Sunday 26 January 2020

विषय = अर्थशास्त्र प्रश्नसंच

८२१) अर्थशास्त्राचे जनक, भांडवलशाहीचे जनक राष्ट्राची संपत्ती या सर्वाचा कोणत्या अर्थशास्त्रज्ञ संदर्भ येतो?
अ) रॉबीन सन्स    ब) मार्शल    क) अॅडम स्मीथ     ड) थॉमस
१) वरील सर्व बरोबर    २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर      ४) ब आणि ड चूक

८२२) भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणत्या पंतप्रधानानी केला?
१) लाल बहादुर शास्त्री    २) पंडित जवाहरलाल नेहरू
३) डॉ. मनमोहनसिंग      ४) वरीलपैकी एकही नाही

८२३) भारतीय अर्थव्यवस्थेत सातत्याने कोणत्या क्षेत्राचा वाटा वाढत आहे?
अ) सेवा       ब) उद्योग    क) कृषी    ड) सेवा व उद्योग
१) वरील सर्व बरोबर    २) वरील सर्व चूक
३) फक्त अ बरोबर      ४) ब आणि ड चूक

८२४) श्रमाच्या बदल्यात जे देयके दिले जाते. त्यास.. म्हणतात?
अ) व्याज        ब) खंड       क) वेतन       ड) नफा
१) वरील सर्व बरोबर       २) वरील सर्व चूक
३) फक्त क बरोबर        ४) ब आणि ड चूक

८२५) औद्योगिक अर्थव्यवस्थेचे निकष सांगा.
अ) अर्थव्यवस्थेत द्वितीयक क्षेत्राचा वाटा ५०%
ब) एकूण श्रमिकापैकी ५०% श्रमिक असावेत
क) अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचा वाटा ५०%
१) अ, ब आणि क बरोबर       २) सर्व चूक
३) फक्त अ बरोबर              ४) अ आणि ब बरोबर

उत्तर :- ८२१ -३, ८२२ -२, ८२३ -३, ८२४ -३, ८२५ - ४.
===========================

संपूर्ण पणे जाणून घ्या :- 'स्वर भास्कर 'पंडित भीमसेन जोशी'

भारतरत्न' पंडित भीमसेन जोशी यांचा आज (24 जानेवारी) स्मृतिदीन. धारवाड जिल्ह्यातील रोण येथे 14 फेब्रुवारी 1922 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते व त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्यांच्या काळातील नाणावलेले गायक होते.

भीमसेन यांना लहाणपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायन शिक्षकाची नेमणूक केली. मात्र त्यांचे इतक्यात समाधान न झाल्याने ते गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंधर, कलकत्ता आदी ठिकाणी फिरले.

दरम्यान त्यांनी काही काळ लखनऊच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरीही केली. शेवटी त्यांनी सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांचेकडे गाण्याची दीक्षा घेतली. ते गुरुसेवा करून अति कष्टाने गानविद्या शिकले. सवाई गंधर्वानीही त्यांना 5 वर्षे चांगली शिकवण दिली.

सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांनी भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँ यांच्या गायकीचे विशेष आत्मसात करून किराणा शैली समृद्ध केली.

भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ 1952 पासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल 1942 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे संगीत मैफिलींसाठी त्यांची धावपळ वाढली. दरम्यान वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करत असत.

भीमसेन जोशी यांनी 1940 च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील प्रसिद्ध गायकांकडून ठुमरी शिकून घेतली. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे हजारो कार्यक्रम केले.

भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी व कर्नाटकी या 2 प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या गोष्टी हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत असत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.

अशा या महान गायकाचे 24 जानेवारी 2011 रोजी पुणे येथे वयाच्या 88 व्या वर्षी देहावसान झाले.

शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक नक्की वाचून पहा

🎖 पुरस्कार : पंडितजींना खालील अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविण्यात आले.

● 4 नोव्हेंबर 2008 : भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार
● 1985 : पद्मभूषण पुरस्कार
● 1976 : संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
● 1972 : पद्मश्री पुरस्कार
● 1971 : संगीत-रत्न

जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी दिली, तर पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डि. लिट्. ही पदवी दिली.

👍 इतर पुरस्कार : पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार आदी. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले आहे.

विषय = इतिहास प्रश्नसंच

७२६) लक्ष्मीबाई टिळक यांच्याबाबत पुढील विधाने वाचा चुकीचे विधान ओळखा.

१) 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२) नारायण वामन टिळक हे त्यांच्या पतीचे नाव.
३) लक्ष्मीबाई टिळक व त्यांचे पती नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
४) ब्राह्मण कन्या विवाह विचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१)२ ४,          २)४,        ३) १ व २,        ४) २

७२७) विधाने वाचा समाजसुधारक स्त्री ओळखा.
१) १९२० मध्ये पुण्यात मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला.
२) स्त्रियांना मतधिकार मिळावेत यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतले होते.
३) येरवडा तुरुंगाच्या त्या मानद सचिव होत्या.
४) गांधीजींच्या मते, त्या वैधव्य जीवनाचा आदर्श होत्या.

१) अवंतिका गोखले,        २) पंडिता रमाबाई,
३) अनुसया काळे,           ४) रमाबाई रानडे

७२८) विधाने वाचा समाजसुधारक ओळखा.

१) 'वेदोक्त धर्म प्रकाश' या ग्रंथाचे ते लेखक होते.
२) पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, बाल विवाह, समुद्र पर्यटन, सती याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते.
३) मार्क्सच्या विचारांशी त्यांचे विचार काही प्रमाणात जुळतात.

१) विष्णुशास्त्री चिपळूणकर,       २) विष्णुबुवा ब्रह्मचारी,
३) विष्णुशास्त्री पंडित,             ४) रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक

७२९) गोपाळराव जोशी यांच्या बाबत पुढील विधाने वाचा. बरोबर विधान ओळखा.
१) गोपाळराव जोशी हे एक विक्षिप्त,जिद्दी,तहेवाईक,जिभेला हाड नसलेले व कशाचा धरबंध नसणारे एक सामान्य गृहस्थ होते. ते पोस्ट खात्यात नोकरीस होते.
२) गोपाळराव जोशी यांनी आपली पत्नी आनंदीबाई जोशींच्या मृत्युनंतर ४ वर्षानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
३) श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रपर कादंबरीमुळे व त्यावर अंधारलेल्या नाटकामुळे गोपाळराव जोशी हे नाव महाराष्ट्राला माहित झाले.
४) आगरकरांची निंदानालस्ती करण्यात ते आघाडीवर होते.
आगरकरांची जिवंतपणीच त्यांनी प्रेतयात्रा काढली होती.

१)१ व ३,           २) १,२,३,४,        ३) १,३,४,         ४)१ व २

७३०) त्र्यंबकजी डेंगळे यांचे दोन पुतणे गोदांजी व महिपा यांनी L000 .... ची पलटण उभी केली होती.
१) भिल्ल,        २) रामोशी,           ३) कोळी,         ४) यापैकी

उत्तर - ७२६- २, ७२७- ४, ७२८-२, ७२९ -२, ७३०-१

तामिळनाडू सरकार राज्यपातळीवर ‘एक राज्य, एक रेशन कार्ड’ योजना राबवत आहे.

🔰 भारत सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजनेच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडू सरकारने रेशनकार्डांची आंतरराज्य मान्यता देण्यासाठीच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

🔰 या योजनेमुळे राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना राज्यातल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे.

☑️ योजनेविषयी..

🔰 ही योजना प्रायोगिक तत्वावर थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे आणि नंतर ती राज्यभरात लागू केली जाणार.

🔰 राज्यभरात सध्या 35,233 स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी एकूण 9,635 ही अर्धवेळ दुकाने आहेत. एकूणच 2,05,03,379 कुटुंबांना स्मार्ट रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत.
ही योजना स्थलांतरित कामगारांना उपयुक्त ठरणार. ते स्मार्ट कार्ड, आधार कार्ड किंवा OTP मार्फत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचा वापर करून त्यांच्या हक्काच्या वस्तू मिळवू शकतात.
‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना

🔰 1 जून 2020 पासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना लागू होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातल्या कोणत्याही भागातून सध्याच्या रेशनकार्डवरच स्वस्त धान्य घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

🔰 'एक देश, एक रेशन कार्ड' या योजनेचा सर्वात मोठा फायदा दैनंदिन मजूर, कामगार आणि स्थलांतरित कामगारांना होणार आहे. देशभरात 'एक देश, एक रेशन कार्ड' ही योजना लागू करण्यापूर्वी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प म्हणून राबविण्यात आला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विज्ञान प्रश्नसंच

1)सामन्यत: सूक्ष्मजीव  असतात.
एकपेशी
बहुपेशी
अतिसूक्ष्म
विविध आकारांचे
A. एकपेशी
-----------------------------------------------------------------------------
2) प्रकाश संश्लेषनात _ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
हरितद्रव्यामुळे
झथोफिलमुळे
कॅरोटीनमुळे
मग्नेशिंअममुळे
A. हरितद्रव्यामुळे
-----------------------------------------------------------------------------
3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.
पोषण
स्वयंपोषण
परपोषण
अंत:पोषण
A. पोषण
-----------------------------------------------------------------------------
4) _ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.
पेशी - भित्तिका
प्रद्रव्य पटल
पेशीद्रव्य
केंद्रक
A. पेशी - भित्तिका
-----------------------------------------------------------------------------
5) ___ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.
पेशी
उती
अवयव
अणु
A. पेशी
-----------------------------------------------------------------------------
6)  संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.
प्लटिहेल्मिन्थस
पोरीफेरा
आर्थ्रोपोडा
ईकायनोडर्माटा
C. आर्थ्रोपोडा
-----------------------------------------------------------------------------
7) किण्वन हा ___ चा प्रकार आहे.
ऑक्सिश्वसन
विनॉक्सिश्वसन
प्रकाशसंश्लेषण
ज्वलन
B. विनॉक्सिश्वसन
-----------------------------------------------------------------------------
8) अहरित वनस्पती  असतात.
स्वयंपोषी
परपोषी
मांसाहारी
अभक्षी
B. परपोषी
-----------------------------------------------------------------------------
9) सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
प्रकाश प्रारणांच्या
विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
अल्फा प्रारणांच्या
गामा प्रारणांच्या
B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
-----------------------------------------------------------------------------
10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _ प्रारणांचा मारा करतात.
अल्फा
बिटा
गामा
क्ष-किरण
C. गामा
-----------------------------------------------------------------------------
11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.
M
N
A
X
B. N
-----------------------------------------------------------------------------
12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.
०.०३%
०.३%
३%
०.००३%
A. ०.०३%
-----------------------------------------------------------------------------
13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.
फिलीसीनी
मुसी
लायकोपोडियम
इक्विसेटीनि
B. मुसी
-----------------------------------------------------------------------------
14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.
सेल्युलेज
पेप्सीन
सेल्युलीन
सेल्युपेज
A. सेल्युलेज
-----------------------------------------------------------------------------
15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.
४'C
२५'C
०'C
७३'C

A. ४'C

-----------------------------------------------------------------------------
16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.
अवअणू
अणू
रेणू
पदार्थ
C. रेणू
-----------------------------------------------------------------------------
17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
आयोडीन-१२५
सामारिअम-१५३
ल्युथिनिअरम-१७७
सेसिअम-१३७
A. आयोडीन-१२५
-----------------------------------------------------------------------------
18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
१०० डी.बी.च्या वर
११० डी.बी.च्या वर
१४० डी.बी.च्या वर
१६० डी.बी.च्या वर
A. १०० डी.बी.च्या वर
-----------------------------------------------------------------------------
19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन...
कमी होते
वाढते
सारखेच राहते
शून्य होते
A. कमी होते
-----------------------------------------------------------------------------
20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते?
पाणी
अल्कोहोल
इथेनॉल
सेंद्रिय पदार्थ
A. पाणी

महत्त्वाचे 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे

1) भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट कोण बनली आहेत?
उत्तर : लेफ्टनंट शिवांगी

2) ‘YSR मत्स्यकारा भरोसा’ योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

3) ‘आंतरराष्ट्रीय बाल शांती परितोषिक 2019’ कोणी जिंकले?
उत्तर : ग्रेटा थुनबर्ग

4) “हाऊ ए फॅमिली बिल्ट ए बिजनेस अँड ए नेशन” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : गिरीश कुबेर

5) “अॅग्रोव्हिजन 2019” या भारताच्या प्रमुख कृषी शिखर परिषदेची संकल्पना काय आहे?
उत्तर : स्मार्ट टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट

6) “शिखर से पुकार” हे शब्द कशाशी संबंधित आहे?
उत्तर : जलसंधारण विषयक माहितीपट

7) दहशतवादविरोधी टेबल-टॉप सराव प्रथम कोणत्या संस्थेकडून आयोजित करण्यात आला?
उत्तर : राष्ट्रीय अन्वेषण विभाग

8) ‘कार्टोसॅट-3 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे?
उत्तर : PSLV C47

9) आरबीआयच्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा किती आहे?
उत्तर : 448.249 अब्ज डॉलर

10) ‘जागतिक दूरदर्शन दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 21 नोव्हेंबर

अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

- भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या काही तास आधी घोषणा करण्यात आली.

-  भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली,
-  माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
-  माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर
झाला आहे.

- क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या - खासदार मेरी कोम,
- छन्नुलाल मिश्रा,
- अनेरूद जुगुनाथ जीसीएसके,
- विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा - - मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

▪️पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावाची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

- माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्म भूषण -माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

- आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी
- मुमताज अली,
- सय्यद मुझीम अली (मरणोत्तर),
- मुझफ्फर हुसेन बेग,
- कला क्षेत्रातील कार्यासाठी अजोय चक्रवर्ती,
- मनोज दास,
- बालकृष्ण दोशी,
- क्रिष्णम्मल जगन्नाथन,
- एस. सी. जमीर,
- अनिल प्रकाश जोशी,
- डॉ. त्सेरिंग लंडोल,
- आनंद महिंद्रा,
- निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर),
- जगदीश शेठ,
- बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू,
- वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

▪️महाराष्ट्रातील या मान्यवरांचा गौरव -
पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

- भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान,
- डॉ. रमण गंगाखेडकर,
- चित्रपट दिग्दर्शक करण जोहर,
- ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी,
आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार,
- दिग्दर्शक एकता कपूर,
- बीजमाता राहीबाई पोपेरे,
- अभिनेत्री कंगना राणौत,
- गायक अदनान सामी,
- सामाजिक कार्यकर्ते सय्यद मेहमूद शाह कादरी उर्फ सय्यदभाई,
-  साँड्रा डिसूझा,
- गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
-----------------------------------------------

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी.

🎆 युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा मार्ग मोकळा झाला आहे. 

🎆 डाउनिंग स्ट्रिट इथं युरोपीय महासंघ आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर जॉन्सन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. 

🎆 ब्रिटनच्या नागरिकांच्या जनमताचा आदर ठेवून, येत्या ३१ जानेवारीपासून युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर आपण स्वाक्षरी केली असल्याचं, जॉन्सन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

भारताच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ.

🎆 जानेवारीच्या १७ तारखेला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन संपत्तीत ८६७ दशलक्ष डॉलर्सची वाढ होऊन ती ४२८.४५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोचली, यामुळे भारताच्या परकीय गंगाजळीत ९४३ दशलक्ष अमेरिकी डॉर्लसची घसघशीत वाढ होऊन, ती ४६२.१६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पोचली आहे. हा आजवरच्या उच्चांक आहे. 

🎆 याच आठवड्यात भारताचा सुवर्णसाठी ७० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सनं वाढून २८ पूर्णांक ५६ दशांश अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोचला आहे.

🎆 यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतही भारताचा वाटा ३ दशलक्ष डॉलर्सनं वाढून, ३.७० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोचला आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१साठीचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार.

🎆 १ फेब्रुवारी रोजी २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

🎆 गेल्यावर्षी सरकारने गृहक्षेत्रासाठीच्या विविध योजनांना प्राधान्य दिले होते. त्याअनुषंगाने सरकारे अनेक घोषणा केल्या होत्या. 

🎆 २०२२ पर्यंत शहरी भागात प्रत्येकाला घर देण्याची सरकारची मोहीम आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ८१ लाख घरांची घोषणा करण्यात आली होती.

🎆 यंदा १ कोटी ३ लाखांहून अधिक घरांना मंजूरी देण्यात आली आहे. दरम्यान, ३२ लाख घरे बांधून तयार आहेत. तर २८ लाखांहून अधिक घरांचे वाटपही करण्यात आलं आहे.

भारतीय संशोधन केंद्र

1. दक्षिण गंगोत्री
- Indian Antarctic Programme चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र
- स्थापना: 26 जानेवारी 1984
- बंद: 25 फेब्रुवारी 1990

2. मैत्री
- वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र
- स्थापना: जानेवारी 1989

3. भारती
- अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र
- या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते. 
- स्थापना: 18 मार्च 2012

4. IndARC
- भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र
- हे केंद्र आर्क्टिक भागात आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच


⚛⚛'हुँडाग्रस्त स्त्रियांच्या पुनर्वसनाच्या ' दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाने कोणती योजना सुरु केली?.
  
*1)* महिला कल्याण योजना

*2)* संजीवनी योजना
  
*3)* ग्रामीण रोजगार हमी योजना

*4)* माहेर योजना✅

⚛⚛*जिल्हा नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली?*
  
*1)* 1972✅

*2)* 1974
  
*3)* 1976

*4)* 1978

⚛⚛ चंद्र क्षितिजाजवळ असतांना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे

                          [राज्यसेवा_पूर्व_2011]

1) दृष्टीभ्रम(Optical illusion)✅✅✅अचूक उत्तर

2) वातावरणीय अपवर्तन
      (Atmospheric refraction)

3) प्रकाशाचे विकिरण
       (Scattering of light)

4( प्रकाशाचे अपस्करण
       (Dispersion of light)

⚛⚛. खालील विधाने विचारात घ्या.              [राज्यसेवा_मुख्य_2015]

अ. मूलभूत हक्क व्यक्तिसापेक्ष आहेत तर मार्गदर्शक तत्त्वे समाजसापेक्ष आहेत.

ब. राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट आहे.

क. एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्त्वे सकारात्मक आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे?

1) केवळ अ व ब

2)केवळ ब व क

3) केवळ अ व क

4) अ ब आणि क✅✅✅अचूक उत्तर

Note- काही मूलभूत हक्क नकारात्मक आहेत कारण ते राज्यास काही गोष्टी करण्यास प्रतिबंध करतात.

Eg. पदव्या, किताब नष्ट करणे

⚛⚛________यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.

                          [राज्यसेवा_पूर्व_2012]
                          [संयुक्त_पूर्व_2017]
1) महात्मा गांधी

2)लोकमान्य टिळक

3) महात्मा फुले✅✅✅अचूक उत्तर

4)दयानंद सरस्वती

⚛⚛ उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड या राज्यांची निर्मिती________या पंचवार्षिक योजनेत झाली.

                                 [PSI_पूर्व_2011]

1) नवव्या✅✅✅अचूक उत्तर

Note-

🌟9 वी पं वा यो
कालावधी-(1Apl,1997-31mar2002)

👉छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड या राज्यांची निर्मिती 2000 साली करण्यात आली.

2)सातव्या

3) आठव्या

4) वरीलपैकी नाही

⚛⚛ सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?
       
                                 [PSI_पूर्व_2012]

1) जमीनदार

2) राष्ट्रीय नेते

3)गिरणी कामगार✅✅✅योग्य उत्तर

4)व्यापारी

⚛⚛. चंद्र क्षितिजाजवळ असतांना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे

                          [राज्यसेवा_पूर्व_2011]

1) दृष्टीभ्रम(Optical illusion)✅✅✅अचूक उत्तर

2) वातावरणीय अपवर्तन
      (Atmospheric refraction)

3) प्रकाशाचे विकिरण
       (Scattering of light)

4) प्रकाशाचे अपस्करण
       (Dispersion of light)

⚛⚛ सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?
       
                                 [PSI_पूर्व_2012]

(1)  जमीनदार

(2) राष्ट्रीय नेते

(3) गिरणी कामगार✅✅✅योग्य उत्तर

4) व्यापारी

⚛⚛ नवेगाव राष्टीय उध्यान कोठे आहे ? ( अमरावती ग्रामीण पोलीस 2018 )
(1) ठाणे
(2) बोरीवली
(3) गोंदिया ✅✅✅
(4) चंद्रपूर

⚛⚛कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले? - 

फैजपूर⏩⏩
आवडी
मद्रास
रामनगर

⚛⚛चौरी - चौरा घटनेने ............. हे आंदोलन संपुष्टात आले? -

रौलट विरोधी सत्याग्रह
छोडो भारत
असहकार✅✅✅
सविनय कायदेभंग

⚛⚛मनाचे श्लोक व दासबोध" हे ग्रंथ कोणी लिहिले?

संत तुकाराम
संत तुकडोजी महाराज
समर्थ रामदास✅✅✅
संत ज्ञानेश्रर

⚛⚛मराठी भाषेतील वॄतपत्राचे जनक कोण?

म.गो. रानडे
लोकहितवादी
बाळशास्त्री जांभेकर✅✅✅✅
लोकमान्य टिळक

⚛⚛भावर्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिल?

विष्णूबुवा ब्रह्मचारी✅✅
विष्णूशास्त्री पंडित
कॄष्णशास्त्री चिपळूणकर
लो. टिळक

⚛⚛डोंगरीच्या तुरूंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला?

गो.ग. आगरकर✅✅✅✅
लोकमान्य टिळक
लोकहितवादी 
शि.म. परांजपे

⚛⚛मुंबर्इ येथे शारदा सदन ही संस्था कोणी सुरू केली?

पंडिता रमाबार्इ✅✅
सावित्रीबार्इ फुले
म.गो.रानडे
डॉ.रा.गो. भांडारकर

⚛⚛गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते?

रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे✅✅✅
सखाराम परांजपे
म.गो. रानडे
भाऊराव पाटील

⚛⚛तुम मुझे खुन दो, मै तुम्हे आझादी दूँगा' असे आव्हान कोणी केले?

चंद्रशेखर आझाद
नेताजी सुभाषचंद्र बोस✅✅✅
महात्मा गांधी
भगतसिंग

⚛⚛साने गुरूजींना कोणत्या पुस्तकामुळे उदंड किर्ती मिळाली?

श्यामची आर्इ✅✅✅
धडपडणारी मुले
ना खेद ना खंत
मनुबाबा

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...