Sunday 18 April 2021

एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! परीक्षांसाठी वाढवून मिळणार वयोमर्यादा

मागील वर्षी नियोजित असलेल्या 'एमपीएससी'च्या सर्वच परीक्षा कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 31 तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासांठी 33 वयोमर्यादा आहे. तर राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38 तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा निकष ओलांडला असून त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्‌स असोसिएशननेदेखील लावून धरली होती

या पार्श्‍वभूमीवर सामान्य प्रशानाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी वाढवून द्यावी, असे निर्देश आयोगाला दिले जाणार आहेत. तत्पूर्वी, राज्याच्या विविध विभागांमध्ये अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. मात्र, मेगाभरतीची प्रक्रिया अजूनही सुरु झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आणि कोरोनामुळे राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती ही दोन प्रमुख कारणे त्यामागे असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल

''कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांचा एक पेपर पुढे ढकलला आहे. परंतु, 2021 मध्ये होणाऱ्या पदभरतीत वयोमर्यादा संपलेल्या या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे एक संधी वाढवून दिली जाईल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.''

ठळक बाबी

- आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अभिप्रायानंतरच संयुक्‍त पूर्व परीक्षेचे ठरणार वेळापत्रक

- एप्रिलअखेर होणार वेळापत्रकाची घोषणा; 15 जूनपर्यंत परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन

- मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 420 उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न प्रलंबितच

- राज्याच्या विविध विभागांमध्ये 30 हजारांहून अधिक गट-'अ' व 'ब'ची पदे रिक्‍त; तरीही आयोगाकडे मागणीपत्र नाहीत

- 2021 च्या वेळापत्रकात वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव एक संधी

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...