Thursday 17 September 2020

ञानेंद्रिये (Sensory Organs)

प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.


डोळे (Eyes):

८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.

पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.

अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.


बुबुळ (Cornea):

नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.

बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.


दृष्टिपटल (Retina):

हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.


दृष्टीसातत्य :

वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.


दृष्टिदोष (Defects Of Vision):


दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.

१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Short-sightedness):

जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.

उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा.



२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):

दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा


३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):

बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो. त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात. हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.

 उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.


४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):

वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.

उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आता जम्मु आणि काश्मिरचा समावेश असेल का?



🔸जम्मु आणि काश्मिर केंद्र शासित प्रदेश होण्याअगोदर ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत होते.


🔸आता मात्र ते राज्य नसुन केंद्र शासित प्रदेश आहे. त्यामुळे त्याचा समावेश या निवडणुकीत समावेश होत नाही. 


🔸जर जम्मु आणि काश्मिरचा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात (Electrol college) करायचा असेल तर कलम 54 मध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल. 


🔸सविधान कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणाची तरतुद आहे.


🔸70 वी घटनादुरुस्ती करुन ज्या प्रकारे “दिल्ली आणि पुदुचेरी” चा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात केला तसा जम्मु आणि काश्मिरचा करावा लागेल.


🔸राष्ट्रपतींच्या निवडणुक पद्धतीत बदल करण्यासाठी 2/3 विशेष बहुमत व निम्या राज्यांची संमती लागेल.

बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

🥇विजेतेपद - पी.व्ही.सिंधू🏆

🥈उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान)


★स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड


●21-7 , 21-7 अश्या 2 सरळ सेटमध्ये विजय


●1977 साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात


●जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू - पी.व्ही.सिंधू ठरली आहे.


●यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश

1. 2013 - 🥉कांस्यपदक

2. 2014 - 🥉कांस्यपदक

3. 2017 - 🥈रौप्यपदक

4. 2018 - 🥈रौप्यपदक

5. 2019 - 🥇सवर्णपदक


🏆भारतास जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आजपर्यंत - 10 पदके

(त्यातील 5 पदके एकट्या पी.व्ही.सिंधुची)


🎖वयाच्या 24 वर्षी पी.व्ही.सिंधू 🏸बडमिंटन जागतिक अजिंक्यपदाची🏆 मानकरी ठरली आहे.

कष्णा-गोदावरी खोऱ्यात मिथेन इंधनाचा साठा आहे: एक शोध.

🔰सपत चाललेल्या जीवाश्म इंधनाला एक पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध भारतीय भूप्रदेशात लागला आहे.


🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेली आघरकर संशोधन संस्थेनी केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ‘मिथेन हायड्रेट’ साठ्याचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो.


🔴ठळक बाबी....


🔰मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे.

अंदाजानुसार, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. त्यानुसार, खोऱ्यातला मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातल्या जीवाश्म इंधन साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.


🔰खोऱ्यात आढळलेले मिथेन हायड्रेट साठे बायोजेनिक मूळ असलेले आहेत.हायड्रोजन-बंधित पाणी आणि मिथेन वायू सागरामध्ये उच्च दाब आणि कमी तापमानाला एकत्र आले असता मिथेन हायड्रेटची निर्मिती होते.


🔰मिथेन हायड्रेट म्हणून सांधलेल्या बायोजेनिक मिथेनची निर्मिती करणार्‍या मिथेनोजेन शोधून काढले गेले आहे, जे ऊर्जेचे महत्त्वपूर्ण स्रोत असू शकते.


🔴कष्णा-गोदावरी खोरे..


🔰20 हजार चौरस किलोमीटर एवढ्या भूमी क्षेत्रात तसेच बंगालच्या उपसागराच्या 24 हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात 2000 किलोमीटर एवढ्या आईसोबाथ (पाण्याच्या खोलीच्या समसमान ठिकाणी जोडली जाणारी नकाशावरील रेषा) पर्यंत कृष्णा-गोदावरी खोरे विस्तारलेले आहे.


🔰हा एक क्रॅटॉनिक फॉल्ट भूभाग आहे तसेच ईशान्य-नैऋत्य फॉल्टद्वारे मर्यादित आहे, ज्याला वायव्येकडील प्रणाहिता-गोदावरी ग्रॅबेन आणि पश्चिमेस कुडप्पा खोरेपासून वेगळे करते.

Ozone Day : ओझोन दिवस



» अंतरराष्ट्रीय ओझोन स्तर संरक्षक दिवस / अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 

» 16 सप्टेंबर 

» पासून - 1995

» 16 सप्टेंबर 1987 रोजी Montreal Protocol वरती सह्या झाल्या होत्या, या दिवसाचे स्मरण म्हणून आमसभेने 1994 मध्ये 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

» 2019 Theme: 32 Years And Healing

» 2020 Theme: Ozone for life : 35 years of ozone layer protection


◆ ओझोन म्हणजे काय ?


» ओझोन हा ऑक्सिजनचा एक विशेष प्रकार आहे, ज्याचे रासायनिक सूत्र O3 आहे. बहुतेक ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 40 कि.मी. पर्यंत उंचीवर असतो. या प्रदेशास स्ट्रॅटोस्फियर असे म्हणतात आणि त्यात वातावरणातील सर्व ओझोनपैकी 90% समाविष्ट असतो.

» 1913 साली चार्ल्स फॅब्रि आणि हेन्री बुइसन यांनी लावला.

» व्हिएन्ना कन्व्हेंशन (ओझोन संरक्षण) 1985 साली केले होते त्यास यावर्षी 35 वर्ष होत आहेत (अंमलबजावणी 1988)

Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम

टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध


आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने टाकलेली नजर…


🔰 भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.



🔰 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.


🔰 टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.


१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….


🔰 म ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.


🔰 म ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.


🔰 म २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.


🔰 म २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.


🔰 म ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.


🔰 जन १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.


🔰 जन १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.


🔰 जन १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली


🔰 जन २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.


🔰 जलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली


🔰 जलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली


🔰 जलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली


🔰 जलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला


🔰 जलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद.



♾निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा देश ठरला आहे.


♾ दशाच्या प्रतिनिधींनी 22 जुलै 2020 रोजी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली.


🔺आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी.

..


♾2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.


♾पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 87 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्याला मान्यता दिली आहे.


🔺निकाराग्वा देश...


♾निकाराग्वा हा मध्य अमेरिका उपखंडातला सर्वात मोठा देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.


♾मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी आहे. कोर्डोबा हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.

दक्षिण-पश्चिम भागातल्या व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी वेगवेगळी जलमार्ग यंत्रणा.


📛भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे केले आहेत. नवीन मार्ग 1 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित होतील.


📛भारताच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्याभोवती असलेला अरबी समुद्र हा एक व्यस्त समुद्री मार्ग असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी जहाजे ये-जा करीत असतात तसेच मासेमारी करणारी जहाजे देखील काम करीत असतात. यामुळे काहीवेळा अपघात घडतात; परिणामी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि पर्यावरणीय प्रदूषण होते.


♻️ठळक बाबी...


📛जलवाहतूकीची सुरक्षा व कार्यक्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


📛धडक होण्यापासून बचाव, समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षेसह वाहतूकीचा प्रवाह सुलभ करणे, तसेच सागरी वातावरणाचे संरक्षण वाढविणे, या बाबी देखील यामुळे सुनिश्चित होणार.नौवहन महासंचलनालयाचे हे एक अतिशय सक्रिय व सकारात्मक पाऊल आहे, जे या प्रदेशातील नौवहनाचे कार्यक्षमतेने नियमन करणार आहे.

ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र.

💠भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.


💠'ध्रुवास्‍त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.


🔆ठळक वैशिष्ट्ये.... 


💠धरुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.


💠या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.


💠ह स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.


💠या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.


💠सरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले. 


💠हलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.

अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष.



🌼रल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.


🌼ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.


🍂आतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी...


🌼आतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.


🌼वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.


🌼UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.

मानवी चेतासंस्था



- मध्यवर्ती, परिघिय आणि स्वायत्त चेतासंस्था असे तीन प्रकार आहेत.

- मेंदू आणि मेरूरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था तयार होते.


● मानवी मेंदू

- चेतासंस्थेचे नियंत्रण करणारा प्रमुख भाग

- प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते

- 100 अब्ज चेतापेशींपासून मेंदूची निर्मिती 

- मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये: संभाषण, लिखाण, तर्कसंगत व विश्लेषणात्मक विचार, भाषा, शास्त्र व गणित

- मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये: सर्वांगीण व प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगीत 

- डावी आणि उजवी बाजू एकमेकास नियंत्रीत करतात

- प्रमस्तिष्क: मोठा मेंदू

- अनुमस्तिष्क: छोटा मेंदू

- मस्तिष्कपुच्छ: सर्वात शेवटचा भाग 


● मेरूरज्जू

- त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे

- मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे

- प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतो.

तिरंगा ध्वज



*🔮🌀कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला ? याच्या निर्मिती मागचा विचार काय होता ? हे जाणून घेऊया....*


🔺 दशाला पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये तयार करण्यात आला होता. कोलकातातील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला होता. यात केसरी, पिवळा आणि हिरवा रंग होता. तसेच त्यात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिले होते. याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता तो केवळ दोन रंगांचा होता. हा ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता.


🔺 तर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता. यात तीन रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते. याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी १९०४ मध्ये राष्ट्रध्वज निर्माण केला होता. हा स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी तयार केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर नवीन राष्ट्रध्वज १९१७ मध्ये समोर आला. यात ५ लाल आणि ४ हिरव्या रंगांच्या पट्ट्या होत्या. तसेच त्यात तारेही होते. हा ध्वज डॉ. एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी एका आंदोलनादरम्यान तयार केला होता.


🔺 भारतीय राष्ट्रध्वजाचा मुख्य प्रवास १९२१ मध्ये तेव्हा सुरु झाला जेव्हा महात्मा गांधी यांनी देशासाठी ध्वजाचा विषय काढला. आणि त्यावेळी ध्वज पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. ध्वजाच्या मधे पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली होती. पांढरा रंग ठेवल्याने सर्वधर्म समभाव आणि चरख्याने ध्वजाला स्वदेशीची प्रतिमा मिळाली. त्यानंतर ध्वजामध्ये काही बदल करण्यात आले. हा ध्वज आधी अखिल भारतीय कॉंग्रेससाठी तयार करण्यात आला होता. नंतर राष्ट्रीय ध्वज १९३१ मध्ये तयार करण्यात आला होता. हा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. गांधीजींच्या संशोधनानंतर यात केसरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आला. २२ जुलै, १९४७ रोजी संविधान समितीने भारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला.


🔰धवजातील रंगांचा अर्थ🔰


📌 भगवा किंवा केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. 

📌 पांढरा रंग प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे.

📌 तर, हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे. 

📌 तयाचप्रमाणे झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.


🔰राष्ट्रध्वजासंबंधी नियम🔰


💥भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा यासंदर्भात भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.


*–    भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे.*


*–    राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे*.


*–    ध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा*


*–    शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा*


*–    केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो*


*–    राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.*🔙🙏👍🌹


काही महत्त्वाची पुस्तके आणि लेखक


आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न पुस्तकावर नेहमीच असतो.


The becoming - मिशेल ओबामा

Healed -मनीषा कोईराला

India after Modi -अजय गुडावर्थी

I do what I do -रघुराम राजन

The third pillar -रघुराम राजन

Every vote counts -नवीन चावला

India in distress -ममता बॅनर्जी

The republican ethic -रामनाथ कोविंद

लोकतंत्र के स्वर -रामनाथ कोवींद

Electronic voting machine -आलोक शुक्ला

Bad man - गुलशन ग्रोव्हर

The best thing about you is you -अनुपम खेर

Lessons life taught me unknowingly -अनुपम खेर

My life my lessons -बाबा रामदेव

We are displaced -मलाला युसुफजाई

Indian fiscal federalism -Y V Reddy आणि G R Reddy

Whispers of time -कृष्णा सक्सेना

Six machine  क्रिस गेल

Straight task -अभिषेक मनु सिंघवी

Citizen delhi -शीला दीक्षित

The assassination of mahatma Gandhi-एम एस स्वामिनाथन

40 years of sportstar -पी व्ही सिंधू

Mind matter -विश्वनाथन आनंद

Unseen,unheard,unsaid - भरत वटवाणी

Let me say it now - राकेश मारिया

Who killed the sunderbans -तुषार कांजीलाल

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासोबत ‘एअर बबल’ करार

कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या सोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार केले आहेत.


🔸महामारीमुळे बंद पडलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरु कारण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीबरोबर करार करून या देशांमध्ये विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.


ठळक बाबी


🔸टाळेबंदीनंतर प्रथमच भारत-अमेरिका विमानसेवा सुरु झाली आहे. 18 जुलैपासून फ्रान्ससोबत हवाई सेवा सुरू होणार आहे.


🔸‘एअर बबल’ करारानुसार ठरलेल्या कालावधीतच निश्चित विमानसेवा पूर्ण करावयाच्या असतात. 


🔸अमेरिका आणि भारत यांच्यात 17 ते 31 जुलै 2020 या कालावधीत 18 विमानांची उड्डाणे निश्चित झाली आहेत. 


🔸ही उड्डाणे दिल्ली ते न्यूयॉर्क आणि दिल्ली ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान होतील. यासह एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू पॅरिस दरम्यान 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत 28 विमानाचे उड्डाण करणार आहे.


🔸तसेच ब्रिटनसोबत हवाईसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.


♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.


♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.


♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.


♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...