Monday 28 November 2022

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले.

🅾मूळ आडनाव – गोह्रे

🅾जन्म – 11 मे 1827

🅾मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

🅾1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

🅾1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

🧩उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन
परिचय :

🅾आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

🧩शिक्षण:

🅾फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.
परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

🅾अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.

🧩विवाह:

🅾महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.
त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

🧩पुढील शिक्षण :

🅾इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

🧩संस्थात्मक योगदान :

🅾3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

🅾1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.
1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

🅾10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

🅾व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.
1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

🧩महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

🅾1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).1868 - 'ब्राम्हणांचे कसब'
1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

🅾1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

🅾1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.अस्पृश्यांची कैफियत.
शिवाजी महाराजांचा पोवाडा.

🧩वैशिष्ट्ये :

🅾थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

🅾1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.
2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.
ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

🅾उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.
सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...