Wednesday 5 July 2023

पोलीस भरती प्रश्नसंच

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर



 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...