Saturday 24 December 2022

राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🟣1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🟣2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🟣3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🟣4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🟣5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🟣6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🟣7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🟣8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🟣9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🟣10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

परश्न मंजुषा


Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3  २३ एप्रिल
4 १ व ३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1  २००७
2  २००४
3  २००५√√√√√√
4  २०१३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1  कामगारांची वाढती संख्या
2  अयोग्य तंत्रज्ञान
3  प्रभावी मागणीची     
कमतरता
4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1  १९४८-४९
2  १९३१-३२√√√√
3  १९११-१२
4  १८६७-६८

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1   चलन निश्चलीकरन
2   रुपयाचे अवमूल्यन√√√√
3   १ व २  दोन्ही घडले
4  १ व २ दोन्ही घडले नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1   बँकदर
2  रोख राखीव प्रमाण
3  वैधानिक रोखता प्रमाण
4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1  "से" चा बाजार विषयक नियम
2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3  एंजल चा नियम√√√√√
4  फिलिप्स वक्ररेषा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  दरडोई उत्पन्न
4  किमतीचा निर्देशांक√√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1   अ आणि ब  √√√√√
2   ब आणि क
3   क आणि ड
4  अ आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1  चीन -भारत युध्द
2  भारत पाकिस्तान संघर्ष
3  आर्थिक मंदी
4  राजकीय अस्थिरता √√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1  मुद्रा अवपात
2  मुद्रा संस्फीती√√√√√
3  स्टगफ्लेशन
4  स्टगनेशन

📖📖📖📖📖📖📖📖📖

[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1  यु एस ए √√√√√√ 
2  यु के 
3  चीन 
4  सिंगापूर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब  मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड  रिझर्व्ह बँक
1  अ आणि क
2  ब आणि  ड√√√√√√
3  ब आणि  क
4  क आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  परकीय चलन साठा
4  किमतीचा निर्देशांक√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1   हिल्टन यंग आयोग
2   चेंबर्लिन आयोग
3   फौलर समिती
4   मॅकलेगन समित✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2  मद्रास फर्टिलायझर ली.
3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4  वरील सर्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1  १९४६
2  १९३८√√√√√
3  १९२९
4  १९२५

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2  नवीन चलन निर्मिती
3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4  जमा झालेले महसूल√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1  रोख
2  बहुआयामी
3  शून्याधारीत√√√√√
4  यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1  पुरोगामी
2  न्याय्य
3  प्रतिगामी√√√√√√
4  प्रमाणशीर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.23 GST विधेयकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी रहित (non NDA) पहिले राज्य..... हे होते.
1  बिहार√√√√
2  केरळ
3  तामिळनाडू
4  तेलंगणा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.24  रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भरतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असे?
1  इंपिरियल बँक
2  बँक ऑफ बंगाल
3  बँक ऑफ मद्रास
4  ब्रिटिश भारत सरकार√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.25  ....... हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकारी आहेत.
1  CAG
2. CGA√√√√√
3.  वित्त सचिव
4   अर्थमंत्री

सराव प्रश्नसंच


1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

=====================

विधानसभा


विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

निवडणूक

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.


ग्रामपंचायत



ग्रामसभा ही एक ग्राम किंवा पंचायत निवडणार्‍या खेड्यांच्या गटांच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींची एक संघटना आहे.


एक गतिशील व प्रबुद्ध ग्रामसभा पंचायतीच्या राजांच्या यशाच्या केंद्रस्थानी आहे.


राज्य सरकारांना असे आवाहन करण्यात आले आहे: -


पंचायत (अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार) अधिनियम 1996 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार ग्रामसभेला अधिकार प्रदान करा.


प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, स्वातंत्र्यदिन आणि गांधी जयंतीनिमित्त देशभरात ग्रामसभा सभा आयोजित करण्यासाठी पंचायती राज कायद्यात अनिवार्य तरतुदींचा समावेश.


पंचायती राज कायद्यात विशेषत: ग्रामसभा सभा, सर्वसाधारण सभा व विशेष सभा आणि कोरमची पूर्तता न झाल्यामुळे सभा घेण्याबाबतच्या कोरमसंबंधी तरतूद जोडणे.


ग्रामसभेच्या सदस्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून देणे यासाठी की लोकसहभागाची खात्री करुन घ्यावी आणि विशेषत: उपेक्षित गट जसे की महिला आणि अनुसूचित जाती / जमातीमधील लोक यात सहभागी होऊ शकतात.


ग्रामसभेसाठी कार्यपद्धती तयार करणे ज्याद्वारे ते ग्रामविकास मंत्रालयाच्या लाभार्थीभिमुख विकास कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करतात आणि आर्थिक गैरव्यवस्थेची वसुली किंवा शिक्षेचा कायदेशीर हक्क मिळवू शकतात.


ग्रामसभेच्या बैठकीसंदर्भात व्यापक प्रचारासाठी कृती योजना तयार करणे.


ग्रामसभा सभा आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे / कार्यपद्धती तयार करणे.


नैसर्गिक स्रोतांबाबत ग्रामसभेच्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण करणे, भूमी अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे व समस्या सोडवणे.


Rd 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यात ग्रामीण पातळीवर स्वराज्य संस्था म्हणून सक्षम अशा मजबूत पंचायतींची कल्पना केली गेली आहे, जी खालील गोष्टी करण्यास सक्षम आहेत:


गावपातळीवर सार्वजनिक विकास कामे व त्यांची देखभाल नियोजन व पूर्ण करणे.


गाव पातळीवर लोकांचे कल्याण सुनिश्चित करून त्यात आरोग्य, शिक्षण, समुदाय बंधुत्व, सामाजिक न्याय विशेषत: लिंग आणि जाती-आधारित भेदभाव, संघर्ष सोडवणे, मुलांचे खासकरुन मुलींचे कल्याण असे विषय असतील.


Rd 73 व्या घटनादुरुस्तीमध्ये जनसंवाद म्हणून तळागाळातील सशक्त ग्रामसभेची कल्पना आहे, ज्यास ग्रामपंचायत जबाबदार असावी.

--------------------------------------------------

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...