Thursday 17 September 2020

कष्णा-गोदावरी खोऱ्यात मिथेन इंधनाचा साठा आहे: एक शोध.

🔰सपत चाललेल्या जीवाश्म इंधनाला एक पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध भारतीय भूप्रदेशात लागला आहे.


🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेली आघरकर संशोधन संस्थेनी केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ‘मिथेन हायड्रेट’ साठ्याचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो.


🔴ठळक बाबी....


🔰मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे.

अंदाजानुसार, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. त्यानुसार, खोऱ्यातला मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातल्या जीवाश्म इंधन साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.


🔰खोऱ्यात आढळलेले मिथेन हायड्रेट साठे बायोजेनिक मूळ असलेले आहेत.हायड्रोजन-बंधित पाणी आणि मिथेन वायू सागरामध्ये उच्च दाब आणि कमी तापमानाला एकत्र आले असता मिथेन हायड्रेटची निर्मिती होते.


🔰मिथेन हायड्रेट म्हणून सांधलेल्या बायोजेनिक मिथेनची निर्मिती करणार्‍या मिथेनोजेन शोधून काढले गेले आहे, जे ऊर्जेचे महत्त्वपूर्ण स्रोत असू शकते.


🔴कष्णा-गोदावरी खोरे..


🔰20 हजार चौरस किलोमीटर एवढ्या भूमी क्षेत्रात तसेच बंगालच्या उपसागराच्या 24 हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात 2000 किलोमीटर एवढ्या आईसोबाथ (पाण्याच्या खोलीच्या समसमान ठिकाणी जोडली जाणारी नकाशावरील रेषा) पर्यंत कृष्णा-गोदावरी खोरे विस्तारलेले आहे.


🔰हा एक क्रॅटॉनिक फॉल्ट भूभाग आहे तसेच ईशान्य-नैऋत्य फॉल्टद्वारे मर्यादित आहे, ज्याला वायव्येकडील प्रणाहिता-गोदावरी ग्रॅबेन आणि पश्चिमेस कुडप्पा खोरेपासून वेगळे करते.

No comments:

Post a Comment

Latest post

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️ ▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ▶️ ...