Friday 16 July 2021

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती



🧩1. ग्रहाचे नाव - बूध


🅾️सर्यापासुन चे अंतर - 5.79  


🅾️ परिवलन काळ - 59 


🅾️परिभ्रमन काळ - 88 दिवस 


🅾️इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 


🧩2. ग्रहाचे नाव - शुक्र


🅾️सर्यापासुन चे अंतर - 10.82  


🅾️परिवलन काळ - 243 दिवस 


🅾️  परिभ्रमन काळ - 224.7 दिवस 


🅾️ इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 


🧩3. ग्रहाचे नाव - पृथ्वी


🅾️सर्यापासुन चे अंतर - 14.96  


🅾️परिवलन काळ - 23.56 तास 


🅾️परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस 


🅾️ इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 


🧩4. ग्रहाचे नाव - मंगळ


🅾️सर्यापासुन चे अंतर - 22.9  


🅾️परिवलन काळ - 24.37 तास 


🅾️परिभ्रमन काळ - 687 


🅾️इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत. 



🧩5. ग्रहाचे नाव - गुरु


🅾️  सर्यापासुन चे अंतर - 77.86 


🅾️परिवलन काळ - 9.50 तास 


🅾️  परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे 


इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


 


🧩6. ग्रहाचे नाव - शनि


🅾️सर्यापासुन चे अंतर - 142.6 


🅾️परिवलन काळ - 10.14 तास 


🅾️परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष 


🅾️ इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत. 


🧩7. ग्रहाचे नाव - युरेनस  


🅾️सर्यापासुन चे अंतर - 268.8  


🅾️परिवलन काळ - 16.10 तास 


🅾️ परिभ्रमन काळ - 84 वर्षे 


🅾️ इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 


🧩8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  


🅾️सर्यापासुन चे अंतर - 449.8 


🅾️ परिवलन काळ - 16 तास 


🅾️ परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे 


🅾️इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

पाण्याचे असंगत आचरण



🅾️ सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.


🅾️ परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.


🅾️ 00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 


🅾️ 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 40C च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.


🅾️ पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.


🅾️ 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 40C ला उच्चतम (Maximum) असते.


🅾️ पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.


🅾️बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 00C तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.


🅾️थड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 00C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 40C होईपर्यंत चालू राहते. 


🅾️तापमान 40C पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते. परिणामी त्याची घनता कमी होऊन ते पृष्ठभागावरच राहते. 


🅾️पष्ठभावरील तापमान कमी होत होत 00C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान 40C च राहाते.


🅾️बर्फ उष्णतेचा विसंवाहक (Bad Conductor) आहे. त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वाटवरणात जाऊ शकत नाही.


🅾️अशाप्रकारे 40C तापमानास जलीय वनस्पति व जलचर प्राणी जीवंत राहू शकतात. 


🅾️ तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. 00C तापमानाला पाण्याचे बर्फ होते. नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात. 


🅾️कधीकधी खडकाच्या फटीमध्ये पाणी शिरते आणि तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावते. मोठा दाब निर्माण होऊन खडक फुटून त्याचे तुकडे होतात.


नासाची नोकरी सोडून नाशिकला परतले; शेतकऱ्यांसाठी बनवलं आधुनिक हवामान केंद्र.



🌧निसर्गाच्या लहरीपणाचे शेतीवर विपरित परिणाम होतात. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी करता येऊ शकतं. ही अडचण हेरून अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेतून भारतात परतलेले डॉ. पराग नार्वेकर यांच्या सोबतीने सह्याद्री फार्मसने शेतकऱ्यांना परवडतील, असे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले आहे.


🌧तयाची उपयोग लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांचा ही केंद्र बसविण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० केंद्र कार्यान्वित झाली असून, ४०० शेतकऱ्यांनी यासाठी मागणी नोंदविली आहे.


🌧अमेरिकेच्या नासा संस्थेत उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञान यावर संशोधन करणारे पराग नार्वेकर हे आता भारतीय शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत. सेंन्सरटिक्स या कंपनीचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्या संकल्पनेला स‘ह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचं पाठबळ मिळालं. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीक विमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांची माहिती उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास मदत मिळणार आहे. सह्याद्रीने एका खासगी कंपनीसोबत करार करून शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्रं उभारणी, संगणकीय प्रणाली विकसित करणे व त्याआधारे सल्ला, मार्गदर्शन असा उपक्रम सुरू केला.


🌧अत्याधुनिक प्रणालीद्वारे काटेकोर शेतीवर लक्ष दिले गेले. याद्वारे उत्पादन खर्च कमी करून प्रभावी व अचूक शेती व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादन साध्य करता येते. नंतर सह्याद्री कंपनीने एक पाऊल पुढे टाकत स्वत:ची सहयोगी कंपनी सुरू केली.

महाराष्ट्रातील पंचायत राज....!!



आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


🌸1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌸2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌸3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌸4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🌸5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌸6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🌸7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌸8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🌸9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌸10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==>  1  मे 1962


🌸11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🌸12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌸13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🌸14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

==> जिल्हाधिकारी


🌸15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌸16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌸17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌸18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌸19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌸20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌸21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🌸22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌸23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती


🌸24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌸26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌸28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌸29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌸30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌸31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌸32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌸33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🌸34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌸35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

==> ग्रामविकास खाते


🌸36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🌸37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌸38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌸39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌸40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक


चालूघडामोडी 25 मार्क्स


1) अलीकडे कोणत्या देशाने "बालक धोरण' समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे?

अ भारत

ब इंडोनेशिया

क जपान

ड चीन✅


2) जीएसटी परिषदेच्या 43 व्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतील?

अ निर्मला सीताराम✅

ब नरेंद्र मोदी

क अमित शहा

ड रामनाथ कोविंद



3) युवा लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने युवा प्रधानमंत्री योजना सुरू केली आहे?

अ रक्षा मंत्रालय

ब शिक्षण मंत्रालय✅

क गृह मंत्रालय

ड वरील सर्व



4) भारतीय सैन्याला 4 "हेरन टीपी ड्रोन्स" कोणत्या देशाकडून प्राप्त होणार आहे?

अ चीन

ब रशिया

क जपान

ड इस्त्राईल✅


5) वर्ल्ड हंगर डे' नुकताच कधी साजरा केला जातो?

अ 28 मे✅

ब 6 जून

क 22एप्रिल

ड 6 मे


6) IPL 2021 चे उर्वरित स्पर्धेचे सामने अधिकृतपणे कोणत्या देशात हलविले आहेत?

अ इंग्लंड

ब जपान

क श्रीलंका

ड यूएई✅



7) HDFC बँकेचे सीईओ कोण आहेत?

अ हसमुख भाई पारेख

ब शशीधर जगदीशन✅

क सलील पारेख

ड यापैकी नाही


8) अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने अभिनेता संजय दत्त यांना गोल्डन व्हिसा दिला आहे?

अ जपान

ब इंडोनेशिया

क स्वीझरलँड

ड यूएई✅



9) जागतिक बँकेचे शिक्षक विषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली?

अ रणजित डिसले✅

ब अरुण मिश्रा

क डॉ हर्षवर्धन

ड विमल जुलका



10) मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

अ न्या अरुण मिश्रा✅

ब न्या शरद बोबडे

क न्या दिपणकार दत्त

ड न्या हर्षल गायकवाड



11) शून्य भेदभाव दिवस कधी असतो?

अ 1 मार्च✅

ब 3 जून

क 3 मे

ड 3 एप्रिल



12) ICICI दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण ठरली?

अ एलिस पेरी✅

ब मिताली राज

क लॉरेन डाऊन

ड हरमणप्रित कौर


13) नवीन संसदेची इमारत किती मजली असेल?

अ आठ

ब सहा

क चार✅

ड पाच


14) भारताच्या नव्या संसदगृहामध्ये लोकसभा सदस्यांसाठी बसण्यासाठी किती आहेत?

अ 888 जागा✅

ब 384 जागा

क 778 जागा

ड  556 जागा


15) वरुणा 2021 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादारम्यान झाला आहे?

अ भारत - चीन

ब भारत - जपान

क भारत - फ्रान्स✅

ड भारत - ब्राझील


16) पंतप्रधान मोदींनी कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पीएम केअर फंडमधून मुलांच्या नावावर किती मुदत ठेवीची घोषणा केली आहे?

अ 15 लाख

ब 5 लाख

क 10 लाख✅

ड 2.5 लाख



17) खालीलपैकी कोणास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अतिरिक्त प्रभार मिळाला आहे?

अ कुलदीप सिंग✅

ब अलोक रंजन झा

क अरुपकुमार सिन्हा

ड सुबोधकुमार जयस्वाल


18) नुकतीक कोणत्या राज्य सरकारने " बल सहाय्यक योजना' चालू केली आहे?

अ मध्यप्रदेश

ब उत्तरप्रदेश

क बिहार✅

ड उत्तराखंड


19) जागतिक अन्न दिवस कधी असतो?

अ 3 जून

ब 16 ऑक्टोबर✅

क 5 सप्टेंबर

ड 1 मे


20) नासा ही कोणत्या देशाची कंपनी आहे?

अ अमेरिका✅

ब भारत

क जपान

ड चीन


21) कोणत्या देशातील सर्वात मोठे नौदल जहाज ' IRIS खार्ग' बुडाले आहे?

अ इराक

ब जपान

क इराण✅

ड स्पेन



22) आसाम रायफलचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत?

अ अरुपकुमार मिश्रा

ब अरुपकुमार सिन्हा

क सुबोध जयस्वाल

ड प्रदीप चंदन नायर✅


23) टेनिस स्पर्धा बेलेग्रेड ओपन 2021 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद  कोणी जिंकले?

अ राफेल नदाल

ब नोव्हाच झोकोव्हीच✅

क मेरी कोण

ड यापैकी नाही


24) भारतीय वायुसेनेने नवीन उपप्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नेमणूक केली आहे? 

अ विवेक राम चौधरी✅

ब रूपींदर सिंग सोदी

क आयझॅक अरणेक्स

ड शाफाली शर्मा


25) आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत?

अ हेमंत सोरेन

ब हेमंता बिस्वा सरमा✅

क सर्वांनंद सोनवाल

ड वरील एकही नाही

भारत-नेपाळ रेल सेवा करार


नेपाळ आणि भारत या देशांनी ‘भारत-नेपाळ रेल सेवा करार (RSA) 2004’ यासाठी विनिमय पत्रावर (LoE) स्वाक्षरी केली आहे.


या करारामुळे दोनही देशांमधील सर्व अधिकृत मालवाहू रेलगाडी संचालकांना नेपाळमधून भारतात तसेच भारतातून नेपाळकडे आणि भारताकडून इतर तिसऱ्या देशावाटे नेपाळकडे मालवाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे जाळ्याचा वापर करण्यास परवानगी मिळते.


💢नपाळ देश


नेपाळ हा भारत व चीन (तिबेट) या दोन राष्ट्रांदरम्यान, हिमालयाच्या दक्षिण उतारावर वसलेला एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे. याच्या उत्तरेस चीन (तिबेट) आणि पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे हा देश संपूर्णतः भूवेष्टित आहे. देशाची राजधानी काठमांडू हे शहर आहे. नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.


🌷भारतीय रेल्वे विषयी


भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.


भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.


भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

Electric Vehicles : मुंबई, पुण्यासह ७ शहरं होणार चार्जिंग स्टेशन्सने सज्ज; ठाकरे सरकारचं धोरण जाहीर!

 सातत्याने वाढत जाणारी प्रदूषणाची पातळी आणि त्याहून वेगाने वाढणारे इंधन दर या पार्श्वभूमीवर राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करण्यात आले आहे. असे धोरण अधिसूचित करणारे महाराष्ट हे पहिले राज्य ठरले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्टिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी वाहन खरेदी आणि नोंदणी शुल्कामध्ये सूट दिली जाणार आहे. याचा फायदा खरेदीदार ग्राहक आणि विक्रेता अशा दोघांनाही होणार आहे. त्यासोबतच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचं धोरण राज्य सरकारने आखलं आहे. त्यानुसार मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे.

मुंबईसह ७ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्सचं लक्ष्य

या धोरणानुसार मुंबईसह एकूण ७ शहरांमध्ये किंवा पालिका क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक १५०० चार्जिंग स्टेशन्स मुंबईत असून पुण्यात ५००, नागपूरमध्ये १५०, नाशिकमध्ये १००, औरंगाबादमध्ये ७५, अमरावतीमध्ये ३० तर सोलापूरमध्ये २० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. हे चार्जिंग स्टेशन उभारताना ३ किलोमीटरच्या परिघात एक चार्जिंग स्टेशन असं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच, प्रत्ये १० लाख लोकसंख्येमागे एक स्टेशन यापैकी जे जास्त असेल, ते आधार मानून या चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करण्यात येणार आहे.

राज्यातील ४ महामार्ग होणार चार्जिंग स्टेशन्सनी सज्ज!

दरम्यान, एकीकडे शहरांसोबतच राज्याती ४ महामार्ग देखील अशा प्रकारच्या चार्जिंग स्टेशन्सने सज्ज करण्याचं नियोजन राज्य सरकारने केलं आहे. यामध्ये मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे आणि नाशिक-पुणे एक्स्प्रेस वे या चार महामार्गांचा समावेश आहे. २०२५ पर्यंत ७ शहरं आणि ४ महामार्ग चार्जिंग स्टेशन्सनं सज्ज करण्याचं नियोजन राज्य सरकारने केलं असून त्याचा अंतर्भाव या धोरणामध्ये करण्यात आला आहे.

किमान १० टक्के वाहने होणार इलेक्ट्रिक!

२०२५पर्यंत राज्यात नोंदणी होणाऱ्या वाहनसंख्येपैकी किमान १० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असतील असं राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण दुचाकींपैकी १० टक्के, एकूण तीन चाकींपैकी २० टक्के तर एकूण चारचाकींपैकी ५ टक्के वाहनांचा समावेश असेल.

देऊबा पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान



नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे मंगळवारी पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी केली आहे.


राज्य घटनेच्या अनुच्छेद ७६ (५)नुसार ही नेमणूक करण्यात आली आहे, असे ‘दी हिमालयन टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालानुसार  ७४ वर्षीय   देऊबा  यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयाने  आदेश दिला होता की, के. पी शर्मा ओली यांना काढून देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा करावा. अध्यक्षीय सूत्रांनी सांगितले, त्यांच्या कार्यालयाने देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करीत असल्याचे कळवले आहे.  शपथविधी कधी होणार हे अजून ठरवण्यात आलेली नाही.


तत्कालीन पंतप्रधान ओली यांनी २१ मे रोजी प्रतिनिधीगृह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.  हा निर्णय घटनाबाह्य़ होता व त्यामुळे देऊबा यांची पंतप्रधानपदी नेमणूक करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.  सरन्यायाधीश न्या. चोलेंद्र समशेर राणा यांनी सांगितले की, ओली यांनी पंतप्रधानपदासाठी केलेला दावा अवैध व घटनाबाह्य़ आहे.

राष्ट्रीय आयुष अभियानाचा कालावधी वाढविण्यात आला.



14 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून आणखी पाच वर्षांकरिता पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ मान्य केली. या निर्णयानुसार, अभियान 01 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे.


तसेच अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 4607.30 कोटी रुपयांचा निधी देखील आरक्षित करण्यात आला आहे. त्यापैकी 3000 कोटी रुपये खर्चभार केंद्रीय सरकार तर 1607.30 कोटी रुपये खर्चभार राज्यांचे सरकार उचलणार आहेत.


🔴राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) विषयी.


भारताला आयुर्वेद, सिद्ध, सोवा रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी यासारख्या पारंपारिक उपचारांचा अजोड वारसा लाभला आहे. या उपचारांसंबधीचा लाभ नागरिकांना मिळवा या प्रयत्नात भारत सरकारच्या पुढाकाराने राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) याला 15 सप्टेंबर 2014 रोजी प्रारंभ झाला.


परवडण्याजोगी आयुष सेवा उपलब्ध करून देणे, आयुष रुग्णालये व दवाखाने सार्वत्रिक प्रवेशासाठी ती उपलब्ध होतील अश्या प्रकारे त्यात सुधारणा घडवून आणणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये येथे आयुषपद्धतीच्या उपचारांची सोय करणे, राज्यपातळीवरील शिक्षणसंस्थांची क्षमता वाढवून त्याद्वारे आयुष उपचार पद्धतींचे शिक्षण वाढवणे, नवीन रुग्णालय उभारणी ते 50 खाटां राखीव असणारे रुग्णालय यांना प्रोत्साहन, आयुष सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आयुष पद्धतीची- समग्र आरोग्यसंपन्नतेकडे नेणारी 12,500 आयुष उपचार व आरोग्यसंपन्नता उपचारपद्धती केंद्रे, आजारांचा विळखा कमी करण्याच्या दृष्टीकोनातून लोकांना स्वतःचे आरोग्य राखण्यासाठी सक्षम करणे आणि आजारांसंबधीत खर्चाचा भार कमी करणे या हेतूंनी आयुष उपचारांना सार्वत्रिक उपलब्धता मिळवून देणे हा भारत सरकारचा या योजनेमागील हेतु आहे.


ही योजना देशात आयुष आरोग्य सेवा व संबधित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना, विशेषतः दुर्गम भागात सहकार्य करणे, अश्या प्रदेशांवर विशेष लक्ष पुरवणे आणि वार्षिक योजना आखताना अश्या प्रदेशांमध्ये जास्त संसाधने उपलब्ध करून देणे याद्वारे आयुष उपचार आणि औषधोपचार यामधील दरी सांधते.

“मी २१ वर्षांपूर्वी लोकसंख्या धोरण बनवलं, त्यांना ते आज समजलं”



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि राज्याचा विकास साध्य करण्यासाठी हे धोरण लागू करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. या धोरणावर संमिश्र प्रतिक्रिया येत असून खुद्द विश्वि हिंदू परिषदेने देखील यातील काही तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. त्यात आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रीया दिली आहे.


“सुशिक्षित लोकांमध्ये कुठे २-३ पेक्षा जास्त मुले होतात. गरीबी हे मुख्य कारण आहे, जर आपण गरिबीचे निर्मूलन केले तर आपोआप लोकसंख्या नियंत्रणात येईल. हे धोरण मी २००० मध्येच बनवले होते, हे यांना २१ वर्षांनंतर समजले.” असे दिग्विजय सिंह म्हणाले.


याशिवाय दिग्विजय सिंह यांनी महागाईबाबत केंद्र सरकारला घेराव घातला, ते म्हणाले की महागाईमुळे जनता नाराज आहे. इंधन दरामध्ये किरकोळ वाढ करण्यात आली तेव्हा भाजपा सदस्यांनी त्याला विरोध केला होता. आता इंधनाचे दर ११० रुपयांच्या पुढे गेले आहेत. पंतप्रधानांनी डिझेलवरील सेंट्रल एक्साईज ड्युटी ३२.५ रुपयांवर आणि पेट्रोलवर ३३ रुपये केली आहे. त्यांनी जनतेची लूट केली आहे.

भूतान: QR सुविधेसाठी भारताची UPI मानके स्वीकारणारा प्रथम देश



🎍भारताचे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे वित्तमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी 13 जुलै 2021 रोजी झालेल्या आभासी कार्यक्रमादरम्यान ‘भीम-UPI’ अॅपच्या भूतानमधील परिचालनाला संयुक्तपणे सुरुवात केली.


🎍कविक रिस्पॉन्स (QR) सुविधेसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रमाणकांचा स्वीकार करणारे तसेच भारताच्या भीम अ‍ॅप (भारत इंटरफेस फॉर मनी / BHIM) याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याची यंत्रणा स्वीकारणारे शेजारी राष्ट्रांपैकी भूतान हे पहिले राष्ट्र आहे.


🎍भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या रूपे कार्डच्या वापराला स्वीकृती देण्यात येऊन त्यांचा वापर यापूर्वीच सुरु झाला आहे.


🌀BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) अॅप विषयी


🎍30 डिसेंबर 2016 रोजी ‘डिजी धन’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी)’ या मोबाइल देयक अॅपचे उद्घाटन झाले. ते युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) तंत्रावर आधारित देयके प्रदान करणारे एक मोबाइल अॅप आहे. ते खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. BHIM अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे, खात्यांची जोडणी, वापरकर्ताची माहिती जतन करणे, भाषा बदलणे, लाभार्थीच्या तपशीलाची नोंद ठेवणे आणि रकमेची चौकशी अश्या सुविधा देण्यात आल्या आहेत.


🎍गल्या 5 वर्षांत 10 कोटीपेक्षा जास्त UPI QR नोंदण्यात आले तसेच भीम-UPI अॅपच्या माध्यमातून 2020-21 या वर्षात 41 लक्ष कोटी रुपये एवढ्या मूल्याचे 22 अब्ज आर्थिक व्यवहार करण्यात आले. 


🌀भतान देश


🎍भतान हा दक्षिण आशियातील एक सार्वभौम राजेशाही राष्ट्र आहे. पूर्व हिमालयातील हे एक भूवेष्टीत राज्य असून याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस भारताचा अरूणाचल प्रदेश, दक्षिणेस आसाम व प. बंगाल आणि पश्चिमेस सिक्कीम तसेच तिबेटमधील चुंबी खोरे आहे. थिंफू ही देशाची उन्हाळी, तर पारो ही हिवाळी राजधानी आहे. ’एनगुलट्रम’ हे भूतानी चलन आहे.

कॅग कर्तव्ये



घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः


भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.


ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा


कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .


संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.


केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.


विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.


तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचा

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...