Friday 23 July 2021

ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद.



🔰२०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली.


🔰बधवारी मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल ३२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत.


🔰ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले, ”आमच्या सरकारला अभिमान आहे की आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.


🔰ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित क

अ‍ॅमेझॉनवीराची अवकाशवारी.



अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझॉस यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या वतीने पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली. स्वत:च्या अवकाशयानातून सफर करणारे ते आठवडाभराच्या अंतरातील दुसरे अब्जाधीश ठरले.


अ‍ॅमेझॉनचे संस्थापक असलेल्या बेझॉस यांच्यासमवेत त्यांचे बंधू आणि इतर दोघे होते. ब्लू ओरिजिन यानाच्या अग्निबाणास न्यू शेफर्ड असे नाव देण्यात आले होते. पश्चिम टेक्सासमधून हा अग्निबाण अपोलो ११ या चांद्रमोहिमेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनी अवकाशात झेपावला. नंतर सर्व जण तेथेच परतले. व्हर्जिन गॅलक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अलीकडे अशाच प्रकारे न्यू मेक्सिकोतून अवकाशवारी केली होती.


बेझॉस यांनी त्यांची योजना आधी जाहीर केलेली असताना ब्रॅन्सन यांनी त्यांची योजना मध्येच जाहीर करून आघाडी मारली होती. ब्रॅन्सन यांचे अग्निबाणयुक्त विमान होते, तर बेझॉस यांची कॅप्सूल होती; पण दोन्ही स्वयंनियंत्रित होते. ब्लू ओरिजिन यान ६६ मैल म्हणजे १०६ कि.मी. उंचीवर गेले होते.  बेझॉस यांचे अवकाशयान १० मैल म्हणजे १६ कि.मी. जास्त उंचीवर जाऊन आले. साठ फूट बूस्टरच्या मदतीने मॅक ३ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ३ पट वेगाने कॅप्सूल अवकाशात गेले. नंतर विलग झाले. प्रवाशांना तीन ते चार मिनिटे शून्य गुरुत्वाचा अनुभव घेता आला. त्यानंतर कॅप्सूल खाली जमिनीवर आले तेव्हा त्यांना सहापट गुरुत्व जाणवले. बेझॉस यांचे एक मोठे स्वप्न  पूर्ण झाले. वॅली फंक या महिला वैमानिक त्यांच्यासमवेत होत्या. ऑलिव्हिएर डेमेन यांनी २८ दशलक्ष डॉलर्स भरून या सफरीत पर्यटक म्हणून स्थान मिळवले.

उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंतचे सर्व ध्वजवाहक (१९२० ते २०२०)



👤 १९२० (बेल्जियम) : पी बॅनर्जी

👤 १९३२ (अमेरिका) : एल एस भोखारी

👤 १९३६ (जर्मनी) : मेजर ध्यानचंद

1️⃣ १९५२ (फिनलॅंड) : बलबीर सिंह सि.

2️⃣ १९५६ (स्वीडन) : बलबीर सिंह सि.

👤 १९६४ (टोकियो) : जी एस रंधावा 

👤 १९७२ (जर्मनी) : डिव्हिन जोन्स 

👤 १९८४ (अमेरिका) : जफर इक्बाल 

👤 १९८८ (द.कोरिया) : के डी सिंह

👩‍🦰 १९९२ (स्पेन) : एस अब्राहम विल्सन 

👤 १९९६ (अमेरिका) : पी सिंह

👤 २००० (ऑस्ट्रेलिया) : लिअँडर पेस

👩‍🦰 २००४ (ग्रीस) : अंजु बॉबी जॉर्ज 

👤 २००८ (बिजिंग) : राजवर्धन राठोड

👤 २०१२ (लंडन) : सुशिल कुमार 

👤 २०१६ (रिओ) : अभिनव बिंद्रा

👩‍🦰 २०२० (टोकियो) : मेरी कॉम व मनप्रीत

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...