Monday 28 November 2022

विज्ञान मैत्री प्रश्नमंजूषा



🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही 

गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती


● गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती

1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)
- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात
- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था

2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)
- कमी गुणसूत्रामुळे
- स्त्रीयांमध्ये आढळतो

3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)
- जास्त गुणसूत्रामुळे
- पुरूषांमध्ये आढळतो

● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती

1. वर्णकहीनता (Albinism)
- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे

2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)
- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.
- आनुवांशिक आजार

©माहिती संकलन: वैभव शिवडे
@VJSeStudy Online Learning Platform
YouTube I Telegram I Facebook

विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?


उत्तर -- पांढ-या पेशी

--------------------------------------------------

२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?


उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार

--------------------------------------------------

३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?


उत्तर -- मांडीचे हाड

--------------------------------------------------

४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?


उत्तर -- कान

--------------------------------------------------

५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?


उत्तर -- सुर्यप्रकाश

--------------------------------------------------

६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?


उत्तर -- टंगस्टन

--------------------------------------------------

७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?


उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद

--------------------------------------------------

८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?


उत्तर -- न्यूटन

--------------------------------------------

९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?


उत्तर -- सूर्य 

------------------------------------------------

१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?


उत्तर -- नायट्रोजन.

पोलीस भरती विशेष तयारी. नद्या व त्यांच्यावरील धरणे

भीमा - उजनी (सोलापूर)

कृष्णा - धोम (सातारा)

प्रवरा - भंडारदरा (अहमदनगर)

वैतरणा - मोडकसागर (ठाणे)

पेंच - तोतलाडोह (नागपूर)

भोगावती - राधानगरी (कोल्हापूर)

अंबी, मोसी, मुठा - खडकवासला (पुणे)

दारणा - दारणा (नाशिक)

गाढवी - इटियाडोह (गोंदिया)

बिंदुसरा - बिंदुसरा (बीड)

मुळा - मुळशी (पुणे)

वारणा - चांदोली (सांगली)

दक्षिण पूर्णा - सिद्धेशवर (हिंगोली)

दक्षिण पूर्णा - येलदरी (हिंगोली)

गोदावरी - गंगापूर (नाशिक)

वेळवंडी - भाटघर (पुणे)

तिल्लारी - तिल्लारी (कोल्हापूर)

नीरा - वीर (पुणे)

सिंदफना - माजलगाव (बीड)

गोदावरी - जायकवाडी (औरंगाबाद)

अंबी - पानशेत (पुणे)

पैनगंगा - पैनगंगा (बुलढाणा)

कोयना - कोयना (सातारा)

गिरणा - चाणकपूर (नाशिक)

नळगंगा - नळगंगा (बुलढाणा)

तानसा - तानसा (ठाणे)

अडाण - अडाण (वाशिम)

अनेर - अनेर (धुळे)

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण

●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)

●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण

●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव

●›› गडचिरोली जिल्हा : दिना

●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह

●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा

●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)

●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे

●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव

●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,

●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.

●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण

●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण

●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण

●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)

●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी

●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण

●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप

●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी

●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा

●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)

●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)

●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण

●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)

●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.
_________________________________

रासायनिक गुणधर्मानुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार :



🔘आम्लधर्मीय खडक : 

आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत असते. अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असते. हे खडक वजनाने हलके असून त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. घट्ट लाव्हारसापासून त्याची निर्मिती होत असल्याने या खडकांची उंची जास्त, पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे.


🔘अल्कधर्मीय खडक : 

या प्रकारच्या अग्निजन्य खडकात ४०% सिलिका व ४०% मॅग्नेशियमचे प्रमाण असते. आयर्न ऑक्साइड व इतर पदार्थ २०% असतात. या खडकाचा रंग काळा असून त्याची झीज लवकर होते. बेसॉल्ट हे याचे उदाहरण आहे. पातळ लाव्हारसापासून हे खडक तयार होत असल्याने भूपृष्ठावर दूरवर पसरलेले असतात.


🔶अग्निजन्य खडकांचे गुणधर्म :

* अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात. निरनिराळ्या आकारांचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे, एकसंध झालेले असतात.

* हे खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये थर आढळत नाहीत, परंतु जोड असतात.

* या खडकांमध्ये छिद्र नसते. त्यात पाणी मुरत नाही.

* अग्निजन्य खडकांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत, परंतु अनेक प्रकारची खनिजे आढळतात.

नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती.


🧩जग : वनसंपत्ती...


🅾️ उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


🅾️ मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


🅾️ समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


🅾️ सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


🧩जग : पशुसंपत्ती ..


🅾️ समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


🅾️ उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


🅾️ परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


🅾️ परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


🅾️परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


🅾️परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


🧩जग : खनिजे व ऊर्जासाधने..


l🅾️ लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


🅾️मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


🅾️ बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


🅾️ जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


🅾️ तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


🅾️ चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


🅾️ सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


🅾️ कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


🅾️निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


🅾️ करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


🅾️शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


🅾️ गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


🅾️ खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


🅾️ नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


🅾️ दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


🅾️ हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


🧩जग : शेती 


🅾️गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


🅾️ तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


🅾️मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


🅾️जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


🅾️ बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


🅾️ डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


🅾️सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


🅾️ भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


🅾️खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


🅾️ पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


🅾️ बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


🅾️ सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


🅾️ चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


🅾️ कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


🅾️कशर - स्पेन, भारत, इराण.


🅾️ कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


🅾️ कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


🅾️ ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


🅾️ तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


🅾️ रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


🅾️ ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


🅾️ फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.

महाराष्ट्रात आढळणारी खनिजे


⚜️ कोळसा - नागपुर,चंद्रपूर,वर्धा,यवतमाळ


⚜️ मगनीज - नागपुर,भंडारा, सिंधुदुर्ग


⚜️ लोहखनिज - चंद्रपूर,गडचिरोली,सिंधुदुर्ग


⚜️ चनखडक - चंद्रपूर,यवतमाळ


⚜️ डोलोमाइट - चंद्रपूर,नागपूर, यवतमाळ


⚜️ कायनाईट सिलिमनाईट - भंडारा


⚜️ बॉक्साइट - कोल्हापूर,रायगड,ठाणे,सातारा


⚜️ सिलिका वाळू - सिंधुदुर्ग,रत्नागिरी,कोल्हापूर


⚜️ करोमाइट - नागपूर,भंडारा,सिंधुदुर्ग


⚜️ बराइट - चंद्रपूर


⚜️ तांबे - नागपूर, चंद्रपूर


⚜️ जस्त - नागपूर


⚜️ टगस्टन - नागपूर


⚜️ फलोराइट - चंद्रपूर


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान


 
* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून
दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त
प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर

कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले
जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक करतो.

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था


.

* जमीनदारांची संघटना

१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.


* "इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.


* ब्रिटिश इंडियन असोसिएशन

०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.


* ईस्ट इंंडिया असोसिएशन

१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.


* पुणे सार्वजनिक सभा

०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.

०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.


* मद्रास महाजन सभा

मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.


* इंडियन असोसिएशन

०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.

०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.


* इंडियन नॅशनल युनियन

१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.


* २६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.


* भारतातील कामगार चळवळ

०१. १८५० ते १९०० हा भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड आहे . या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक

प्रश्नमंजुषा


१.  "स्वच्छ रेल स्वच्छ भारत २०१९" अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे? 

१. जयपूर ✍️✍️

२. जोधपूर 

३. दुर्गापूर 

४. अहमदाबाद


२.  एक्स ईस्टर्न ब्रिज-५ संबंधित खालील विधानांचा विचार करा : 

अ. भारत आणि ओमान दरम्यान हा द्विपक्षीय संयुक्त वायुसेना लष्करी अभ्यास आहे. 

ब. हा लष्करी सराव ओमानच्या हवाई दलाच्या बेस मासिराह येथे आयोजित करण्यात आला. 

वरील कोणती विधाने अचूक आहेत. 


१. केवळ अ

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्हीही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


३.  मानव विकास निर्देशांक संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.

अ) या निर्देशांकात भारताचा क्रमांक १२२ आहे. 

ब) निर्देशांकाची गणना ४ प्रमुख निर्देशांकांनुसार केली जाते. 

क) यूएनडीपी दरवर्षी ही क्रमवारी प्रसिद्ध करते. 


१. केवळ अ आणि ब 

२. केवळ ब आणि क ✍️✍️

३. केवळ अ आणि क 

४. सर्व


४.  युनोकडुन कोणता दिवस 'जागतिक आनंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो? 

१. २१ मार्च 

२. २४ एप्रिल 

३. २३ मार्च 

४. २० मार्च ✍️✍️


५.  'गोल्डमँन पर्यावरण पुरस्कार' च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 

अ. आतापर्यंत चार भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

ब. प्रफुल्ल सामंतारा यांना वर्ष २०१९ मध्ये आशिया प्रदेशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही 

४. अ आणि ब दोन्ही नाही✍️✍️


६.  आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय पँनल आँफ मँच रेफ्री म्हणून नियुक्त होणा-या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?

१. दीप्ती शर्मा 

२. जी. एस. लक्ष्मी ✍️✍️

३. अंजुम चोप्रा 

४. रूमेली धर


७.  जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश अभ्यासक्रमात करणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? 

१. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ✍️

२. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर 

३. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती 

४. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक


८. १९४२ च्या 'चलेजाव' आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी 'भुमीगत चळवळीत' भाग घेतला? 

अ. डॉ. राम मनोहर लोहिया 

ब. जयप्रकाश नारायण 

क. पंडित जवाहरलाल नेहरू 

ड. एस. एम. जोशी 

१. फक्त अ, ब, क 

२. फक्त अ, ब, ड ✍️✍️

३. फक्त ब, क, ड 

४. अ, ब, क, ड


९.  खालीलपैकी कोणी "हिंदू सेवा संघ" ची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले?

१. दामू आण्णा टोकेकर ✍️✍️

२. काँ. रेवजी पांडुरंग चौधरी 

३. काँ. देवजीभाई 

४. बाळासाहेब खेर


१०.  खालील विधान कोणाचे आहे ते ओळखा :

अ. " आम्ही गुलामांप्रमाणे नांदणार नाहीत. "

ब. " राजकीय सुधारणा मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चळवळ. "

१. विधान अ: दादाभाई नौरोजी,  विधान ब: लोकमान्य टिळक 

२. विधान अ: लोकमान्य टिळक,  विधान ब: दादाभाई नौरोजी 

३. विधान अ, ब: दादाभाई नौरोजी ✍️✍️

४. विधान अ, ब: लोकमान्य टिळक


११.  खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 

अ. २६ आँगस्ट १८५२ रोजी बाँम्बे असोसिएशनची स्थापना झाली तेव्हा, बबनजी होरमसजी आणि खरसेटजी जमशेटजी उपाध्यक्ष होते.

ब. या संस्थेचे चिटणीस होते भाऊ दाजी आणि विनायकराव जगन्नाथजी 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


१२. एलफिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक इंग्रज प्राध्यापकाने "भारताची आशा" असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले आहे? 

१. गोपाळ कृष्ण गोखले 

२. गोपाळ गणेश आगरकर 

३. दादाभाई नौरोजी✍️✍️ 

४. स्वामी दयानंद सरस्वती


१३.  खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री. एस. एस. खेरा  यांनी म्हटले आहे?

१. मंत्रिमंडळ 

२. मंत्रिमंडळ सचिवालय ✍️✍️

३. लोकसभा व राज्यसभा 

४. वरील सर्व


१४.  अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबतची तरतुद  राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?

१. कलम ३३५✍️✍️

२. कलम १७

३. कलम ३४०

४. कलम ३३८


१५.  प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात कोणी केले?

 उत्तर : अँरिस्टाँटल✍️✍️

MPSC अधिकारी प्रश्नमंजुषा


1)प्राणी आणि वनस्पती पेशींनी बनलेले असतात व पेशी हाच सजीवांचा पायाभूत घटक आहे हे कोणी सिद्ध केले ?

1)राॅबर्ट  हूक

2)ॲटनी लिव्हेनहूक

3)श्लायडेन व थिओडोर✅✅

4)आर विरशा




2)वायू ऊती कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतात ? 

1)वाळवंटातील वनस्पती 

2)जलिय वनस्पती ✅✅

3)वेली

4)1 & 2




3)ताग , अंबाडी , नारळ यांच्या खोडात , शिरात व बियावरील कवचात कोणत्या मृत ऊती असतात ?


1)  मूल ऊती 


2)  स्थूलकोन ऊती 


3)  सरलस्थायी ऊती 


4)  दृढ ऊती✅✅




4)वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

1) सल्फर

2) पलाश

3) मॅग्नेशियम 

4) जस्त✅✅




5) पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो ?

1) बोराॅन 

2) माॅलीब्डेनम 

3) कोबाल्ट

4) लोह✅✅




6) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही ?  

1) फिलीसीनी 

2) मुसी✅✅

3) लायकोपोडियम 

4) इक्विसेटिनी




7) भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे ?

1)  लुधियाना 

2)  महाबळेश्वर 

3)   कर्नाल✅✅

4)  गोरखपूर




8) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 

अ) काष्ठमय वनस्पतीच्या  झाडांच्या सालातील पेशी मृत असतात. 

ब)काष्ठमय वनस्पतीच्या झाडांच्या सालातील पेशीमध्ये आंतरपेशीय पोकळ्या नसतात.  


1)  फक्त अ बरोबर 

2)  फक्त ब बरोबर 

3)  अ , ब दोन्ही बरोबर ✅✅

4)  अ , ब दोन्ही चूक


NTPC Important Questions



प्रश्न 1. अंतरिक्ष यात्री को बाह्य आकाश कैसा दिखायी पड़ता है?

उतर - काला


प्रश्न 2. दूरबीन का आविष्कार किसने किया था?

उतर - गैलिलियो ने


प्रश्न 3. दिल्ली स्थित महात्मा गाँधी की समाधि का क्या नाम है ?

उतर - राजघाट


प्रश्न 4. भारत में पहली रेल कहाँ से कहाँ तक चली?

उतर - बम्बई (वर्तमान मुंबई) से थाने तक


प्रश्न 5. भारत में पहली बार मेट्रो रेल सेवा किस नगर में आरम्भ की गई?

उतर - कोलकाता


प्रश्न 6. भारत में रेल का आरम्भ किस सन में हुआ?

उतर - 1853


प्रश्न 7. प्रथम भारतीय अंतरिक्ष यात्री कौन थे ?

उतर - स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा , 1984 में


प्रश्न 8. भारत की प्रथम महिला मुख्यमंत्री कौन थी ?

उतर - श्रीमती सुचेता कृपलानी


प्रश्न 9. हरियाणा के पहले मुख्यमंत्री कौन थे ?

उतर - पं. भगवत दयाल शर्मा


प्रश्न 10. संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब हुई ?

उतर - 24 अक्तूबर 1945


प्रश्न 11. संयुक्त राष्ट्र संघ का मुख्यालय कहाँ स्थित है ?

उतर - न्यूयॉर्क


प्रश्न12. संयुक्त राष्ट्र संघ के पहले महासचिव कौन थे?

उतर - त्रिग्वेली


प्रश्न 13.इस समय संयुक्त राष्ट्र संघ के कितने देश सदस्य हैं ?


उतर - 193


प्रश्न 14. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के कितने देश सदस्य होते हैं ?

उतर - 15


प्रश्न 15. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के कितने देश स्थाई सदस्य हैं?

उतर - 5


प्रश्न 16.अंतरराष्ट्रीय न्यायालय कहाँ स्थित है ?

उतर - द हेग, हॉलैंड में


प्रश्न 17. संयुक्त राष्ट्र संघ के वर्तमान महासचिव कौन है ?

उतर - बान-की-मून


प्रश्न 18. संयुक्त राष्ट्र महासभा में हिंदी में भाषण देने वाले भारतीय कौन थे ?

उतर - अटल बिहारी वाजपेयी


प्रश्न 19. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के अस्थायी सदस्य कितने वर्ष के लिये चुने जाते हैं ?

उतर - 2 वर्ष


प्रश्न 20. संयुक्त राष्ट्र संघ का 193वां सदस्य कौनसा देश बना था ?

उतर - दक्षिण सूडान


प्रश्न 21. किस विटामिन की कमी से खून का रुकाव बंद नहीं होता ?

उतर - विटामिन K


प्रश्न 22. हिंदी दिवस कब मनाया जाता है ?

उतर - 14 सितंबर


प्रश्न 23. संविधान के किस अनुच्छेद द्वारा हिंदी को राष्ट्रभाषा घोषित किया गया ?

उतर - अनुच्छेद 343


प्रश्न 24. ओलंपिक खेलों की एकल स्पर्धा में स्वर्ण पदक जीतने वाले एकमात्र भारतीय कौन है ?

उतर - अभिनव बिंद्रा


प्रश्न 25. ओलंपिक खेलों का आयोजन कितने वर्षों बाद होता है?

उतर - 4 वर्ष


प्रश्न 26. सन 2016 में ओलंपिक खेल कहाँ होंगे ?

उतर - रियो डी जिनेरो


प्रश्न 27. अन्तर्राष्ट्रीय मानव अधिकार दिवस कब मनाया जाता है ?

उतर - 10 दिसंबर

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ...

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)


• राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर


• नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)


• कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)


• बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)


• महात्मा फुले- पुणे


• महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)


• गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)


• गोपाळ हरी देशमुख- पुणे


• न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)


• सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)


• बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)


• आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-

शिरढोण (रायगड)


• आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)


• स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)


• सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)


• विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)


• गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)


• विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)


• डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)


• साने गुरुजी- पालघर (रायगड)


• संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)


• सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)


• संत ज्ञानेश्वर- आपेगाव


• संत एकनाथ- पैठण-


• समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--

           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली. 

मृत्यू २७ सप्टेंबर १८३३


(२) स्वामी विवेकानंद :--

            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे 

भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण. 


(३) रवींद्रनाथ टागोर :--

            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली 

हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१. 


(४) न्यायमूर्ती रानडे :--

           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१. 


(५)लोकमान्य टिळक :--

             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.


(६) महात्मा गांधी :--

            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली 

लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८. 


(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--

              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे 

पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार. 


(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--

         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६. 


(९) सुभाषचंद्र बोस :--

               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते. 


(१०) इंदिरा गांधी :--

               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या 

पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

चवदार तळे सत्याग्रह

▪ महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून केला सत्याग्रह होता.

▪ चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्तिसंग्राम म्हणून ही ओळखले जाते. यामुळेच हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.

▪ हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेमुळे उच्चजातीय अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे वागवत असत.अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास परवानगी नव्हती.

▪ मुंबई कायदे मंडळाने 1923 साली एक महत्वपूर्ण निर्णय पारित करत सार्वजनिक पाण्याच्या जागा, विहिरी, धर्मशाळा, शाळा, न्यायालये, यांमध्ये अस्पृश्यांनाही परवानगी आहे असे म्हटले होते.

▪ महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी 1924 साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.

▪ अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून  19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला.

▪ याच अनुषंगाने 20 मार्चला महाड चवदार तळ्याचे पाणी पिऊन समतेचा हक्क सिद्ध करायचा या निर्धाराने सर्वजण तळ्याकडे गेले आणि आधी बाबासाहेब आणि नंतर सर्वांनी पाणी प्राशन करून आपला समतेचा संदेश दिला.

▪ सत्याग्रहाच्यावेळी अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्र गोविंद टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे यांचे चांगले सहकार्य लाभले.

▪ या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर, रामचंद्र बाबाजी मोरे, शिवराम गोपाळ जाधव, केशवराव आणि गोविंद आद्रेकर आदी कार्यकर्त्यांचा सत्याग्रहात  महत्वाचा सहभाग होता.

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले.

🅾मूळ आडनाव – गोह्रे

🅾जन्म – 11 मे 1827

🅾मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

🅾1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

🅾1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

🧩उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन
परिचय :

🅾आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

🧩शिक्षण:

🅾फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.
परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

🅾अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.

🧩विवाह:

🅾महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.
त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

🧩पुढील शिक्षण :

🅾इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

🧩संस्थात्मक योगदान :

🅾3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

🅾1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.
1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

🅾10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

🅾व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.
1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

🧩महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

🅾1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).1868 - 'ब्राम्हणांचे कसब'
1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

🅾1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

🅾1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.अस्पृश्यांची कैफियत.
शिवाजी महाराजांचा पोवाडा.

🧩वैशिष्ट्ये :

🅾थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

🅾1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.
2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.
ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

🅾उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.
सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...