निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद.



♾निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा देश ठरला आहे.


♾ दशाच्या प्रतिनिधींनी 22 जुलै 2020 रोजी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली.


🔺आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी.

..


♾2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.


♾पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 87 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्याला मान्यता दिली आहे.


🔺निकाराग्वा देश...


♾निकाराग्वा हा मध्य अमेरिका उपखंडातला सर्वात मोठा देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.


♾मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी आहे. कोर्डोबा हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...