयद वंश                    - खिज्र खान


▪️ लोदी वंश                    - बहलोल लोदी


▪️ विजयनगर साम्राज्य     - हरिहर / बुक्का


▪️ बहमनी साम्राज्य          - हसन गंगू


▪️ मुगल वंश                    - बाबर



⭕️♦️प्राचीन इतिहास ,जोड्या जुळवा येऊ शकतो लक्षात असुद्या मोजके वंशज आणि संस्थापक✔️


येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेकरिता अर्थव्यवस्था महत्वाचे मुद्दे


⚠️ 👇👇👇 हे करा 10-12 मार्क्स हमखास येतील.


♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणी :-

♦️ राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या पध्दती :-

➡️ उत्पाद पद्धत ,उत्पन्न पद्धत  खर्च पद्धत 


♦️राष्ट्रीय उत्पन्न मोजणीशी संबंधित संकल्पना :-

➡️ GDP GNP NNP NDP


♦️GDP मोजमाप पद्धती :-

➡️स्थिर ,चालू किंमत, घटक किंमत, बाजारमूल्य


♦️आधारभूत वर्ष (समिती) :- 

➡️2011-12

➡️2017-18


♦️GREEN GDP ,GNH, PCI ,PPP


♦️CURRENT:-

➡️GDP GROWTH RATE, GDP मधील क्षेत्रनिहाय वाटा 

➡️PRIMARY SECOnDARY TERTIARY


⭕️✔️चलनवाढ :-

➡️ संकल्पना .

➡️ तेजीचे चक्र व मंदीचे चक्र.


♦️इतर संकल्पना :- 

➡️ delation disinflation ,reflation stagflation .


♦️चलनवाढीचे प्रकार :-

➡️ दरानुसार ,कारणांनुसार 


♦️चलनवाढीचे मोजमापसाठी निर्देशांक :-

➡️WPI ,CPI, GDP DEFLECTOR, NHB


♦️चलनवाढीचे परिणाम:- 

चांगले , वाईट ,शुन्य


♦️चलनवाढ नियंत्रणात ठेवण्याचे उपाय(3-5%) :- 

➡️ मौद्रीक उपाय .

➡️ राजकोशीय उपाय .

➡️ प्रत्यक्ष उपाय.

➡️ Angels law

➡️ Say चा नियम

➡️ जिफेन वस्तू

➡️ व्यापरचक्र

➡️ फिलिप्स curve

➡️ पैशाचे प्रकार :-m0,m1 m2,m3

➡️ पैसा गुणक 

पैशाचा संख्यात्मक सिद्धांत



⭕️✔️पैसा व चलन:-

➡️ पैसे व चलन मधील फरक

➡️ पैशाची कार्य :-SUMS

➡️ नोटा व नाणी उत्क्रांती :-कायदे

➡️SPMCIL .


♦️कागदी चलनाचे प्रकार :- 

➡️ परिवर्तनीय अपरिवर्तनीय


⭕️✔️Rbi व मौद्रीक धोरण :-

➡️ RBI ची उत्क्रांती .

➡️RBI ची रचना.

➡️पतनियंत्रण ची साधने :- 

➡️संख्यात्मक .

➡️गुणात्मक.

➡️अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा :-


♦️ बँकांचे वर्गीकरणलक्ष्य :-40%.


♦️उत्क्रांती.


♦️भांडवल पर्याप्तता.


♦️✔️सार्वजनिक वित्त :

➡️ अर्थसंकल्प ची सुरुवात आणी उत्क्रांती.

➡️ राजकोष धोरण :- उद्दिष्ट

➡️ अर्थसंकल्प रचना

➡️ भारत शासनाचे निधी :- 3 

➡️ वित्तमंत्रालाय रचना

➡️ अर्थसंकल्प निर्मिती ची प्रक्रिया

➡️ अनुदानाचे प्रकार 

➡️ तुटीचे प्रकार

➡️ अर्थसंकल्प प्रकार

➡️ प्रारूपे :-GENDER BUDGET

➡️ संसदीय समित्या

➡️ CAG ,CGA



⭕️✔️कररचना:-

➡️ करकसोट्या.

➡️ करांचे प्रकार

➡️लाफर CURVe

➡️भारतातील महत्वाचे प्रकार


♦️वित्त आयोग :-

➡️ 13,14,15

➡️ बाकी अध्यक्ष


⭕️ उद्योग:-

♦️ IIP

♦️गाभा उद्योग :- 8

♦️ओद्योगिक धोरण:- 1948 ,1956,1969,1973,1977,1991

♦️राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011

♦️Make in india


⭕️✔️ आर्थिक सुधारणा:-

➡️Lpg  fullform

➡️IMF ,WTO, WORLD BANK (BASIC ONLY)


⭕️✔️परकीय व्यापार:-

♦️अनुकूल व प्रतिकूल वर्ष

♦️भारतीय आयात निर्यातपरिवर्तनीय व अवमूल्यन 

♦️EPZ, SEZ

♦️परकीय गुंतवणूक:-

FDI 


⭕️✔️ दारिद्र्य व बेरोजगार:-

♦️समित्या व आकडेवारी

♦️पंचवार्षिक योजना

♦️योजना आयोग

♦️NDC 

♦️NITI आयोग


♦️⭕️ चालू घडामोडी


⭕️✔️पायाभूत सुविधा


➡️ कृषिशी संबंधित :-

➡️ आकडेवारी व योजना 

➡️ सामाजिक योजना



👆👆👆👆वरील दिलेले सर्व मुद्दे जरी cover केले तरी येणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षा मध्ये 10-12 मार्क्स हमखास 100% शाश्वती ने मिळतील नसतील केले तर नुसते बघू नका करून घ्या😍😍



चालू घडामोडी


◆ आरटीआयने डेटा जारी केला, 60% मतदारांनी आधारला मतदार ओळखपत्राशी जोडले.


◆ भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी” सर्व सर्वोच्च न्यायालयांसाठी “Neutral Citations” लाँच केले.


◆ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 04 वर्षे पूर्ण झाली.


◆ यमुनोत्री धाम येथे रोपवेसाठी उत्तराखंड सरकारने करार केला.


◆ मॅनहोल्स साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.


◆ भूतानचा 7 वर्षीय राजकुमार देशाचा पहिला डिजिटल नागरिक बनला आहे.


◆ औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्यात आले.


◆ पाकिस्तानला चीनकडून $700 दशलक्ष निधी मिळाला.


◆ जागतिक बँकेने युद्धाच्या वर्धापनदिनानिमित्त युक्रेनला अतिरिक्त 2.5 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.


◆ भारत, गयाना तेल आणि वायू क्षेत्रावर करार करणार आहेत.


◆ युक्रेन संघर्षामुळे आर्थिक गुन्हे वॉचडॉग FATF ने रशियाचे सदस्यत्व निलंबित केले आहे.


◆ जानेवारीमध्ये जीएसटी महसूल 1.56 लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.


◆ भारतीय रिजर्व्ह बँकेने ने 5 सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत.


◆ Infosys क्लाउडच्या उद्योगाला गती देण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत करार केला.


◆ CSC Academy आणि NIELIT यांनी डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला.


◆ 2023 मध्ये क्रिप्टोचा अवलंब करण्यास भारत 7 व्या क्रमांकावर आहे.


◆ गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्यासाठी UAE ने प्रथम I2U2 उप-मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली.


◆ बिल गेट्स 902 दशलक्ष डॉलर्सला हेनेकेनमधील स्टेक खरेदी केली.


◆ भारतीय पाणबुडी INS सिंधुकेसरी इंडोनेशियामध्ये पहिल्यांदा डॉक करण्यात आली.


◆ IDEX च्या तिसर्‍या दिवशी NAVDEX 2023 वर $1.5bn किमतीचे 11 सौदे झाले.


◆ एस. एस. राजामौली यांच्या RRR ने HCA येथे ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ पुरस्कार जिंकला.


◆ पंतप्रधान मोदींनी ‘बारिसु कन्नड दिम दिमावा’ महोत्सवाचे उद्घाटन केले.


◆ जर्मनीने भारतासोबत 5.2 अब्ज डॉलर्सच्या 6 पाणबुड्या बांधण्याचा करार केला आहे.

मराठी भाषा गौरव दिन


- 27 फेब्रुवारी

- कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस

--------------------------------------------------

● विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)


- जन्म: 27 फेब्रुवारी 1912, मृत्यू 10 मार्च 1999

- जन्म पुणे येथे तर नाशिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते.

- आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार

--------------------------------------------------

● ग्रंथसंपदा


नाटके

दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१), दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१)


काव्यसंग्रह

जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०)


कादंबर्‍या

वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६).


कथासंग्रह

फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८)

--------------------------------------------------

● पुरस्कार


- 1974 मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले.

- 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

- त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.

- 1964 मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


साधारण विधेयक आणि धनविधेयक यांचा तुलनात्मक अभ्यास

🔴 साधारण विधेयक


▪️साधारण विधेयकाची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात करता येते.

▪️कोणताही सदस्य असे विधेयक मांडू शकतो.

▪️राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीशिवाय मांडता येते.

▪️राज्यसभा यात बदल करू शकते किंवा फेटाळू शकते.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने असे विधेयक रोखून धरू शकते. -

▪️लोकसभेने पारित केलेले विधेयक राज्यसभेत पाठवण्यासाठी अध्यक्ष्यांच्या सहीची गरज नसते.

▪️दोन्ही सभागृहांत असहमती झाल्यास राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात

▪️मत्र्याने लोकसभेत मांडलेले साधारण विधेयक अस्वीकृत झाल्यास/ सरकारचा मतदानात पराभव झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. खाजगी सदस्याच्या विधेयकाच्या बाबतीत असे झाल्यास मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागत नाही.

▪️राष्ट्रपती असे विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.


🔵धन विधेयक

▪️सरुवात फक्त लोकसभेत करता येते.

▪️फक्त मंत्रीच मांडू शकतो.

▪️फक्त राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीनेच मांडता येते.

▪️राज्यसभेला फक्त बदल सुचवण्याचा हक्क आहे.

▪️राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस धन विधेयक रोखून धरू शकते.

▪️लोकसभेने पास केलेल्या धनविधेयकावर अध्यक्षांची सही असणे गरजेचे असते.

▪️असहमती झाल्यास लोकसभेने स्वीकारलेल्या स्वरुपातच विधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केल्याचे मानले जाते. यावर संयुक्त बैठकीची तरतूद नाही.

▪️लोकसभेने नामंजूर झाल्यास सरकार राजीनामा देते.

▪️राष्ट्रपती अस्वीकृत करू शकतात पण पुन्हा विचार करण्यासाठी परत पाठवू शकत नाही.


पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो

राष्ट्रपती  -  उपराष्ट्रपतीकडे

उपराष्ट्रपती  -  राष्ट्रपतींकडे

पंतप्रधान  -  राष्ट्रपतींकडे

राज्यपाल  -  राष्ट्रपतींकडे

संरक्षण दलाचे प्रमुख -   राष्ट्रपतींकडे 

महालेखापाल  - राष्ट्रपतींकडे

महान्यायवादी  - राष्ट्रपतींकडे

लोकसभा सदस्य  -  लोकसभा सभापतींकडे

लोकसभा सभापती  -  लोकसभा उपसभापतीकडे

मुख्य निवडणूक आयुक्त -   राष्ट्रपतींकडे

मुख्यमंत्री  -  राज्यपालांकडे

महाधिवक्ता  -  राज्यपालांकडे

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  -  राष्ट्रपतींकडे

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश -   राष्ट्रपतींकडे 

विधानसभा अध्यक्ष  - विधानसभा उपाध्यक्षांकडे

विधानसभा सदस्य  -  विधानसभा अध्यक्षांकडे

लोकपाल  -  राष्ट्रपतींकडे 

महाराष्ट्र लोकायुक्त  -  राज्यपालांकडे

मसुदा समिती (Drafting Committee)

📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.

📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.

📌 मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

📌घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.

📌पढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.

📌मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


📌मळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


📌 मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल

(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.

(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


📌मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -

(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


📌मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.

📌.26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.


राजकीय भूगोल

राजकीय भूगोल

✔️महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हे :-
       १) अहमदनगर -17048चौ.किमी
       २) पुणे    - 15663चौ.किमी
       ३) नाशिक    - 15530चौ.किमी
       ४) सोलापूर    - 14895चौ.किमी
       ५) गडचिरोली  - 14412चौ.किमी

Tricks:- "आपुन सोला गडी खेळू कबड्डी"

✔️ महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे जिल्हे:-
         1) मुंबई शहर  - 157चौकिमी
         2) मुंबई उपनगर - 446चौ.किमी
         3) भंडारा  - 3896चौ.किमी
         4) ठाणे   - 4214चौ.किमी
         5) हिंगोली   -  4524चौ.किमी



महत्त्वाचे विविध ऑपरेशन

❇️ऑपरेशन नमस्ते:-

✍कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.

❇️ऑपरेशन मिशन सागर:-

✍विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.

❇️ऑपरेशन शिल्ड:-

✍कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.

❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-

✍इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.

❇️ऑपरेशन संजीवनी:-

✍मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.

❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-

✍गुन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.

❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-

✍चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.

❇️ऑपरेशन मुस्कान:-

✍अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.



महाराष्ट्रातील पंचायतराज

 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

 कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

 बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

 बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

 वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

 वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

 वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

 पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

 महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

 ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

 महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

 ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

 ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

 ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार

 सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

 उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

 पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

 महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

 पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

 पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

 जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

 जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

 जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

 कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

 ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा.

1857 पूर्वीचे उठाव

 1. रामोशांचा उठाव


०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची जास्त दहशत होती.


०२. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबूर्ड्याचा लष्करी खजिना १९२४-२५ साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.


०३. सत्तू नाईकनंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईककडे आले. भूजाजी, येसाजी, कृष्णाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू साथीदार होते. उमाजी स्वतःला राजे म्हणवून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी १७९१ साली उमाजीचा जन्म झाला होता.


०४. ब्रिटीश काळात रामोशांची संख्या १८००० होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसांत दहशत पसरविली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी १८२६ साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रु. इनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.


०५. सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम १२०० रु केली. आणि जाहीरनाम्यात असे म्हटले कि, सरकारला मदत नाही केलीत तर बंडवाल्यात सामील झालात असे समजण्यात येईल. यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाक महारास रामोशांनी ठार केले.


०६. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीच आले नाही.


०७. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटीशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजीकडे महसूल भरला.


०८. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजीकडे देण्यात आले. पण पुढे नंतर १३ गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटीश यांच्यात वाद सुरु झाला.


०९. १८३१ साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली.उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपये व २ बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास २५०० रुपये व १ बिघा जमीन जाहीर करण्यात आली.


१०. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी व नाना रामोशी यांनी गद्दारी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. १५ डिसेंबर १८३१ रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.


११. उमाजी नाईकनंतर रामोशांनी दौलतराव नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवला. सह्याद्रीच्या खोऱ्यात येसूबाईच्या डोंगरात दौलतराव नाईक व मेजर डैनियल यांच्यात चकमक झाली त्यात नाईक व त्याचे सहकारी मारले गेले. मारताना नाईकांनी फडकेंना विनंती केली कि, रामवंशी (रामोशी) पुढे स्वार्थासाठी दरोडे घालणार नाहीत याची दक्षता घ्या.


१२. त्यानंतर नाशिक व अहमदनगर भागात राघू भांगरे याने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. २० सप्टेंबर १८४४ रोजी राघू भांगरेनी एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ पोलिसांना ठार केले. ब्रिटिशांना सहाय्य करणाऱ्या पाटलांची नाके त्याने कापली. त्याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिशांनी ५००० रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्याला पकडण्याची जबादारी पाटील व कुलकर्ण्यावर सोपविली.


2. कोळ्यांचा उठाव


०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.


०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.


०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.


०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.


०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.


3. भिल्लांचे उठाव


०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.


4. गौंड जमातीतील उठाव


०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला.


5. हटकरांचा उठाव


०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला.


०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.


6. धर्माजी प्रतापरावाचा उठाव


०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.


7. कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव


०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.


०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.


०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.


०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले


भारतीय संविधान प्रश्नसंच


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

उत्तर : 19 ते 22


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 राज्यपाल

उत्तर : राष्ट्रपती


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 पंतप्रधान

 सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर : सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ---- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


 11 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

उत्तर : 11 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1

 परिशिष्ट-2

 परिशिष्ट-3

 परिशिष्ट-4

उत्तर : परिशिष्ट-3


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47

 48

 52

 यापैकी नाही

उत्तर : 47


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित नेहरू

 लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 डॉ. आंबेडकर

 महात्मा गांधी

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

 विधानपरिषद

उत्तर : राज्यसभा


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?


 लोकसभा सदस्य

 मंत्रीमंडळ

 राज्यसभा सदस्य

 राष्ट्रपती

उत्तर :  लोकसभा सदस्य


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे

 6 वर्षे

 4 वर्षे

 5 वर्षे

उत्तर : 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती

 सभापती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

उत्तर : उपराष्ट्रपती


13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण

 तार

 पोस्ट

 जमिनमहसूल

उत्तर : जमिनमहसूल


14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.


 कुटुंब

 शाळा

 दोन्हीही

 मंदिर

उत्तर : दोन्हीही


15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 सरन्यायधीश

उत्तर : राष्ट्रपती


16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी

 अध्यक्षीय

 हुकूमशाही

 संसदीय

उत्तर : संसदीय


17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18

 12

 16

 20

उत्तर : 12


18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2

 1

 3

 4

उत्तर : 3


19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 अर्थमंत्री

उत्तर : पंतप्रधान


20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे

 5 वर्षे

 6 वर्षे

 कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती



· केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे. 


· या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.



1. नेमणूक

· महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. 

· महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते. 

· राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महालेखापालासाठी केली जाते.



2. कार्यकाल

· भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. 

· परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते असे असले तरी महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. 

· याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात.



3. वेतन व भत्ते

· महालेखापालाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. 

· शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास त्याला मोफत असतो. 

· एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

· महालेखापालाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते. 

· निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.



4. अधिकार व कार्ये


1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब तपासणे.

2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे ठरविणे.

3. शासनामार्फत खर्च होणार्‍या रकमा नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही हे पाहणे.

4. घटक राज्य सरकारच्या लेखा संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या राज्यपालाला पाठविणे.

5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे हिशोब तपासणे.

6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी माहिती मागविल्यास ती पुरविणे.

7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा जास्तीचा खर्च झाला असेल तर तो वसूल करणे.

अविश्वास प्रस्ताव

"(No Confidence Motion) )"

🅾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.

🅾️ कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.

1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.

2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.

3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.

4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.

5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.

6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.

7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.

८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.

9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.

10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.

11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

आजाद हिंद सेनेची स्थापना



👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला. 

👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना. 

👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.

👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली

👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.

👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.

👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.

गुजरात विधानसभेने भरती परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले




🔹गुजरात विधानसभेने 24 फेब्रुवारी 2023 रोजी सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद असलेले विधेयक मंजूर केले.


🔸विधेयकानुसार, आरोपीला 10 लाख रुपयांपेक्षा कमी नसलेल्या दंडासाठी जबाबदार असेल, जो 1 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकेल.


🔹गुजरात पब्लिक एक्झामिनेशन (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) बिल, 2023, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी मांडले होते.

लेफ्टनंट जनरल आर एस रेन यांनी महासंचालक गुणवत्ता आश्वासन (DGQA) म्हणून पदभार स्वीकारला



🔹लेफ्टनंट जनरल आरएस रेन यांनी 24 फेब्रुवारी'23 रोजी महासंचालक गुणवत्ता आश्वासन म्हणून पदभार स्वीकारला.


🔸1986-बॅचचे अधिकारी, लेफ्टनंट जनरल रीन हे इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत.


🔹त्यांनी श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीई (इलेक्ट्रिकल) पूर्ण केले.


🔸ते डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ क्वालिटी अॅश्युरन्स, बेंगळुरू येथे वरिष्ठ प्राध्यापक होते.


🔹ते अतिरिक्त म्हणून DQA(L) चे प्रमुख होते. महासंचालक (इलेक्ट्रॉनिक्स).


मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन आता पहिले भारतीय आरबीआय गव्हर्नर सीडी देशमुख म्हणून ओळखले जाईल.


▪️रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पहिले गव्हर्नर सीडी देशमुख यांच्या नावावरून मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला लवकरच ‘चिंतामणराव देशमुख स्टेशन’ असे संबोधण्यात येणार आहे. 


▪️एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, ज्याला निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना घोषित केले होते. 


▪️या बैठकीत चर्चगेट रेल्वे स्थानकाचे आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री सीडी देशमुख यांच्या नावावर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.


✅ चर्चगेट रेल्वे स्थानक


▪️चर्चगेट हे मुंबई शहराच्या चर्चगेट भागातील एक रेल्वे स्थानक आहे. 


▪️चर्चगेट स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गांवरील टर्मिनस असून पश्चिम मार्ग येथे संपतो. 


▪️चर्चगेट मुंबईमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.


जानेवारीमध्ये जीएसटी महसूल 1.56 लाख कोटी रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.




▪️वस्तू आणि सेवा कर संकलनासाठी जुलै 2017 मध्ये अप्रत्यक्ष कर आकारणी (GST) सुरू केल्यापासूनचा दुसरा-सर्वोच्च मोप-अप जानेवारी 2023 मध्ये 1.56 ट्रिलियन रुपये होता. 


▪️एप्रिल 2022 मध्ये, जीएसटी प्राप्ती 1.68 ट्रिलियन रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली.

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...