Friday 23 July 2021

सातपुडा पर्वतरांगा



पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सिमेजवळ सातपुडा रांग पसरलेली आहे. महाराष्ट्रात सातपुड्याला नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ डोंगर म्हणतात. सातपुडा पर्वतरांगांचा काही भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आढळतो त्यास गाविलगड टेकड्या असे म्हणतात. बैराट शिखराची उंची १,१७७ मीटर तर चिखलदराची उंची १.११५ मीटर आहे.


 • सातपुडा पर्वतात नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात तोरणमाळ हे एक लहान आकाराचे पठार असून त्याची उंची १,०३६ मी आहे तर त्या भागातील सर्वात जास्त उंचीचे शिखर अस्तंभा डोंगर असून त्याची उंची १,३२५ मीटर आहे.

 

• अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात जीनगड डोंगर व दक्षिण भागात गाविलगड डोंगर असून त्यात बैराट (११७७ मी) हे उंच शिखर आहे. जीनगड डोंगरात मेळघाट हा दाट जंगलांचा विभाग आहे. या डोंगराच्या उत्तर सिमेकडून तापी नदी वाहते जळगांव जिल्ह्यांत पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागात हास्ती चे डोंगर असून त्यातील किसेरसेंचा (५३५ मी) हा उंच भाग आहे.


 • गाविलगड पर्वतात अमरावती जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणालाच विदर्भाचे महाबळेश्वर असेही म्हणतात. या विभागात तोरणमाळचे डोंगर (१९६० मी) व अस्तंभा डोंगर (१३२५ मी) हे प्रमुख डोंगर आहेत.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...