Friday 12 February 2021

भारतीय हवामान विभागाचे “मौसम” मोबाइल अॅप



🔸भशास्त्र मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त, 27 जुलै 2020 रोजी भूशास्त्र मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी (IMD) "मौसम" नावाच्या मोबाइल अॅपचे अनावरण केले.


🔸ICRISAT ची डिजिटल कृषी व युवा चमू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (IITM), पुणे आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी संयुक्तपणे या अॅपची रचना केली आहे.


🔸तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी तयार केलेले हे मोबाइल अॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे. वापरकर्ते हवामान, हवामान अंदाज, रडार प्रतिमा यांचा वापर करू शकतात आणि त्यांना हवामानाच्या घडामोडींसंदर्भात सतर्कतेचा इशारा मिळू शकतो.


🌐मौसम मोबाइल अॅपवर खालील 5 सेवा उपलब्ध आहेतः


🔸वर्तमान हवामान - 200 शहरांसाठी दिवसातून 8 वेळा वर्तमान तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची सुधारित माहिती देण्यात आली आहे. सूर्योदय / सूर्यास्त आणि चंद्रोदय / चंद्रास्त याविषयीची माहिती देखील दिली आहे.


🔸नाऊकास्ट - IMDच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे 800 स्थानके आणि भारतातल्या जिल्ह्यांसाठी स्थानिक हवामानातल्या घटनेविषयी आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल दर तीन तासांनी इशारा देणे. तीव्र हवामानाच्या बाबतीत, त्याचा परिणाम देखील इशारामध्ये समाविष्ट केला आहे.


🔸शहरासाठीचा अंदाज - भारतातल्या सुमारे 450 शहरांमध्ये गेल्या 24 तास आणि 7 दिवसांचा हवामानाचा अंदाज उपलब्ध आहे.


🔸इशारा - नागरिकांना धोकादायक हवामानाबद्दल इशारा देण्यासाठी येत्या पाच दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांना दिवसातून दोनदा कलर कोडमध्ये (लाल-गंभीर परिस्थिती, नारिंगी- सावधगिरी व पिवळा- सूचना) इशारा दिला जाऊ शकतो.


🔸रडार उत्पादने - दर 10 मिनिटांनी नवीनतम स्टेशनद्वारे रडार माहिती अद्ययावत केली जाते.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भारतातल्या व्याघ्र गणनेचा नवीन गिनीज विक्रम लोकांना समर्पित करणार



🔸29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला नवीन गिनीज विक्रम भारतीय नागरिकांना समर्पित करणार आहेत.


🔸भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे. सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.


ठळक बाबी


🔸नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. वर्तमानात, जागतिक संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.


🔸वगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.


🔸वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे.


पार्श्वभूमी


🔸चार वर्षातून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ सारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरु आहे.


🔸वाघांचा वावर असणाऱ्या देशातल्या सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे जागतिक पातळीवर वाघांची संख्या 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करुन केला आहे. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन व्याघ्र संवर्धनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत मिळणार.

महाराष्ट्र सर्वाधिक लिंग गुणोत्तर



 पहिले पाच जिल्हे 


१) रत्नागिरी - ११२३

२) सिंधुदुर्ग - १०३७

३) गोंदिया - ९९६

४) सातारा - ९८६

५) भंडारा - ९८४


स्पर्धा परीक्षा तयारी-महाराष्ट्र सर्वात कमी लिंग गुणोत्तर


१) मुंबई शहर - ८३२

२) मुंबई उपनगर - ८६०

३) ठाणे - ८८६

४) पुणे - ९१५

५) बीड - ९१६


 महाराष्ट्र सर्वात कमी लिंग गुणोत्तर


   (0 ते 6 वयोगट)


१) बीड - ८०७

२) जळगांव - ८४२

३) अहमदनगर - ८५२

४) बुलढाणा - ८५५

५) औरंगाबाद - ८५८

उष्णता



उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.


थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.


जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.


वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.


पाण्याचे असंगत आचरण=>


सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.


परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.


0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.


पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.


पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.


बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.


थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃  पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.


तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.

____________________________

१५ वा वित्त आयोग



अध्यक्ष   : एन के सिंग 

सचिव    : अरविंद मेहता 

स्थापना  : नोव्हेंबर २०१७

अहवाल  : नोव्हेंबर २०१९

 

शिफारशी लागू असणारा कालावधी : सुरुवातीला एक वर्षासाठी लागू असतील


मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा ४२% वरून ४१ % करावा


करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - १७.९

२. बिहार 

३. मध्यप्रदेश 

४. पश्चिम बंगाल

५. महाराष्ट्र - ६.१ ( ५.५ वरून ६.१) (०.६ ची वाढ झाली )


सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - ०.३८८


करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : १५%

२. क्षेत्रफळ     : १५% 

३. वने आणि पर्यावरण : १०%

४. उत्पन्न तफावत : ४५% 

५. लोकसंख्या कामगिरी : १२.५ 

६. कर प्रयत्न : २.५


# २०११ ची लोकसंख्या वापरली आहे. आधी १९७१ ची वापरत होते. दक्षिणेकडील राज्यांना तोटा होऊ नये म्हणून एकूण जनन दर पहिल्यांदाच विचारात घेतला आहे.


#कर प्रयत्न हा नवीन घटक घेतला आहे


चलेजाव आंदोलन (१९४२).



घटनाक्रम


 क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.


 मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. 


 (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. 


 ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.


गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.


 कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.


 प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.


बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.


 या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.


सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.


या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.


 काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.


 व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.


मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.


 भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.


निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.


 स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.


 भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.


छोडो भारत चळवळ.


क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला.


ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले.


 देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.


नेताजी सुभाष चंद्र बोस...


भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. 


त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


आझाद हिंद सेना...


ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. 


नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 


१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.


भारतीय नौदलाचा उठाव..


आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. 


या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.


२०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल दहांमध्ये.



नवी दिल्ली : लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे.


‘‘ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंना यश मिळण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ‘लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ’ ही कनिष्ठ खेळाडूंसाठी असणारी योजना लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या योजनेतून १० आणि १२ वर्षांच्या गुणवान मुलांना हेरण्यात येणार आहे. भारताला क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सफल झाल्यास २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १०मध्ये असेल,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.


‘‘कनिष्ठ खेळाडूंसाठी असणाऱ्या योजनेमुळे कुमार-कुमारी पातळीवरील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना दर्जेदार प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. जेणेकरून लॉस एंजेलिस येथील ऑलिम्पिकमध्ये नाव उंचावण्यासाठी खेळाडू सज्ज होतील. नुकतीच भारतीय प्रशिक्षकांवरील दोन लाख रुपये पगाराची मर्यादादेखील दूर करण्याचा निर्णय घेतला होता. चांगले प्रशिक्षक मिळण्यासाठीच हा निर्णय घेतला,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर.


🔰१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. 


🔰तयाच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.


🔰छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.


🔰यदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.


🔰सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.


🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.


🔰महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.


🔰फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.


🔰आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

लोकसत्ता डॉट कॉम ठरली मराठीमधील नंबर वन न्यूज वेबसाईट.



🔰इंडियन एक्स्प्रेस समूहातील लोकसत्ता डिजिटलनं मराठी वृत्त माध्यमांमध्ये वादातीतरीत्या अग्रस्थान प्राप्त केलं आहे. डिसेंबरमध्ये लोकसत्ता वेबसाईटला १.३४ कोटी वाचकांनी भेट दिली.


🔰ताज्या ‘कॉमस्कोअर एमएमएक्स’ अहवालानुसार, लोकसत्ता डॉट कॉमनं डिसेंबर २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२ टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेस समूहाचा आघाडीचा मराठी न्यूज ब्रँड असलेल्या लोकसत्ता डॉट कॉमनं पाच प्रादेशिक वेबसाईट्सना वाचकसंख्या वाढीमध्ये मागे टाकलं आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यूज १८ लोकमत ( उणे ८ टक्के), ईसकाळ डॉट कॉम (उणे ९ टक्के), लोकमत डॉट कॉम (उणे १५ टक्के) व महाराष्ट्र टाइम्स (उणे ६० टक्के) या वेबसाईट्सचा समावेश आहे.


🔰इडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडिया सर्विसेसचे (IE Online Media Services) सीईओ संजय सिंधवानी यांनी लोकसत्ता डॉट कॉमने मिळवलेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. लोकसत्ता डॉट कॉम आघाडीवर राहण्यामध्ये नवीन वाचकसंख्येत झालेली ऑरगॅनिक वाढ, जुन्या वाचकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद हे महत्त्वाचे घटक असल्याचं सिंधवानी म्हणाले आहेत.


🔰“स्पर्धकांच्या तुलनेत आम्हाला मिळालेली आघाडी, आमच्या कंटेंटवर वाचकांचा विश्वास असल्याचं द्योतक आहे. लोकसत्ताच्या वेबसाइटवर जगभरातल्या मराठी वाचकांना उपयुक्त व अचूक कंटेट योग्य वेळी देणाऱ्या संपादकीय विभागाचं मी अभिनंदन करतो. वाचकांना सर्वसमावेशक कंटेंट मिळावा व त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा आनंददायी अनुभव यावा यासाठी संपादकीय विभागाबरोबर आमची संपूर्ण टीम सतत कार्यशील राहील,” असा विश्वास सिंधवानी यांनी व्यक्त केला.

मेड इन इंडिया’ Koo मध्ये चिनी गुंतवणूक, कंपनीच्या ‘सीईओं’ची कबुली; म्हणाले.



🔰शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वाद समोर आल्यापासून ‘मेड इन इंडिया’ Koo अ‍ॅप झपाट्याने लोकप्रिय होत आहे. ट्विटरला स्वदेशी पर्याय म्हणून Koo अ‍ॅपची चर्चा असून सरकारमधील काही मंत्रीही Koo अ‍ॅप वापरण्यास प्रोत्साहन देत आहेत. मात्र, या ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅपमध्ये चिनी गुंतवणूक असल्याचं समोर आलं आहे.


🔰कपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) अप्रम्या राधाकृष्णा यांनी CNBC-TV18 ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Koo अ‍ॅपमध्ये चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक असल्याचं सांगितलं. “शुनवेई कॅपिटल या चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक अ‍ॅपमध्ये आहे, पण त्यांचा हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे ते लवकरच यातून बाहेर पडतील”, असंही राधाकृष्णा यांनी स्पष्ट केलं.


🔰“शुनवेई कॅपिटलने सुरूवातीला आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता आम्ही ‘कू’ कडे लक्ष केंद्रीत केलं आहे, त्यामुळे शेनवाई लवकरच बाहेर पडेल”, असं राधाकृष्णा म्हणाले. शुनवेई कॅपिटलशिवाय ‘कू’मध्ये 3one4 कॅपिटल (माजी इन्फोसिस बोर्ड मेंबर मोहनदास पै यांची कंपनी), कलारी कॅपिटल आणि ब्लम व्हेंचर्स यांची गुंतवणूक आहे.

करोना लसीकरण संपताच CAA लागू होणार; अमित शाह यांची घोषणा.



🔰करोना लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिलं जाणार आहे. पश्चिम बंगालमधील रॅलीमध्ये बोलत असताना अमित शाह यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत आता त्यांची वेळ संपली असल्याचं म्हटलं.


🔰“दीदींची वेळ संपली आहे. बंगाल निवडणूक संपेपर्यंत ममतादीदी ‘जय श्री राम’ म्हणतील हे माझं आश्वासन आहे. भाजपाच्या नेतृत्वात पुढील सरकार स्थापन होईल. मी शंतनू ठाकूर यांना आश्वासन दिलं आहे की, मी येथे येऊन सीएएसंबंधी सर्व शंका दूर करणार आहे,” असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं.


🔰अमित शाह यांनी यावेळी आयुषमान योजना लागू केली जाणार असल्याचं आश्वासन देत शेतकऱ्यांना वार्षिक थकबाकी व्यतिरिक्त सहा हजारांची मदत केली जाईल असं सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर केंद्र सरकार ‘शरणार्थी कल्याण योजना’ राबवणार आहे असंही ते म्हणाले.


🔰“२०१८ मध्ये आम्ही सर्वांसाठी सीएए असं आश्वासन दिलं होतं. २०१९ मध्ये आम्हाला त्यांनी समर्थन दिलं आणि २०२० मध्ये सीएए आलं. ममता बॅनर्जी यांनी आपण सीएएला परवानगी देणार नाही असं म्हटलं होतं. आम्ही जे आश्वासन देतो ते पूर्ण करतो. करोना लसीकरण आणि महामारी संपताच आम्ही सीएए लागू करणार,” असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.

विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन: 11 फेब्रुवारी.



🔰दरवर्षी 11 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करतात.


🔰2021 साली ‘विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ “विमेन सायंटिस्ट्स अॅट द फोरफ्रंट ऑफ द फाइट अगेन्स्ट कोविड-19” या संकल्पनेखाली पाळला गेला आहे.


🔰यदा या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने, विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित (STEM) या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी, तसेच या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याची आणि राष्ट्रउभारणीत योगदान देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि माय जीओव्ही, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने एक ऑनलाईन मोहीम सुरू केली.


🔰गणित आणि विज्ञान या विषयात देशभरात ज्या मुलींनी उत्तम कामगिरी केली आहे त्यांचा सन्मान या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे आणि भावी काळात आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.


🔴पार्श्वभूमी..


🔰22 डिसेंबर 2015 रोजी संयुक्‍त राष्ट्रसंघ महासभेत दरवर्षी 11 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुली यांचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्याची घोषणा करणारा एक ठराव मंजूर करण्यात आला होता.


🔰या दिवशी विज्ञान क्षेत्रात स्त्रिया आणि मुलींचा सहभाग वाढवा या उद्देशाने अधिकाधिक प्रोत्साहन देऊन त्याबाबत जनजागृती केली जाते.

भारतात पहिल्यांदाच डिझेल ट्रॅक्टरला CNG ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित केले.



🔰भारतात पहिल्यांदाच डिझेल ट्रॅक्टरला CNG ट्रॅक्टरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे आता बहुउपयोगी ट्रॅक्टर डिझेल इंधनाचा वापर न करता कॉमप्रेस्ड नॅच्युरल गॅस (CNG) या इंधनाचा वापर करू शकणार, ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो.


🔰अश्या पहिल्या-वहिल्या ट्रॅक्टरचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 2021 रोजी झाले.


🔰रॉमट्ट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिल्ल इंडिया या कंपन्यांनी संयुक्तपणे केलेले हे रूपांतरण, शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढविण्यास आणि ग्रामीण भारतात नोकरीच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल.


🔰इधन खर्चावर वर्षाकाठी एक लक्षाहून अधिक रुपयांची बचत करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.


🔴CNGचे फायदे....


🔰कार्बन व इतर प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी असल्याने हे स्वच्छ इंधन आहे.

हे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे कारण यात शिसे नसून ते न गंजणारे, संहत आणि प्रदूषण न करणारे असल्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढविण्यात मदत करण्याबरोबरच नियमित देखरेखही कमी करावी लागते.


🔰डिझेल / पेट्रोल वरील वाहनांपेक्षा CNG वरील वाहनांचे सरासरी माइलेज चांगले आहे.ते सुरक्षित आहे कारण CNG टाक्या कडक सीलसह येतात, ज्यामुळे इंधन भरताना किंवा गळती झाल्यास स्फोट होण्याची शक्यता कमी असते.


🔰हा कचऱ्यातून संपत्तीचा एक भाग आहे कारण बायो-CNG तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कापणी पश्चात पिकांच्या अवशेषांचा उपयोग (परळी) केला जाऊ शकतो, जो शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील बायो-CNG उत्पादन केंद्रामध्ये विकून पैसे कमावण्यास मदत करेल.


🔰डिझेलच्या तुलनेत होणारे एकूण उत्सर्जन 70 टक्के कमी झाले आहे.

सध्याच्या डिझेलचे दर प्रति लिटर 77.43 रुपये आहेत तर CNG फक्त 42 रुपये प्रति किलो आहे.

भारतीय रेल्वेने सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ उपक्रमाची अंमलबजावणी केली.



🔰महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. त्याची आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये अंमलबजावणी झाली आहे. संपूर्ण प्रवासात महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.


🔴उपक्रमाविषयी....


🔰सप्टेंबर 2020 पासून दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने सुरू केलेला हा महत्वाकांक्षी उपक्रम भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये 17 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आला आहे.


🔰महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्यामार्फत (RPF) सुरू केलेले हे एक विशेष अभियान आहे.


🔰सरक्षा मदतक्रमांक (182) आणि GRP मदतक्रमांक (1512) याद्वारे महिलांना सुरक्षा पथकाशी संपर्कात राहता येते.


🔰‘मेरी सहेली’ ही महिला प्रवाशांची सतत सोबती म्हणून काम करते, जी त्यांची सुरक्षा केवळ सुरवातीच्या स्थानकापासून ते मार्गावरील स्थानकांवर, रेल्वे गाडीत आणि शेवटच्या स्थानकावर देखील करते. त्याच्या अंतर्गत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके महिला प्रवाशांसह सर्व डब्यांमध्ये जावून महिला प्रवाशांशी संवाद साधतात.


🔰रल्वे प्रवाशांचे नाव, PNR / तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक इत्यादी प्रवाशांचा तपशील देखील ‘मेरी सहेली’ पथक नोंदवते. हे तपशील मूळ स्थानक ते शेवटच्या स्थानकापर्यंत मार्गावरील इतर क्षेत्रांत, विभागांमध्ये सामायिक केले जातात.थांबलेल्या स्थानकांवर तैनात ‘मेरी सहेली’ पथक महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल विचारपूस करते.

भारत, चीनची सैन्यमाघारी.



🔰पर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. परिणामी़, पूर्व लडाखमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून सीमासंघर्षांमुळे भारत-चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव निवळण्याचे संकेत आहेत.


🔰पगाँग सरोवर येथून चीन आणि भारताच्या सैन्याने एकाच वेळी आणि संघटितपणे माघार घेण्यास सुरुवात केली असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू क्वियान यांनी बुधवारी सांगितले. भारत आणि चीन यांच्यात कमांडर पातळीवरील चर्चेतील नवव्या फेरीत झालेल्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याने क्विआन यांनी प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. मात्र, भारताने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


🔰गल्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारत (पान १० वर) (पान १ वरून) आणि चीन यांच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झाला. पँगाँग सरोवर परिसरात दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. गेल्या वर्षी १५-१६ जूनदरम्यान गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्या सैन्यात संघर्ष झाला होता. त्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. चीनचीही त्यात मनुष्यहानी झाली.

क्वाड’ देशांमुळे हिंद प्रशांत क्षेत्रात खुल्या व मुक्त व्यवस्थेस उत्तेजन.



🔰कवाड देशांच्या माध्यमातून अमेरिकेने हिंद उभारण्याचा प्रयत्न केला असल्याचे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत व जपान या देशांचा समावेश आहे. हा गट हिंद प्रशांत क्षेत्रात चिनी लष्कराची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे.


🔰अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, क्वाड हे अमेरिकेने हिंद प्रशांत क्षेत्रात खुली व मुक्त व्यवस्था तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मोठे फलित आहे. चीनने या भागात लष्करी कारवाया वाढवल्या असून त्या परिस्थितीत ही जागतिक पातळीवरची आघाडी चीनला काबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.


🔰दक्षिण व पूर्व चीन सागरात चीनने बऱ्याच भागांत प्रादेशिक वाद निर्माण केले असून कृत्रिम बेटे तयार करून त्यांचे लष्करीकरण केले आहे. चीनने दक्षिण चीन सागरावर दावा केला असला तरी तो व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई व तैवान यांनी अमान्य केला आहे. चीनचा जपानशीही प्रादेशिक वाद असून दक्षिण चीन  सागर व पूर्व चीन सागर हे दोन्ही खनिज संपत्ती व नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण आहेत. त्यामुळे जागतिक व्यापारात या भागांचे महत्त्वाचे स्थान आहे.

Latest post

चालू घडामोडी

Q1. पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले Ans: पश्चिम बंगाल Q2. संसद खेळ महाकुंभ ३.० चे आयोजन...