Friday 12 February 2021

लोकसत्ता डॉट कॉम ठरली मराठीमधील नंबर वन न्यूज वेबसाईट.



🔰इंडियन एक्स्प्रेस समूहातील लोकसत्ता डिजिटलनं मराठी वृत्त माध्यमांमध्ये वादातीतरीत्या अग्रस्थान प्राप्त केलं आहे. डिसेंबरमध्ये लोकसत्ता वेबसाईटला १.३४ कोटी वाचकांनी भेट दिली.


🔰ताज्या ‘कॉमस्कोअर एमएमएक्स’ अहवालानुसार, लोकसत्ता डॉट कॉमनं डिसेंबर २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२ टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेस समूहाचा आघाडीचा मराठी न्यूज ब्रँड असलेल्या लोकसत्ता डॉट कॉमनं पाच प्रादेशिक वेबसाईट्सना वाचकसंख्या वाढीमध्ये मागे टाकलं आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यूज १८ लोकमत ( उणे ८ टक्के), ईसकाळ डॉट कॉम (उणे ९ टक्के), लोकमत डॉट कॉम (उणे १५ टक्के) व महाराष्ट्र टाइम्स (उणे ६० टक्के) या वेबसाईट्सचा समावेश आहे.


🔰इडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडिया सर्विसेसचे (IE Online Media Services) सीईओ संजय सिंधवानी यांनी लोकसत्ता डॉट कॉमने मिळवलेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. लोकसत्ता डॉट कॉम आघाडीवर राहण्यामध्ये नवीन वाचकसंख्येत झालेली ऑरगॅनिक वाढ, जुन्या वाचकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद हे महत्त्वाचे घटक असल्याचं सिंधवानी म्हणाले आहेत.


🔰“स्पर्धकांच्या तुलनेत आम्हाला मिळालेली आघाडी, आमच्या कंटेंटवर वाचकांचा विश्वास असल्याचं द्योतक आहे. लोकसत्ताच्या वेबसाइटवर जगभरातल्या मराठी वाचकांना उपयुक्त व अचूक कंटेट योग्य वेळी देणाऱ्या संपादकीय विभागाचं मी अभिनंदन करतो. वाचकांना सर्वसमावेशक कंटेंट मिळावा व त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा आनंददायी अनुभव यावा यासाठी संपादकीय विभागाबरोबर आमची संपूर्ण टीम सतत कार्यशील राहील,” असा विश्वास सिंधवानी यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...