Friday 12 February 2021

२०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल दहांमध्ये.



नवी दिल्ली : लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे.


‘‘ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंना यश मिळण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ‘लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ’ ही कनिष्ठ खेळाडूंसाठी असणारी योजना लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या योजनेतून १० आणि १२ वर्षांच्या गुणवान मुलांना हेरण्यात येणार आहे. भारताला क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सफल झाल्यास २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १०मध्ये असेल,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.


‘‘कनिष्ठ खेळाडूंसाठी असणाऱ्या योजनेमुळे कुमार-कुमारी पातळीवरील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना दर्जेदार प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. जेणेकरून लॉस एंजेलिस येथील ऑलिम्पिकमध्ये नाव उंचावण्यासाठी खेळाडू सज्ज होतील. नुकतीच भारतीय प्रशिक्षकांवरील दोन लाख रुपये पगाराची मर्यादादेखील दूर करण्याचा निर्णय घेतला होता. चांगले प्रशिक्षक मिळण्यासाठीच हा निर्णय घेतला,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...