दक्षिण-पश्चिम भागातल्या व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी वेगवेगळी जलमार्ग यंत्रणा.


📛भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे केले आहेत. नवीन मार्ग 1 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित होतील.


📛भारताच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्याभोवती असलेला अरबी समुद्र हा एक व्यस्त समुद्री मार्ग असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी जहाजे ये-जा करीत असतात तसेच मासेमारी करणारी जहाजे देखील काम करीत असतात. यामुळे काहीवेळा अपघात घडतात; परिणामी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि पर्यावरणीय प्रदूषण होते.


♻️ठळक बाबी...


📛जलवाहतूकीची सुरक्षा व कार्यक्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


📛धडक होण्यापासून बचाव, समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षेसह वाहतूकीचा प्रवाह सुलभ करणे, तसेच सागरी वातावरणाचे संरक्षण वाढविणे, या बाबी देखील यामुळे सुनिश्चित होणार.नौवहन महासंचलनालयाचे हे एक अतिशय सक्रिय व सकारात्मक पाऊल आहे, जे या प्रदेशातील नौवहनाचे कार्यक्षमतेने नियमन करणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...