11 October 2025

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)



●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.


भारताचा घटनात्मक विकास ( राज्यसेवा - पूर्व + मुख्य साठी )

प्रस्तावना


ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात राजेशाही अस्तित्वात होती़ राजेशाहीची अंतिम विधिसत्ता, कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता ही राजाच्या हातात एकवटलेली होती़.

या काळात मात्र खेडी ही स्वयंपूर्ण होती व स्वतंत्रही होती़ यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले होते.

याच काळामध्ये युरोपियन लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यामधील एक कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होय़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना इ़ स़ १६०० मध्ये करण्यात आली, या कंपनीने इंग्लंडच्या राणीकडून ३१ डिसेंबर १६०० रोजी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद मिळवली.

प्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे एकच ध्येय होते, ते भारतीय लोकांशी व्यापार करणे व त्यापासून नफा कमवणे़ म्हणून इ़ स़ १६०० ते १७५७ पर्यंतच्या कालखंडास ब्रिटिश ईस्ट इंडियाकंपनीचा व्यापार विस्ताराचा काळ असे म्हटले जाते़.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया हा प्लासी (१७५७) (बंगाल प्रान्त) च्या लढाईने घातला, तर १७६४ च्या बक्सारच्या लढाईने आपल्या सत्तेचा पाया भक्कम केला़.

भारताच्या घटनात्मक विकासासंदर्भात खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाते

१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये झालेला घटनात्मक विकास : १७७३ ते १८५८ पर्यंत़

२) ब्रिटिश राणी किंवा ब्रिटिश पार्लमेंटच्या काळामध्ये झालेला घटनात्मक विकास : १८५८ -१९४७


भारताचा घटनात्मक विकास १७७३ -१८५८ :


१७७३ चा रेंग्युलेटिंग अॅक्ट :

बंगालमधील जनतेत कंपनी सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या व जुलमाच्या बातम्या इंग्लंडमधील अधिकाऱ्यांच्या कानावर पडत होत्या़.

त्याच काळामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला़ बंगाल प्रान्तामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता माजली़.

भारतीय व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला असल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत असे़ व्यापारी कंपनीला राज्य करण्यास परवानगी देण्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये आरडाओरड सुरू झाली़.

या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने पार्लमेंटकडे मोठ्या रकमेच्या कर्जाची मागणी केली़ तेव्हा कंपनीच्या एकूण कारभारावर पार्लमेंटमध्ये टीका होऊन त्यातून कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटींग अॅक्ट संमत करावा लागला़.

रेंग्युलेटिंग अॅक्ट

कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटतर्फे जो अॅक्ट देण्यात आला, त्यास रेंग्युलेटिंग अॅक्ट असे म्हणतात़.

त्यावेळी इंग्लंडमध्ये लॉर्ड नॉर्थ यांचे सरकार होते़ त्यांना इंग्लंडमधील संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत होते़ त्यामुळे कंपनी विषयी त्या सरकारने सभागृहामध्ये दोन कायदे केले़

१) पहिल्या कायद्यानुसार कंपनीच्या मागणीनुसार कंपनीला ४ टक्के व्याजदराने व काही अटींवर १४ लाख पौंड एवढे कर्ज दिले़

२) दुसरा कायदा म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारा रेग्युलेटिंग अॅंक्ट होय़

रेग्युलेटिंग अॅाक्टमधील तरतूदी

१) या अॅक्टनुसार कंपनीच्या इंग्लंडच्या व भारताच्या घटनेत बदल करण्यात आला़

२) या अॅेक्टनुसार कंपनीच्या कारभाराचे भारतामध्ये एकसूत्रीकरण करण्यात आले़

३) बंगाल प्रान्तातील गव्हर्नरला बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला व त्याच्या नियंत्रणाखाली मुंबई व मद्रास प्रान्ताचे गव्हर्नर आले़ (विशेष बाब म्हणजे १७७३ च्या अॅचक्टपूर्वी अशा प्रकारे नियंत्रण नव्हते़ प्रत्येक प्रांताच्या गव्हर्नरवर प्रत्यक्ष संचालक मंडळाचे नियंत्रण होते़)

४) या अॅरक्टनुसार गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार जणांचे एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले़ प्रशासनाच्या कामात मार्गदर्शन व साहाय्य करण्याचे त्याचे काम होते़

५) या कायद्यानुसार बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि ४ जणांचे सल्लागार मंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले होते़ या कार्यकारी मंडळाचे सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जावेत असे ठरवण्यात आले़

६) या कायद्यामधील तरतुदीनुसार १७७४ मध्ये कोलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली़ (पहिले न्यायाधीश -एलिजा इम्पे)

कंपनीचे कर्मचारी या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणले़

७) गव्हर्नर जनरल व न्यायाधीशांसह कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना कोणाकडूनही बक्षीस, भेटवस्तू इ़ स्वीकारता येणार नाहीत असे सांगण्यात आले़

८) प्रत्येक २० वर्षानंतर कंपनीच्या कारभाराचे मूल्यमापन केले जाईल किंवा भारताच्या कारभारासाठी फेर कायदा देण्याचे ठरवण्यात आले़ हे फेर कायदे/मूल्यमापन (१) १७९३, (२) १८१३, (३) १८३३, (४) १८५३ मध्ये देण्यात आले

-------------------------------------------------------------------------१७८१

१७८१ चा संशोधनात्मक कायदा :

१७७३ च्या रेग्युलेटिंग अॅाक्टनंतर काही उपायात्मक व पूरक कायदे करण्याची आवश्यकता निर्माण झाली, त्यांपैकी एक म्हणजे १७८१ चा भारत सरकारचा कायदा होय़ यास १७८१ चा संशोधनात्मक कायदा असे म्हणतात़

१) त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपल्या शासकीय कार्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर करण्यात आले़

२) यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आले़.

--------------------------------------------------------------------------पिट्सचा

१७८४ चा पिट्स अॅक्ट :

१७८१ चा भारत सरकारच्या कायद्यानंतर - गव्हर्नर जनरलच्या भारतातील प्रशासनावर सक्त नजर ठेवण्याची गरज आहे अशी जाणीव ब्रिटिश सरकारला (पार्लमेंटला) झाली़ तसेच १७७३ च्या कायद्यातील दोष दूर करण्यासाठी १७८४ चा पिट्स अॅ क्ट देण्यात आला़ (पिट्स हे इंग्लंडचे पंतप्रधान होते़)

तरतुदी :

१) या कायद्यानुसार कंपनीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले़.

२) कंपनीच्या संचालकांचे धोरण नियंत्रित करण्यासाठी ६ सदस्यीय नियंत्रक मंडळाची स्थापना करण्यात आली़

३) या कायद्यानुसार कंपनीचे राजकीय व व्यापारविषयक अधिकार वेगळे करण्यात आले़.

४) गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करताना सल्लागार मंडळाची सदस्य संख्या ४ वरून ३ करण्यात आली़.

५) गव्हर्नर जनरलला इतर गव्हर्नरांनी आपल्या प्रांतात लागू केलेले कायदे व नियम याची एक प्रत देणे सक्तीचे केले़

---------------------------------------------------------------------------१७९३

१७९३ चा चार्टर अॅक्ट :

१) या अॅक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या मुदतीमध्ये पुन्हा २० वर्षाची वाढ करण्यात आली़

२) कंपनीची व्यापाराची मक्तेदारी कमी करण्यात आली.

३) यानुसार नियामक मंडळाच्या सदस्यांना व त्यांच्या नौकर वर्गाला, भारताच्या महसुलातून तनखे देण्याची तरतूद करण्यात आली़.

४) कंपनीने केलेल्या कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार सर्वाच्च न्यालायला देण्यात आला.

५) कायम धारा या नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

६) गव्हर्नर जनरल सैन्याचा सर्वाच्च प्रमुख बनला

--------------------------------------------------------------------------१८१३

१८१३ चा चार्टर अॅक्ट :

१) १८१३ च्या चार्टर अॅक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली़

मात्र : कंपनीचा चहाच्या व्यापाराचा तसेच चीनशी व्यापाराची मक्तेदारी कंपनीचीच असेल असे ठरवण्यात आले़.

२) या कायद्यानुसार भारताच्या राज्यकारभाराबाबत सनदेची आणखी २० वर्षे मुद्दत वाढवण्यात आली़.

३) या कायद्यानुसार नियंत्रक मंडळाची सत्ता अधिक स्पष्ट करण्यात आली व त्यात वृद्धी करण्यात आली़.

४) या कायद्याने सरकारने जनतेत शिक्षण प्रसार करण्याचे ठरवले़.

५) भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी कंपनीने १ लाख रुपये खर्च करावेत असे कायद्यात सांगितले़

६) या अॅनक्टनुसार खिस्ती धर्मप्रचारकास भारतामध्ये येण्याचे परवाने मिळाले़.

--------------------------------------------------------------------------१८३३

१८३३ चा चार्टर अॅक्ट :

१) या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला २० वर्ष मुदत वाढ देण्यात आली़

२) १८३३ च्या चार्टर अॅशक्टनुसार भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करण्यात आले़ यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल यास भारताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला़.

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग़

३) १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय घटनेत बदल करण्यात आला व या अॅक्टनुसार कंपनीचा चहाचा व्यापार व चीनसोबतच्या व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली़

४) या कायद्यानुसार प्रांताच्या गव्हर्नरच्या मंडळातील सदस्यांची तीन ही संख्या निश्चित करण्यात आली; परंतु आर्थिक बाबतीत पूर्वीचे विकेंद्रीकरण नष्ट करण्यात आल्याने अधिकारावर मर्यादा आली़ अर्थकायदा, याबाबतीतही प्रांतावर मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण प्रस्थापित झाले़

5) विधी आयोगाची स्थापना करण्यात आली (अध्यक्ष-लॉर्ड मेकोले)

-----------------------------------------------------------------------------१८५३

१८५३ चा चार्टर अॅक्ट :

:रेग्युलेटिंग अॅटक्टमधील तरतुदीनुसार १७९३, १८१३, १८३३ व १८५३ या मधील १८५३ चा चार्टर अॅक्ट महत्त्वाचा आहे़.

एकीकडे डलहौसीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतातील अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली होती़.याच सुमारास ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामधून संपवावी अशी मागणी भारतातील अनेक नेत्यांनी, संस्थानांनी केलेली होती़.

या सर्व मागण्यांचा काही फायदा झाला नाही कारण या अॅक्टनुसार कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली नाही; पण सत्तेचा कालावधीही ठरविण्यात आला नाही़.

तरतुदी

१) कंपनीला व्यापाराचा व कारभाराची सत्ता मागील चार्टर अॅक्टप्रमाणे २० वर्षे वाटून देण्यात आली नाही़

२) या अॅक्टनुसार इंग्लंड पार्लमेंट जोपर्यंत देईल तेवढीच मुदतवाढ मिळेल असे स्पष्ट केले़

३) गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या सल्लागार मंडळात पार्लमेंटच्या अनुमतीनेच सभासदांची नेमणूक केली जावी असे स्पष्ट केले़

४) बोर्ड ऑफ कंट्रोल अध्यक्षाचा दर्जा वाढवून त्याला इंग्लंडमधील मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला़

५) भारतीयांच्या मागणीनुसार सनदी नोकरांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेची पद्धत स्वीकारण्यात आली़ (१८५४ मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या)

६) या कायद्यानुसार बंगाल प्रांतासाठी गव्हर्नरचे स्वतंत्र पद देण्यात आले़ यापूर्वी बंगालचा गव्हर्नर जनरल बंगालचा कारभार पाहत असे़.

इंग्रज अधिकारी व कामगिरी

▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी  बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक  कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी  कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची  स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा   जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा  जनक.


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.

मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.


 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.

1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.

हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.

सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.

आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.


संस्थात्मक योगदान :


1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.

1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.

20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.

25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.

2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)

24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.

1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.

ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.

1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.

1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.

मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.

20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.


आंबेडकरांचे लेखन :


The Problem Of Rupee

1916 - Cast In India

1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)

1946 - The Untouchables

1956 - Thoughts on pakisthan.

1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.

'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.

1920 - मुकनायक.

1927 - समता.

1946 - Who Were Shudras?


वैशिष्ट्ये :


गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.

1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.

1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.

1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.

29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.

1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.

14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

खोती पद्धत


🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.


🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.


🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.


🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.


🔹खोती पद्धत बहुतांशी 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 

सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती. 


🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. 


🔹कळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.


🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.


🔸 तयांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. 


🔹तयानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.


🔸शतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. 


🔹शतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. 

त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.


📚 खोतांचे अधिकार 📚


🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. 


🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. 


🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.


🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.


🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.


➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.


सह्यादीतील घाट



उत्तर दक्षिण घाट


सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वाहतूक करता येण्यासारखे घाट


●सह्याद्रीतील प्रमुख घाट


□ घाट जोडलेली शहरे


•आंबाघाट  रत्‍नागिरी-कोल्हापूर

•आंबेनळी घाट  महाबळेश्वर-पोलादपूर

•आंबोली-रामघाट सावंतवाडी– कोल्हापूर

•कुंभार्ली घाट चिपळूण-कराड

•खंबाटकी-खंडाळा  पुणे-सातारा

•चंदनापुरी घाट  नाशिक-पुणे

•ताम्हिणी घाट  माणगाव (कोकण)-पुणे

•दिवा घाट  पुणे-सासवड

•थळघाट-कसार्‍याचा घाट  नाशिक-मुंबई

               (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)

०पसरणी घाट वाई-महाबळेश्वर

०पारघाट  सातारा-रत्नागिरी

०फोंडाघाट कोल्हापूर-गोवा

०बोरघाट-खंडाळ्याचा घाट पुणे-मुंबई 

             (राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४)

०माळशेज घाट आळेफाटा-कल्याण

०रणतोंडी घाट  महाड-महाबळेश्वर

०वरंधा घाट   भोर-महाड




            महाराष्ट्राचा भूगोल 


महत्त्वाचे घाट...               स्थान


 उत्तरेकडून दक्षिणेकडे


● थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक


○ माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर


●बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे


○वरंधा घाट=भोर - महाड


● खंबाटकी घाट=पुणे - सातारा


○ पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर


● आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड


○ कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण


● आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी


○ फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी


●हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ


○ अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाड

अस्पृश्य निवारण परिषदा

23 मार्च, 1918 - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद.❗️

🔺ठिकाण - मुंबई

🔺अध्यक्ष- महाराज सायाजीराव गायकवाड.

🔺आयोजक - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

🔺स्वागताध्यक्ष - न्या. चंदावरकर

📍 महत्वाचे - "जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही" असे लोकमान्य टिळकांनी याच परिषदेत प्रसिद्ध उद्गार काढले होते. 


25 डिसेंबर 1920 रोजी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद❗️

🔺 ठिकाण - नागपूर 

🔺अध्यक्ष – महात्मा गांधी


२२ मार्च १९२० रोजी 'दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद' ❗️

🔺ठिकाण - माणगाव, कागल 

🔺अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

🔺आयोजक - राजश्री शाहू महाराज 

🔺स्वागताध्यक्ष- दादासाहेब इनामदार

📍महत्वाचे - याच परिषदेत शाहू महारजांनी डॉ. आंबेडकरांना पुढारी म्हणून घोषित केले होते.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

महाराष्ट्रातील समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे :

जन्म – 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू – 2 जानेवारी 1944.

1932 – 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

‘महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी‘ गं. बा. सरदार.

‘निष्काम कर्मयोगी‘, भाई माधवराव बागल.

जनतेकडून ‘महर्षी‘ ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :

1905 – मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

18 ऑक्टोबर 1906 – डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई

येथे स्थापना. पहिले अध्यक्ष – न्या. चंदावकर.

1910 – जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन‘ ही संस्था.

अनाथाश्रम – रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

23 मार्च 1918 – अस्पृश्यता निवारक संघ.
1918 – मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

1920 – पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

1937 – स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

1923 – तरुण ब्रहयो संघ.

1937 – बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्य

महिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :

प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

1903 – प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

1903 – अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा निबंध वाचला.

Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .


वैशिष्ट्ये :

शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

1904 – मुंबई धर्म परिषद.

1905 – अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

1918 – मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

1924 – वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

1935 – बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.


पोलीस भरती प्रश्नसंच


1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

शिवराम महादेव परांजपे.  √

विष्णुशास्त्री चिपळूणकर

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

छत्रपती शाहू महाराज

=========================

2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते

संत तुकाराम

संत सावतामाळी

संत नरहरी सोनार

संत नामदेव.   √

=========================

3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?

डॉ. भाऊ दाजी लाड

दादोबा पांडुरंग

बाळशास्त्री जांभेकर

नाना जगन्नाथ शंकरशेठ.   √

=========================

4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.

ऊस

कापूस

भात

नीळ.   √

=========================

5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........

गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग.   √

अनेक संस्थाने खालसा करणे

ख्रिश्चन धर्म प्रसार करणे

पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

=========================

6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?

पंडित जवाहरलाल नेहरू 

विनोबा भावे.    √

सरदार वल्लभभाई पटेल 

मौलाना आझाद

=========================

7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?


विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली

साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत

साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत.   √

विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत 

=========================

8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?

इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे

ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे

वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे.  √

निवडणुकांवर बहिष्कार टाकणे

=========================

9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

रविंद्रनाथ टागोर .    √

लाला लजपतराय

लाला हरदयाळ

महात्मा गांधी

=========================

10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?

डॉ. रार्जेद्र प्रसाद.    √

डॉ. राधाकॄष्णन

डॉ. आंबेडकर

डॉ. झाकीर हुसेन

=========================

11.  ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

खैर.   √

कुसूम

कंडोल

शलार्इ

=========================

12. इस्त्रायलची राजधानी कोणती?

जेरुसलेम.  √

दमास्कस

तेल अवीव 

तेहरान 

=========================

13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

निग्रॉइड

मंगोलाइड .  √

बुश मॅनाइड 

ऑस्ट्रेलोंइड

=========================

14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

हरिहरेश्र्वर

वज्रेश्र्वरी.  √

गणपतीपुळे

संगमेश्र्वर

=========================

15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

गाळाची जमीन 

काळी जमीन.   √

तांबडी जमान

रेताड जमीन

=========================

16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.

पाडेगाव

कोर्इमतूर

कानपूर

मांजरी.   √

=========================

17.  ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

दिल्ली

चेन्नर्इ

मुंबर्इ.   √

हैद्राबाद

=========================

18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.

महाराष्ट्र

केरळ .  √

प. बंगाल

तमिळनाडू

=========================

19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?

मुंबई

दिल्ली.   √

मद्रास 

बंगलोर

=========================

20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?

अरबी समुद्र .   √

बंगालचा उपसागर  

हिंदी महासागर   

पॅसिफिक महासागर